सातवी सामान्य विज्ञान
January 23, 2021
Translate
Showing posts with label इयत्ता सातवी सामान्य विज्ञान. Show all posts

Saturday, 23 January 2021
Tuesday, 19 January 2021
Monday, 4 January 2021
Sunday, 3 January 2021
Saturday, 2 January 2021
Friday, 25 December 2020
Monday, 30 November 2020
Friday, 6 November 2020
Thursday, 1 October 2020
सातवी सामान्य विज्ञान
October 01, 2020
7 वी विज्ञान - 10 - आपत्ती व्यवस्थापन
Thursday, 6 August 2020
इयत्ता सातवी सामान्य विज्ञान
August 06, 2020
इयत्ता सातवी सा. विज्ञान 9-उष्णता Heat Online Test
9- उष्णता
खालील ठळक मुद्दे काळजीपूर्वक वाचा व सर्वांत खाली चाचणी सोडविण्यासाठी क्लिक करा
1. उष्णता हे ऊर्जेचे एक रूप आहे.
उष्णतेचे संक्रमण म्हणजे उष्णतेचे एका स्थानाकडून दुसऱ्या स्थानाकडे जाणे,
म्हणजेच उष्णतेचे स्थानांतर अथवा स्थलांतर होय.
2. उष्णतेचे संक्रमण हे वहन, अभिसरण आणि प्रारण या तीन प्रकारे होते.
◆ वहन
पदार्थाच्या उष्ण भागाकडून थंड भागाकडे होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणास उष्णतेचे वहन म्हणतात. उष्णता वहनास पदार्थरूपी माध्यमाची आवश्यकता असते. म्हणजेच निर्वात पोकळीमधून उष्णतेचे वहन होत नाही.
मुख्यत: स्थायू पदार्थांमध्ये उष्णतेचे वहन होते.
◆ अभिसरण.
कोणत्याही द्रव पदार्थास भांड्याच्या तळाकडून उष्णता दिली असता आधी तळालगतचा द्रव पदार्थ गरम होतो व त्याची घनता कमी होऊन तो वरच्या भागाकडे जातो.
या द्रव पदार्थाची जागा वरुन येणारा थंड द्रव घेतो. घनतेच्या फरकामुळे असे प्रवाह निर्माण होतात व त्यादवारे द्रव पदार्थात उष्णतेचे संक्रमण होते.
यास उष्णतेचे अभिसरण म्हणतात.
वायूंमध्येही अशा प्रकारे उष्णतेचे संक्रमण होते.
अभिसरणासही पदार्थरूपी माध्यमाची आवश्यकता असते.
◆. प्रारण
कोणतेही माध्यम नसतानाही विद्युतचुंबकीय तरंगांच्या स्वरूपात होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणास प्रारण म्हणतात.
माध्यम असतानाही अशा प्रकारे उष्णतेचे संक्रमण होऊ शकते. ही प्रारणे एखादया वस्तूवर पडली असता त्यांचा काही भाग परावर्तित होतो, काही भाग शोषला जातो व उरलेला भाग पारेषित केला जातो.
◆. उष्णतेचे सुवाहक
ज्या पदार्थांमधून उष्णतेचे वहन सहजपणे होते, त्या पदार्थला उष्णतेचे सुवाहक म्हणतात.
उदा., तांबे, लोखंड.
◆उष्णतेचे दुर्वाहक
ज्या पदार्थांतून उष्णतेचे वहन सहजपणे होत नाही, त्यांना उष्णतेचे दुर्वाहक म्हणतात.
उदा., लाकूड, प्लॅस्टिक
◆.उष्णतेमुळे धातू प्रसरण पावतात व उष्णता काढून घेतल्यास ते धातू आकुंचन पावतात.
◆. सामान्यत: उष्णतेमुळे द्रव पदार्थ प्रसरण पावतात व उष्णता काढून घेतल्यास ते आकुंचन पावतात.
◆. उष्णतेमुळे वायूंचे आकारमान वाढते व उष्णता काढून घेतल्यास त्यांचे आकारमान कमी होते.
◆. थर्मास प्लास्कमध्ये उष्ण पदार्थ बराच काळ उष्ण राहतो, तसेच थंड पदार्थ बराच काळ थंड राहतो.
★ थर्मासची रचना व कार्य
थर्मासची रचना - हा दुहेरी भिंत असलेला फ्लास्क असतो. यात एकात एक बसवलेल्या काचेच्या सीलबंद केलेल्या नळ्या असतात. दोन्ही नळ्यांचे पृष्ठभाग चांदीचा मुलामा देऊन चकचकीत केलेले
असतात. दोन्ही नळ्यांदरम्यानची शक्य तेवढी सगळी हवा काढून घेऊन जवळजवळ निर्वात पोकळी तयार केलेली असते. नळ्यांच्या बाहेर धातू किंवा प्लॅस्टिकची संरक्षक बरणी असते. ही बरणी व आतील फ्लास्क यांच्यामध्ये स्पंज किंवा रबरासारख्या दुर्वाहकाचे तुकडे फ्लास्कच्या संरक्षणासाठी लावलेले असतात.
थर्मास फ्लास्कचे कसे कार्य करते :
जेव्हा एखादा उष्ण पदार्थ फ्लास्कमध्ये ठेवला जातो तेव्हा आतील नळीच्या चकचकीतपणामुळे बाहेर
जाणारी उष्णता प्रारणे पुन्हा आत परावर्तित होतात. जवळजवळ निर्वात पोकळीमुळे उष्णतेचे वहन जवळजवळ होऊ शकत नाही व अभिसरणही जवळजवळ होऊ शकत नाही. त्यामुळे उष्णता बाहेरील थंड भागाकडे संक्रमित होत नाही आणि आतल्या आत दीर्घकाळासाठी राहते.
काचे तुन होणाच्या अल्प वहनामुळे उष्णता बाहेर येत असते. त्यामुळे फ्लास्कच्या दर्जानुसार काही तासांनंतर आतील उष्ण पदार्थ तेवढा उष्ण राहत नाही.
जेव्हा एखादा थंड पदार्थ फ्लास्कमध्ये ठेवला जातो तेव्हा त्यास बाहेरुन जवळजवळ काहीही उष्णता मिळत नाही त्यामुळे फ्लास्कच्या दर्जानुसार काही तास तो पदार्थ थंड राहतो.
◆ राजस्थानमध्ये घरांचा पांढरा रंग
राजस्थानमध्ये वातावरणाचे तापमान खुप जास्त असते, पांढऱ्या रंगामुळे आपाती उप्णता प्रारणाचे मोठया प्रमाणावर परावर्तन होऊन उष्णतेचे शोषण कमी प्रमाणात होते. म्हणून राजस्थानम्ये घरांना पांढरा रंग देतात.
●खारे वारे व मतलई वारे उष्णता संक्रमण प्रकार
दिवसा सूर्याकडून मिळणाऱ्या उष्णता प्रारणामुळे जमीन लवकर तापते व जमिनीलगतच्या हवेची
चनता कमी झाल्याने ती वर जाते. या वेळी समद्रावरील त्यामानाने कमी तापमानाची व जास्त धनतेची हवा जमिनीच्या दिशेने वाहते. उष्णतेच्या अभिसारणाने खारे वारे वाहतात.
रात्री जमीन लवकर थंड होते. त्यामुळे जमिनीलगतच्या हवेची घनता अधिक होते. त्यामानाने समुद्रावरील हवेचे तापमान अधिक असते व घनता कमी असते. अशा वेळी जमिनीवरची हवा समुद्राच्या दिशेने वाहते.
उष्णतेच्या अभिसरणाने मतलई वारे वाहतात.
◆ अंटाक्क्टिका खंडातील पेंग्विन पक्षी
अंटाक्क्टिका खंडात वातावरणाचे तापमान कमी असते. काळया रंगाच्या पदार्थावर / वस्तूवर पडणाऱ्या
उष्णता प्रारणाचे मोठ्या प्रमाणावर शोषण होते.
पेंग्विन पक्ष्यांचा रंग वरून काळा असल्याने उप्णतेचे मोठ्या प्रमाणावर शोषण होऊन त्यांना त्यांच्या शरीराचे तापमान कायम राखण्यास त्याची मोठी मदत होते.
◆ खोलीमध्ये हीटर व वातानुकुलन यंत्रे यांचे स्थान
उष्णतेच्या अभिसरणात जमिनीलगतची/तळालगतची हवा गरम झाल्याने तिची घनता कमी होऊन ती वर जाते व वरची कमी तापमानाची व जास्त घनतेची हवा खाली येते, त्यामुळे अभिसरण प्रवाह तयार होतात. म्हणून खोलीमध्ये हीटर खाली व वातानुकूलन यंत्रे भिंतीवर उंचावर बसवलेली असतात.
◆ उष्णता शोषक
धातूच्या (स्टीलचा चमचा, तवा) जास्त प्रमाणात उष्णता शोषून घेतात.
लाकडी पोळपाट, लाकडी चमचा व प्लॅस्टिकची प्लेट फार कमी प्रमाणात उष्णता शोषून घेतात. मेण कदाचित वितळेल.

इयत्ता सातवी सामान्य विज्ञान 8- स्थितिक विद्युत Online Test
8- स्थितिक विद्युत
खालील ठळक मुद्दे काळजीपूर्वक वाचा आणि सर्वात खाली चाचणी सोडविण्यासाठी क्लिक करा..
◆ विद्युतप्रभार (Electric Charge) :
● जेव्हा एखाद्या वस्तूवर धनप्रभार ( +) व ऋणप्रभार (-) हे दोन्ही प्रभार समतोल असतात तेव्हा त्या वस्तूवरील निव्वळ प्रभार शून्य असतो. अशा स्थितीत त्या वस्तूला उदासीन म्हणतात. निव्वळ प्रभार शून्य नसल्यास ती वस्तू प्रभारित आहे असे म्हणतात.
◆ एकाच प्रकारच्या प्रभारांमधील बल प्रतिकर्षण स्वरूपाचे असते. तर विरुद्ध प्रकारच्या प्रभारांमधील बल आकर्षण या स्वरूपाचे असते.
◆ प्रतिकर्षण : एकाच प्रकारचे प्रभार असलेल्या दोन कांड्या एकमेकींना दूर ढकलतात. याला प्रतिकर्षण असे म्हणतात.
◆ आकर्षण : विरुद्ध प्रकारचे प्रभार असलेल्या कांड्या एकमेकांकडे ओढल्या जातात. यालाच आकर्षण असे म्हणतात.
महत्वाचे--

विद्युत प्रभाराला धनप्रभार (+)आणि ऋणप्रभार ( -) अशी नावे बेंजामिन फ्रैंकलिन या शास्त्रज्ञाने दिली आहेत.
◆ विद्युतप्रभाराचा उगम : सर्व पदार्थ हे कणांचे बनलेले असून ते कण अणूंपासून बनलेले असतात. प्रत्येक अणूमध्ये स्थिर धनप्रभारित भाग व चल असा ऋणप्रभारित भाग असतो. दोन्ही प्रभार संतुलित असल्यामुळे अणू हा विद्घुतदृष्ट्या उदासीन असतो.
◆ प्रत्येक अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो कारण त्यातील धन व ऋणप्रभारांचे प्रमाण समान असते.
ऋणप्रभार काही कारणांने कमी झाल्यास अणू धनप्रभारीत होतो.
◆ थेल्स या ग्रीक शास्त्रज्ञाच्या असे लक्षात आले, की राळेचा दांडा (अँबर) लोकरी कापडाने घासला
असता या दांड्याकडे पिसे आकर्षित होतात. अंबरला ग्रीक भाषेत 'इलेक्ट्रॉन' असे म्हणतात, म्हणून अँबरच्या या आकर्षण गुणधर्माला 'इलेक्ट्रिसिटी' म्हटले गेले.
थॉमस ब्राउनने या शास्त्रज्ञांने 1646 साली इलेक्ट्रिसिटी' हे नाव शोधून काढले.
![]() |
| बेंझामीन फ्रँकलिन |

◆ घर्षणविद्युत (Frictional Electricity) :
घर्षणामुळे निर्माण होणाऱ्या विदयुतप्रभाराला घर्षण विद्यूत म्हणतात.
घर्षण झालेल्या ठिकाणीच हा प्रभार त्या वस्तूवर निर्माण होतो. त्यामुळे या विदधुतप्रभाराला स्थितिक विद्यूत असेही म्हणतात. वस्तूवर प्रभार निर्माण होतो तो थोडयावेळे पुरताच टिकतो.
◆ प्रभार नसणाच्या वस्तूंना विदधुतप्रभारित वस्तू आकर्षित करतात. समान विदयुतप्रभारांमध्ये प्रतिकर्षण असते,
तर विरुद्ध विदधुतप्रभारांमध्ये आकर्षण असते. विदयुतप्रभारित वस्तू ओळखण्यासाठी प्रतिकर्षण ही कसोटी वापरली जाते.
◆ कोणताच प्रभार नसणाच्या किंवा उदासीन वस्तूवर धन व ऋणप्रभारांची संख्या सारखी असते.
* प्रवर्तनाने निर्माण झालेला विदयुतप्रभार, म्हणजेच जवळ असताना निर्माण झालेला विदधुतप्रभार, फक्त
विदधुतप्रभारित वस्तू जवळ असे पर्यंतच टिकू शकतो.
◆ सुवर्णपत्र विद्युतदर्शी (Gold Leaf Electroscope) :
![]() |
| सुवर्णपत्र विद्युतदर्शी |
वस्तूवरील विदयुतप्रभार ओळखण्याचे हे साधे उपकरण आहे.
◆ सन 1752 मध्ये शास्त्रज्ञ बेंजामिन फ्रैंकलिननने वीज हे विद्युतप्रभाराचे रूप आहे असे स्पष्ट केले.
◆ वातावरणातील विद्युतप्रभार (Atmospheric Electric Charge)
आकाशात हवा आणि ढग घासले गेले की त्यावेळी वर असणारे काही ढग धनप्रभारित, तर खाली असणारे काही ढग ऋणप्रभारित बनतात.
जेव्हा ढगाच्या तळाचा ऋणप्रभार जमिनीवरील प्रभारापेक्षा खूप जास्त होतो तेव्हा ऋणप्रभार जमिनीकडे वाह् लागतो. हे अतिशय जलद गतीने घडते. यालाच वीज चमकणे असे म्हणतात. या वेळी विद्युतप्रवाहामुळे उष्णता, प्रकाश व ध्वनिऊर्जा निर्माण होते.
◆वीज पडणे (Lightning Strike) :
वीज पडते तेव्हा इमारतीच्या छतावर किंवा झाडाच्या शेंड्यावर प्रवर्तनाने विरुद्ध विद्युतप्रभार निर्माण होतो.
ढग आणि इमारत यांच्यातील विरुद्ध प्रभारातील आकर्षणामुळे ढगातील प्रभार इमारतीकडे प्रवाहित होतो. यालाच वीज पडणे असे म्हणतात.
◆विजेचे फायदे :
विजेमुळे निर्माण होणारी प्रचंड उष्णता व प्रकाशामुळे हवेतील नायट्रोजन व ऑक्सिजन यांच्यात एक रासायनिक क्रिया होऊन नायट्रोजन ऑक्साइड वायू तयार होतो. हा वायू पावसाच्या पाण्यात मिसळून जमिनीवर येतो व जमिनीला नत्र पुरवून जमीन सुपीक करतो.
● विजेच्या ऊर्जेमुळे हवेतील ऑक्सिजनचे ओझोनमध्ये रूपांतर होते. हा ओझोन वायू सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांपासून आपले सर्व सजीवांचे रक्षण करतो.
◆ तडितरक्षक (Lightning Protector) :
![]() |
| तडीतरक्षक |
ढगातून पडणाऱ्या विजेच्या आघातापासून बचाव करण्यासाठी जे उपकरण वापरतात, त्याला तडितरक्षक म्हणतात.
चाचणी सोडविण्यासाठी- क्लिक करा
Wednesday, 5 August 2020
इयत्ता सातवी सामान्य विज्ञान
August 05, 2020
सातवी विज्ञान-7 गती ,बल व कार्ये Online Test
7-गती ,बल व कार्ये
खालील ठळक मुद्दे काळजीपूर्वक वाचा व सर्वात खाली चाचणी सोडविण्यासाठी क्लिक करा..
◆गती
वस्तूचे ठरावीक वेळेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होणारे विस्थापन म्हणजेच त्या वस्तूची
गती होय. गतीमध्ये बदल हा बलामुळे होतो.
◆. अंतर (Distance) व विस्थापन (Displacement) :
● अंतर :
गतीच्या दिशेचा विचार न करता, एखाद्या गतिमान वस्तूने प्रत्यक्ष पूर्ण केलेल्या मार्गाची लांबी
म्हणजे अंतर होय.
अंतर ही अदिश राशी आहे.
(2) विस्थापन:
एखादया गतिमान वस्तूने आरंभीच्या ठिकाणापासून अंतिम ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी एकाच
दिशेने म्हणजेच सरळ रेषेत पार केलेले कमीत कमी अंतर म्हणजे विस्थापन होय.
विस्थापन ही सदिश राशी आहे.
विस्थापनामध्ये अंतर व दिशा या दोन्ही गोष्टींचा विचार होतो.
(3) अंतर व विस्थापन या दोन्ही राशींचे SI व MKS मापन पद्धतींत एकक मीटर (m) आहे.
(4) वेग :
वेग म्हणजे विशिष्ट दिशेने एकक कालावधीत वस्तूने कापलेले अंतर होय.
(5) वस्तूच्या वेगाचे सूत्र :
वेग = विस्थापन/ विस्थापनाला लागलेला वेळ
◆. चाल व वेग (Speed and Velocity) :
चाल सांगत असताना गतीची दिशा सांगण्याची आवश्यकता नसते.
गाडीची चाल 50 किमी प्रतितास असे सांगितले जात असताना गाडीच्या गतीची दिशा स्पष्ट करण्याची गरज
नाही. परंतु वादळ एखादया विशिष्ट ठिकाणी येणार की नाही याची कल्पना येण्यासाठी वादळाच्या दिशेचा
उल्लेख करणे जरुरीचे ठरते.
चाल व वेग दोन्हीचे SI एकक मीटर/सेकंद (m/s) आहे.
● एखाद्या वस्तूने एकक कालावधीत कापलेल्या अंतरास चाल म्हणतात.
चाल = कापलेले अंतर/ वेळ
◆ सरासरी वेग व तात्कालिक वेग :

एखादी वस्तू सरळ रेषेत जात असतांना तिचा वेग बदलत जाऊ शकतो.
(1) सरासरी वेग :
वस्तूचे विस्थापन/त्या विस्थापनाला लागलेला कालावधी
(2) तात्कालिक वेग : एका विशिष्ट क्षणी असलेल्या वेगाला तात्कालिक वेग म्हणतात. तात्कालिक वेग
वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा असू शकतो.
◆. त्वरण (Acceleration) :
(1) वेगामधील वेळेच्या संदर्भात होत असलेल्या बदलाला त्वरण म्हणतात.
ही सदिश राशी आहे. वेग वाढत असल्यास
त्वरण धन असते. वेग कमी होत असल्यास त्वरण ऋण असते. वेग बदलत नसल्यास त्वरण शून्य असते.
त्वरणाचे सूत्र :
वेगातील बदल/बदलास लागलेला कालावधी
त्वरणाचे SI एकक
मीटर/सेकंद×सेकंद (m/s').
◆. बल (Force) :
(1) त्वरण घडवणाच्या आंतरक्रियेला बल असे म्हणतात. म्हणजेच बलामुळे वस्तूच्या वेगात बदल होतो. बल हे
वस्तूवर कार्य करते.
बल = वस्तुमान x त्वरण.
बल ही सदिश राशी आहे.
2) सर आयझक न्यूटन या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम बल आणि त्यामुळे घडणाऱ्या त्वरणा संबंधीचा अभ्यास केता
◆. न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम :
(1) एखद्या वस्तूवर बल कार्य करीत नसेल, तर त्या वस्तूचा वेग बदलत नाही. म्हणजेच बल लावले नसताना
वस्तू जर स्थिर असेल तर ती स्थिर राहते व तिला गती असेल, तर ती एकाच वेगाने म्हणजेच एकाच
चालीने एकाच दिशेने सतत पुढे जात राहते.
(2) जर वस्तूवर कार्य करणारे एकूण बल 0 असेल तर वस्तूचे त्वरणसुद्धा 0 असते.
(3) न्यूटन : एक किलोग्रॅमचे प्रमाण घर्षण नसलेल्या पृष्ठभागावर ठेवले आणि 1 m/s' इतक्या त्वरणाने ओढले तर त्यासाठी लावलेल्या बलाला 1 न्यूटन किंवा 1 N म्हणतात.
◆. बल, विस्थापन व कार्य (Force, Displacement and Work) :
बल, विस्थापन व कार्य यांचा एकमेकांशी संबंध पुढील सूत्रात दाखवला आहे :
बलाने केलेले कार्य (W)= वस्तूवर लावलेले बल x बलाच्या दिशेत झालेले वस्तूचे विस्थापन
W = FXs
बल, विस्थापन या सदिश राशी आहेत.
पण कार्य ही अदिश राशी आहे.
* SI पद्धतीत कार्याचे एकक- ज्यूल
* बलाचे एकक- न्यूटन (N) आणि विस्थापनाचे एकक--मीटर (m)
* CGS पद्धतीत कार्याचे एकक- अर्ग (erg)
टेबलावरील लाकडी ठोकळ्याला टेबलाच्या पृष्ठभागाशी
समांतर असे 1 N इतके बल लावले आणि एक मीटर
इतके ठोकळ्याचे विस्थापन केले, तर बलाने 1 ज्यूल
इतके कार्य केले असे समजतात.
चाचणी सोडविण्यासाठी --क्लिक करा

Saturday, 1 August 2020
इयत्ता सातवी सामान्य विज्ञान
August 01, 2020
इयत्ता सातवी सा. विज्ञान ६- भौतिक राशींचे मापन Online Test
6-भौतिक राशींचे मापन
खालील ठळक मुद्दे काळजीपूर्वक वाचा व सर्वात खाली चाचणी सोडवण्यासाठी क्लिक करा.
◆ भौतिक राशी (Physlcal Quantities) :
● वस्तुमान, वजन, अंतर, वेग, तापमान, आकारमान इत्यादी राशींना भौतिक राशी असे म्हणतात.
वेगवेगळ्या गोष्टींचे मापन करण्यासाठी भौतिक राशी वापरल्या जातात.
उदा. फळभाज्या, धान्य यांचे वस्तुमान शरीर, द्रवपदार्थ यांचे तापमान; द्रव, स्थायू, वायू यांचे आकारमान; विविध पदार्थाची घनता, वाहनांचा वेग इत्यादी. मापन केले जाते.
● भौतिक राशींचे परिमाण (Magnitude) सांगण्यासाठी मूल्य (Value) व एकक (Unit) यांचा वापर करतात.
उदा., अंतर या भौतिक राशीसाठी सामान्यतः मीटर आणि किलोमीटर ही एकके वापरतात.
समजा, दोन शहरांमधील अंतर 350 किलोमीटर. येथे 350 हे मूल्य आणि किलोमीटर हे एकक होय.
वेगवेगळ्या राशींचे मोजमाप करताना निरनिराळी एकके वापरली जातात.
◆ अदिश राशी (Scalar Quantity)
अदिश राशी केवळ परिमाणाच्या साहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येते.
उदाहरणार्थ, लांबी, रुंदी, क्षेत्रफळ, वस्तुमान, तापमान, घनता, कालावधी, कार्य या राशी व्यक्त करण्यासाठी
केवळ मूल्य व एककाचा वापर म्हणजेच परिमाणाचा वापर म्हणजेच होतो.
उदा. रस्त्याची लांबी :किलोमीटर, ताप आलेल्या माणसाच्या शरीराचे तापमान : 101° फॅरनहाइट इत्यादी.
◆ सदिश राशी (Vector Quantity)
सदिश राशी व्यक्त करण्यासाठी परिमाण व दिशा या दोहोंची गरज असते.
उदा., विस्थापन, उत्तर दिशेस 40 किलोमीटर विस्थापन, वेग मुंबईच्या दिशेने 700 किमी प्रति तास वेगात चाललेले विमान.
◆ वस्तुमान (Mass)
(1) वस्तुमान म्हणजे पदार्थातील ट्रव्यसंचय होय.
(2) पदार्थात निसर्गत: जडत्व असते व , यामुळे पदार्थ स्थितिबदलास विरोध करतो.
(3) वस्तुमान हे वस्तूच्या जडत्वाचे गुणात्मक माप आहे, म्हणजे जितके वस्तुमान जास्त तितके जडत्व सुद्धा
जास्त असते.
(4) वस्तुमान ही अदिश राशी आहे. त्याचे एकक सामान्यतः ग्रॅम किंवा किलोग्राम आहे.
◆ वजन (Weight) :
(1) वस्तुमानावर कार्य करणाच्या गुरुत्चीय बलाला वजन असे म्हणतात.
(2) एखादघा वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने आकर्षित करते, त्याला त्या वस्तूचे पृथ्वीवरील वजन असे म्हणतात.
(3) वजन ही सदिश राशी आहे. वस्तूचे वजन पृथ्वीवरील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असते.
SI पद्घतीत वजनाचे एकक न्यूटन (N) होय.
◆ पृथ्वीच्या मानाने चंद्राचे गुरुत्वाकर्षण कमी असल्याने आपले/एखादया वस्तूचे चंद्रावरील वजन त्या वस्तूच्या
पृथ्वीवरील वजनापेक्षा कमी भरते. दोन्हीही ठिकाणी वस्तुमान मात्र सारखेच असते.
◆ प्रमाणित मापन
(Standardized Measurement)
आपण अंदाजे कोणतेही मापन करणे योग्य नाही. त्यासाठी प्रमाणित मापांची आवश्यकता असते. प्रमाणित एकके वापरून केलेले मापन अचूक असते. अचूक मापन करताना निरनिराळ्या राशींचे मोजमाप त्या राशीसाठी सुनिश्चित केलेल्या एककामध्येच करतात. उदा., लांबी मीटर या एककात मोजली जाते. त्यासाठी एक विशिष्ट अंतर म्हणजे 1.0 मीटर असे प्रमाण मानले आहे.
◆ प्रचलित मापन पद्धती
(1) एमकेएस (MKS) पद्धती :
MKS मापन पद्धतीनुसार लांबी मीटरमध्ये, वस्तुमान किलोग्रॅममध्ये व काळ (वेळ, कालावधी) सेकंदांत मोजतात.
M-मीटर Kg-किलोग्रॅम S-सेकंद.
(2) सीजीएस (CGS) पद्धती :
CGS मापन पद्धतीनुसार लांबी सेंटिमीटरमध्ये, वस्तुमान ग्रॅममध्ये व काळ
(वेळ) सेकंदात मोजतात.
C-सेंटिमीटर G-ग्रॅम S-सेकंद.
एमकेएस मापन पद्धतीमध्ये लांबी, वस्तुमान व काळ या राशी आधारभूत मानण्यात येतात. त्यांचा उपयोग करून इतर राशींचे मापन सुद्धा होते.
◆ पायाभूत राशी :
(1) ज्या राशींचे प्रमाण ठरवता येते अशा राशींना पायाभूत राशी असे म्हणतात. उदा., लांबी व काळ
(2) पायाभूत राशच्या प्रमाणास पायाभूत प्रमाण म्हणतात. पायाभूत प्रमाण सवांना उपलब्ध असते. सात राशीपायाभूत मानल्या आहेत.
◆ एककांची आंतरराष्ट्रीय पद्धती :
(1) मेट्रिक पद्धती ही एककांची आंतरराष्ट्रीय पद्धती System International (SI) सात पायाभूत राशावर आधारित आहे. सध्या जगभरात विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये हयाच पद्धतीचा वापर अपेक्षित आहे.
◆ पायाभूत राशींचे प्रमाण :
(1) पॅरिस येथील आंतरराष्ट्रीय वजनमाप संस्थे मधील प्लॅटिनम-इरिडियम संमिश्राचा एक भरीव दंडगोल वस्तुमानाचे प्रमाण म्हणून ठेवला आहे.
प्लॅटिनम-इरिडियम संमिश्राच्या या आदिरुप पट्टीवर दोन सूक्ष्मरेषा कोरलेल्या आहेत. या दोन रेषांमधील अंतर 'मीटर' म्हणून जगभरात प्रमाण मानले आहे.
(2) वस्तुमानाच्या आदिरूपाचे वस्तुमान एक किलोग्रॅम आहे असे आंतरराष्ट्रीय करारानुसार ठरवले आहे.
(3) यांच्या अधिकृत आणि अचूक अशा प्रती प्रमाणीकरण करणाऱ्या जगभरातील प्रयोगशाळा मध्ये
ठेवण्यात आलेल्या आहेत.
(4) कालगणना करताना पृथ्वीच्या एका परिवलनास जो सरासरी वेळ लागतो, तो अचूक साधनाने मोजून
त्यास 24 तास धरून एक दिवस प्रमाणित केला गेला आहे. एका तासाची 60 मिनिटे व एका मिनिटाचे
60 सेकंद याप्रमाणे एक सेकंद प्रमाणित केला जातो.
◆. मापनाचा इतिहास :
(1) प्राचीन काळात मानवाने मोजमाप करण्यासाठी पहिल्यांदा स्वत:च्या शरीराच्या भागांचा वापर करणे
सुरुवात केले.
(2) इजिप्तमध्ये 'क्युबिट' हे माप वापरत. माणसाच्या कोपरापासून मधल्या बोटाच्या टोकापर्यंतचे अंतर म्हणजे
1 क्युबिट',
प्रत्येक व्यक्तीनुसार हे माप बदलत असे, म्हणून राजाचे 'क्युबिट' हे प्रमाण मानण्यात येत असे.
(3) भारतात पूर्वी 'गुंज' या मापाने सोने मोजत असत. गुंज ही खरे तर झाडाची बी होती.
(4) पुरातन काळी वाळूचे घड्याळ कालमापनासाठी वापरले जात असे.
◆ अचूक मापनाचे महत्त्व :
(1) मापन कशासाठी करणार यावर मापनाची काटेकोर अचूकता ठरते. तशा आवश्यकतेप्रमाणे योग्य साथ
निवडले जाते.
(2) उदा.. मौल्यवान, विशेष महत्त्वाच्या आणि अल्प प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या पदार्थांचे (हिरे,
औषधे इत्यादी) मोजमाप विशेष काळजीपूर्वक करावे लागते.
3) प्रगत तंत्रज्ञानामुळे अंतर, वस्तुमान, काळ, तापमान इत्यादी राशींची सूक्ष्म मापनेही अचूकपणे करणा
माधने आता उपलब्ध आहेत. उदा., अत्यंत महत्त्वाच्या क्रीडास्पर्धाशी निगडित अंतरे व काळ,
वस्तुमान, शरीराचे तापमान
◆ मोजमाप करीत असतानाच्या काही प्रमुख त्रुटी :
(1) मोजमाप करतांना योग्य साधनांचा वापर न करणे.
(2)योग्य साधनांचा योग्य पद्धतीने वापर न करणे.
◆ प्रमाणित मापन
बाजारातील मोजमाप करण्याची साधने (शासन विभागाने) तपासणे आवश्यक आहे. ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून या साधनांना वेळोवेळी प्रमाणित करण्याची गरज असते. यालाच
प्रमाणीकरण असे म्हणतात.
◆. वजन-मापन इत्यादींमधील शासनाची जबाबदारी
(1) शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचा वजनमाप उपविभाग ग्राहकांची वजनमापांमध्ये
फसवणूक होऊ नये, यासाठी कार्यरत असतो.
(2) या उपविभागाचे अधिकारी ठिकठिकाणी जाऊन वजने, तराजू, प्रमाणित वजनमापे इत्यादी योग्य आहेत की नाहीत यांची खात्री करीत असतात.
(3) प्रमाणित वजनमापे वापरणे कायद्याने बंधनकारक आहे.
(4) वजनमाप उत्पादन, विक्री व दुरुस्ती यांसाठी आवश्यक ते परवाने देण्याचे काम शासनाचा वजनमाप
विभाग करतो.
(5) राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळेत (नवी दिल्ली) येथे मीटर, किलोग्रॅम, सेकंद, केल्विन, अॅम्पिअर, कँडेला
या सहा मूलभूत एककांची प्रमाणे ठेवली आहेत.
◆. 1 TMC पाणी म्हणजे एक अब्ज घनफूट पाणी होय. (one thousand million cubic feet)
एक घनफूट म्हणजे सुमारे 28.317 लीटर.
1 TMC = 28316846592 लीटर म्हणजे सुमारे 28.317 अब्ज लीटर.
इयत्ता सातवी -- सामान्य विज्ञान
पाठ ६- भौतिक राशींचे मापन
चाचणी सोडविण्यासाठी-- ➤ ➤ क्लिक करा

.jpeg)