Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

Translate

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image
Showing posts with label सातवी मराठी. Show all posts
Showing posts with label सातवी मराठी. Show all posts

Sunday, 31 January 2021

Sunday, 10 January 2021

Thursday, 31 December 2020

December 31, 2020

इयत्ता 7 वी मराठी 17 .थेंब आज हा पाण्याचा (कविता )

इयत्ता 7 वी मराठी 17 .थेंब आज हा पाण्याचा (कविता )



अर्थ -  आपण बोलत असलेल्या  शब्दांपेक्षा अर्थाला जास्त महत्त्व आहे; म्हणून शब्द जाऊ दे व अर्थ राहू दे. आभाळातून पडणारा जीवनाला खूप मूल्यवान असणारा जो पाण्याचा थेंब आहे, तो गाण्याचा विषय होऊ दे. असे कवितेत म्हटले आहे .

पावसाच्या सरीमधून हे थेंब मोती बनून सरसर खाली येतात. जणू एखादी सुंदर परी थेंबांची माळ ओवते आणि  ती माळ निसटून मोती विखुरतात, तेव्हा ती बावरते. या मोतीरूपी थेंबांचा संग्रह कर; कारण यावरच तुझे सर्व   जगणे अवलंबून आहे. आभाळातून बहुमोल असा आज पाण्याचा थेंब तुझ्यासाठीच खाली येत आहे. 

आभाळातले हे मोती मातीवर बरसतात व त्यातून मोत्यांसारखी पिके येतात. निसर्गाला पाण्याचे मोल कळले आहे. माणसे मात्र संकुचित वृत्तीने वागतात. माणसे खणखणणाऱ्या तिजोरीत असलेल्या नाण्यांचा (पैशांचा) संग्रह करण्यात धन्यता मानतात. आभाळातून मूल्यवान बरसणाऱ्या पाण्याच्या थेंबांकडे दुर्लक्ष पुन्हा करतात. 

माणसाचा  संपत्ती गोळा करण्याचा हा वेडा नाद कशासाठी ? यांत तुम्ही स्वत: फसत आहात. निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन आता तरी बदलायला हवा. पाण्याचा आदर करायला हवा. सोन्याचा घोट घेऊन तुझी तहान शमेल का?तहानेसाठी आभाळातून बरसणारा बहुमोल पाण्याचा  थेंबच  आवश्यक आहे. असे कवितेत वर्णिले आहे .

Monday, 30 November 2020

Sunday, 29 November 2020