How glass is made : (काच कशी तयार केली जाते :)
दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या अनेक वस्तू तयार करण्याकरिता वापरली जाणारी काच, हे मानवनिर्मित साहित्य आहे. ती कशापासून तयार केली जाते, याचा अंदाज तुम्ही करू शकता का ? तुम्हांला अविश्वसनीय वाटेल: परंतु ही स्वच्छ, पारदर्शक आणि गुळगुळीत वस्तू प्रत्यक्षात वाळूपासून तयार केलेली असते ! स्वच्छ, शुभ्र वाळू आणि सोडा व चुना यांसारखी रसायने यांच्या मिश्रणाला उष्णता देऊन, काच तयार केली जाते. त्या मिश्रणाचे उष्ण, द्रवरूप काचेत रूपांतर होईपर्यंत ते एका भट्टीत तापवले जाते. ते जेव्हा थंड होते तेव्हा ते घट्ट आणि कठीण होते.
How glass is shaped : (काचेला आकार कसा दिला जातो :)
एकदा का काच थंड, घट्ट आणि कठीण झाली, की तिला आकार देणे शक्य होत नाही. काच ठिसूळ असते. म्हणजे, ती सहजपणे फुटते. ती उष्ण आणि मऊ असतानाच तिला निरनिराळ्या वस्तूंचा आकार दिला जाऊ शकतो. अतिशय उष्ण काच खूपशी द्रवरूप असते-तुम्ही ती ओतू शकता, मुशीत घालून आकार देऊ शकता, गुंडाळू शकता, तिच्यावर दाब देऊ शकता किंवा निरनिराळे आकार देण्याकरिता हवेने फुगवूही शकता.उष्ण द्रवरूप काच साच्यात ओतली जाते आणि विविध आकारांच्या आणि मापांच्या वस्तु तयार करण्याकरिता कडक (कठीण) केली जाते. काचेचे सपाट ताव तयार करण्यासाठी ती काच लाटलीसुद्भा जाऊ शकते, दुसरया एका प्रक्रियेत, वितळलेली काच, वितळवलेल्या धातूच्या सपाट थरावर समान जाडीचे काचेचे सपाट ताव तयार करण्याकरिता पसरवले जातात. उष्ण द्रवरूप काचेच्या गोळयात हवा फुंकून तिच्यापासून बाटल्या, बल्थ, ग्लास आणि इतर वस्तू तयार करता येऊ शकतात. द्रवरूप काचेतून अत्यंत सूक्ष्म धागे किंवा काचेचे लोकरी धागे काढले जातात.
Some properties of glass : (काचेचे काही गुणधर्म :)
काचेचे अनेक उपयुक्त गुणधर्म आहेत. ती पारदर्शक असते- तुम्ही तिच्यामधून आरपार पाहू शकता. तो मजबूत व कठीण असते. तुम्ही तिच्यावर भरपूर वजन ठेवू शकता. ती द्रवरोधक असते- ती पाणी किंवा इतर द्रवपदार्थ तिच्यामधून आरपार जाऊ (झिरपू) देत नाही आणि ती ओलसर राहत नाही किंवा तिच्यावर डागही राहत नाहीत. काचेच्या भांड्यात ठेवलेल्या (साठवलेल्या) अन्न, पाणी किंवा इतर पदार्थांवर काचेचा कोणताही परिणाम होत नाही. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, तो त्या पदार्थांना वास किंवा चव संक्रमित करीत नाही. सामान्य काचेचा पृष्ठभाग गुळगुळीत असतो आणि ती सहजपणे धुतली जाऊ शकते. शेवटची परंतु कमी महत्त्व नसलेली बाब म्हणजे, ती फार सुंदर दिसते. इतक्या मोठ्या प्रमाणात वस्तू तयार करण्याकरिता तिचा उपयोग केला जातो, यात काही नवल नाही.
Coloured Glass : (रंगीत काच : )
सर्वसाधारण (सामान्य) काच रंगहीन असते;B परंतु काच तयार करण्याच्या प्रक्रियेत विविध प्रकारची रसायने मिसळून रंगीत व पारदर्शक काचेची निर्मिती करणे शक्य असते. निळा, गडद जांभळा, हिरवट निळा, माणिकासारखा लाल, गुलाबी, पिवळसर-तपकिरी, नारिंगी, केशरी रंग, गडद पिवळा, नीलमण्यासारखा जांभळट रंग, गडद हिरवा, अगदी काळा आणि पांढरासुद्धा - असे अनेक सुंदर रंग काचेला दिले जाऊ शकतात!
Staincd Glass : (नक्षीदार रंगीत काच : )
रंगीत काचेचा उपयोग सुंदर चित्रे तयार करण्यासाठी खासकरून खिडक्यांची तावदाने तयार करण्याकरिता केला जातो. अशा खिडक्यांना नक्षीदार रंगीत खिडक्या म्हणतात. त्या प्रामुख्याने चर्चमध्ये दिसतात. सुंदर शिल्पकाम किंवा शोभादायक वस्तू तयार करण्याकरिता रंगोत काच वापरतात. काचेवर खास रसायने आणि प्रक्रिया वापरून रंगवणे सुद्धा शक्य असते.
Glass can be recycled : (काच पुन्हा उपयोगात आणण्याकरिता तिच्यावर प्रक्रिया करता येऊ शकते : )
काचेचे दुसरे एक अद्वितीय वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे-ती 100% पुन्हा उपयोगात आणली जाऊ शकते. जुनी काच कितीही वेळा नवीन काच तयार करण्यासाठी वापरली जाऊ शकते. पुन्हा उपयोगात आणलेली अशा प्रकारची काच कच्च्या मालापासून तयार केलेल्या नवीन काचेपेक्षा अधिक स्वस्त असते. तिला खूप कमी उष्णता लागते. त्यामुळे खूपशी ऊर्जा वाचवली जाते. तुम्ही एकच एक काचेच्या बाटलीवर पुन्हा वापरण्याकरिता प्रक्रिया केली, तर तुम्ही रंगीत टी.व्ही. सुमारे 20 मिनिटे वापरता येईल एवढी ऊर्जा वाचवता म्हणून, पुढील काळात काचेची बाटली फेकून देताना, विचार करा ! काच ही मौल्यवान वस्तू आहे.
No comments:
Post a Comment