Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

Translate

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image
Showing posts with label स्वाध्याय स्वप्नं विकणारा माणूस. Show all posts
Showing posts with label स्वाध्याय स्वप्नं विकणारा माणूस. Show all posts

Monday, 28 September 2020

September 28, 2020

स्वाध्यायमाला - प्रश्नोत्तरे - सातवी मराठी 2 - स्वप्नं विकणारा माणूस

स्वाध्याय 2 - स्वप्नं विकणारा माणूस 

तुमचे मत लिहा .

 (१) गावात येणाऱ्या माणसाला गावकरी 'स्वप्न विक्या' म्हणत.

उत्तर : घोड्यावर बसून गावात येणारा माणूस वेगवेगळ्या गोष्टी सांगून, गावकऱ्यांमध्ये उत्साह पेरत असे.त्याच्या बोलण्याने जगाची ओळख होत असे.त्याच्या किश्शांनी गावकरी थोड्या काळापुरते आपले दुःख विसरत. गोड गोड बोलून तो जणू स्वप्नच गावकऱ्यांच्या डोळ्यांत उतरवून जात असे. म्हणून गावकरी त्याला स्वप्नविक्या' म्हणत.

(२) स्वप्नं विकणाऱ्या माणसाचा गावात येण्यामागचा उद्देश काय असेल .

उत्तर : आपले अनुभव सांगावेत, आपल्याजवळचे ज्ञान दुसऱ्यांना दयावे. दुसऱ्यांना आनंद द्यावा .लोकांची सेवा करावी. स्वप्नं विकणाऱ्या माणसाचा गावात येण्यामागे हा उद्देश होता.

प्रश्न . स्वप्नं विकणाऱ्या माणसाचे पुढील मुदुद्यांच्या आधारे दोन-दोन वाक्यांत वर्णन करा :

स्वप्नं विकणारा माणूस

त्याचा पेहराव    

तलम रेशमी धोतर, त्यावर रेशमी जरीचा सैलसर कुडता, डोक्याला लाल-पांढरा फेटा, डोळ्यांवर चष्मा व पायांत चामडी बूट, असा स्वप्नं विकणाऱ्या माणसाचा पेहराव असे.

त्याचे बोलणे

त्याने अनुभवलेले समृद्ध विश्व तो वेगवेगळ्या किश्शांनी रंगवून व फुलवून सांगत असे. त्याचे बडबडणे दिलखेचक व स्वप्नात धुंद गुंगवणारे होते.

त्याचे स्वप्न

आपले अनुभव, आपल्याजवळचे ज्ञान इतरांना सांगावे. दूसऱ्यांना आनंद दधावा. लोकांची सेवा करावी, हे स्वप्नविक्या माणसाचे स्वप्न होते.


 तुम्ही चांगले धावपटू आहात. शाळेच्या क्रीडासंमेलन मध्ये  धावण्याच्या स्पर्धेत तुम्हाला  पहिले बक्षीस मिळवायचे, हे तुमचे स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण करण्याकरिता तुम्ही कोणते प्रयत्न कराल?

उत्तर : अगदी लहानपणापासून मला धावण्याची आवड आहे. प्राथमिक शाळेत असताना मी धावण्याच्या

शर्यतीत भाग घेत असे व बक्षिसे मिळवत असे. आता पुढच्या महिन्यात माझ्या शाळेचे क्रीडासंमेलन आहे. त्यातील धावण्याच्या स्पर्धेत पहिले बक्षीस मिळवावे, असे माझे स्वप्न आहे. ते पूर्ण करण्यासाठी मी जबरदस्त मेहनत करणार आहे. माझ्या घराजवळ मैदान आहे. दरोज पहाटे उठून मी त्या मैदानाला धावत पाच गोल चकरा मारणार आहे. त्याचबरोबर प्राणायाम करणे, वजन वाढू न देणे, तेलकट न खाणे. वेळेचे नियोजन करणे हे सर्व नियमित काटेकोरपणे करीन. या स्पर्धेत मी नक्की उज्ज्वल यश मिळवीन असा माझा  ठाम निर्धार आहे.

कल्पना करा व लिहा :

(१) स्वप्न विकणारा माणूस तुम्हांला भेटला आहे व त्याच्याशी तुमचा संवाद झाला आहे.

 उत्तर :

मी:             राम राम भाऊसाहेब, कसे आहात ?

स्वप्नविक्या : राम राम ! मजेत आहे.

मी : आज खूप दिवसांनी येणं केलंत.

स्वप्नविक्या : हो, खरं आहे. थोडा कामात गुंतलो होतो.

मी: एक विचारू का?

स्वप्नविक्या : विचारा की !

मी: तुम्ही हे असं गाठोडं घेऊन का फिरता ?

स्वप्नविक्या : प्रवास घडतो, वेगवेगळे प्रदेश पाहायला मिळतात. माणसांच्या ओळखी होतात.

मी: तुम्हांला गावकरी 'स्वप्नविक्या' म्हणतात हे तुम्हांला माहीत आहे का?

स्वप्नविक्या : खरं सांगू का? मी स्वप्नं विकत नाही. अनुभव सांगतो. ज्ञान देतो. मनमुराद हसवतो.

त्यामुळे माणसं आनंदी राहतात. स्वप्नात रमतात. लोकांची सेवा करायला मिळते, हेच माझे समाधान.

मी: फार महान काम करता तुम्ही!

स्वप्नविक्या : महान काही नाही. जमेल तेवढं करतो.

मी: परमेश्वर तुम्हांला उदंड आरोग्यपूर्ण आयुष्य देवो, अशी सदिच्छा व्यक्त करतो. राम,राम!!