Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

Translate

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image
Showing posts with label 6 th Engilsh. Show all posts
Showing posts with label 6 th Engilsh. Show all posts

Monday, 15 February 2021

February 15, 2021

Class 6 th English Unit Four 4.6 - The Worth of A Fabric Story

Class 6 th English Unit


Four 4.6 - The Worth of  A Fabric Story


दोन हजार वर्षापूर्वी थीरुवल्लुवर नावाचा संत होऊन गेला. तो व्यवसायाने विणकर होता. अतिशय शांत, कमी बोलणारा, कधीही कोणावर न मुद्रा रागावणारा अशी त्याची ख्याती होती. त्याच गावात एक श्रीमंत उनाड मुलगा राहात होता. तो कुठलाही काम धंदा करत नसे. आपले मित्र जमा करणे आणि गावभर भटकून इतरांना त्रास देणे  हाच त्याचा उदयोग होता. जेव्हा थिरुवल्लुवरच्या शांत स्वभावाविषयी त्याने ऐकले तेव्हा त्याचा त्यावर विश्वास बसला नाही. एखाद्या व्यक्तिला रागच येत नाही हे तो मान्य करायला तयार नव्हता. 

एक दिवस तो आपल्या मित्रांना म्हणाला, "आज  मी थिरुवल्लुवरला राग आणतो की नाही ते बघाच, मला खात्री आहे की तो आज रागावल्याशिवाय राहणार नाही. असे म्हणून तो आपल्या मित्रांना घेऊन बाजारात थिरुवल्लुवरच्या दुकानात गेला. कपड्याच्या गठ्ठातील एक सुंदर कापड निवडून हातात घेतले आणि विचारले, काय दर आहे या कापडाचा ? संत थिरुवल्लुवर म्हणाले आठ मुद्रा. 

   तरुणाने कापड उकलले आणि मधून फाडून त्याचे दोन तुकडे केले आणि विचारले, आता या कापडाची किमती किती चार मुद्रा थिरुवल्लुवर शांतपणे म्हणाले. तरुणाला उत्तर ऐकून आश्चर्य वाटले आणि तो विचार करू लागला, या माणसाला राग का येत नाही. रागाने त्याने आधीच फाडलेल्या कापडाचे अजून दोन तुकडे केले आणि विचारले आता, याची किंमत ? उत्तर आले. दोन मुद्रा. आता मात्र तरुण भलताच संतापून हातवारे करू लागला. त्याला स्वतःला काबूत ठेवणे अशक्य झाले आणि त्याने त्या कापडाच्या चिंध्या करायला सुरुवात केली. प्रत्येक वेळेस तो विचारायचा आता याची किमंत किती ?" थिरुवल्लुवर प्रत्येक वेळेस फाटलेल्या कापडाची किंमत कमी करत होता. सरतेशेवटी कापडचे फक्त तुकडेच शिल्लक राहिले. थिरुवल्लूवर त्यावर शांतपणे म्हणाले. “आता हे कापड संपूर्ण ख़राब झाले आहे त्यामुळे आता त्याला कुठलीच किंमत उरली नाही. हे ऐकून तरुणाला काय बोलावे हेच कळेना. पण त्याला त्याच्या श्रीमंतीचा गर्व होता. म्हणून त्याने संत थिरुवल्लुवरला आठ मुद्रा देऊ केल्यात. ते बघून थिरुवल्लुवर प्रथमच त्या तरुणाकडे बघून हसले. पण त्यांनी मुद्रा घेण्यास नकार दिला आणि म्हणाले, हे तरुण माणसा आता हे कापड कोणाच्याच उपयोगाचे राहिलेले नाही. त्यामुळे त्याला कुठलीही किमंत राहिलेली नाही. कारण हे वस्त्र आता कोणीही परिधान करू शकणार नाही. तुला कदाचित याची कल्पना नसेल की हे कापड तयार होण्यासाठी अनेकांनी कष्ट उपसले आहेत. हे कापड काही एका दिवसात तयार झालेले नाही. यासाठी सर्व प्रथम शेतकऱ्याने मेहनत घेऊन सरकी पेरली, कापसाच्या रोपट्याची त्याने उन्हा- तान्हात काळजी घेतली. कापसाच्या बोंडाकधून कापूस वेचला त्याला जिनामध्ये पाठवून त्याची सरकी वेगळी केली. त्यानंतर त्या रुई पासून एकसारखा लांब धागे तयार केले. त्यानंतर हे धागे हातमागावर विणून मी आणि माझ्या बायकोनी वेगवेगळ्या रंगसंगतीचे सुंदर चित्रे, आकृत्या असलेले कापड तयार केले.कापड पूर्ण झाल्यावर आम्हाला असे वाटले की कोणीतरी आनंदाने हे कापड़ विकत घेईल व परिधान करेल. व आम्हाला आम्ही केलेल्या मेहनतीचे बक्षीस मिळेल. परंतु जेव्हा तू ह्या कापडाच्या चिंध्या केल्यास त्याचवेळेस तू आमच्या प्रेमाचा आणि कष्टाचा चुराडा केलास. हे झालेले नुकसान पैशाने कधीही भरून येवू शकत नाही.

संत थिरुवल्लुवरांचे वरील शब्द तरुणाच्या हृदयाला भिडले. आणि त्याला आता स्वत:ची लाज वाटायला लागली. ते पुढे म्हणाले, “मी यासारखे दुसरे कापड पुन्हा विणू शकतो. परंतु आपले जीवन देखील या कापडासारखेच आहे. जर तुम्ही ते अतिरेकी अविचाराने फाडून टाकले तर ते नाश होईल. आणि ते तुम्हाला पुन्हा परत मिळणार नाही.' संत थिरुवल्लूवरांच्या शब्दाने त्या तरुणाचे डोळे उघडले आणि तद्नंतर त्या तरुणाने त्याच्या सर्व वाईट सवयींचा आणि आळशीपणाचा नेहमीसाठी त्याग केला.

Friday, 1 January 2021

Friday, 27 November 2020

Monday, 5 October 2020

October 05, 2020

6 - English -2.6 - How Glass is Made

2.6-How Glass is Made




 How glass is made : (काच कशी तयार केली जाते :)

दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या अनेक वस्तू तयार करण्याकरिता वापरली जाणारी काच, हे मानवनिर्मित साहित्य आहे. ती कशापासून तयार केली जाते, याचा अंदाज तुम्ही करू शकता का ? तुम्हांला अविश्वसनीय वाटेल: परंतु ही स्वच्छ, पारदर्शक आणि गुळगुळीत वस्तू प्रत्यक्षात वाळूपासून तयार केलेली  असते ! स्वच्छ, शुभ्र वाळू आणि सोडा व चुना यांसारखी रसायने यांच्या मिश्रणाला उष्णता देऊन, काच तयार केली जाते. त्या मिश्रणाचे उष्ण, द्रवरूप काचेत रूपांतर होईपर्यंत ते एका भट्टीत तापवले जाते. ते जेव्हा थंड होते तेव्हा ते घट्ट आणि कठीण होते.

How glass is shaped : (काचेला आकार कसा दिला जातो :)

एकदा का काच थंड, घट्ट आणि कठीण झाली, की तिला आकार देणे शक्य होत नाही. काच ठिसूळ असते. म्हणजे, ती सहजपणे फुटते. ती उष्ण आणि मऊ असतानाच तिला निरनिराळ्या वस्तूंचा आकार दिला जाऊ शकतो.  अतिशय उष्ण काच खूपशी द्रवरूप असते-तुम्ही ती ओतू शकता, मुशीत घालून आकार देऊ शकता, गुंडाळू शकता, तिच्यावर दाब देऊ शकता किंवा निरनिराळे आकार देण्याकरिता हवेने फुगवूही शकता.उष्ण द्रवरूप काच साच्यात ओतली जाते आणि विविध आकारांच्या आणि मापांच्या वस्तु तयार करण्याकरिता कडक (कठीण) केली जाते. काचेचे सपाट ताव तयार करण्यासाठी ती काच लाटलीसुद्भा जाऊ शकते, दुसरया एका प्रक्रियेत, वितळलेली काच, वितळवलेल्या धातूच्या सपाट थरावर समान जाडीचे काचेचे सपाट ताव तयार करण्याकरिता पसरवले जातात. उष्ण द्रवरूप काचेच्या गोळयात हवा फुंकून तिच्यापासून बाटल्या, बल्थ, ग्लास आणि इतर वस्तू तयार करता येऊ शकतात. द्रवरूप काचेतून अत्यंत सूक्ष्म धागे किंवा काचेचे लोकरी धागे काढले जातात.

Some properties of glass : (काचेचे काही गुणधर्म :)

काचेचे अनेक उपयुक्त गुणधर्म आहेत. ती पारदर्शक असते- तुम्ही तिच्यामधून आरपार पाहू शकता. तो मजबूत व कठीण असते. तुम्ही तिच्यावर भरपूर वजन ठेवू शकता. ती द्रवरोधक असते- ती पाणी किंवा इतर द्रवपदार्थ तिच्यामधून आरपार जाऊ (झिरपू) देत नाही आणि ती ओलसर राहत नाही किंवा तिच्यावर डागही राहत नाहीत. काचेच्या भांड्यात ठेवलेल्या (साठवलेल्या) अन्न, पाणी किंवा इतर पदार्थांवर काचेचा कोणताही परिणाम होत नाही. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, तो त्या पदार्थांना वास किंवा चव संक्रमित करीत नाही. सामान्य काचेचा पृष्ठभाग गुळगुळीत असतो आणि ती सहजपणे धुतली जाऊ शकते. शेवटची परंतु कमी महत्त्व नसलेली बाब म्हणजे, ती फार सुंदर दिसते. इतक्या मोठ्या प्रमाणात वस्तू तयार करण्याकरिता तिचा उपयोग केला जातो, यात काही नवल नाही.

Coloured Glass : (रंगीत काच : )

सर्वसाधारण (सामान्य) काच रंगहीन असते;B परंतु काच तयार करण्याच्या प्रक्रियेत विविध प्रकारची रसायने मिसळून रंगीत व पारदर्शक काचेची निर्मिती करणे शक्य असते. निळा, गडद जांभळा, हिरवट निळा, माणिकासारखा लाल, गुलाबी, पिवळसर-तपकिरी, नारिंगी, केशरी रंग, गडद पिवळा, नीलमण्यासारखा जांभळट रंग, गडद हिरवा, अगदी काळा आणि पांढरासुद्धा - असे अनेक सुंदर रंग काचेला दिले जाऊ शकतात!

Staincd Glass : (नक्षीदार रंगीत काच : )

रंगीत काचेचा उपयोग सुंदर चित्रे तयार करण्यासाठी खासकरून खिडक्यांची तावदाने तयार करण्याकरिता केला जातो. अशा खिडक्यांना नक्षीदार रंगीत खिडक्या म्हणतात. त्या प्रामुख्याने चर्चमध्ये दिसतात. सुंदर शिल्पकाम किंवा शोभादायक वस्तू तयार करण्याकरिता रंगोत काच वापरतात. काचेवर खास रसायने आणि प्रक्रिया वापरून रंगवणे सुद्धा शक्य असते.

Glass can be recycled : (काच पुन्हा उपयोगात आणण्याकरिता तिच्यावर प्रक्रिया करता येऊ शकते : )

काचेचे दुसरे एक अद्वितीय वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे-ती 100% पुन्हा उपयोगात आणली जाऊ शकते. जुनी काच कितीही वेळा नवीन काच तयार करण्यासाठी वापरली जाऊ शकते. पुन्हा उपयोगात आणलेली अशा प्रकारची काच कच्च्या मालापासून तयार केलेल्या नवीन काचेपेक्षा अधिक स्वस्त असते. तिला खूप कमी उष्णता लागते. त्यामुळे खूपशी ऊर्जा वाचवली जाते. तुम्ही एकच एक काचेच्या बाटलीवर पुन्हा वापरण्याकरिता प्रक्रिया केली, तर तुम्ही रंगीत टी.व्ही. सुमारे 20 मिनिटे वापरता येईल एवढी ऊर्जा वाचवता म्हणून, पुढील काळात काचेची बाटली फेकून देताना, विचार करा ! काच ही मौल्यवान वस्तू आहे.