Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

Translate

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image
Showing posts with label पुस्तक vachan. Show all posts
Showing posts with label पुस्तक vachan. Show all posts

Saturday, 18 October 2025

October 18, 2025

श्रीमानयोगी -कादंबरी - Pdf

श्रीमानयोगी - कादंबरी - Pdf

सांजपाखरू अन् सायंतारा
व्यथित मनावर कुंकर मारी
माहित असता घरी न दारी
फुका शोधितो प्रिया हरवली
'श्रीमान योगी' वाचकांच्या हाती देत असता समाधान वाटत आहे. या पुस्तकाच्या
नादात गेल्या काही वर्षांत अनेक नवे स्नेही जोडता आले. खूप पाहायला आणि वाचायला
मिळाले. जीवनाची ही वर्षे सार्थकी लागली.

पुस्तक Pdf स्वरूपात वाचण्यासाठी व डाऊनलोड करण्यासाठी खालील पुस्तकाच्या चित्रावर क्लिक करा  


 

October 18, 2025

वोरन बफेच्या यशाचे 50 मंत्र - pdf

वोरन बफेच्या यशाचे 50 मंत्र - pdf

'गुंतवणूकदार' आणि 'नफेखोर' यांच्यामधला फरक बहुतेक जणांच्या लक्षात येत नाही.
ज्या माणसाला शेअर बाजारातून आयुष्यभरासाठीच्या दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीमधून
आपलं भलं करून घ्यायचं असतं, त्याला 'गुंतवणूकदार' म्हणतात; तर ज्या माणसाला
शेअर बाजाराच्या चढउतारांमधून आपला फायदा करून घ्यायचा असतो, त्याला 'नफेखोर'
असं म्हणतात..................................
पुस्तक Pdf स्वरूपात वाचण्यासाठी व डाऊनलोड करण्यासाठी खालील पुस्तकाच्या चित्रावर क्लिक करा 



 

October 18, 2025

वपूर्झा - कादंबरी pdf

वपूर्झा  - कादंबरी  pdf

वेणूताई गेल्या आणि यशवंतरावांची जगण्याची इच्छाच नाहीशी झाली होती. यशवंतरावांच्या
डोळ्यांतून अश्रू वाहतच राहिले. कुणीही जिवाभावाचे भेटले, की यशवंतरावांना भावना अनावर होत आणि आसवे ओसंडून जात. यशवंतराव नेहमीच आणि बारकाईने 'नवा काळ' वाचत.यशवंतरावांच्या वेणूताई' अशा मथळ्याचा अग्रलेख आम्ही लिहिला तेव्हा यशवंतरावांचा टेलिफोन आला. ते म्हणाले, 'वेणूबद्दलचा तुमचा अग्रलेख वाचला. तुम्ही फार मनापासून लिहिला आहे आणि मला मनापासून आवडला!' त्यांना अधिक बोलताच आले नाही. पतीच्या निधनानंतर पत्नीचे हाय खाऊन जाणे आपल्याला माहीत आहे. पण वेणूताईच्या निधनानंतर जगण्याची इच्छाच नाहीशी होऊन जणू काही सतीच गेलेले यशवंतरावांसारखे पती राजकारणात आम्हाला माहीत नाहीत. किडनीच्या आजाराचे निमित्त झाले इतकेच. त्यांना जायचे होते आणि ते गेले.


पुस्तक Pdf स्वरूपात वाचण्यासाठी व डाऊनलोड करण्यासाठी खालील पुस्तकाच्या चित्रावर क्लिक करा 


 

October 18, 2025

बोधकथा - आत्मपरिवर्तन - Moral Story

 बोधकथा - आत्मपरिवर्तन - Moral Story

एका गावात एक लोभी राहात होता. प्रत्येक बाबतीतील त्याचा हव्यास वाढत होता; पण एके दिवस त्याला अचानक ईश्वरप्राप्तीचा ध्यास लागला होता. त्याला वाटत होते, आता आपल्याकडे साऱ्या सुविधा आहेत. नाही तो फक्त ईश्वरच नाही. सगळ्या सुविधा आपण मिळवल्या; पण ईश्वराला कधी मिळवणार? 


मग त्याने भगवी वस्त्रे परिधान करून पर्णकुटीत राहणे सुरू केले. एका रात्री तो दचकून उठला. त्याला जाणवले की, छपरावरून कोणीतरी चालत आहे. तो म्हणाला, कोण आहे? उत्तर आले, घाबरू नका, चोर नाही. तरुणाने विचारले, अहो, छतावर काय करताय? उत्तर आले, माझी शेळी हरवलीय, ती शोधतोय.... 


तरुण म्हणाला, डोकं ठिकाणावर आहे का? छतावर कधी शेळी शोधतात का? कशी असेल.ती? छतावरील व्यक्तीने उत्तर दिले, अरे मूर्खा, तू ज्या अस्वस्थ, लोभी इच्छेने आणि अतृप्त मनाने ईश्वराचा शोध घेतो आहेस, ते सुद्धा छतावरची शेळी शोधण्याइतकंच मूर्खपणाचं नाही का?



तात्पर्य :सत्याच्या आणि ईश्वराच्या प्राप्तीसाठी आत्मपरिवर्तन आवश्यक आहे.
October 18, 2025

Wings of Fire - अग्निपंख - pdf

Wings of Fire - अग्निपंख - pdf

 I was born into a middle-class Tamil family in the island
town of Rameswaram in the erstwhile Madras state. My
father, Jainulabdeen, had neither much formal education
nor much wealth


पुस्तक Pdf स्वरूपात वाचण्यासाठी व डाऊनलोड करण्यासाठी खालील पुस्तकाच्या चित्रावर क्लिक करा

 

October 18, 2025

'युगंधर' - कादंबरी - Pdf

'युगंधर' - कादंबरी - Pdf.


'युगंधर' शब्दरूप झाली! मन एका अननुभूत कार्यपूर्तीच्या अवर्णनीय आनंदानं कसं शिगोशीग भरून आलंय. खरंतर या वेळी मनोगत म्हणूनसुद्धा एकही शब्द लिहू नये, असे अबोध मनाच्या तळवटातून प्रकर्षानं जाणवतं आहे. जे काय बोलायचं असेल,ते जाणत्या भारतीय मनावर गेली हजारो वर्ष निर्विवाद अधिराज्य गाजविणाऱ्या 'काळ्याला त्याच्या वर्णासारख्याच गडद 'करंद' भाषेत मनमुक्त बोलू देत.आपण आपलं आता,गेली तीस वर्ष हा कृष्णवेध घेणाऱ्या थकल्या देहमनाला का हे आचमन घेताना- आचमन हे शीर्षक लिहितानाच या मनोगताला 'आचमन' हे नाव का? हे स्पष्ट करणं भाग आहे. 'आचमन' म्हणजे सदहेतूनं समष्टीच्या श्रेयसासाठी,
कल्याणासाठी परमशक्तीला मनोमन आवाहन करून प्राशन केलेली जलांजली! वाचून झाल्यावर वाचकाला याचा नक्कीच प्रत्यय येईल, याचा श्रीकृष्णकृपेन पूर्ण विश्वास आहे. म्हणून तर हे मनोगताच प्रकट-अप्रकट शब्द मिसळलेल आचमन! या वेळी काही श्रद्धेय सुहृदांच्या तीव्र स्मरणानं लेखणी क्षणैक मुग्ध-स्तब्ध झालीय,
त्यांनी वेळोवेळी कुठवर आलाय युगधर?', 'कधी पडणार हातात" अशी आत्मभावान वारंवार केलेली विचारणा ऐकताना मलाच उत्तर माहिती नसल्यामुळे देहूच्या तुक्या वाण्यासारम्बा माझा माझ्याशीच मूक संवाद जुंपत असे. 

पुस्तक Pdf स्वरूपात वाचण्यासाठी व डाऊनलोड करण्यासाठी खालील पुस्तकाच्या चित्रावर क्लिक करा 


 

October 18, 2025

बाजिंद भाग 1 ते 30 - Pdf

बाजिंद भाग 1 ते 30 - Pdf


रायगड च्या डोंगरदरीत धनगरवाडी हे खुप जुने गाव. सखाराम चा जन्म याच गावचा.शिवाजी महाराजांनी रायगड स्वराज्याची राजधानी म्हणून निवडला आणि आसपास च्या छोट्या छोट्या  खेड्यांचं सोनं झाला. जीवन स्थिर झालं.

पुस्तक Pdf स्वरूपात वाचण्यासाठी व डाऊनलोड करण्यासाठी खालील पुस्तकाच्या चित्रावर क्लिक करा 

 

October 18, 2025

पावनखिंड - कादंबरी - Pdf

पावनखिंड - कादंबरी - Pdf


सूर्य उगवला, तरी हिरडस मावळातल्या सिंध गावावर धुकं रेंगाळत होतं. सिंध ! पाच-पन्नास घरट्यांचं गाव. गावाच्या मध्यभागी काळ्याशर दगडांनी चिरेबंद झालेला तीन चौकी देशपांडे- वाडा उभा होता. वाड्याच्या भव्य कमानीत भालाईत पहारेकरी उभे होते. पहिल्या चौकाच्या उजव्या बाजूला घोड्यांची पागा होती. सदरेवर पाच-सहा मंडळी बाजींची वाट पाहत बसली होती. सदरेवरच्या झोपाळ्यावर बाजींची बैठक मांडली होती. पितळी, चकचकीत पानाचा डबा झोपाळ्यावर नजरेत भरत होता. झोपाळ्यालगत जमिनीवर एक मोठी पितळी पिंकदाणी ठेवली होती.


पुस्तक Pdf स्वरूपात वाचण्यासाठी व डाऊनलोड करण्यासाठी खालील पुस्तकाच्या चित्रावर क्लिक करा 


 

October 18, 2025

अमृतवेल - कादंबरी - Pdf

अमृतवेल  - कादंबरी - Pdf

आजोबा-"
मिलिंदाच्या या हाकेला उत्तर मिळाले नाही, असे सहसा होत नसे. त्याला वाटले,
आरामखुर्चीत पडल्या-पडल्या आजोबांना झोप लागली असावी! हळूच चवड्यांवर चालत
तो त्यांच्याजवळ गेला. तरीही आजोबा हलले नाहीत, बोलले नाहीत. त्यांच्या मांडीवर
एक पुस्तक पडले होते. ते उघडे होते. मात्र ते पाहत होते समोर. एका मोठ्या फोटोकडे.
मिलिंदाला त्या फोटोतली आपली आई काही केल्या आठवत नसे!


पुस्तक Pdf स्वरूपात वाचण्यासाठी व डाऊनलोड करण्यासाठी खालील पुस्तकाच्या चित्रावर क्लिक करा 

 

October 18, 2025

बालभारती मराठी कविता

बालभारती मराठी कविता 


ओळखलंत का सर मला, पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी
क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून
गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतींत नाचली ................................

पुस्तक Pdf स्वरूपात वाचण्यासाठी व डाऊनलोड करण्यासाठी खालील पुस्तकाच्या चित्रावर क्लिक करा 


 

October 18, 2025

बटाट्याची चाळ - कादंबरी - Pdf

बटाट्याची चाळ - कादंबरी - Pdf


साऱ्या हिंदुस्थानात काही ना काही चळवळी चालू आहेत आणि मुंबई शहराच्या अगदी पोटात असून आपली चाळ थंड असावी याचे बटाट्याच्या चाळीतील सर्व बि-हाडकरूंना एके दिवशी सामुदायिक दुःख झाले. समोरच्या जुठाभाई बिल्डिंग्जमध्ये वर्षातून बारा-बारा अखिल भारतीय पुढाऱ्यांची व्याख्याने व्हावी आणि आपल्या चाळीत भाषण करायला गल्लीचा दादासुद्धा मिळू नये, बाजूच्या चाळीतील भगिनींनी शिशुसप्ताह साजरा करून गव्हर्नरांच्या हस्ते बक्षिससमारंभ घडवून आणावा आणि आपल्याला संक्रांतीच्या हलव्याचे साधे प्रदर्शनसुद्धा भरवता येऊ नये, याचे बटाट्याच्या चाळीतील बंधूंना आणि भगिनींना मनस्वी दुःख झाले. तसे पाहू गेल्यास बटाट्याच्या चाळीत गुणी माणसांना तोटा नव्हता ... 


पुस्तक Pdf स्वरूपात वाचण्यासाठी व डाऊनलोड करण्यासाठी खालील पुस्तकाच्या चित्रावर क्लिक करा 

 

October 18, 2025

झोपाळा - कादंबरी - Pdf

झोपाळा - कादंबरी - Pdf



माणसाला माणूस का म्हणायचं? तर तो माणसासारखा दिसतो म्हणून. तो माणसासारखा राहतो. तस्साच जगतो. आणि, त्याहीपेक्षा भयानक गोष्ट म्हणजे तो विचार पण 'तस्साच' करतो. 'तस्साच' म्हणजे माणसाला साजेसा. घोड्याला लावतात ती झापडं मधूनमधून दूर तरी केली जातात. माणसांची झापडं दूर कोण करणार?

संपूर्ण पुस्तक Pdf स्वरूपात वाचण्यासाठी व डाऊनलोड करण्यासाठी खालील पुस्तकाच्या चित्रावर क्लिक करा