सेतू अभ्यासक्रम 5 वी मराठी
June 30, 2021
इयत्ता 5 वी - दिवस दुसरा -मराठी -मुलाखत - सेतू अभ्यासक्रम
इयत्ता 5 वी - दिवस दुसरा -मराठी - मुलाखत - सेतू अभ्यासक्रम
मौखिक भाषा विकासाच्या सरावासाठी मुलाखत हे तंत्र विद्यार्थ्यानी कसे वापरावे याबाबत वरील घटकामध्ये मार्गदर्शन केले आहे .
कोविड १९ च्या उद्भवलेल्या परिस्थितीमुळे मागील शैक्षणिक वर्षात प्रत्यक्ष विद्यार्थी समोर असताना वर्ग अध्यापन होऊ शकले नाही. नव्या शैक्षणिक वर्षात प्रत्यक्ष शाळा कधी सुरू होतील याबाबत अनिश्चितता आहे. मागील शैक्षणिक वर्षात आपण ऑनलाइन माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी विविध प्रयत्न केलेत. मागील शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी केलेल्या अध्ययनाची उजळणी व्हावी तसेच नवीन शैक्षणिक वर्षात शिकाव्या लागणाऱ्या अभ्यासक्रमाची पूर्वतयारी हा दुहेरी उद्देश ठेवून हा सेतू अभ्यास म.रा.शै.सं.व प्र.परिषद पुणे याच्या मार्फ़त तयार करण्यात आला आहे. तो पूरक साहित्यासह सहजपणे विद्यार्थी व पालक यांच्यापर्यंत पोहोचावा हाच प्रयत्न !
मौखिक भाषा विकासाच्या सरावासाठी मुलाखत हे तंत्र विद्यार्थ्यानी कसे वापरावे याबाबत वरील घटकामध्ये मार्गदर्शन केले आहे .
उदहारण म्हणून डॉक्टर यांची मुलाखत घेण्यासाठी खालील प्रश्नावली बघा व एक मुलाखत घ्या .
- नमस्कार ............. साहेब , आपले शुभ नाव काय ?
- आपण डॉक्टर व्हावे असे आपणास का वाटले होते ?
- आपण कोण कोणत्या आजारावर उपचार करत आहात ?
- आपण आपले वैद्यकीय शिक्षण कोणत्या ठिकानावरून पूर्ण केले आहे ?
- रुग्ण सेवा करत असताना तुम्हाला कधी रुग्ण व् त्यांचे नातेवाईक यांच्या कडून आपल्या सेवेच्या कामाबद्दल चांगले अनुभव येत असेल तर ते सांगू शकाल का ?
- आपल्या हॉस्पिटलची वेळ काय आहे ?