Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

Translate

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image
Showing posts with label स्वाध्यायमाला सातवी bhugol. Show all posts
Showing posts with label स्वाध्यायमाला सातवी bhugol. Show all posts

Thursday, 29 October 2020

October 29, 2020

स्वाध्यायमाला - प्रश्नोत्तरे इयत्ता सातवी भूगोल 6 - नैसर्गिक प्रदेश

स्वाध्यायमाला - प्रश्नोत्तरे इयत्ता सातवी  भूगोल  6  -  नैसर्गिक प्रदेश 


गाळलेल्या जागी कंसांतील योग्य पर्याय लिहा :

उत्तरे : 

(१) हिवाळी पर्जन्य हे भूमध्य सागरी प्रदेशाचे वैशिष्ट्य आहे.

(२) भारताचा बहुतांश भाग हा मोसमी प्रदेशात मोडतो. 

(३) उष्ण वाळवंटी प्रदेशात निवडुंग ही वनस्पती प्रामुख्याने आढळते.

प्रश्न .  पुढील विधाने लक्षपूर्वक वाचा. चूक असल्यास विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा :

(৭) पश्चिम युरोपीय प्रदेशांतील लोक सौम्य व उबदार हवामानामुळे उत्साही नसतात.

उत्तर : चूक.      पश्चिम  युरोपीय प्रदेशांतील लोक सौम्य व उबदार हवामानामुळे उत्साही असतात.

(२) प्रेअरी प्रदेशाला जगातील गव्हाचे कोठार'म्हणतात.

उत्तर : बरोबर,

(३) भूमध्य सागरी प्रदेशातील झाडांची पाने मेणचट असतात आणि झाडांची साल फार जाड़ असते. झाडांतील पाण्याचे बाष्पीभवन जास्त होते.

उत्तर : चूक, भूमध्य सागरी प्रदेशातील झाडांची पाने मेणचट असतात आणि झाडांची साल फार जाड असते. झाडांतील पाण्याचे बाष्पीभवन कमी होते.

(४) उष्ण वाळवंटी प्रदेशात 'उंट' हा महत्त्वाचा प्राणी आहे, कारण तो अन्नपाण्याशिवाय दीर्षकाळ राहतो, तसेच तो वाहतुकीसाठी उपयोगी आहे.

उत्तर : बरोबर.

(५) वाघ, सिंह यांसारखे मांसभक्षक प्राणी विषुववृत्तीय प्रदेशांत जास्त आढळतात.

उत्तर : चूक. वाघ, सिंह यांसारखे मांसभक्षक प्राणी मोसमी प्रदेशात व गवताळ ( सुदान) प्रदेशात जास्त आढलतात.

प्रश्न . पूढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा :

(१) शीत पट्ट्यातील नैसर्गिक प्रदेश कोणते ?

उत्तर : टुंड़ा प्रदेश व तैगा प्रदेश है शीत पट्यातील नैसर्गिक प्रदेश होत.

(२) गवताळ प्रदेशात प्रामुख्याने कोणत्या जमातीचे लोक राहतात?

उत्तर : गवताळ प्रदेशात प्रामुख्याने झुलू, हौसा, मसाई इत्यादी जमातीचे लोक राहतात.

(३) त्से-त्से माश्या प्रामुख्याने कोणत्या प्रदेशात आढळतात?

उत्तर : त्से-त्से माश्या प्रामुख्याने विषुववृत्तीय प्रदेशात आढळतात.

(४) उष्ण वाळवंटी प्रदेशात कोणत्या ठिकाणी शेती केली जाते ?

उत्तर : उष्ण वाळवंटी प्रदेशात मरूदधाने व नदयांची खोरी या ठिकाणी शेती केली जाते.

(५) भूमध्य सागरी प्रदेशात कोणत्या संस्कृतींचा विकास झाला ?

उत्तर : भूमध्य सागरी प्रदेशात ग्रीक य रोमन संस्कृतींचा विकास झाला.

(६) तैगा प्रदेशाचा विस्तार कोणत्या अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे ?

उत्तर : तैगा प्रदेशाचा विस्तार सुमारे ५५ ते ६५' उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे.

प्रश्न. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा :

(१) सुदान प्रदेशातील कोणतेही तीन तृणभक्षक प्राणी सांगा. त्यांच्या स्वसंरक्षणासाठी निसर्गाने कोणती व्यवस्था केली आहे ?

उत्तर : (अ) सुदान प्रदेशातील तीन तृणभक्षक प्राणी : जिराफ, झेब्रा, कांगारू.

(ब) स्वसंरक्षणासाठी निसर्गने केलेली व्यवस्था : सुदान प्रदेशातील तृणभक्षक प्राण्यांना निसर्गाने चपळ पाय दिले आहेत. मांसभक्षक प्राण्यांनी शिकारीसाठी हल्ला केला असता, तृणभक्षक प्रायांना त्यांच्या चपळ पायांनी मासभक्षक प्राण्यांपासून अत्यंत वेगात दूर पळणे शक्य होते व त्यामुळे त्यांना स्वतःच्या जीवाचे रक्षण करता येते.

(२) मोसमी प्रदेशांखाली दिलेली वैशिष्टये कोणती?

उत्तर : मोसमी प्रदेशांखाली दिलेली महत्वाची वैशिष्टे पुढीलप्रमाणे होत : 

(१) हवामानाशी संबंधित वैशिष्ट्ये : मोसमी प्रदेशात उन्हाल्यातील सरासरी तापमान सुमारे २७' से. ते ३२' से असते. हिवाळयातील तापमान सुमारे १५ से ते २४ से असते. मोसमी प्रदेशात नैऋत्य मान्सून वारयापासून ठरावीक ऋतूंत पाऊस पडतो. पावसाचे प्रमाण सरासरी २५० ते २५०० मिमी असते. या प्रदेशात पावसाचे असमान व अनिश्चित वितरण आढळून येते

(२) नैसर्गिक वनस्पतींशी संबंधित वैशिष्ट्ये : मोसमी प्रदेशात पानझडी व निमसदाहरित वने आढळतात. या प्रदेशात पावसाच्या वितरणानुसार वनस्पती प्रकार दिसून येतात. 

(३) मानवी जीवनाशी संबंधित वैशिष्ट्ये : मोसमी प्रदेशात अनेक लहान लहान असंख्य खेडी आढळतात. या प्रदेशातील लोकांच्या अन्नात व पोशाखात विविधता आदळते. या प्रदेशातील बहुतांश लोकसंख्या प्रामुख्याने प्राथमिक व्यवसायांत गुंतलेली आढळते. या प्रदेशातील बहुतांश लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे.

(३) मोसमी प्रदेशाचे स्थान सांगा. या प्रदेशात प्रामुख्याने कोणत्या भूभागांचा समावेश होतो?

उत्तर : (अ) मोसमी प्रदेशाचे स्थान : मोसमी प्रदेशाचे स्थान हे विषुववृत्ताच्या उत्तरेस व दक्षिणेस १०° ते ३०° अक्षृत्तांच्या दरम्यान आहे. (ब) मोसमी प्रदेशात समाविष्ट होणारे भूभाग : मोसमी प्रदेशात प्रामुख्याने भारत, फिलिपाइन्स, वेस्ट इंडिज, उत्तर ऑस्ट्रेलिया, पूर्व आफ्रिका, मध्य अमेरिका इत्यादी भूभागांचा समावेश होतो.

(४) मोसमी प्रदेशातील प्राणिजीवनाची माहिती लिहा.

उत्तर : (१) मोसमी प्रदेशात विविध प्रकारचे प्राणी व पक्षी आढळतात. (२) या प्रदेशात प्रामुख्याने वाघ, सिंह, बिबट्या, हत्ती, लांडगे, रानडुकरे, माकडे, साप इत्यादी वन्य प्राणी आढळतात. याशिवाय गाई, म्हशी, शेळया, घोडे हे पाळीव प्राणी आढळतात. (३) याशिवाय मोर, कोकीळ इत्यादी वन्य पक्षी आढळतात.

(५) वाघ, सिंहासारखे प्राणी विषुववृत्तीय वनांच्या प्रदेशांत का आढळत नाहीत ?

उत्तर : (१) वाघ, सिंह यांसारखे प्राणी तृणभक्षक प्राण्यांची शिकार करतात. तृणभक्षक प्राणी हे प्रामुख्याने मोसमी प्रदेशात व गवताळ प्रदेशांत मोठ्या प्रमाणावर आढळतात. परिणामी वाघ, सिंह यांसारखे प्राणी मोसमी प्रदेशात व गवताळ प्रदेशांत मोठ्या प्रमाणावर आढळतात. (२) विषुववृत्तीय वनांमध्ये खूप उंच वृक्ष आढळतात व येथे गवताचे प्रमाण कमी असते. त्यामुळे विषुववृत्तीय प्रदेशात तृणभक्षक प्राणी आढळत नाहीत. त्यामुळे वाघ, सिंहासारखे प्राणी विषुववृत्तीय वनांच्या प्रदेशांत आढळत नाहीत.

(६) नैसर्गिक साधनसंपत्तीच्या सुयोग्य वापराविषयी माहिती लिहा.

उत्तर : (१) वेगवेगळ्या नैसर्गिक प्रदेशांत विविध प्रकारचे पर्यावरण व नैसर्गिक साधनसंपत्ती उपलब्ध असते (२) नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर हा त्या त्या प्रदेशांतील विज्ञानाच्या आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीवर अवलंबून असतो (३) त्याचप्रमाणे त्या प्रदेशाचा इतिहास व सांस्कृतिक जडणघडण यांचाही नैसर्गिक साधनसंपत्तीच्या वापरावर व परिणामी तेथील लोकजीवनावर प्रभाव असतो. (४) नैसर्गिक साधनसंपत्तीवर केवळ मानवाचेच नव्हे तर पृथ्वीवरील इतर सर्वच सजीवांचे जीवन अवलंबून असते. (५) त्यामुळे नैसर्गिक प्रदेशातील साधनसंपत्तीचा वापर करताना आपल्याबरोबरच इतर सजीवांचा देखील विचार करणे आवश्यक आहे.

प्रश्न . पुढील विधानांची भौगोलिक कारणे लिहा :

(৭) मोसमी प्रदेशात प्रामुख्याने शेती व्यवसाय करतात.

उत्तर : (१) मोसमी प्रदेशात नैॠ्रत्य मान्सून वान्यांपासून ठरावीक ऋतूंत पाऊस पडतो. या प्रदेशात सरासरी २५० ते २५०० मिमी पाऊस पडतो. (२) या प्रदेशात उन्हाळ्यातील सरासरी तापमान सुमारे २७° से ते ३२' से असते व हिवाळ्यातील तापमान सुमारे १५' से ते २४" से असते. मोसमी प्रदेशातील ही पजन्याची व तापमानाची स्थिती अनेक पिकांच्या वाढीसाठी अनुकूल ठरते. त्यामुळे मोसमी प्रदेशात प्रामुख्याने शेती व्यवसाय करतात.

(२) विषुववृत्तीय वनांतील वृक्ष उंच वाढतात.

उत्तर : (१) विषुववृत्तीय प्रदेशात वार्षिक सरासरी तापमान २७ से व उन्हाळ्यातील सरासरी तापमान सुमारे ३०° से असते. (२) या प्रदेशात वर्षभर पाऊस पडतो व पावसाचे प्रमाण हे सरासरी २५०० ते ३००० मिमी असते. (३) या प्रदेशात सूर्यकिरणे लंबरूप पडतात. भरपूर सूर्यप्रकाश व भरपूर पाऊस या वैशिष्ट्यांमुळे या प्रदेशातील वनस्पती झपाटयाने व दाटीवाटीने वाढतात. (४) परिणामी जास्तीत जास्त सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी विषुववृत्तीय वनांतील वृक्ष उंच वाढतात.

(3)टुंड्रा प्रदेशात वनस्पती जीवन अल्पकाळ टिकणारे असते.

उत्तर : (१) टुंड्रा प्रदेशातील हिवाळ्यातील सरासरी तापमान सुमारे २०" ते ३० से असते. हवामानाची ही स्थिती वनस्पतीच्या वाढीसाठी पोषक नसते. (२) टुंड्रा प्रदेशातील ऊहाळ्यातील सरासरी तापमान सुमारे १० से असते.या कालावधीत सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे छोटी झुडपे, गवत इत्यादी वनस्पती वाढतात. परंतु हिवाळयात या वनस्पती अतिशय थंड हवामानामुळे नष्ट होतात. त्यामुळे टुंड्रा प्रदेशात वनस्पती जीवन अल्पकाळ टिकनारे असते.

प्रश्न . टिपा लिहा :

(१) टुंड्रा  प्रदेशाचे स्थान, प्रदेश व हवामान,

उत्तर : (अ) स्थान व प्रदेश : (१) स्थान : टूंडा प्रदेशाचे स्थान सुमारे ६५ ते ९० उत्तर अक्षवृताच्यादरम्यान आहे (२) प्रदेश या प्रदेशात ग्रीनलंड उत्तर केंनडा, उत्तर युरोप, उत्तर आशीया इत्यादी भूभागांचा/ देशांचा/प्रदेशांचा समावेश होतो.(ब) हवामान : (१) तापमान : टुंड्रा प्रदेशातील उन्हाल्यातील सरासरी तापमान सुमारे १० से व हिवाळयातील सरासरी तापमान सुमारे -२० ते -३० से असते. (२) पर्जन्य : या प्रदेशातील सरासरी पर्जन्याचे प्रमाण सुमारे २५ मिमी ते ३०० मिमी आहे. (३) इतर वैशिष्टथे : या प्रदेशात वर्षभर अतिशय थंड हवामान असते.

(२) टुंड्रा प्रदेशातील नैसर्गीक वनस्पती, प्राणिजीवन व मानवी जीवन.

उत्तर : (अ) नैसर्गिक वनस्पती : टुंड्रा प्रदेशात अल्पकाळ टिकणाऱ्या वनस्पती आढळतात त्यांत प्रामुख्याने छोटी झुडपे, खुरटे गवत, फुले, शेवाळ, दगडफूल इत्यादी वनस्पतींचा समावेश होतो. (ब) प्राणिजीवन : टुंड्रा प्रदेशात प्रामुख्याने कॅरियू, रेनडिअर, धुवीय अस्वल. कोल्हा, सील मासे व वॉलरस मासे इत्यादी प्राणी आढळतात.(क) मानवी जीवन : (१) व्यवसाय : टुंड्रा प्रदेशातील लोकांचे शिकार व मासेमारी हे मुख्य व्यवसाय आहेत. (२) घरे : येथील लोक कातड्याचे तंबू (ट्युपिक) व इग्लू घरे यांत निवास करतात. (३) वाहतूक : येथील लोक वाहतुकीसाठी स्लेज गाडीचा वापर करतात. (४) लोकसंख्या : टुंड्रा प्रदेशात लोकसंख्या अतिविरळ आहे. या प्रदेशात स्किमो लोक राहतात.

(३) तैगा प्रदेशाचे स्थान, प्रदेश व हवामान,

उत्तर : (अ) स्थान व प्रदेश : (१) स्थान तैगा प्रदेशाचे स्थान सुमारे ५५' ते ६५' उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे. (२) प्रदेश : या प्रदेशात अलास्कापासून अटलांटिक महासागरापर्यंतचा भाग व युरेशियाचा भाग येतो.

(ब) हवामान : (१) तापमान : तैगा प्रदेशात उन्हाळधातील सरासरी तापमान सुमारे १५' से ते २०" से व हिवाळयातील तापमान ० से पेक्षा कमी असते. (२) पर्जन्य : या भागातील सरासरी पर्जन्याचे प्रमाण सुमारे ३०० मिमी ते ५०० मिमी असते (३) इतर वैशिष्ट्ये: या भागात उन्हाळयात पाऊस पडतो व हिवाळयात हिमवृष्टी होते.

(४) तैगा प्रदेशातील नैसर्गिक वनस्पती, प्राणिजीवन व मानवी जीवन,

उत्तर : (अ) नैसर्गिक वनस्पती : तैगा प्रदेशात प्रामुख्याने सूचिपर्णी वने आढळतात या वनांतील झाडाची पाने ही अरूंद व टोकदार असतात व झाडांच्या फांदया  जमिनीकडे झुकलेल्या असतात. या वनातील झाडांचे लाकूड मऊ  हलके असते. या प्रदेशांतील वनांत प्रामुख्याने स्प्रूस फर पाइन  ही झाडे  आढळतात

(ब) प्राणिजीवन : तैगा प्रदेशात कैरीबू, एल्क, आर्मिन, बीदहर सिल्हहर फॉक्स, मिक, अस्वले इत्यादी प्राणी आढळतात थंडीपासून संरक्षण होण्यासाठी यांतील बहुतांश प्राण्यांच्या अंगावर दाट व मऊ केस असतात

(क) मानवी जीवन : (१) लोकसंख्या : तैगा प्रदेशात कमी लोकसंख्या आढळते. (२) व्यवसाय : येथील लोकाचा शिकार व लाकूडतोड है प्रमुख व्यवसाय आहेत. येथील लोक शेती व्यवसाय कमी करतात

(५) गवताळ प्रदेशाचे (स्टेप्स व प्रेअरी) स्थान, प्रदेश व हवामान.

उत्तर : (अ) स्थान व प्रदेश : (१) स्थान सुमारे ३०° ते ५५° उत्तर व दक्षिण अक्षवृत्तांच्या दरम्यान खंडांच्या आतील भागात गवताळ प्रदेश आढळून येतो. (२) विविध नावे : हे गवताळ प्रदेश विविध खंडांत/प्रदेशांत वेगवेगळ्या नावांनी ओळखले जातात. उदा., स्टेप्स (युरेशिया), व्हेल्ड (दक्षिण आफ्रिका), पंपास (दक्षिण अमेरिका), प्रेअरी (उत्तर अमेरिका), डाऊन्स (ऑस्ट्रेलिया) इत्यादी.

(ब) हवामान : (१) तापमान : गवताळ प्रदेशातील उन्हाळ्यातील सरासरी तापमान सुमारे २७ से व हिवाळ्यातील तापमान ० से पेक्षा कमी असते. (२) पर्जन्य : या भागातील सरासरी पर्जन्याचे प्रमाण सुमारे ४०० मिमी ते ६०० मिमी असते. या प्रदेशात बहुतेक पाऊस उन्हाळ्यात पडतो.

(६) गवताळ प्रदेशातील (स्टेप्स व प्रेअरी) नैसर्गीक वनस्पती, प्राणिजीवन व मानवी जीवन.

उत्तर : (अ) नैसर्गिक वनस्पती : या प्रदेशात गवताची विस्तीर्ण कुरणे आढळतात. या प्रदेशात कमी उंचीचे व झुपक्यांनी वाढणारे गवत सर्वत्र आढळते. हे गवत हिवाळ्यात नष्ट होते. या प्रदेशात एल्डर, पॉपलर इत्यादी झाडे आढळतात.(ब) प्राणिजीवन : गवताळ प्रदेशात हरणे, घोडे, कुत्रे, लांडगे, रानगवे, ससे, कांगारू, डिंगो इत्यादी जंगली प्राणी व शेळ्या, मेंढ्या, गाई, बैल, घोडे, गाढव इत्यादी पाळीव प्राणी आढळतात. (क) मानवी जीवन : (१) व्यवसाय : गुरे चारणे (पशुपालन) हा गवताळ प्रदेशातील लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. (२) जीवनशैली : या प्रदेशात पूर्वी लोक भटके जीवन जगत असत. (३) घरे : या प्रदेशातील लोक कातड्याच्या तंबूत (युट) मध्ये राहतात. (४) किरगीज लोक : या प्रदेशातील किरगीज लोकांचे भटके जीवन आता संपुष्टातआले असून ते आता पक्क्या घरांत वास्तव्य करतात. (५) जगातील गव्हाचे कोठार : या प्रदेशात प्रामख्याने गव्हाची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. त्यामुळे गवताळ प्रदेशातील प्रेअरी भागास 'जगातील गव्हाचे कोठार असे म्हणतात.

(७) उष्ण वाळवंटी प्रदेशाचे स्थान, प्रदेश व हवामान.

उत्तर : (अ) स्थान व प्रदेश : (१) स्थान : विषुववृत्तापासून २०° ते ३०° उत्तर व दक्षिण अक्षवृत्तांच्या दरम्यान व खंडांच्या पश्चिम भागात उष्ण वाळवंटी प्रदेश आढळून येतो. (२) विविध नावे : उष्ण वाळवंटी प्रदेशात पुढील वाळवंटांचा समावेश होतो : सहारा (उत्तर आफ्रिका), कोलोरॅडो (उत्तर अमेरिका), अटाकामा (दक्षिण अमेरिका), थरचे वाळवंट (आशिया), कलहारी (दक्षिण आफ्रिका) इत्यादी. (ब) हवामान : (१) तापमान : उष्ण वाळवंटी प्रदेशातील उन्हाळ्यातील सरासरी तापमान सुमारे ३०° से ते ४५° से व हिवाळ्यातील तापमान सुमारे २०° से ते २५° से असते. (२) पर्जन्य : या भागात पर्जन्याचे प्रमाण अत्यल्प असते. (३) इतर वैशिष्ठ्ये : या प्रदेशात अतिउष्णता असून रात्री खूप थंडी पडते.

(८) उष्ण वाळवंटी प्रदेशातील नैसर्गीक वनस्पती, प्राणिजीवन व मानवी जीवन.

उत्तर : (अ) नैसर्गिक वनस्पती : या प्रदेशात कमीत कमी पाने असलेल्या व काटेरी वनस्पती असतात. या प्रदेशातील वनस्पतींच्या साली जाड व अरुंद असतात व पाने मेणचट असतात. जमिनीतील ओलावा संपला की या वनस्पती नष्ट होतात. या प्रदेशात प्रामुख्याने निवडुंग, घायपात, पाम, खजूर इत्यादी वनस्पती आढळतात.(ब) प्राणिजीवन : या प्रदेशात अनेक दिवस पाण्याशिवाय जगू शकणारा उंट हा प्राणी आढळतो. या प्रदेशात जमिनीवर प्राण्यांची संख्या कमी आढळते. अतिउष्णतेमुळे या भागात प्राण्यांचे दिवसा जमिनीखाली वास्तव्य असते. या प्रदेशात घोडे, बैल, गाढव, मेंढ्या इत्यादी पाळीय प्राणी आढळतात. याशिवाय साप, उंदीर, सरडे, विंचू इत्यादी प्राणीही आढळतात.(क) मानवी जीवन : (१) लोक : या प्रदेशात राहणारे लोक विविध नावांनी ओळखले जातात. उदा., बदाउन (सहारा), बुशमेन (कलहारी), अबॉरिजिन (ऑस्ट्रेलिया). या प्रदेशातील लोक त्यांच्या अनेक गरजा जनावरांपासून पूर्ण करतात. (२) व्यवसाय : या प्रदेशात मरूदघाने व नदयांची खोरी या ठिकाणी शेती केली जाते

(९) गवताळ प्रदेशाचे (सुदान) स्थान, प्रदेश व हवामान.

उत्तर : (अ) स्थान व प्रदेश : (१) स्थान विषुववृत्ताच्या उत्तरेस ५ ते २० अक्षयृत्तांच्या दरम्यान गवताळ प्रदेश (सुदान) आढळतो. (२) विविध नावे : हा प्रदेश वेगवेगळवा खंडांत पुढील नावांनी ओळखला जातो : सॅव्हाना (आप्रिका), क्वीन्सलंड (ऑस्ट्रेलिया), दक्षिण पार्कलैंड (आफ्रिका), लॅनोज व कॅंम्पोज ( दक्षिण अमेरिका) व इतर गवताळ प्रदेश (ब) हवामान : (१) तापमान : गवताळ प्रदेश ( सुदान) येथे उन्हाळयातील सरासरी तापमान सुमारे ३५' से व हिवाळयातील तापमान सुमारे २४ से असते. ( २) पर्जन्य : या भागात सुमारे २५० मिमी ते १००० मिमी पाऊस पडतो. (३) इतर वैशिष्ट्ये : येथील उन्हाळा उष्ण व दमट आणि हिवाळा उबदार व कोरडा असतो.

(१०) गवताळ प्रदेशातील (सुदान) नैसर्गिक वनस्पती, प्राणिजीवन व मानवी जीवन,

उत्तर : (अ) नैसर्गिक वनस्पती : गवताळ प्रदेश (सुदान) येथे उंच व दाट गवत आढळते. या भागातील गवत सुमारे सहा मीटर उंच वाढते. उदा., हत्तीगवत या प्रदेशात तुरळक वृक्ष  छत्रीसारखा आकार असणारी झाडे आढळतात. उदा., बेल, बोर, घायपात, अननस, निवडुंग इत्यादी (ब) प्राणिजीवन : गवताळ प्रदेश (सुदान) येथे तृणजीवी प्राण्यांची व मांसभक्षक प्राण्यांची विपुलता आढळते. या भागातील प्राण्यांचे पाय चपळ असतात बहुतांश प्राण्यांच्या अंगावर रंगीत पट्टे व ठिपके असतात. या प्रदेशात प्रामुख्याने सिंह, चित्ता, तरस, लांडगा, जिराफ, झेता, हत्ती, गेंडा, रानबैल, रेडा, कांगारू, एमू इत्यादी प्राणी आढळतात (क) मानवी जीवन : (१) विविध जमातींचे लोक : या प्रदेशात झूलू, हौसा, मसाई इत्यादी जमातीचे लोक राहतात. (२) घरे : या प्रदेशातील लोक मातीच्या भिंती व गवताचे छप्पर असलेल्या साध्या घरात राहतात. या प्रदेशातील घरांना खिडक्या नसतात. या प्रदेशातील काही जमातींचे लोक 'क्रॉल' या ठेंगण्या व गोलाकार झोपडयात राहतात. (३) व्यवसाय : या प्रदेशांतील लोकांचे शिकार व पशुपालन हे प्रमुख व्यवसाय आहेत.

(११) विषुववृत्तीय प्रदेशाचे स्थान, प्रदेश व हवामान.

उत्तर : (अ) स्थान व प्रदेश : (१) स्थान विषुववृत्ताच्या उत्तरेस व दक्षिणेस ० ते ५° अक्षवृत्तांच्या दरम्यान विषुववृत्तीय प्रदेश आढळतो. (२) प्रदेश या प्रदेशात मलेशिया, इंडोनेशिया, सिंगापूर, गिनी व कांगो किनारा, अॅमेझॉन नदीचे खोरे इत्यादी भूमागांचा/देशांचा / प्रदेशांचा समावेश होतो. (ब) हवामान : (१) तापमान : या प्रदेशात सरासरी तापमान २७' से असते. उन्हाळयातील तापमान सुमारे ३०° से असते. (२) पर्जन्य : या प्रदेशात सरासरी २५०० ते ३००० मिमी पाऊस पडतो. (३) इतर वैशिष्ठे : या प्रदेशातील उष्ण व दमट हवामानामुळे येथील झाडपाला कुजतो व हवा रोगट बनते. या प्रदेशात जास्त उष्णता असते व येथे वर्षभर पाऊस पडतो.

(१२) विषुववृत्तीय प्रदेशातील नैसर्गिक वनस्पती, प्राणिजीवन व मानवी जीवन,

उत्तर : (अ) नैसर्गिक वनस्पती : विषुववृत्तीय प्रदेशात धनदाट सदाहरित वने आढळतात या वनांमधील वनस्पतींमध्ये भरपूर विविधता आढळते. या प्रदेशात ठिकठिकाणी दलदलयुक्त प्रदेश आढळतात या प्रदेशातील वृक्षांचे लाकूड कठीण असते. या प्रदेशात महोगनी, ग्रीन-हार्ट, रोजवूड, एबनी इत्यादी वृक्ष मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. (ब) प्राणिजीवन : विषुववृत्तीय प्रदेशातील प्रण्यांमध्ये खूप विविधता आढळते. येथील दलदलीच्या प्रदेशात सुसर, पाणघोड़ा, अॅनाकॉडा इत्यादी जलचर आढळतात. या प्रदेशातील उंच झाडांवर गोरिला, चिंपांझी, हॉनबिल इत्यादी प्राणी राहतात. या प्रदेशात अनेक विषारी कीटक आढळतात उदा., त्से-से माशी. (क) मानवी जीवन : (१) लोक : विषुक्वृत्तीय प्रदेशात कमी लोकवस्ती आढळते. या प्रदेशात प्रामुख्याने पिग्मी, बोरो इंडियन, सेमांग आदिवासी जमातीचे लोक राहतात. (२) घरे : येथील लोक झाडांवर घरे बांधून राहतात.(३) व्यवसाय : येथील लोकांचे जीवन निसर्गावर अवलंबून असते.

(१३) भूमध्य सागरी प्रदेशाचे स्थान, प्रदेश व हवामान.

उत्तर : (अ) स्थान व प्रदेश : (१) स्थान : भूमध्य सागरी प्रदेश विषुववृत्ताच्या उत्तरेस व दक्षिणेस ३०' ते ४० अक्षवृत्तांच्या दरम्यान व खंडांच्या पश्चिम भागांत आढळतो. (२) प्रदेश : या प्रदेशात पोर्तुगाल, स्पेन, अल्जेरिया, ट्की, कॅलिफोर्निया, मध्य चिली, नै्रत्य व आग्नेय ऑस्ट्रेलिया इत्यादी भूभागांचा समावेश होतो. (ब) हवामान : (१) तापमान : भूमध्य सागरी प्रदेशातील उन्हाळ्यातील सरासरी तापमान सुमारे २१° से ते २७° से आणि हिवाळ्यातील तापमान सुमारे १०° से ते १४" से असते. (२) पर्जन्य : या प्रदेशात सरासरी ५०० ते १००० मिमी पाऊस पडतो. (३) इतर वैशिष्ट्ये : येथील उन्हाळे कोरडे असतात व येथे हिवाळ्यात पाऊस पडतो.

(१४) भूमध्य सागरी प्रदेशातील नैसर्गीक वनस्पती, प्राणिजीवन व मानवी जीवन.

उत्तर : (अ) नैसर्गिक वनस्पती : भूमध्य सागरी प्रदेशातील झाडांची पाने जाड, लहान व मेणचट असतात. या प्रदेशात प्रामुख्याने जाड सालांची झाडे आढळतात. उदा., ऑलिव्ह, ओक, चेस्टनट इत्यादी. येथील कमी पावसाच्या भागात गवत वाढते व पर्वतीय भागात सूचिपणी वनस्पती आढळतात. (ब) प्राणिजीवन : भूमध्य सागरी प्रदेशातील अनेक लोक पशुपालन व्यवसाय करतात. या व्यवसायामुळे या प्रदेशात पाळीव प्राण्यांची संख्या जास्त आढळते. या प्रदेशात शेळ्या, मेंढ्या, गाई, खेचरे, घोडे इत्यादी प्राणी पाळले जातात. (क) मानवी जीवन : (१) संस्कृतींचा उदय : भूमध्य सागरी प्रदेशात ग्रीक व रोमन संस्कृतींचा विकास झाल्याचे आढळून येते. (२) व्यवसाय : या प्रदेशातील लोकांचा शेती हा मूळ व्यवसाय आहे. या प्रदेशात फळांची व फुलांची मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. (३) आहार : या प्रदेशातील लोकांच्या आहारात प्रामुख्याने गव्हापासून बनवलेल्या विविध पदार्थांचा मुख्य अन्न म्हणून समावेश होतो. (४) पोशाख : या प्रदेशातील लोक रंगीबेरंगी कपडे परिधान करतात.

प्रश्न . पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा :

(१) पश्चिम युरोपीय प्रदेशाचे स्थान, प्रदेश व हवामान यांविषयी सविस्तर माहिती लिहा.

उत्तर : पश्चिम युरोपीय प्रदेशाचे स्थान, प्रदेश व हवामान यांविषयी सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे आहे : (अ) स्थान व प्रदेश : (१) स्थान : पश्चिम युरोपीय प्रदेश विषुववृत्ताच्या उत्तरेस व दक्षिणेस ४५° ते ६५* अक्षवृत्तांच्या दरम्यान व खंडांच्या पश्चिम भागांत आढळतो. (२) प्रदेश : या प्रदेशात नॉ्वे डेन्मार्क, आयलंड, ब्रिटिश कोलंबिया, दक्षिण चिली, न्यूझीलंड इत्यादी भूभागांचा / देशांचा समावेश होतो (ब) हवामान : (१) तापमान : पश्चिम युरोपीय प्रदेशातील उन्हाळ्यातील सरासरी तापमान समारे २०" से आणि हिवाळ्यातील सरासरी तापमान सुमारे ५' से असते. (२) पर्जन्य : या प्रदेशात वर्षभर पाऊस पडतो. येथील पावसाचे प्रमाण सरासरी ५०० मिमी ते २५०० मिमी इतके असते. (३) इतर वैशिष्ठ्ये : या प्रदेशात पश्चिमी  वार्याच्या  आवर्तापासून पाऊस पडतो. या प्रदेशाचे हवामान वर्षभर सौम्य असते.

(२) पश्चिम युरोपीय प्रदेशातील नैसर्गीक वनस्पती, प्राणिजीवन व मानवी जीवन यांविषयी वर्णन करा 

उत्तर : पश्चिम युरोपीय प्रदेशातील नैसर्गीक वनस्पती, प्राणिजीवन व मानवी जीवन पुढीलप्रमाणे आहे : (अ) नैसर्गिक वनस्पती : पश्चिम युरोपीय प्रदेशात वर्षभर हिरवेगार गवत आढळते. येथील झाडांची पाने हिवाळयात गळून पडतात. या प्रदेशात प्रामुख्याने सूचिपणीं वृक्ष व कमी उंचीचे गवत आढळते. या प्रदेशात ओक, बीच, मेपल, एल्म, पाईन, स्प्रूस पॉपलर इत्यादी वृक्ष आढळतात. (ब) प्राणिजीवन : या प्रदेशातील काही लोक पशुपालन व्यवसाय करतात. त्यामुळे या प्रदेशात पाळीव प्राण्यांची संख्या जास्त दिसून येते. याशिवाय अस्वले, लांडगे, कोल्हे इत्यादी वन्य प्राणीही आढळतात. (क) मानवी जीवन : (१) लोक : सौम्य व आल्हाददायक हवामानामुळे पश्चिम युरोपीय प्रदेशातील लोक उत्साही व उदघोगी दिसून येतात. या प्रदेशात प्राचीन काळापासून दर्यावर्दी लोक मोठ्या प्रमाणावर आढळतात. (२) पोशाख : या प्रदेशातील लोक प्रामुख्याने लोकरीच्या कपड्यांचा वापर करतात. ( ३) व्यवसाय : या प्रदेशात दवितीय व तृतीय व्यवसायांचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते.

प्रश्न: नैसर्गिक प्रदेशांचा व्यवसायांवर कसा प्रभाव पडतो, हे सोदाहरण स्पष्ट करा.

उत्तर : विविध नैसर्गिक प्रदेशात विविध प्रकारची भूस्वरूपे, हवामान व मृदा आढळतात. म्हणजेच विविध नैसर्गिक प्रदेशांत विविध प्रकारची साधनसंपत्ती उपलब्ध असते. परिणामी विविध नैसर्गिक प्रदेशांत विविध व्यवसाय केले जातात. नैसर्गिक प्रदेशांचा व्यवसायांवर कसा प्रभाव पडतो. हे पूढील उदाहरणांच्या साहाय्याने स्पष्ट करता येते

(अ) मान्सून प्रदेश : मान्सून प्रदेशात नैऋत्य मोसमी  वाऱ्यापासून ठरावीक ऋतुंत पाऊस पडतो. येथील पर्जन्य अणि तापमान अनेक प्रकारच्या पिकांच्या वाढीसाठी अनुकूल असते. त्यामुळे मान्सून प्रदेशात प्रामुख्याने शेती व शेतीपूरक   व्यवसाय केले जातात

(ब) विषुववृत्तीय प्रदेश विषुववृत्तीय प्रदेशात सदाहरित वने मोठ्या प्रमाणावर आढळतात. त्यामुळे विषुववृत्तीय प्रदेशात वनोत्पादनावर आधारित लाकूडकटाई व डिंक, मध, रबर, लाख इत्यादी पदार्थ गोळा करण्याचे व्यवसाय केले जातात

(क) तैगा प्रदेश : तैगा प्रदेशातील सूचिपणीं वनांमध्ये स्मूस फर, पाईन, रेडवूड इत्यादी वृक्ष आढळतात. या वृक्षाचे लाकूड मऊ असते. त्यामुळे या प्रदेशात प्रामुख्याने लाकूडतोड व्यवसाय चालतो.

(ड) टुंडा प्रदेश : टुंड्रा प्रदेशात समुद्रात सील मासे व वॉलरस मासे मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर मासेमारी केली जाते. याशिवाय या प्रदेशात शिकारीचा व्यवसायही मोठया प्रमाणावर केला जातो.

Wednesday, 28 October 2020

October 28, 2020

स्वाध्यायमाला - प्रश्नोत्तरे इयत्ता सातवी भूगोल 5 - वारे

 स्वाध्यायमाला - प्रश्नोत्तरे इयत्ता सातवी  भूगोल  5  - वारे

१. योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा :

उत्तरे : 

(१) हवा प्रसरण पावली, की विरळ होते

(२) वारे हवेच्या जास्त दाबाकडून  हवेच्या कमी दाबाकडे वाहतात

(३) उत्तर गोलार्धात विषुववृत्ताकडे येणारे वारे पृथ्वीच्या परिवलनामुळे  पश्चिमेकडे वळतात

(४) भारतीय उपखंडावरून वाहणाऱ्या हंगामी वाऱ्यांची दिशा हिवाळ्यात  ईशान्येकडून नैऋ्त्येकडे असते

(५) 'गरजणारे चाळीस' वारे दक्षिण गोलार्धात ४० दक्षिण  अक्षांशाच्या भागात वाहतात

प्रश्न २. पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा :

(१) 'वारा म्हणजे काय ?

उत्तर : वाबातील फरकामुळे जास्त दाबाच्या पट्टयाकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे हवेची क्षितीज समांतर होणारी हालचाल, म्हणजे वारा' होय.

(२) वाऱ्याचे प्रमुख प्रकार कोणते ?

उत्तर : वाऱ्याचे - (१) ग्रहीय वारे (२) स्थानिक वारे व (३) हंगामी वारे हे प्रमुख प्रकार आहेत.

(३) वाऱ्याचा वेग कोणत्या परिमाणात मोजतात?

उत्तर : वाऱ्याचा वेग किमी प्रती तास किंवा नॉटस् या परिमाणात मोजतात.

(४) कोणत्या प्रकारचे वारे वर्षभर नियमितपणे वाहतात?

उत्तर : ग्रहीय वारे वर्षभर नियमितपणे वाहतात.

(५) कोणत्या वाऱ्याना ध्रुवीय वारे' म्हणतात?

उत्तर : ध्रुवीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे जे वारे वाहतात, त्या वाऱ्याना ध्रुवीय वारे' म्हणतात.

(६) कोणत्या वाऱ्याना हंगामी वारे' म्हणतात?

उत्तर : जे वारे विशिष्ट ऋतूत वाहतात, त्या वाऱ्याना 'हंगामी वारे' म्हणतात.

(७) ग्रहीय वारे' म्हणजे काय ?

उत्तर : जे वारे जास्त दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वर्षभर नियमितपणे वाहतात व पृथ्वीचे संपूर्ण क्षेत्र व्यापतात, त्या वाऱ्याना 'ग्रहीय वारे' म्हणतात.

(८) स्थानिक वारे' म्हणजे काय?

उत्तर : जे वारे ठरावीक काळात विशिष्ट परिस्थितीमुळे निर्माण होतात आणि तुलनात्मकदृष्ट्या मर्यादित क्षेत्रात वाहतात त्या  वार्याना  स्थानिक वारे'  म्हणतात 

 वर्णनावरून वाऱ्याचा प्रकार ओळखा 

(৭) नैऋत्येकडून येणारे वारे भारतीय उपखंडावर पाऊस आणतात. जून ते सप्टेंबर या काळात भारतात पाऊस पडतो. या कालावधीनंतर हे वारे परत फिरतात.

उत्तर नैऋत्य मोसमी वारे.

(२) उत्तर  धृवीय प्रदेशांकडून ६०° उत्तरेकडे येणाऱ्या या वाऱ्यांमुळे उत्तर अमेरिका, युरोप व रशिया एवढ्या विस्तीर्ण प्रदेशात थंडीची तीव्रता वाढते.

उत्तर : धृवीय वारे.

(३) डोंगरमाथे दिवसा लवकर तापतात. तेथील हवा तापून हलकी होते व वर जाते. त्यामुळे या भागात कमी दाब निर्माण होतो. त्याच वेळी डोंगरपायथ्याशी दरीखोऱ्यांत हवा थंड असल्याने जास्त दाब असतो. तेथील हवा कमी दाबाकडे वाहते.

उत्तर : दरीय वारे.

प्रश्न . पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा :

(१) धृवीय भागात दोन्ही गोलार्धात  हवेचा दाब जास्त का असतो 

(৭) धुवीय भागात दोन्ही गोलार्धात वर्षभर तापमान शुन्य अंश सेल्सिअस पेक्षाही कमी असते

त्यामुळे धृवीय भागात दोन्ही गोलार्धात हवा थंह असते व त्यामुळे हवेची धनता जास्त असते. त्यामुळे धृवीय

भागात दोन्ही गोलार्धात हवेचा दाब जास्त असतो

(२) पृथ्वीच्या परिवलनाचा वाऱ्यावर कोणता परिणाम होतो ?

उत्तर : (१) पृथ्वीचे परिवलन हे पश्चिमेकडून पूर्वेकडे होते. पृथ्वीच्या परिवलनामुळे वाऱ्याच्या मूळ दिशेत बदल होतो. (२) पृथ्वीच्या परिवलनामुळे उत्तर गोलार्धात वारे आपल्या मूळ दिशेपासून उजवीकडे वळतात तर दक्षिण गोलार्धात ते मूळ दिशेच्या डावीकडे वळतात.

(3) आवर्त वारे चक्राकार दिशेतच का वाहतात?

उत्तर (१) एखादया ठिकाणी हवेचा दाब कमी असतो व सभोवताली हवेचा दाब जास्त असतो अश  वेळी  आवर्त वाऱ्याची परिस्थिती निर्माण होते (२) कमी हवेच्या दाबाचे क्षेत्र है मध्यभागी असल्यामुळे या प्रदेशात सभोवतालच्या जास्त हवेच्या  दाबाकडून सर्व बाजूनी वेगाने वारे बाहतात. त्यामुळे आवर्त वारे चक्राकार दिशेत वाहतात

(४) आवर्त वाऱ्याची कारणे व परिणाम लिहा.

उत्तर

(अ) आवर्त वाऱ्याची कारणे (१) एखादया  ठिकाणी हवेचा दाब कमी असतो. (२) सभोवताली हवेचा दाब जास्त असतो. 

(ब) आवर्त वाऱ्याचे परिणाम : (१) आवर्त वाऱ्यामुळे आकाश ढगाळलेले राहते. (२) आवर्त वारे अत्यंत वेगाने वाहत असल्यामुळे भरपूर पाऊस पडतो. (३) काही प्रसंगी विनाशकारी आवर्त वाऱ्यामुळे किनारयालगतच्या प्रदेशांत जीवितहानी व वित्तहानी होते.

(५) दरीय वारे कसे निर्माण होतात?

उत्तर : (१) दरीय वारे सूर्योदयानंतर (दिवसा) वाहतात. दिवसा पर्वतशिखर लवकर तापते व दरीचा भाग तुलनेने थंड असतो. (२) पर्वतावर हवेचा दाब कमी असतो व दरीच्या भागात हवेचा दाब जास्त असतो. (३) त्यामुळे दिवसा दरीकडून पर्वताकडे थंड वारे वाहतात. ( ४) दिवसा दरीतून थंड हवा पर्वतशिखराकडे वेगाने वर येते व पर्वतशिखराकडील उष्ण व हलकी हवा दरीच्या दिशेने खाली ढकलली जाते अशा प्रकारे दरीय वारे निर्माण होतात.

(६) पर्वतीय वारे कसे निर्माण होतात?

उत्तर : (१) पर्वतीय वारे सूर्यास्तानंतर (रात्री) वाहतात. रात्री पर्वतशिखर लवकर थंड होते व दरीचा भाग तुलनेने उष्ण असतो. (२) पर्यतावर हवेचा दाब जास्त असतो व दरीच्या भागात हवेचा दाब कमी असतो. (३) त्यामुळे रात्री पर्वताकडून दरीकडे थंड वारे वाहतात. (४) रात्री पर्वतशिखराकडील थंड हवा दरीच्या दिशेने वेगाने खाली येते व दरीतील उष्ण व हलकी हवा पर्वतशिखराकडे ढकलली जाते. अशा प्रकारे पर्वतीय वारे निर्माण होतात.

(७) सागरी (खारे) वारे कसे निर्माण होतात?

उत्तर : (१) दिवसा समुद्राच्या पाण्यापेक्षा किनारी भागातील जमीन लवकर व जास्त प्रमाणात तापते. तेथील हवाही जास्त तापते व त्यामुळे हवेचा दाब कमी राहतो. (२) याउलट दिवसा समुद्राचे पाणी उशिरा तापते. त्यामुळे समुद्रावरील हवा कमी तापते व तेथे हवेचा दाब जास्त असतो. (३) त्यामुळे दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वारे वाहतात. या  वाऱ्याना सागरी (खारे) वारे म्हणतात. (४) अशा प्रकार सागरी भागातील हवेचा दाब जास्त व जमिनीवरील हवेचा दाब कमी या हवेच्या दाबातील फरकामुळे सागरी (खारे) वारे निर्माण होतात.

(८) भूमीय (मतलई) वारे कसे निर्माण होतात ?

उत्तर : (१) रात्री समुद्राच्या पाण्यापेक्षा किनारी भागातील जमीन लवकर व जास्त प्रमाणात थड होते. त्यामुळे जमिनीवरील हवेचा दाब जास्त राहतो. (२) याउलट रात्री समुद्राचे पाणी उशिरा थंड होते. त्यामुळे समुद्रावरील हवा तुलनेने जास्त तापलेली राहते व तेथे हकेचा दाब कमी असतो. (३) त्यामुळे रात्री जमिनीकडून समुद्राकडे वारे वाहतात. या वार्यानां भूमीय (मतलई) वारे म्हणतात. (४) अशा प्रकारे जमिनीवरील हवेचा दाब जास्त व सागरावरील हवेचा दाब कमी या हवेच्या दाबातील फरकामुळे भूमीय (मतलई) वारे निर्माण होतात.

प्रश्न ५. पुढील विधानांची भौगोलिक कारणे लिहा :

(१) विषुववृत्तावर हवेचा पट्टा शांत असतो.

उत्तर : (१) विषुववृत्ताच्या उत्तरेस व दक्षिणेस सुमारे ५° अक्षवृत्तांपर्यंत हवेचा दाब सर्वसाधारणपणे सर्वत्र सारखाचे असतो. (२) त्यामुळे वर्षातील बराच काळ विषुववृत्ताच्या भागात वारे वाहत नाहीत. म्हणून विषुववृत्तावर हवेचा पट्टा शांत असतो. 

(२) उत्तर गोलार्धातील नैॠत्य वाऱ्यापेक्षा दक्षिण गोलार्धात  वायव्येकडून येणारे वारे जास्त वेगाने वाहतात.

उत्तर : (१) उत्तर गोलार्धात भूभाग जास्त आहे. या गोलार्धात भूपृष्ठाच्या  उंचसखलपणाचा अडथळा असल्यामुळे वाऱ्याच्या  वेगावर मर्यादा येतात. (२) याउलट दक्षिण गोलार्धात जलभाग जास्त आहे. या गोलार्धात भूपुष्ठाच्या उंचसखलपणाचा अडथळा नसल्यामुळे वाऱ्याच्या वेगावर कोणतेही नियंत्रण असत नाही. त्यामुळे उत्तर गोलार्धातील नैऋत्य  वाऱ्यापेक्षा  दक्षिण गोलार्धात वायव्येकडून येणारे वारे जास्त वेगाने वाहतात.

(३) उन्हाळ्यातील मोसमी वारे समुद्राकडून, तर हिवाळ्यातील परतीचे मोसमी वारे जमिनीकडून येतात.

उत्तर : (१) उन्हाळ्यात दीर्घ कालावधीसाठी जमीन अधिक तापलेली राहते. परिणामी उन्हाळ्यात दीर्घ कालावधीसाठी जमिनीवरील हवेचा दाब हा तुलनेने कमी व समुद्रावरील हवेचा दाब तुलनेने जास्त राहतो. त्यामुळे उन्हाळ्यातील मोसमी वारे समुद्राकडून जमिनीकडे (वाहतात) येतात. (२) हिवाळ्यात दीर्घ कालावधीसाठी जमीन तुलनेने कमी तापलेली राहते. परिणामी हिवाळ्यात दीर्घ कालावधीसाठी जमिनीवरील हवेचा दाब हा तुलनेने जास्त व समुद्रावरील हवेचा दाब तुलनेने कमी राहतो. त्यामुळे हिवाळयातील परतीचे मोसमी वारे जमिनीकडून समुद्राकडे (वाहतात) येतात.

(४) वारे वाहण्यासाठी हवेच्या दाबामध्ये फरक असावा लागतो.

उत्तर : (१) हवेचा दाब एकसमान असेल, तर हवेची हालचाल होत नाही. (२) परंतु, पृथ्वीवर हवेचा दाब एकसमान नसतो. पृथ्वीवर हवेच्या जास्त दाबाचे आणि हवेच्या कमी दाबाचे पट्टे असतात. (३) त्यामुळे पृथ्वीवर जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्घाकडे हवेची हालचाल क्षितिजसमांतर दिशेत होते व वाऱ्याची निर्मिती होते. अशा प्रकारे वारे वाहण्यासाठी हवेच्या दाबामध्ये फरक असावा लागतो.

प्रश्न ६. टिपा लिहा :

(१) लू

 (१) उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात उन्हाळ्यात दूपारी वाहणारे वारे हे 'लू' या नावाने ओळखले जातात. (२) हे वारे थरच्या वाळवंटी प्रदेशाकडून येतात. (३) लू' हे स्थानिक वारे उष्ण व कोरडे असतात.

(२) सिमूम : (१) सहारा आणि अरेबियन वाळवंटातून अतिशय वेगाने वाहणारे वारे हे 'सिमूम' या नावाने ओळखले जातात. सिमूम हे स्थानिक वारे उष्ण, कोरडे व विनाशकारी असतात.

(३) चिनूक : (१) उत्तर अमेरिकेतील रॉकी पर्वताच्या पूर्व उतारावरून खाली वाहणारे वारे हे 'चिनूक या नावाने ओळखले जातात. (२) चिनूक वाऱ्यामुळे रॉकी पर्वताच्या पूर्व उतारावरील बर्फ वितळते व दऱ्यामधील तापमानात वाढ   होते. (३) चिनूक हे स्थानिक वारे उबदार व कोरडे असतात.

(४) मिस्ट्रल : (१) स्पेन, फ्रान्स आणि भूमध्य सागराच्या किनार्यालगतच्या प्रदेशात वाहणारे वारे हे 'मिस्ट्रल या नावाने ओळखले जातात. (२) हे वारे आल्प्स पर्वतावरून येतात. या थंड वाऱ्यामुळे किनार्यालगतच्या तापमानात घट होते. (३) मिस्ट्रल हे स्थानिक वारे थंड व कोरडे असतात.

(५) बोरा : (१) आल्प्स पर्वताच्या उतारावरून इटली देशाच्या किनारी भागाकडे वाहणारे वारे हे 'बोरा' या नावाने ओळखले जातात. (२) बोरा हे स्थानिक वारे थंड आणि कोरडे असतात.

(६) पांपेरो : (१) दक्षिण अमेरिकेतील पंपास गवताळ प्रदेशात वाहणारे वारे हे 'पांपेरो' या नावाने ओळखले जातात. (२) पांपेरो हे स्थानिक वारे थंड आणि कोरडे असतात.

(७) फॉन : (१) आल्प्स पर्वताच्या उत्तर भागात वाहणारे वारे हे 'फॉन या नावाने ओळखले जातात. (२) फॉन हे बारे उष्ण व कोरडे असतात.

प्रश्न ७. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा :

(৭)ग्रहीय वाऱ्याचे प्रकार स्पष्ट करा.

उत्तर : ग्रहीय वाऱ्याचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत :

(৭) पूर्वीय वारे : दोन्ही गोलाधांत २५' ते ३५ अक्षवृत्तांच्या दरम्यान असलेल्या मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून विषुववृत्तीय कमी दाबाच्या पट्टयाकडे वाहणाच्या वार्याना पूर्वीय वारे म्हणतात. पृथ्वीच्या परिवलनाचा या वाऱ्यावर   परिणाम होऊन त्यांची मुळ दिशा बदलते. उत्तर गोलाधात हे वारे ईशान्येकडून नैरूत्येकडे तर दक्षिण गोलार्धात आग्नेयेकडून वायव्येकडे वाहतात .हे दोन्ही वारे  विषुववृत्ताजवळील हवेच्या शांत पट्टयाकडे येऊन मिळतात

(२) पश्चिमी वारे : दोन्ही गोलार्धात मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून ५५' ते ६५' अक्षवृत्तांच्या दरम्यान असलेल्या उपधुवीय कमी दाबाच्या पट्टयाकडे वाहणाच्या वार्याना  पश्चिमी वारे म्हणतात. पृथ्वीच्या परिवलनाचा या  वाऱ्यावर परिणाम होऊन त्यांची मूळ दिशा बदलते. उत्तर गोलाधात हे वारे नैऋत्येकडून ईशान्येकडे, तर दक्षिण गोलार्धात वायव्येकडून आग्नेयेकडे वाहतात.

(३) ध्रुवीय वारे : दोन्ही गोलार्धात ध्रुवीय  जास्त दाबाच्या पट्याकडून ५५' ते ६५' अक्षवृत्तांच्या दरम्यान असलेल्या उपध्रुवीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहणाऱ्या वार्याना  ध्रुवीय वारे म्हणतात. या वाऱ्याची  दिशा सर्वसाधारणपणे पूर्वेकडून  पश्चिमेकडे असते

२) आवर्त वाऱ्याचे  स्वरूप स्पष्ट करा.

उत्तर : आवर्त वाऱ्याचे स्वरूप पुढीलप्रमाणे  आहे :

(৭) आवर्त वाऱ्याची निर्मिती : एखादया ठिकाणी हवेचा दाब कमी असतो व सभोवताली हवेचा दाब जास्त असतो. अशा वेळी आवर्त वाऱ्याची परिस्थिती निर्माण होते. कमी हवेच्या दाबाकडे सभोवतालच्या प्रदेशातील जास्त हवेच्या दाबाकडून वेगाने वारे वाहतात.

(२) आवर्त वाऱ्याची दिशा : पृथ्वीच्या परिलनामुळे उत्तर गोलार्धात घडयाळाच्या काट्याच्या  विरुदध दिशेत, तर दक्षिण गोलार्धात हे वारे घडयाळाच्या काटयांच्या दिशेत वाहतात.

(३) आवर्त वाऱ्याची वैशिष्ट्ये : आवर्ताच्या    वेळी आकाश ढगाळ असते. वारे वेगाने वाहतात आणि भरपूर पाऊस पडतो आवर्त वाऱ्याचे  प्रभावक्षेत्र मर्यादित असते. या वाऱ्याचा कालावधी वेग दिशा  आणि क्षेत्र अतिशय अनिश्चित असते हवेची स्थिती दर्शवणाच्या नकाशात आवर्ताचा केंद्रभाग हा 'L' या अक्षराने दाखवतात.

(४) आवर्त वाऱ्याचे सरकणे : आवर्त प्रणाली एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी सरकते. आवर्ताना आपण वादळ किंवा चक्रीवादळ म्हणतो.

१ टायफून : पैसिफिक महासागराच्या पश्चिम भागात जपान, चीन, फिलिपाइन्स इत्यादी देशांच्या किनार्यालगत जून ते ऑक्टोबर या महिन्यांत वादळे निर्माण होतात ही वादळे 'टायफून या नावाने ओळखली जातात. वेगाने वाहणारे वारे आणि मुसळधार पाऊस यांमुळे ती विनाशकारी असतात.

२. हरिकेन्स : कॅरेबियन समुद्रात निर्माण होणारी चक्रीवादळे म्हणजे 'हरिकेन्स' होय. ही वादळेसुद्धा विनाशकारी असतात. वादळाच्या वेळी वाऱ्याचा वेग दर ताशी कमीत कमी ६० किमी असतो.

३. समरशीतोष्ण कटिबंधातील आवर्त : समशीतोष्ण कटिबंधातही आवर्त तयार होतात. त्यांची तीव्रता कमी असते. ती विनाशकारी नसतात.

(३) प्रत्यावर्त वाऱ्याचे स्वरूप स्पष्ट करा.

उत्तर : :

(१) प्रत्यावर्त वाऱ्याची निर्मिती : एखादया क्षेत्रात विशिष्ट वातावरणीय परिस्थितीत केंद्रभागी हवेचा अधिक दाब निर्माण होतो. केंद्रभागाकडून वारे सभोवतालच्या प्रदेशाकडे चक्राकार दिशेत वाहत असतात.

(२) प्रत्यावर्त वाऱ्याची दिशा : उत्तर गोलार्धात प्रत्यावर्त वारे हे घडयाळाच्या काट्यांच्या दिशेने वाहतात, तर दक्षिण गोलार्धात ते घड्याळाच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेने वाहतात.

(३) प्रत्यावर्त वाऱ्याची वैशिष्ट्ये : प्रत्यावर्ताच्या कालावधीत निरभ्र आकाश, कमी वेगाने वाहणारे वारे आणि अतिशय उत्साहवर्धक हवामान असते. प्रत्यावत्ताची स्थिती ही काही दिवस अथवा एक आठवड्याची असू शकते. असे प्रत्यावर्त समशीतोष्ण कटिबंधात निर्माण होतात. हवेची स्थिती दर्शवणाऱ्या नकाशात प्रत्यावत्ताचा केंद्रभाग 'H' या अक्षराने दाखवतात. प्रत्यावर्त हे जास्त दाबाच्या पट्ट्यात प्रकर्षने जाणवतात. या प्रदेशातून वारे बाहेर जात असल्यामुळे तेथे पावसाचे प्रमाण कमी असते.

Monday, 26 October 2020

October 26, 2020

स्वाध्यायमाला - प्रश्नोत्तरे इयत्ता सातवी भूगोल 3 -भरती - ओहोटी

स्वाध्यायमाला - प्रश्नोत्तरे इयत्ता सातवी  भूगोल  3  -भरती - ओहोटी


Test Link

प्रश्न १. योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा :

उत्तर

(৭) लाटेच्या निर्मितीचे मुख्य कारण  वारा  आहे.

(२) भरतीच्या पाण्याचा  मासेमारी व्यवसायास फायदा होतो.

(३) लाटेच्या उंच भागाला शीर्ष  म्हणतात. 

प्रश्न २. पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा :

(৭) लाटांची गती कशावर अवलंबून असते?

उत्तर : लाटांची गती वार्याच्या  वेगावर अबलंबून असते.

(२) भरती-ओहोटीचे दोन मुख्य प्रकार कोणते ?

उत्तर : उधाणाची भरती-ओहोटी आणि भांगाची भरती-ओहोटी हे भरती-ओहोटीचे दोन मुख्य प्रकार आहेत.

(३) उधाणाची भरती-ओहोटी केव्हा येते ?

उत्तर : उधाणाची भरती-ओहोटी प्रत्येक महिन्याच्या अमावास्येला व पौर्णिमेला येते.

(४) भांगाची भरती-ओहोटी केव्हा येते ?

उत्तर : भांगाची भरती-ओहोटी प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षांतील अष्टमीला येते.

(५) पृथ्वीपासून दूर अवकाशात जाण्यासाठी मोठे अग्निबाण वापरावे लागतात. ते कोणत्या बलाच्या विरोधात कार्य करतात ?

उत्तर : पृथ्वीपासून दूर अवकाशात जाण्यासाठी मोठे अग्निबाण वापरावे लागतात. ते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण  बलाच्या विरोधात कार्य करतात.

प्रश्न ३. पुढील संज्ञा स्पष्ट करा :

(१) शीर्ष : सागरी लाटेचा उंच भाग, म्हणजे 'शीर्ष होय.

(२) द्रोणी : सागरी लाटेचा खोलगट भाग, म्हणजे 'द्रोणी' होय.

(३) त्सुनामी : सागरतळाशी होणाच्या भूकंपामुळे व ज्वालामुखीच्या उद्देकामुळे निर्माण होणान्या प्रचंड उंचीच्या अत्यंत विध्वंसक लाटा, म्हणजे 'त्सुनामी' होत.

प्रश्न ४. पुढील बाबींचा भरती-ओहोटीशी कसा संबंध असेल ते लिहा :

(१) पोहणे (२) जहाज चालवणे (३) मासेमारी (४) मीठ निर्मिती (५) सागरी किनारी सहलीला जाणे.

उत्तरे : 

(१) पोहणे भरती-ओहोटीच्या वेळा माहीत करून घेऊन पोहण्यास जाणे योग्य ठरते. भरतीच्या त्याचप्रमाणे ओहोटीच्या काळातही समुद्रात खूप आत जाऊन पोहणे धोकादायक ठरते. सर्वसाधारणपणे भरतीच्या वेळी समुद्रकिनाच्याजवळच्या भागात पोहणे योग्य ठरते.

(२) जहाज चालवणे : भरतीच्या वेळी जहाज समुद्रकिनान्यावरून (बंदरातून) सागरजलात नेणे व सागरजलातून समुद्रकिनाच्यावर (बंदरात) आणणे अधिक सोपे असते. त्यामुळे भरतीच्या वेळेचा अभ्यास करून जहाज चालवले जाते.

(३) मासेमारी : भरतीच्या पाण्याबरोबर मोठ्या प्रमाणावर मासे समुद्रकिनारी भागात व खाडीच्या भागात येतात. त्यामुळे भरतीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर मासेमारी केली जाते.

(४) मीठ निर्मिती : भरतीच्या वेळी खूप मोठया प्रमाणावर समुद्राचे पाणी किनान्याजवळच्या भागात येते.त्यामुळे भरतीचे पाणी मोठ्या प्रमाणावर मिठागरांमध्ये साठवून त्यापासून मीठ बनवणे फायदेशीर ठरते.

(५) सागरी किनारी सहलीला जाणे : भरती-ओहोटीच्या वेळा माहीत करून घेऊन सागरी किनारी सहलीला जाणे योग्य ठरते. भरतीच्या वेळी सागरी क्रीडाप्रकारांचा योग्य खयरदारी घेऊन आस्वाद घेणे शक्य होते.

प्रश्न ५. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा :

(৭) जर सकाळी सात वाजता भरती आली, तर त्या दिवसातील पुढील ओहोटी व भरतीच्या वेळा कोणत्या ते लिहा.

उत्तर : (१) जर सकाळी सात वाजता भरती आली, तर त्या दिवसातील पुढ्ील ओहोटीची वेळ ही साधारणपणे दुपारी १ वाजून १२ मिनिटे व त्यापुढील भरतीची वेळ ही साधारणपणे संध्याकाळी ७ वाजून २५ मिनिटे अशी असेल.

(२) ज्या वेळी मुंबई (७३' पूर्व रेखावृत्त) येथे गुरुवारी दुपारी १.०० वाजता भरती असेल, त्या वेळी दुसऱ्या कोणत्या रेखावृत्तावर भरती असेल ते सकारण सांगा.

उत्तर : ज्या वेळी मुंबई (७३ पूर्व रेखावृत्त) येथे गुरुवारी दुपारी १.०० वाजता भरती असेल, त्यावेळी १०७" पश्चिम रेखावृत्तावर भरती असेल.

कारणे : (१) पृथ्वीवर ज्या ठिकाणी भरती किया ओहोटी येते, त्याच्या विरुद्ध ठिकाणीही (प्रतिपादी स्थानावर) त्याच देळी अनुक्रमे भरती किंवा ओहोटी येते. (२) ७३" पूर्व रेखावृत्ताच्या विर्द्ध बाजूस (प्रतिपादी स्थानावर) १०७ पश्चिम रेखावृत्त आहे.

(३) लाटानिर्मितीची कारणे स्पष्ट करा.

उत्तर : (१) लाटेच्या निर्मितीचे मुख्य कारण यारा आहे. (२) काही वेळा सागरतळाशी भूकंप झाल्यास किंया ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यासही लाटा निर्माण होतात.

(४) लाटा निर्माण होण्याची प्रक्रिया स्पष्ट करा.

उत्तर : (१) वार्याकडून मिळणाऱ्या शक्तीने (ऊर्जेने) सागरातील पाणी गतिमान (प्रवाही) होते. (२) वाऱ्यांमुळे सागरजल ढकलले जाते व पाण्यावर तरंग निर्माण होतात. अशा प्रकारे लाटा निर्माण होतात.

(५) लाटेची उंची व लांबी कशा प्रकारे सांगता येते ?

उत्तर : (१) शीर्ष व द्रोणी या लाटेच्या दोन भागांदवारे लाटेची उंची आणि लांबी सांगता येते. (२) शीर्ष आणि द्रोणी यांमधील उभ्या अंतरादवारे लाटेची उंची सांगता येते. (३) दोन शीर्षादरम्यानच्या किंवा दोन द्रोणींदरम्यानच्या अंतराद्वारे लाटेची लांबी सांगता येते.

(६) लाटांचे परिणाम स्पष्ट करा.

उत्तर : (१) लाटांमुळे समुद्रात घुसलेल्या किनारी भागाची झीज होते. (२) उपसागरासारख्या सुरक्षित भागात वाळूचे संचयन होऊन पुळण निर्माण होते. (३) त्सुनामीसारख्या विध्वंसक लाटांमुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी व वित्तहानी होते.

प्रश्न ६. पुढील विधानांची भौगोलिक कारणे लिहा :

(१) भरती-ओहोटीवर सूर्यापेक्षा चंद्राचा जास्त परिणाम होतो.

उत्तर : (१) सूर्यापिक्षा चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ आहे. (२) त्यामुळे भरती-ओहोटीच्या बाबतीत चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल सूर्याच्या गुरुत्वाकर्षण बलापेक्षा जास्त परिणामकारकरीत्या कार्य करते. म्हणून भरती-ओहोटीवर सूर्यपिक्षा चंद्राचा जास्त परिणाम होतो.

(२) काही ठिकाणी किनार्याजवळील सखल प्रदेश खाजणाचा किंवा दलदलीचा बनतो.

उत्तर : (१) काही ठिकाणी किनाऱ्याजवळील सखल प्रदेशात भरतीमुळे सागराचे पाणी येते. (२) त्यामुळे सखल भागात काही प्रमाणात समुद्राच्या पाण्याचे व वाळूचे संचयन होत जाते. (३) अशा भागात तिवराची वने झपाट्याने वाढतात. (४) अशा भागात किनारी भागांतील जैवविविधता विकसित होऊन तिचे जतन होते. त्यामुळे काही ठिकाणी किनान्याजवळील सखल प्रदेश खाजणाचा किंवा दलदलीचा बनतो.

(३) ओहोटीच्या ठिकाणच्या विरुद्ध रेखावृत्तावरदेखील ओहोटीच येते.

उत्तर : (१) जेव्हा एखादया रेखावृत्तावरील विशिष्ट ठिकाण चंद्रासमोर येते, तेव्हा त्या ठिकाणी चंद्राच्या गुरुत्वाकर्षण बलाचा प्रभाव हा केंद्रोत्सारी बलाच्या मानाने अधिक असतो. त्यामुळे तेथे चंद्राच्या दिशेने पाणी खेचले जाते व तेथे भरती येते. (२) भरतीमुळे या रेखावृत्ताशी काटकोनात असलेल्या समोरासमोरील दोन रेखावृत्तांवरील पाणी ओसरते व त्याच वेळी तेथे ओहोटी येते. अशा प्रकारे ओहोटीच्या ठिकाणच्या विरुद्ध रेखावृत्तावरदेखील (प्रतिपादी स्थानावर) ओहोटीच येते.

(४) सागरी लाटा उथळ किनारी भागात येऊन फुटतात.

उत्तर : (१) वार्यामुळे निर्माण होणाऱ्या लाटांमुळे सागराचे पाणी वर-खाली व किंचित मागे-पुढे होते. (२) सागरी लाटा त्यांच्यात सामावलेली ऊर्जा किनार्यापर्यंत घेऊन येतात. त्यामुळेच लाटा उथळ किनारी भागात येऊन फुटतात

प्रश्न ७, फरक स्पष्ट करा :

(৭) भरती व ओहोटी.

उत्तर :

भरती

৭. सागरजलाच्या पातळीत होणारी वाढ, म्हणजे 'भरती' 

२. भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी किनाऱ्याच्या खूप जवळ येते.

ओहोटी

१. सागरजलाच्या पातळीत होणारी घट, म्हणजे 'ओहोटी' होय.

२. ओहोटीच्या वेळी समुद्राचे पाणी किनाऱ्यापासून आत दूरपर्यंत जाते.

(२) उधाणाची भरती व भांगाची भरती,

उत्तर :

उधाणाची भरती

१. पौर्णिमेला व अमावास्येला येणारी भरती, म्हणजे 'उधाणाची भरती होय

२. उधाणाच्या भरतीतील सागरजलाची पातळी ही इतर भरतीतील सागरजलाच्या पातळीच्या तुलनेत सर्वांत अधिक असते

भांगाची भरती

१ शुक्ल व कुष्ण पक्षातील अष्टमीला येणारी भरती,म्हणजे 'भांगाची भरती होय.

२. भांगाच्या भरतीतील सागरजलाची पातळी ही इतर भरतींतील सागरजलाच्या पातळीच्या तुलनेत सर्वात कमी असते.

(३) उधाणाची ओहोटी व भांगाची ओहोटी.

उत्तर :

उधाणाची ओहोटी

१पोर्णिमेला व अमावास्येला येणारी ओहोटी, म्हणजे उधाणाची ओहोटी होय.

२. उधाणाच्या ओहोटीतील सागरजलाची पातळी ही इतर ओहोटीतील सागरजलाच्या पातळीच्या तुलनेत सर्वांत कमी असते.

भांगाची ओहोटी

१. शुक्ल व कृष्ण पक्षातील अष्टमीला येणारी ओहोटी, म्हणजे भांगाची ओहोटी' होय,

२. भांगाच्या ओहोटीतील सागरजलाची पातळी ही इतर ओहोटीतील सागरजलाच्या पातळीच्या तुलनेत सर्वात अधिक असते.

लाट व त्सुनामी लाट.

उत्तर :

लाट

৭. वार्याकडून मिळणाच्या शक्तीने सागराचे पाणी गतिमान होऊन लाट निर्माण होते.

२. लाट विनाशकारी नसते.

त्सुनामी लाट

१. सागरतळाशी झालेल्या भूकंप व ज्वालामुखीमुळे त्सुनामी लाट निर्माण होते.

२. त्सुनामी लाट विनाशकारी असते.

प्रश्न ८. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा :

(१) भरती-ओहोटीचे चांगले व वाईट परिणाम कोणते, ते लिहा.

उत्तर : भरती-ओहोटीचे चांगले व वाईट परिणाम पुढीलप्रमाणे आहेत :

(अ) चांगले परिणाम : (१) भरतीच्या पाण्याबरोबर मासे खाडीत येतात. त्याचा फायदा मासेमारीसाठी होतो. (२) भरती-ओहोटीमुळे पाण्यातील कचर्याचा निचरा होतो व समुद्रकिनारा स्वच्छ राहतो. (३) भरती-ओहोटीमुळे बंदरे गाळाने भरत नाहीत. (४) भरतीच्या वेळेस जहाजे बंदरात आणता येतात. ( ५) भरतीचे पाणी मिठागरात साठवून त्या पाण्यापासून मीठ तयार केले जाते. (६) भरती-ओहोटीच्या प्रक्रियेमुळे वीज निर्माण करता येते. (७) भरती- ओहोटीमुळे तिवराची वने व किनारी भागातील जैवविविधता इत्यादींचा विकास व जतन होते.

(ब) वाईट परिणाम : भरती-ओहोटीच्या वेळेचा अंदाज नीट न आल्यास समुद्रात पोहण्यास गेलेल्या व्यक्तींना अपघात होऊ शकतो  

. त्सुनामी लाट माहिती लिहा.

उत्तर : (१) काही वेळा सागरतळाशी भूकंप झाल्यास व ज्वालामुखींचा उद्रेक झाल्यास, अत्यंत विध्वंसक स्वरूपाच्या लाटा निर्माण होतात. अशा लाटांना त्सुनामी म्हणतात. (२) उथळ किनारी भागांत त्सुनामी लाटांची उंची प्रचंड असते (३) त्सुनामी लाटांमुळे मोठया प्रमाणावर जीवितहानी व वित्तहानी होते. (४) २००४ साली सुमात्रा व इंडोनेशिया बेटांजवळ झालेल्या भूकंपामुळे प्रचंड ल्सुनामी लाटा निर्माण झाल्या होत्या. त्यांचा तडाखा भारताचा पूर्व किनारा व श्रीलंका या देशांनाही बसला होता (५) त्युनामीचा धोका निर्माण झाला असता किनारी भागापासून दूरजाणे किंवा समुद्रसपाटीपासून उंचावर जाणे उपयुक्त ठरते. त्यामुळे जीवितहानी टाळता येते.

(३) उधाणाची भरती-ओहोटी  स्पष्ट करा.

उत्तर : (१) चंद्र आणि सूर्य यांच्या भरती निर्माण करणाऱ्या प्रेरणा अमावास्या व पौर्णिमेला एकाच दिशेत कार्य करतात. त्यामुळे गुरुत्वाकर्षण बल वाढते. (२) त्यामुळे पौर्णिमेला व अमावास्येला सरासरी भरतीपेक्षा मोठी भरती व सरासरी ओहोटीपेक्षा मोठी ओहोटी येते. (३) या भरती-ओहोटीला उधाणाची भरती-ओहोटी म्हणतात. (४) उधाणाच्या भरतीच्या ठिकाणी पाण्याचा नेहमीपेक्षा अधिक फुगवटा झाल्यामुळे ओहोटीच्या ठिकाणी पाणी नेहमीपेक्षा अधिक खोलपर्यंत ओसरते.

(४) भांगाची भरती-ओहोटी  स्पष्ट करा.

उत्तर : (१) चंद्र पृथ्वीभोवती फिरताना महिन्यातून दोन वेळा पृथ्वी आणि सूर्य यांच्या संदर्भात काटकोन स्थितीत येतो. (२) ही स्थिती प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षातील अष्टमीला येते. (३) या दोन दिवशी भरती निर्माण करणार्या चंद्र आणि सूर्य यांच्या प्रेरणा पृथ्वीवर काटकोन दिशेत कार्य करतात. त्यामुळे या दोन दिवशी चंद्र व सूर्य यांचे आकर्षण एक दुसर्यास पूरक न होता परस्पर काटकोनात असते. (४) त्यामुळे ज्या ठिकाणी चंद्रामुळे भरती निर्माण होते; त्याच ठिकाणी सूर्यामुळे ओहोटी निर्माण होते व ज्या ठिकाणी चंद्रामुळे ओहोटी निर्माण होते; त्याच ठिकाणी सूर्यामुळे भरती निर्माण होते. (५) अशा तन्हेने निर्माण झालेल्या भरतीमुळे पाण्याची पातळी नेहमीपेक्षा कमी चढते व ओहोटीमुळे पाण्याची पातळी नेहमीपेक्षा कमी उतरते. (६) या भरती-ओहोटीला भांगाची भरती-ओहोटी म्हणतात. (७) भांगाची भरती-ओहोटी सरासरीपेक्षा अधिक लहान असते. (

(५) भरती-ओहोटीच्या वेळेत रोजच्या रोज होत जाणारा बदल  स्पष्ट करा.

उत्तर : (१) पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणची भरती- ओहोटीची वेळ दररोज बदलते. (२) एकाच दिवसातील दोन भरतींच्या किंवा दोन ओहोटयांच्या वेळांतील फरक हा सुमारे १२ तास २५ मिनिटांचा असतो. (३) कोणत्याही पुढील दिवसातील दोन भरतींच्या किंवा दोन ओहोटयांच्या वेळा या त्या दिवसाच्या अगोदरच्या दिवसातील दोन भरतींच्या किंवा दोन ओहोटयांच्या वेळांपेक्षा प्रत्येकी सुमारे ५० मिनिटे पुढच्या असतात 

प्रश्न ९. जोड्या लावून साखळी बनवा :

उत्तरे : 

(१) लाटा-वारा-भूकंप व ज्वालामुखीच्या उद्रेकामुळेही होतात.

(२) केंद्रोत्सारी प्रेरणा-पृथ्वीचे परिवलन-वस्तू बाहेरच्या दिशेने फेकली जाते.

(३) गुरुत्वीय बल-चंद्र, सूर्य व पृथ्वी-पृथ्वीच्या मध्याच्या दिशेने कार्य करते.

(४) उधाणाची भरती-अमावास्या-सर्वांत मोठी भरती त्या दिवशी असते.

(५) भांगाची भरती-अष्टमी-चंद्र व सूर्य यांच्या प्रेरणा वेगवेगळ्या दिशांनी कार्य करतात.



October 26, 2020

स्वाध्यायमाला - प्रश्नोत्तरे इयत्ता सातवी भूगोल 2 -सूर्य ,चंद्र व पृथ्वी

 स्वाध्यायमाला - प्रश्नोत्तरे इयत्ता सातवी  भूगोल  2  -सूर्य ,चंद्र व पृथ्वी 


                                                                                                                     Test link


प्रश्न १. योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा :
उत्तरे

(१) चंद्र अंशतः झाकला जातो, त्या स्थितीला  खंडग्रास चंद्रग्रहण म्हणतात.

(२) सूर्यग्रहण  अमावास्येला   होते.

(३) चंद्रग्रहण पौर्णिमेला. होते. 

प्रश्न २. जी विधाने चुकीची आहेत ती दुरुस्त करून लिहा :

(१) चंद्र हा सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतो.

उत्तर : चूक. चंद्र हा पृथ्वीच्या भोवती प्रदक्षिणा घालतो.

(२) पौर्णिमेला चंद्र, सूर्य व पृथ्वी हा क्रम असतो.

उत्तर : चूक. पौर्णिमेस चंद्र, सूर्य व पृथ्वी यांचा सूर्य, पृथ्वी व चंद्र असा क्रम असतो.

(३) पृथ्वीची परिभ्रमण कक्षा आणि चंद्राची परिभ्रमण कक्षा ही एकाच पातळीत आहे.

उत्तर : चूक. पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा एकाच पातळीत नाही. चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी सुमारे ५° चा कोन करते.

(४) चंद्राच्या एका परिभ्रमण काळात चंद्राची कक्षा पृथ्वीच्या कक्षेशी एकदाच छेदते.

उत्तर : चूक, चंद्राच्या एका परिभ्रमण काळात चंद्राची कक्षा पृथ्वीच्या कक्षेशी दोनदा छेदते.

(५) सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे बरोबर आहे.

उत्तर : चूक. सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे योग्य नाही. सूर्यग्रहण पाहण्यासाठी काळी काच किंवा दिशिषएट प्रकारचे गाँगल्स वापरणे योग्य ठरते.

(६) चंद्र पृथ्वीशी उपभू स्थितीत असताना कंकणाकृती सूर्यग्रहण होते.

उत्तर : चूक. चंद्र पृथ्वीशी अपभू स्थितीत असताना कंकणाकृती सूर्यग्रहण होते.

प्रश्न ४. पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा :

(१) अमावास्येला चंद्र, सूर्य आणि पृथ्वी यांचा क्रम कसा असतो?

उत्तर : अमावास्येला चंद्र, सूर्य आणि पृथ्वी यांचा क्रम सूर्य चंद्र पृथ्वी असा असतो.

(२) सूर्यग्रहणाचे प्रकार लिहा.

उत्तर : खग्रास, खंडग्रास आणि कंकणाकृती सूर्यग्रहण हे सूर्यग्रहणाचे तीन प्रकार आहेत.

(३) चंद्रग्रहणाचे प्रकार लिहा.

उत्तर : खग्रास आणि खंडग्रास हे चंद्रग्रहणाचे दोन प्रकार आहेत.

4) उपभू स्थितीत कोणत्या प्रकारची सूर्यग्रहणे होतील?

उत्तर : उपभू स्थितीत खग्रास सूर्यग्रहण व खंडग्रास सूर्यग्रहण या प्रकारची सूर्यग्रहणे होतील.

(५) चंद्राची अक्षीय गती म्हणजे काय?

उत्तर : चंद्र स्वतःभोवती ज्या गतीने फिरतो ती गती म्हणजे चंद्राची 'अक्षीय गती होय.

(६) चंद्राची कक्षीय गती म्हणजे काय ?

उत्तर : चंद्र पृथ्वीभोवती ज्या गतीने फिरतो, ती गती म्हणजे चंद्राची 'कक्षीय गती' होय.

(७) सूर्यग्रहणाच्या दिवशी पृथ्वीवरील कोणत्या भागातून ग्रहण दिसणार नाही ?

उत्तर : सूर्यग्रहणाच्या दिवशी पृथ्वीवरील ज्या भागावर चंद्राची दाट किंवा विरळ सावली पडणार नाही, त्या भागातून ग्रहण दिसणार नाही.

(८) कंकणाकृती आणि खग्रास असे सूर्यग्रहण एकाय वेळी होऊ शकते काय ?

उत्तर : कंकणाकृती आणि खग्रास असे सूर्ग्रहण एकाच वेळी होऊ शकत नाही.

(९) चंद्रावर गेल्यास तुम्हांला कोणकोणती ग्रहणे दिसू शकतील ?

उत्तर : चंद्रावर गेल्यास तेथून खग्रास व खंडप्रास सूर्यग्रहणे दिसू शकतील.

प्रश्न ५. पुढील संज्ञा स्पष्ट करा :

(৭) शुक्ल पक्ष : अमावास्येपासून पौर्णिमिपर्यंतच्या पंधरा दिवसांच्या चंद्राचा प्रकाशित भाग वाढत जाण्याच्या काळास शुक्ल पक्ष म्हणतात.

(२) कृष्ण पक्ष : पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंतच्या पंधरा दिवसांच्या चंद्राचा प्रकाशित भाग कमी होत जाण्याच्या काळास शुक्ल पक्ष म्हणतात.

(३) पौर्णिमा : ज्या रात्री पृथ्वीच्या समोर असलेला चंद्राचा संपूर्ण भाग प्रकाशित दिसतो, त्या रात्रीला पौर्णिमा म्हणतात.

(४) अमावास्या : ज्या रात्री पृथ्वीच्या समोर असलेला चंद्राचा प्रकाशित भाग आपल्याला अजिबात दिसत नाही, त्या रात्रीला अमावास्या म्हणतात.

प्रश्न ६. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा :

৭) दर अमावास्येस व पौर्णिमेस चंद्र, पृथ्वी, सूर्य एका सरळ रेषेत का येत नाहीत ?

उत्तर : (१) पृथ्वीची सूर्याभोवतीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची पृथ्वीभोवतीची परिप्रमण कक्षा एकाच पातळीत नाहीत. (२) चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिप्रमण कक्षेशी सुमारे ५° चा कोन करते. त्यामुळे दर अमावास्येस व पौर्णिमेस चंद्र, पृथ्वी, सूर्य एका सरळ रेपेत येत नाहीत.

(२) खग्रास सूर्यग्रहण होत असताना पृथ्वीवर खंडग्रास सूर्यग्रहणही का अनुभवास येते ?

उत्तर : (१) अमावास्येच्या दिवशी सूर्य, चंद्र व पृथ्वी हे तीन खगोल अनुक्रमे एकाच सरळ रेषेत आले तर चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. (२) एकाच वेळी पृथ्वीच्या काही भागावर चंद्राची दाट छाया पडते, तर काही भागावर चंद्राची विरळ छाया पडते. (३) पृथ्वीच्या ज्या भागावर चंद्राची दाट छाया (सावली) पडते, त्या भागातून सूर्य पूर्णपणे झाकलेला दिसतो व या भागातून खपरास सूर्यप्रहण अनुभवास येते. (४) त्याच वेळी पृथ्वीच्या ज्या भागावर चंद्राची विरळ छाया (सावली) पडते, त्या भागातून सूर्याचा काही भाग दिसतो, तर काही भाग झाकलेला दिसतो, म्हणजेच या भागातून खंडग्रास सूर्यप्रहण अनुभवास येते. ( ५) याशिवाय पृथ्वीवरील काही भाग प्रथम चंद्राच्या विरळ छायेत आला असता व त्यानंतर चंद्राच्या दाट छायेत आला असता, त्या भागातून प्रथम खंडग्रास  सूर्यग्रहण व त्यानंतर खंग्रास सूर्यग्रहण अनुभवास येते. अशा प्रकारे, खग्रास सूर्यग्रहण होत असताना पृथ्वीवर खंडग्रास सूर्यप्रहणही अनुभवास येते.

३) सूर्यग्रहण पाहताना कोणती काळजी घ्याल?

उत्तर : (१) सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे डोळ्याना इजा होऊ शकते, त्यामुळे सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे कटाक्षाने टाळू (२) सूर्यग्रहण पाहताना काळया काचेचा किंवा विशिष्ट प्रकारच्या गॉंगल्सचा वापर करू.

(४) चंद्राची उपभू व अपभू स्थिती म्हणजे काय ?

उत्तर : (१) चंद्राची पृथ्वीभोकतीची परिभ्रमण कक्षा लंबवतुतुळाकार आहे. त्यामुळे चंद्र पृथ्वीभोवती प्रदकषिणा घालताना पृथ्वी व चंद्र यांमधील अंतर सर्वत्र सारखे नसते. (२) जेव्हा चंद्र त्याच्या पृथ्वीभोवतीच्या प्रदक्षिणा मार्गात जवळ असतो, त्या स्थितीला चंद्राची उपभू स्थिती म्हणतात. उपभू स्थितीत चंद्र पृथ्वीपासून सुमारे ३,५६.००० किमी अंतरावर असतो. (३) याउलट, जेव्हा चंद्र त्याच्या पृथ्वीभोवतीच्या प्रदक्षिणा मार्गात पृथ्वीपासून जास्तीत जास्त दूर असतो, त्या स्थितीला चंद्राची अपभू स्थिती म्हणतात. अपभू स्थितीत चंद्र पृथ्वीपासून सुमारे ४,०७,००० किमी अंतरावर असतो.

प्रश्न - सूर्यग्रहणाची वैशिष्ट्ये लिहा.

उत्तर : (१) सूर्यग्रहण अमावास्येला होते, परंतु ते प्रत्येक अमावास्येला होत नाही. (२) ज्या अमावास्येला सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे अनुक्रमे एका सरळ रेषेत व एका पातळीत येतात, केवळ त्याच अमावास्येला सूर्यग्रहण होते. (३) पृथ्वीच्या ज्या भागावार चंद्राची दाट सावली पडते, त्या भागातून खग्रास सूर्यग्रहण दिसते, तर पृथ्वीच्या ज्या भागावर चंद्राची विरळ सावली पडते, त्या भागातून खंडग्रास सूर्यग्रहण दिसते. (४) खग्रास सूर्यग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी ७ मिनिटे २० सेकंद (४४० सेकंद) इतका असतो.

(६) चंद्रग्रहणाची वैशिष्ट्ये लिहा.

उत्तर : (१) चंद्रग्रहण पौर्णिमेला होते, परंतु ते प्रत्येक पौर्णिमेला होत नाही. (२) ज्या पौरणिमिला सूर्य, पृथ्वी आणि चंद्र हे अनुक्रमे एका सरळ रेषेत व एका पातळीत येतात, केवळ त्याच पौर्णिमेला चंद्रग्रहण होते. (३) पृथ्वीच्या दाट सावलीत चंद्र संपूर्णपणे झाकला गेला असता, खग्रास चंद्रग्रहण दिसते; तर पृथ्वीच्या दाट सावलीत चंद्राचा काही भाग झाकला गेला असता, खंडग्रास चंद्रग्रहण दिसते. (४) खग्रास चंद्रप्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी १०७ मिनिटे इतका असतो.

(७) सूर्यग्रहणाच्या वेळी पशुपक्ष्यांचे वर्तन कसे असते ?

उत्तर : (१) सूर्यग्रहणाच्या कालावधीत अचानक निर्माण होणाऱ्या काळोखामुळे अनेक पक्षी, प्राणी गोंधळतात. (२) त्यांच्या जैविक घड्याळापेक्षा वेगळी घटना असल्यामुळे त्यांचा या घटनेला मिळणारा प्रतिसाद वेगळा असतो.

(८) चंद्र, पृथ्वी व सूर्य यांची कृष्ण व शुक्ल पक्षातील अष्टमीची तसेच अमावास्येच्या दिवशीची सापेक्ष स्थिती लक्षात घ्या. या दिवशी चंद्र-पृथ्वी - सूर्य यांच्यातील कोन किती अंशाचे असतील ? प्रत्येक महिन्यात असे कोन किती वेळा होतील ?

उत्तर : चंद्र-पृथ्वी सूर्य यांच्यातील कोन कृष्ण व शुक्ल पक्षातील अष्टमीच्या दिवशी तसेच अमावास्येच्या दिवशी पुढीलप्रमाणे असतील : (१) कृष्ण पक्षातील अष्टमी चंद्र -पृथ्वी सूर्य यांच्यातील कोन ९०° (२) शुक्ल पक्षातील अष्टमी : चंद्र-पृथ्वी सूर्य यांच्यातील कोन- ९०° (३) अमावास्या : चंद्र - पृथ्वी सूर्य यांच्यातील कोन - ०° [(४) पौर्णिमा : चंद्र-पृथ्वी सूर्य यांच्यातील कोन- १८०°], प्रत्येक महिन्यात अष्टमीच्या स्थितीतील कोन दोन वेळा व अमावास्या (व पौर्णिमा) स्थितीतील कोन एक वेळा होईल

प्रश्न ७. पुढील विधानांची भौगोलिक कारणे लिहा :

(१) चंद्राची दुसरी बाजू पृथ्वीवरून कधीही दिसत नाही.

उत्तर : (१) चंद्राचा परिवलन व परिभ्रमण काळ जवळजवळ सारखाच असतो. (२) म्हणजेच चंद्राची अक्षीय गतीव कक्षीय गती जवळजवळ सारखीच असते. परिणामी पृथ्वीवरून चंद्राची विशिष्ट बाजूच सतत दिसत राहते. त्यामुळे चंद्राची दुसरी बाजू पृथ्वीवरून कधीही दिसत नाही.

(२) दर अमावास्येस सूर्यग्रहण होत नाही.

उत्तर : (१) अमावास्येस सूर्य, चंद्र आणि पृथ्यी अनुक्रमे एकाच सरळ  रेषेत आले, तर सूर्यग्रहण होते. (२) परंतु पृथ्वीचा सूर्याभोवतीचा प्रदक्षिणा मार्ग व चंद्राचा पृथ्वीवरचा प्रदक्षिणा मार्ग एकाच पातळीत नाहीत. त्यांच्यात ५ अंशांचा कोन आहे. (३) त्यामुळे दर अमावास्येस सूर्य घंद्र आणि पृथ्वी एकाच सरळ रेषेत येत नाहीत. त्यामुळे दर अमाधास्येस सूर्यप्रहण होत नाही.

(३) दर पौणिमेस चंद्रग्रहण होत नाही.

उत्तर : (१) पौणिमेस सूर्य पृथ्वी आणि चंद्र अनुक्रमे एकाच सरळ रेषेत आले, तर चंद्रग्रहण होते. (२) परंतु पृथ्वीचा सू्याभोवतीचा प्रद्षिणा मार्ग व चंद्राचा पृथ्वीवरधा प्रदक्षिणा मार्ग एकाचर पातळीत नाहीत. त्यांच्यात ५ अंशांचा कोन आहे. (३) त्यामुळे दर पौर्णिमेस सूर्य, पृथ्वी आणि घंद्र एकाच सरळ रेषेत येत नाहीत त्यामुळे दर पौर्णिमेस चंद्रग्रहण होत नाही.

(४) चंद्रग्रहण कंकणाकृती का दिसणार नाही ?

उत्तर : (१) चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. चंद्राच्या आकारमानापेक्षा पृथ्वीचे आकारमान खूप मोठे आहे व चंद्र पृथ्वीच्या (सूर्याच्या तुलनेत) जवळ आहे. (२) परिणामी, चंद्रग्रहणाच्या वेळी पृथ्वीची दाट सावली चंद्रापर्यंत न पोहोचता ती अवकाशातच संपली अशी स्थिती उद्भवू शकणार नाही. त्यामुळे चंद्रग्रहण कंकणाकृती दिसणार नाही.

(५) इतर ग्रहांमुळे होणारी सूर्यग्रहणे आपण का पाहू शकत नाही ? 

उत्तर : (१) चंद्र या उपप्रहाच्या तुलनेत इतर ग्रह पृथ्वीपासून दूर अंतरावर आहेत. (२) इतर ग्रहांच्या दाट किंवा विरळ छाया पृथ्वीवर पडत नाहीत. त्यामुळे इतर ग्रहामळे होणारी सूर्यग्रहणे आपण पाहू शकत नाही.

प्रश्न ८. थोडक्यात टिपा लिहा :

(१) खग्रास सूर्यग्रहण : 

(१) अमावास्येच्या दिवशी सूर्य, चंद्र व पृथ्वी हे तीन खगोल अनुक्रमे एकाच सरळ रेषेत आले, तर चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. (२) पृथ्वीच्या ज्या भागावर चंद्राची दाट छाया ( सावली) पडते, त्या भागातून सूर्य पूर्णपणे झाकलेला दिसतो. यालाच खग्रास सूर्यग्रहण म्हणतात. (३) खग्रास सूर्यग्रहण फार थोडया भागातून अनुभवता येते.

(२) खंडग्रास सूर्यग्रहण : 

(१) अमावास्येच्या दिवशी सूर्य, चंद्र व पृथ्वी हे तीन खगोल अनुक्रमे एकाच सरळ रेषेत आले, तर चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. (२) पृथ्वीच्या ज्या भागावर चंद्राची विरळ छाया (सावली) पडते, त्या भागातून सूर्याचा काही भाग दिसतो, तर काही भाग झाकलेला दिसतो. यालाच खंडग्रास सूर्यहण म्हणतात

(३) कंकणाकृती सूर्यग्रहण : 

(१) अमावास्येच्या दिवशी सूर्य चंद्र व पृथ्वी हे तीन खगोल अनुक्रमे एकाच सरळ रेषेत असतील व चंद्र अपभू स्थितीत असेल, तर अशा वेळी चंद्राची दाट सावली पृथ्वीवर पोहोचू शकत नाही, ती अवकाशातच संपते. (२) अशा वेळी पृथ्वीवरील अगदी थोड्या  भागातून सूर्याची फक्त प्रकाशमान कडा एखादया बांगडीप्रमाणे दिसते. (३) अशा प्रकारच्या सूर्यप्रहणास कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात. (४) कंकणाकृती सूर्य्रहण क्वचितच  दिसते

(४) खग्रास  चंद्रग्रहण : 

(१) पौर्णिमेच्या दिवशी सूर्य पृथ्वी व चंद्र है तीन खगोल अनुक्रमे एकाच सरळ रेषेत आले, तर चंद्राचा पृथ्वीभोवतीचा प्रदक्षिणा मार्ग पृथ्वीच्या दाट सावलीतून जातो. (२) चंद्र पृथ्वीच्या दाट सावलीत आल्यामुळे पूर्णपणे झाकला गेल्यास, त्या स्थितीला खास चंद्रप्रहण] म्हणतात.

(५) खंडग्रास चंद्रग्रहण

(१) पौर्णिमेच्या दिवशी सूर्य, पृथ्वी व चंद्र हेै तीन खगोल अनुक्रमे एकाच सरळ रेषेत आले, तर चंद्राचा प्रदक्षिणा मार्ग पृथ्वीच्या दाट सावलीतून जातो. (२) चंद्र पृथ्वीच्या दाट सावलीत आल्यामुळे अशतः झाकला गेल्यास, त्या स्थितीला खंडयास चंद्रप्रहण म्हणतात.

प्रश्न ९. पुढील तक्ता पूर्ण करा : 

चंद्रग्रहण

तिथी दिवस :   पौर्णिमा 

स्थिती  चंद्र-पृथ्वी - सूर्य  

ग्रहणांचे प्रकार :  खग्रास व खंडग्रास

खग्रासचा जास्तीत जास्त कालावधी  १०७ मिनिटे

सूर्यग्रहण

तिथी दिवस : अमावास्या

स्थिती : पृथ्वी - चंद्र- सूर्य

ग्रहणांचे प्रकार :खग्रास, खंडग्रास व कंकणाकृती

खग्रासचा जास्तीत जास्त कालावधी  ७ मिनिटे २० सेकंद

आकृती काढा