Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

Translate

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image
Showing posts with label स्वाध्यायमाला सातवी विज्ञान. Show all posts
Showing posts with label स्वाध्यायमाला सातवी विज्ञान. Show all posts

Saturday, 22 October 2022

October 22, 2022

स्वाध्याय - इयत्ता सातवी - सामान्य विज्ञान - भौतिक राशींचे मापन

 स्वाध्याय - इयत्ता सातवी - सामान्य विज्ञान-भौतिक राशींचे मापन


 प्रश्न 1. रिकाम्या जागा भरा :

(1) भौतिक राशींचे परिमाण सांगण्यासाठी .मूल्य, व एकक यांचा वापर करतात.

(2) वस्तुमानावर जेवढे  गुरुत्वीय बल कार्य करते, त्याला वजन असे म्हणतात.

(3) चाल ही राशी.अंतर, आणि काळ या राशींचे गुणोत्तर आहे.

(4) .पायाभूत  राशींचे प्रमाण कधीही बदलते असता कामा नये.

(5) सात पायाभूत राशींवर आधारित अशी एककांची आंतरराष्ट्रीय पद्धती,  System

International (SI). सध्या जगभरात वापरली जाते.

प्रश्न 2. एक चुकीचा शब्द असलेली काही विधाने दिलेली आहेत. हा शब्द बदलून विधाने दुरुस्त करा :

(1) लांबी ही सदिश राशी आहे.

(2) पदार्थातील द्रव्यसंचयाला आकारमान म्हणतात.

(3) वस्तुमान ही सदिश राशी आहे, तर वजन ही अदिश राशी आहे.

(4) एमकेएस (MKS) या मापन पद्धतीत लांबी सेंटिमीटरमध्ये, वस्तुमान ग्रॅममध्ये व काळ (वेळ) सेकंदांत

मोजतात.

(5) लोह आणि अल्युमिनिअम संमिश्राचा एक भरीव दंडगोल पॅरिस येथील आंतरराष्ट्रीय वजनमाप संस्थेमध्ये

ठेवला आहे.

(6) इजिप्तमध्ये माणसाच्या कोपरापासून मधल्या बोटाच्या टोकापर्यंतच्या अंतरास 'वीत' असे म्हणत असत.

उत्तरे : (1) रस्त्याची लांबी ही अदिश राशी आहे.

(2) पदार्थातील द्रव्यसंचयाला वस्तुमान म्हणतात.

(3) वस्तुमान ही अदिश राशी आहे, तर वजन ही सदिश राशी आहे.

(4) एमकेएस (MKS)

या मापन पद्धतीत लांबी मीटरमध्ये, वस्तुमान किलोग्रॅममध्ये व काळ (वेळ) सेकंदांत

मोजतात.

(5) प्लॅटिनम-इरिडियम संमिश्राचा एक भरीव दंडगोल पॅरिस येथील आंतरराष्ट्रीय वजनमाप संस्थेमध्ये ठेवला आहे.

(6) इजिप्तमध्ये माणसाच्या कोपरापासून मधल्या बोटाच्या टोकापर्यंतच्या अंतरास 'क्युबिट' असे म्हणत असत.

 📋सरावासाठी ऑनलाईन टेस्ट
📚 इयत्ता - 4 थी

*भाषा,गणित,इंग्रजी, परि सर अभ्यास*

*https://www.studyfromhomes.com/p/blog-page_28.html*

प्रश्न 3. सांगा लावू मी कोणाशी जोडी ? (जोड्या लावा.)

(1)

(1) वेग  - मीटर/सेकंद

(2) क्षेत्रफळ -  चौरस मीटर

(3) आकारमान -  लीटर

(4) वस्तुमान -   किलोग्रॅम

(5) घनता -  किलोग्रॅम / घनमीटर

(2)

(1) एमकेएस - किलोग्रॅम

(2) विस्थापन -  सदिश राशी

(3) हात - अंदाजे माप

(4) मीटर -  प्रमाणित माप

(5) काळ -  पायाभूत राशी

'

 4. उदाहरणांसहित स्पष्ट करा :

(1) अदिश राशी.

उत्तर : अदिश राशी केवळ परिमाणाच्या साहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येते. उदाहरणार्थ, लांबी, वस्तुमान,
क्षेत्रफळ, तापमान, घनता, कालावधी, कार्य इत्यादीचा राशी व्यक्त करण्यासाठी केवळ परिमाणाचा म्हणजेच मूल्य
व एककाचा वापर होतो. यात दिशेचा अंतर्भाव नसतो.


(2) सदिश राशी.
उत्तर : सदिश राशी या परिमाण व दिशा यांच्या साहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येतात. विस्थापन, वेग
या सदिश राशी आहेत.
उदाहरणार्थ, (1) (i) उत्तर दिशेस 20 किलोमीटर विस्थापन व (ii) पूर्व दिशेस 20 किलोमीटर विस्थापन यांत
फरक आहे. येथे अंतर समान आहे पण भाग (ii) मध्ये विस्थापानाची दिशा वेगळी आहे.
(2) (i) आकाशात दक्षिणेकडे 500 किमी प्रतितास वेगाने चाललेले विमान व आकाशात पूर्वेकडे 500 किमी प्रतितास
वेगाने चाललेले विमान यात फरक आहे. येथे चाल समान आहे परंतु भाग (ii) मध्ये गतीची दिशा वेगळी आहे.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

💥महात्मा ज्योतिबा फुले
https://mystudyfromhomes.in/our-idials-jyotiba-phule/
*💥 राजर्षी शाहू महाराज*
https://mystudyfromhomes.in/our-ideals-rajarshi-shahu-maharaj/
*💥लोकमान्य टिळक*
https://mystudyfromhomes.in/our-ideals-lokmanya-tilak/
*🌀 9 th English Test*
*https://mystudyfromhomes.in/http:/mystudyfromhomes.in/.html/9-th-english-online-test/*
*🌀 9 th General Science*
https://mystudyfromhomes.in/http:/mystudyfromhomes.in/.html/9-th-english-online-test/
*🌀 10 वी विज्ञान आणि तंत्रज्ञान*
https://cutt.ly/6C8rfsF
*🌀 सामान्यज्ञान*
https://cutt.ly/aC8rVPq

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

प्रश्न 5. पुढील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा : 

(1) प्रत्येक ग्रहावर एकाच वस्तूचे वजन वेगवेगळे का भरते?
उत्तर : एखाद्या वस्तूवर जेवढे गुरुत्वीय बल कार्य करते, त्याला त्या वस्तूचे वजन म्हणतात.एखादया• वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने आकर्षित करते, त्याला त्या वस्तूचे पृथ्वीवरील वजन म्हणतात. एखादया ग्रहावरील गुरुत्वाकर्षण निरनिराळे असते. त्यामुळे एकाच वस्तूचे निरनिराळ्या ग्रहांवरवेगवगळे वजन भरते.


*(2) दैनंदिन जीवनामध्ये अचूक मापनासंदर्भात तुम्ही कोणती काळजी घ्याल?
उत्तर : (1) कोणतेही मापन करतांना योग्य साधने वापरावीत. (2) या साधनांचा योग्य पद्धतीने वापर करावा..
(3) आपण घेत असलेल्या वस्तू प्रमाणित मापाने योग्यरीत्या मोजल्या आहेत की नाहीत याची शहानिशा करावी.
(4) दुकानदार, भाजीवाले इत्यादी कोणता तराजू वापरतात, त्याच्यावर प्रमाणित असल्याचा छाप आहे की नाही,
आणि त्याचा काटा स्थिर आहे की नाही, तराजूच्या पारड्यांची खालची बाजू कशी आहे या सर्व बाबी
प्रत्येक खरेदीच्या वेळी तपासून पाहिल्या पाहिजेत. (5) वापरण्यात येणारी वजने योग्य आहेत की त्यांच्याऐवजी
एखादा दगड वापरला जातो हे लक्षात घेतले पाहिजे.

(3) वस्तुमान व वजन यांमध्ये काय फरक आहे ?

उत्तर :
वस्तुमान
1. पदार्थातील द्रव्यसंचयाला वस्तुमान म्हणतात.
2. वस्तुमान ही अदिश राशी आहे.
3. वस्तुमान सर्व परिस्थितीत तेवढेच भरते.
वजन
1. वस्तूवर जेवढे गुरुत्वीय बल कार्य करते, त्याला त्यावस्तूचे वजन असे म्हणतात.
2. वजन ही सदिश राशी आहे.
3. वजन निरनिराळ्या परिस्थितींत आणि निरनिराळ्या स्थळी वेगळे असते.

(4) मापनात आढळणाऱ्या त्रुटी उदाहरणाच्या साहाय्याने स्पष्ट करा.
उत्तर : मापनात आढळणाऱ्या महत्त्वाच्या त्रुटी म्हणजे :
(अ) योग्य साधनांचा वापर न करणे.
(1) काही वेळा भाजीवाले किंवा दुकानदार प्रमाणित वजने वापरत नाहीत. त्याऐवजी दगड किंवा तत्सम
साधने वापरतात. त्यामुळे ते करीत असलेल्या वजनात फेरफार होतो. (2) कधी कधी तराजू नीट कार्य करीत नसतो.
(3) पेट्रोल किंवा डिझेल विकत घेताना इंडिकेटरवर योग्य पद्धतीने लक्ष दिले जात नाही.


(ब) साधनांचा योग्य पद्धतीने वापर न करणे.
(1) दैनंदिन जीवनात मापन करण्याची साधने म्हणजे तराजू, ताणकाटा, फूटपट्टी, मोजमापाची टेप,
निरनिराळी वजने, दूध मापनाची मापे इत्यादींचा वापर योग्य पद्धतीने केला जात नाही. (2) मापन करताना
तराजूचा काटा फेरफार करून वापरला जातो. (3) ताग्यातून कापड मापताना त्याचे योग्य मापन केले जात नाही.
वरील बाबींविषयी ग्राहकाने विशेष दक्षता घेऊन आपण फसवले तर जात नाही ना याची खात्री केली पाहिजे.

(5) अचूक मापनाची आवश्यकता व त्यासाठी वापरायची साधने कोणती ते स्पष्ट करा.
उत्तर : अचूक मापनाची आवश्यकता पुढील बाबींवर अवलंबून असते :
(1) दैनंदिन व्यवहारात तसेच शास्त्रीय संशोधनात कुठल्याही वस्तूचे मापन अचूक असले पाहिजे; अन्यथा
त्याचे दूरगामी अनिष्ट परिणाम होऊ शकतात. (2) मापन करावयाच्या वस्तू मौल्यवान, विशेष महत्त्वाच्या आणि
अल्प प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या असतील तर त्यांचे मोजमाप नेहमीच अधिक काटेकोरपणे केले पाहिजे.

प्रश्न 6. शास्त्रीय कारणे लिहा : 

(1) शरीराच्या भागांचा वापर करून मोजमाप करणे योग्य नाही.
उत्तर : प्रत्येक व्यक्तीच्या शरीराच्या भागांची मापे निरनिराळी असतात. त्यांत काहीही प्रमाणीकरण नसते.
त्यामुळे शरीराच्या भागांचा वापर करून मोजमाप करणे योग्य नाही.
*(2) ठरावीक कालावधीनंतर वजन व मापे प्रमाणित करून घेणे आवश्यक असते.
उत्तर : सतत वापराने वजन व मापे प्रमाणित न राहण्याची शक्यता असते. त्यामुळे मापनाच्या वेळी ग्राहकांची
फसवणूक होऊ नये म्हणून वेळोवेळी वजन आणि मापे यांची तपासणी करणे जरुरीचे आहे.
(3) आपले वस्तुमान चंद्र आणि पृथ्वी या दोन्ही ठिकाणी एकसारखे असते.
उत्तर : एखाद्या वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्या वस्तूमधील द्रव्यसंचय होय. वस्तू विश्वात कोठे आहे यावर
तिचे वस्तुमान अवलंबून नसते. म्हणून आपले वस्तुमान चंद्र आणि पृथ्वी या दोन्ही ठिकाणी एकसारखे असते.

Friday, 16 October 2020

October 16, 2020

स्वाध्यायमाला - प्रश्नोत्तरे | General Science |सामान्य विज्ञान - 8 - स्थितिक विद्युत

स्वाध्यायमाला - प्रश्नोत्तरे | General Science |सामान्य विज्ञान - 8 - स्थितिक विद्युत 


प्रश्न . रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा :

(सदैव प्रतिकर्षण, सदैव आकर्षण, ऋणप्रभाराचे विस्थापन, धनप्रभाराचे विस्थापन, अणू, रेणू, स्टील, तांबे,

प्लॅस्टिक, फुगवलेला फुगा, प्रभारित वस्तू, सोने)

उत्तरे - 

(1) सजातीय विदधुतप्रभारांमध्ये सदैव प्रतिकर्षणहोते.

(2) एखादया वस्तूमध्ये विद्युतप्रभार निर्माण होण्यासाठी ऋणप्रभाराचे विस्थापन कारणीभूत असते.

(3) तडितरक्षक तांब्याच्या पट्टीपासून बनवला जातो.

(4) सहजपणे घर्षणाने प्लॅस्टिक विदयुतप्रभारित होत नाही.

(5) विजातीय विद्युतप्रभार जवळ आणल्यास सदैव आकर्षण, होते.

(6) विदयुतदर्शने प्रभारित वस्तू ओळखता येते.


प्रश्न . पुढील विधाने चूक आहेत की बरोबर ते सांगून चुकीची विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा :

(1) विदघुतप्रभारित वस्तू ओळखण्यासाठी आकर्षण ही कसोटी वापरली जाते.

उत्तरे : चूक, विदयुतप्रभारित वस्तू ओळखण्यासाठी प्रतिकर्षण ही कसोटी वापरली जाते.

(2) काचकांडीचे टोक रेशमी कापडावर घासले असता ते टोक धनप्रभारित होते.

उत्तरे :  बरोबर.

प्रश्न . फरक स्पष्ट करा :

पदार्थ प्रभारित करण्याची वहन पद्धती आणि प्रवर्तन पद्धती :

उत्तर

पदार्थ प्रभारित करण्याची वहन पद्धती

1, या पद्धतीने वाहक व रोधक असे दोन्ही प्रकारचे पदार्थ प्रभारित करता येतात.

2. या पद्धतीमध्ये प्रभार घेणाऱ्या पदार्थाला प्रभारित पदार्थानि प्रत्यक्ष स्पर्श करावा लागतो.

3. या पद्धतीमध्ये प्रभारित पदार्थावरील प्रभाराच्या जातीचाच प्रभार दुसर्या पदार्थाला मिळतो.

4. या पद्धतीनुसार पदार्थाला दिलेला प्रभार त्या पदार्थावर कायम राहतो.

पदार्थ प्रभारित करण्याची प्रवर्तन पद्धती

1. या पद्धतीने फक्त वाहक पदार्थ प्रमारित करता येतात.

2. या पद्यतीमध्ये प्रभारित पदार्थ हा प्रभार घेणाच्या पदार्थाजवळ असतो, परंतु प्रत्यक्ष स्पर्श करीत नाही.

3. या पद्धतीमध्ये प्रभारित पदार्थावरील प्रभाराच्या विरुद्ध जातीचा प्रभार जवळच्या टोकावर व त्याच जातीचा प्रभार दूरच्या टोकावर उत्पन्न होतो.

4. या पद्घतीनुसार पदार्थांमध्ये जागृत झालेले प्रभार हे प्रभारित पदार्थ जोपर्यंत जवळ असतो, तोपर्यंतच टिकतात आणि विरुद्ष जातीचा प्रभार कायम दयावयाचा असल्यास त्यातील मुक्त सजातीय प्रभार भूसंपर्कन पद्धतीने घालवावा लागतो.

प्रश्न 4. पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा :

(1) विजेपासून स्वत:चा बचाव कसा कराल?

उत्तर : विजेपासून बचाव करण्यासाठी तडितरक्षक बसवलेल्या घराचा आश्रय ध्यावा.

(2) प्रभार कसे निर्माण होतात?

उत्तर : दोन विशिष्ट वस्तू एकमेकांवर घासल्या असता, एका वस्तूबरील ऋणप्रभार दुसऱ्या वस्तूवर गेल्याने ती दुसरी वस्तु ऋणप्रभारित होते, तर पहिली वस्तु पनप्रभारित होते.

(3) पावसाळवात प्रत्येक वेळी विजा चमकलेल्या का दिसत नाहीत?

उत्तर : जेहा ढगावर फार मोठया प्रमाणावर विदयुतप्रभार निर्माण होतो, तेव्हाच विजा चमकण्याची शक्यता असते.

(4) काचेची कांडी रेशमी कापडावर घासली असता त्या कापडावर कोणत्या प्रकारचा विदपुतप्रभार निर्माण होतो ?

उत्तर : कावेची कांडी रेशमी कापडावर घासली असता त्या कापडावर ऋण विदयतप्रभार निर्माण होतो.

(5) प्लॅस्टिकची कांडी लोकरीच्या कापडावर घासली असता. प्लॅस्टिकच्या कांडीवर कोणत्या प्रकारचा विद्युतप्रभार निर्माण होतो?

उत्तर : प्लॅस्टिकची कांडी लोकरीच्या कापडावर घासली असता. प्लॅस्टिकच्या कांडीवर ऋण विद्युतप्रभार निर्माण होतो.

(6) विद्युतप्रभारांना धनप्रभार (+) आणि ऋणप्रभार (-) अशी नावे कोणत्या शास्त्रज्ञाने दिली?

उत्तर : विदयुतप्रभारांना धनप्रभार (+) आणि ऋणप्रभार (-) अशी नावे बेंजामिन फ्रैंकलिन या शास्त्रज्ञाने दिली.

(7) एखादी वस्तू विद्युतदृष्ट्या उदासीन आहे असे केव्हा म्हणतात?

उत्तर : जेव्हा एखादया वस्तूवर धनप्रभार (+) व ऋणप्रभार (-) हे दोन्ही समतोल असतात; तेव्हा त्या वस्तूवरील निव्वळ प्रभार शून्य असतो. अशा स्थितीत ती वस्तू विदयुतदृष्ट्या उदासीन आहे असे म्हणतात.

(8) स्थितिक विद्युतप्रभाराची वैशिष्ट्ये कोणती ?

उत्तर : स्थितिक विद्युतप्रभार वस्तूवर घर्षण झालेल्या ठिकाणीच असतात. दोन वस्तू परस्परांवर घासल्या असता त्या वस्तूंवर जे विदधुतप्रभार निर्माण होतात ते विजातीय व समान मूल्याचे आणि थोड्या कालावधी करताच असतात. (दोन वस्तूंवरील मिळून निव्वळ विदयुतप्रभार शून्य असतो.)

(9) घर्षणाने ज्यामध्ये विद्युतप्रभार उत्पन्न होतो अशा पाच पदार्थांची नावे द्या.

उत्तर : (a) काच (b) एबोनाइट (c) प्लॅस्टिक (d) रेशीम (e) लोकर या पदार्थांमध्ये घर्षणाने विद्युतप्रभार उत्पन्न होतो.

(10) काचेच्या दांड्याचे टोक रेशमी कपड्यावर घासल्यास कोठे व कोणते प्रभार उत्पन्न होतात?

उत्तर : या क्रियेमध्ये काचेच्या दांड्याचे जे टोक रेशमी कपड्यावर घासले जाते त्या टोकावर धनप्रभार उत्पन्न होतो आणि रेशमी कपड्याचा घासला गेलेला भाग ऋणप्रभारित होतो.

प्रश्न . पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा :

(1) मुसळधार पाऊस, जोराने विजा चमकणे किंवा कडकडणे सुरू असताना छत्री घेऊन बाहेर जाणे योग्य का नाही स्पष्ट करा.

उत्तर : सामान्यत: छत्रीचा मधला दांडा थातूचा असतो व त्याचा वरचा भाग टोकदार असतो, तसेच छत्रीच्या काड्या धातूच्या असतात. मुसळधार पाऊस, जोराने विजा चमकणे किंवा कडकडणे सुरू असताना आपण छत्री घेऊन बाहेर पडल्यास छत्रीच्या वरच्या टोकाकडे वीज खेचली जाण्याची शक्यता असते. आपले शरीर विद्युतवाहक असल्याने या विजेचा जोरदार धक्का आपल्याला बसण्याची शक्यता असते. परिणामी, आपला मृत्यु ओढवण्याचीही शक्यता असते. असे घड़ू नये म्हणून अशा वेळी छत्री घेऊन बाहेर जाऊ नये.


(2) स्पष्ट करा : घर्षण विद्युत व स्थितिक विद्युत.

उत्तर  : काही विशिष्ट वस्तू एकमेकांवर घासल्या असता एका वस्तूवरील ऋणप्रभारित कण दुसऱ्या वस्तूवर गेल्याने ती दुसरी वस्तू ऋणप्रभारित होते, तर पहिली वस्तू धनप्रभारित होते. अशा विदयुतला घर्षण विद्युत प्रभाराला  स्थानांतरित विद्युतप्रभार त्याच ठिकाणी राहतात, म्हणून अशा विदयुतला स्थितिक विदयुत म्हणतात.

(3) समजा सुरुवातीस विद्युतदृष्ट्या उदासीन असलेल्या A व B या दोन वस्तू एकमेकांवर घासल्या असता A ही वस्तू  धनप्रभारित होते, तर B ही वस्तू ऋणप्रभारित होते. याचे कारण स्पष्ट करा.

उत्तर : आधी A या वस्तूवरील, तसेच B या वस्तूवरील निव्वळ प्रभार शून्य होता. A व B या वस्तू एकमेकांवर घासल्या असता  A मधील काही चल ऋणप्रभारित कणांचे B वर स्थानांतर होते. परिणामी, A मधील ऋणप्रभारित कणांची संख्या धनप्रभारित कणांच्या संख्येपेक्षा कमी झाल्याने A ही वस्तू धनप्रमारित होते. तसेच B मधील ऋणप्रभारित कणांची संख्या धनप्रभारित कणांच्या संख्येपेक्षा जास्त झाल्याने B ही वस्तू ऋणप्रभारित होते.

(4) विद्युतप्रभारित वस्तू ओळखण्यासाठी प्रतिकर्षण ही कसोटी का वापरतात,

उत्तर :विरुद्ध वस्तूंमध्ये विदयुत आकर्षण होते. तसेच एक विद्युतप्रभारित वस्तू व दुसरी विदयुतदृष्ट्या उदासीन वस्तू यांच्यामध्येही विद्युत आकर्षण होते. त्यामुळे केवळ आकर्षणामुळे दिलेली वस्तू विद्युतप्रभारित आहे की नाही हे ठरवता येत नाही.विद्युत प्रतिकर्षण मात्र केवळ दोन समान (सजातीय) विद्युतप्रभारित बस्तूंमध्येच होते.म्हणून  विद्युतप्रभारित वस्तू ओळखण्यासाठी प्रतिकर्षण ही कसोटी वापरतात.

(5) तुम्हांला ऋणप्रभारित एबोनाइटचा रूळ आणि काचेच्या स्टैंडवर बसवलेला वाहक दिलेला असल्यास  त्या रुळाने तो वाहकाला (a)ऋणप्रभारित व (b) धनप्रभारित कसा कराल? ते स्पष्ट करा.

उत्तर : (a) एबोनाइटच्या रुळाच्या प्रभारित टोकाने वाहकाला स्पर्श केला असता, त्यावरील ऋणप्रभार वाहकाला मिळून तो ऋणप्रभारित होईल.

(b) वाहक धनप्रभारित करण्याकरिता प्रवर्तन पद्धतीचा अवलंब करावा लागतो. त्याकरिता दांडयाचे प्रभारित टोक वाहकाच्या एका टोकाजवळ आणावे व वाहकाचे दुसरे टोक भूसंपर्कित करावे नंतर भूसंपर्कन तार काढून घेतल्यावर एबोनाइटचा प्रभारित दांडा दूर न्यावा. प्रवर्तनाने उत्पन्न झालेला बद्ध धनप्रभार वाहकावर पसरेल व तो धनप्रभारित होईल.

(6) विद्युत  ऊर्जेला इलेक्ट्रिसिटी' हे नाव कसे पडले?

उत्तर : स्थितिकविद्युत बाबतचे प्रयोग थेल्स या ग्रीक तत्व्वेत्याने अंबर नावाच्या पदार्थाच्या सहाय्याने केले  अंबर ला ग्रीक भाषेत इलेक्ट्रोन म्हणतात म्हणून या ऊर्जेला इलेक्ट्रॉन' या शब्दावरून इलेक्ट्रिसिटी' असे नाव पडले.

(7) आकाशात वीज चमकणे व ती जमिनीवर पडणे या घटनांचे थोडक्यात स्पष्टीकरण करा.

उत्तर : वीज चमकणे (Flash of Lightning) : आकाशात जेव्हा हवा आणि ढग यांचे घर्षण होते तेव्हा वर असणारे काही ढग धनप्रभारित, तर खाली असणारे काही ढग ऋणप्रभारित होतात. जेव्हा ढगाच्या तळाचा ऋणप्रभार जमिनीवरील घनप्रभारापेक्षा खूप जास्त होतो तेव्हा विरुद्ध प्रभारांतील आकर्षणामुळे ढगावरील ऋणप्रभार जमिनीकडे ओढला जातो. एका सेकंदापेक्षाही खूप कमी वेळात ही घटना घडते. या वेळी निर्माण होणाऱ्या प्रचंड विद्युतप्रवाहामुळे उष्णता ,प्रकाश व ध्वनी उर्जा निर्माण होते 

वीज पडणे -विद्युत प्रभारित ढग आकाशात असताना उंच इमारतीच्या छतावर, तसेच उंच झाडाच्या शेंडयावर प्रवर्तनाने विरुद्ध विदघुतप्रभार निर्माण होतो. ढग आणि इमारत यांच्यातील विरुद्ध प्रभारातील आकर्षणामुळे ढगातील प्रभार इमारतीकडे ओढला जातो. अतिशय कमी वेळात या प्रभाराचे इमारतीकडे/ झाडाकडे वहन होते. यालाच वीज पडणे असे म्हणतात.

(8) वीज पडून काय नुकसान होते? ते न होण्यासाठी जनजागृती कशी कराल?

उत्तर : वीज पडल्यामुळे झाडे जळून जातात. इमारतींचे नुकसान होते, प्राणहानी होते, घरातील विद्युत उपकरणे निकामी होऊ शकतात. विजा चमकत असताना बाहेर पडू नये, असे लोकांना समजावले पाहिजे. पाण्यात उतरू नये. उंच ठिकाणी जाऊ नये. आपल्ती व्यवस्थापनाची माहिती असावी. इमारतींवर तडितरक्षक बसवून घ्यावा.

प्रश्न 6. सुबक व नामनिर्देशित आकृतीसह पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा :

(1) सुवर्णपत्र विद्युतदर्शीची रचना व कार्य लिहा.

उत्तर : सुवर्णपत्र विद्युतदर्शी - रचना : या विदयुतदर्शीमध्ये एका योग्य आकाराच्या बुचामध्ये पितळेची किंवा अल्युमिनिअमची दांडी घट्ट बसवलेली असते. या दांडीच्या एका टोकाला अॅल्युमिनिअमची किंवा सोन्याच्या पातळ पत्र्याची (वर्खाची) दोन पाने बसवलेली असतात. दुसऱ्या टोकाशी एक धातूची तबकडी जोडलेली असते. पातळ पत्र्याची पाने बाटलीत राहतील अशा बेताने बाटलीच्या तोंडावर बूच घट्ट बसवलेले असते. त्यामुळे धातूची चकती बाटलीबाहेर राहते. विद्युतदर्शीला बसवलेले बूच विद्युतरोधक असते.

कार्य : विद्युतदर्शीच्या वरच्या चकतीला ऋण किंवा धनप्रभाराच्या वस्तूने स्पर्श केला असता, त्यातील काही विदयुतप्रभाराचे स्थानांतरण होऊन तो तबकडी आणि तांब्याच्या दांडीद्वारे पातळ पत्र्याच्या पानांना मिळतो. पाने सजातीय विदयुतप्रभाराने प्रभारित होतात. त्यामुळे त्यांचे परस्पर प्रतिकर्षण होऊन ती एकमेकांपासून दूर जातात. कोणताच प्रभार नसलेल्या वस्तूने चकतीला स्पर्श केला तर पाने मिटलेलीच राहतात; कारण त्यांवर कोणताच प्रभार नसतो.सुवर्णपत्र विदयुतदर्शी विदयुतप्रभाराचे अस्तित्व ओळखण्यासाठी वापरतात.



(3) तडितरक्षकाची रचना व कार्य थोडक्यात स्पष्ट करा.

उत्तर : तडितरक्षक (Lightning Protector ) : तडितरक्षक तांब्याच्या एका लांब पट्टीने बनवलेला असतो.

याचे एक टोक चर्चसारख्या उंच इमारतीच्या सर्वांच उंच भागावर बसवलेले असते. या टोकाला भाल्याप्रमाणे अग्रे

असतात. दुसरे टोक जमिनीच्या आत बिडाच्या अथवा तांब्याच्या जाड पत्र्याला जोडलेले असते. जमिनीत खड्डा

करून त्यात कोळसा व मीठ घालून हा जाड पत्रा उभा केलेला असतो. त्यात पाणी टाकण्याची सोय केलेली

असते. यामुळे वीज चटकन जमिनीत पसरली जाते व विजेच्या आघातामुळे होणारे नुकसान टळते.

विद्युतप्रभारित ढग इमारतीवरून जाताना प्रवर्तनाने तडितरक्षकाच्या वरच्या टोकावर विरुद्ध विद्युतप्रभार निर्माण होतो. ढगावरील विद्युतप्रभार व हा विद्युतप्रभार यांच्यातील आकर्षण बलामुळे इमारतीकडे प्रवाहित होणारे विद्युतप्रभार तांब्याच्या पट्टीमार्फत जमिनीत जातात व त्यामुळे इमारतीचे नुकसान टळते. उंच इमारतीवर असा तडितरक्षक बसवल्याने आजूबाजूच्या इमारती, झाडे इत्यादींचिही वीज पडण्यापासून संरक्षण होते.

प्रश्न . शास्त्रीय कारणे लिहा :

(1) धनप्रभारित विद्युतदर्शीच्या तबकडीस एबोनाइटच्या प्रभारित दांड्याने स्पर्श केल्यास फाकलेली पाने मिटतात.

उत्तर : विद्युतदर्शीच्या तबकडीवरील प्रभार नष्ट झाला अथवा शून्य झाला असता प्रभाराअभावी विदयुतदर्शीची पाने मिटतात. धनप्रभारित विदयुतदर्शीची पाने त्यावरील घनप्रभारामुळे फाकलेली असतात. प्रभारित एबोनाइटच्या दांड्यावर ऋणप्रभार असतो. त्यामुळे अशा दांड्याचा विदयुतदर्शीच्या तबकडीला स्पर्श होताच तबकडीला ऋणप्रभार मिळतो व त्यामुळे पूर्वीचा धनप्रभार व एबोनाइटने दिलेला ऋणप्रभार यांचे जवळजवळ संपूर्णपणे उदासिनीकरण होऊन प्रभार नष्ट होतो. त्यामुळे प्रभाराअभावी फाकलेली पाने मिटतात.

(2) प्रभारित पदार्थ सुवर्णपत्र विद्युतदर्शाच्या तबकडीजवळ आणल्यास त्याची पाने फाकतात; मात्र तो पदार्थ  दूर नेल्यावर पाने मिटतात.

उत्तर : प्रभारित पदार्थ सुवर्णपत्र विदधयुतदर्शीच्या तबकडीजवळ आणताच स्थितिक विद्युत प्रवर्तन घडून येते. त्यामुळे तबकडीच्या जवळच्या टोकाशी विजातीय बद्ध प्रभार उत्पन्न होतो आणि दूरच्या टोकाशी व सुवर्णपत्राशी मुक्त सजातीय प्रभार उत्पन्न होतात. त्यामुळे दोन्ही पानांवर सजातीय प्रभार उत्पन्न झाल्याने त्यामध्ये प्रतिसारण होऊन पाने फाकतात. प्रभारित पदार्थ दूर नेल्यावर प्रवर्तित प्रभार नाहीसा होतो व त्यामुळे पाने पुन्हा मिटतात.

(3) कोरडया केसांतून वेगाने फिरवलेल्या प्लॅस्टिकच्या कंगव्याकडे कागदाचे लहान तुकडे आकर्षिले जातात.

उत्तर : विदयुतप्रभारित पदार्थाकडे हलके पदार्थ आकर्षिले जातात. प्लॅस्टिकचा कंगवा कोरड्या केसांतुन वेगाने फिरवला असता कंगवा व केस यांमधील घर्षणामुळे कंगव्यावर स्थितिक विदयुतप्रभार उत्पन्न होतो त्यामुळे त्याच्या अंगी कागदाचे हलके लहान तुकडे आकर्षिण्याचे सामर्थ्य  येते

(4) कोरड्या हवेत कोरड्या केसांतुन कंगवा वेगाने फिरवला असता कडकड असा आवाज होतो.

उत्तर : कोरड्या हवेत कोरड्या केसांतून कंगवा वेगाने फिरवला असता त्यांमध्ये घर्षण होऊन स्थितिक विदयुतप्रभार उत्पन्न होतो. या क्रियेमध्ये कंगव्यावरील प्रभाराच्या विरुद्ध जातीचा प्रभार केसांवर उत्पन्न होतो. यामुळे विजातीय प्रभारांमध्ये आकर्षण होते, या तत्वानुसार हे दोन्ही प्रकारचे प्रभार एकमेकांकडे आकर्षिले जाऊन अतिशय सूक्ष्म ठिणग्या पडून कडकड असा आवाज निघतो.

(5) स्थितिक विदयुतचे प्रयोग पावसाळ्यात यशस्वी होत नाही. 

उत्तर : सामान्यतः कोरडी हवा ही विदयूतरोधक असते. तथापि त्यामधील बाण्पाचे प्रमाण वाढले असता ती विद्युतवाहक बनते .पावसाळ्यामध्ये    हवेतील बाण्पाचे प्रभाण अधिक असल्याने ती विद्युत वाहक बनते. त्यामुळे एखादया पदार्थामध्ये घर्षणाने स्थितिक विदधुतप्रभार उत्पन्न होताच ते सभोवतालच्या बाष्पयुक्त हवेमुळे वाहून नेले जातात. परिणामी स्थितिक विदपुतप्रभाराचे अस्तित्वच संपुष्टात आल्याने प्रयोग यशस्वी होत नाहीत.

(6) घर्षणाने विदयुतप्रभारित करावयाच्या धातूच्या रुळाला काचेची किंवा तत्सम रोधकाची मूठ बसवावी लागते. 

उत्तर : धातू हे विदधुतवाहक असतात. त्यामुळे विदयुतरोधक पदार्थाची मूठ न बसवता धातूचा रूळ हातात घेऊन घर्षण केल्यास उत्पन्न होणारा प्रभार क्षणार्धात तो उत्पन्न   झालेला प्रभार जमिनीकडे जाऊ नये यासाठी धातूच्या रुळाला रोधक पदार्थाची मूठ बसवावी लागते व तो रूळ प्रभारित होत असता केवळ मूठच हातात धरावी लागते.

प्रश्न. जरा डोके चालवा :

(1) सर्वच वस्तू घर्षणाने प्रभारित करता येतात का ? 

उत्तर : होय. 

(2) मिंतीजवळ प्रभारित फुगा नेल्यास तो भिंतीला का चिकटतो? 

उत्तर : भिंतीजवळ प्रभारित फुगा नेल्यास प्रवर्तनाने मिंतीवर फुग्याच्या जवळच्या भागावर विजातीय प्रभार निर्माण होतो. फुग्यावरील प्रभार व हा प्रभार यामुळे फुगा भिंतीला चिकटतो.

(3) विदयुतदर्शीत सोन्याऐवजी दुसऱ्या धातूची पाने लावता येतील का ? त्या धातूत कोणते गुणधर्म असले पाहिजेत

उत्तर : होय. उदाहरणार्थ, अल्युमिनिअमची पाने लावता येतील. तो धातू उत्तम विदयुतवाहक असला पाहिजे व त्या धातूचा अतिशय पातळ पत्रा तयार करता यायला हवा. (त्या धातूमध्ये वर्धनीयता हा गुणघर्म असायला हवा.)

(4) वीज पडल्यावर होणारी हानी टाळण्यासाठी काय उपाय कराल ? 

उत्तर : वीज पड़ू नये म्हणून तडितरक्षकाचा उपयोग करावा.

(5) तडितरक्षकाचा वरचा भाग टोकदार का असतो? 

उत्तर : जेव्हा वाहकावर विद्युतप्रभार निर्माण होतो, तेव्हा वाहकाच्या टोकदार भागावर विदयुतप्रभार / क्षेत्रफळ हे गुणोत्तर खूप अधिक असते. परिणामी या भागाभोवती अतिशय उच्च विद्युत क्षेत्र निर्माण होते. तडितरक्षकाचा वरचा भाग टोकदार केल्याने त्यावर विदयुतप्रभार निर्माण झाल्यावर विरुद्ध प्रभार फार मोठ्या आकर्षण बलाने खेचले जातात. अशा प्रकारे तडितरक्षकाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्याचा वरचा भाग टोकदार केलेला असतो.

(6) जमिनीतील खड्ड्यात कोळसा व मीठ का टाकलेले असते ?

उत्तर : तडितरक्षकावर पडणारी वीज चटकन जमिनीत पसरवण्यासाठी खड्डयात कोळसा व मीठ टाकलेले असते.

Thursday, 15 October 2020

October 15, 2020

स्वाध्यायमाला - प्रश्नोत्तरे | General Science |सामान्य विज्ञान - 7 - गती , बल व कार्य

स्वाध्यायमाला - प्रश्नोत्तरे | General Science |सामान्य विज्ञान - 7 - गती , बल  व कार्य

 प्रश्न . रिकाम्या जागी कंसातील योग्य  पर्याय  लिहा :

(स्थिर, शून्य, बदलती, एकसमान, विस्थापन, वेग, चाल, त्वरण, स्थिर परंतु शून्य नाही, वाढते, वेगामध्ये,दिशा.)

उत्तरे 

(1) जर एखादी वस्तू वेळेच्या समप्रमाणात अंतर कापत असेल, तर त्या वस्तूची चाल एकसमान, असते.

(2) जर वस्तू एकसमान वेगाने जात असेल तर तिचे त्वरण शून्य असते.

(3)  चाल, ही राशी अदिश राशी आहे.

(4)  वेग, म्हणजे विशिष्ट दिशेने एकक कालावधीत वस्तूने कापलेले अंतर.

(5) वस्तू जेव्हा सुरुवातीच्या बिंदशी परत येते, तेव्हा तिचे विस्थापन  शून्य  असते 

(6) वेगाला परिमाण व  दिशा दोन्ही असतात.

(7) त्वरण म्हणजे वेळेच्या संदर्भात वेगामध्येहोणारा बदल होय.

प्रश्न 2. पुढील विधाने चूक की बरोबर ते सांगून चुकीची विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा :

(1) वस्तूला एकसमान वर्तुळाकार गती असताना वस्तूच्या त्वरणात बदल होत नाही.

उत्तर :  -- चूक. (वस्तूला एकसमान वर्तुळाकार गती असताना वस्तूच्या त्वरणाची दिशा सतत बदलत असते.) 

(2) दिलेल्या कालावघीमध्ये वस्तूच्या विस्थापनाचे परिमाण व वस्तूने कापलेले अंतर या राशी नेहमी समान असतात.

उत्तर  -   चूक, (वस्तूच्या वेगाची दिशा बदलत नसेल, तरच दिलेल्या कालावधीमध्ये वस्तूच्या विस्थापनाचे परिमाण व वस्तूने कापलेले अंतर या राशी समान असतात.) 

(3) त्वरणाची दिशा वेगाच्या दिशेच्या विरुद्ध असू शकते. -   बरोबर.

(4) त्वरण वेगाला लंबरूप असू शकते.-     बरोबर

(5) अवत्वरणाला परिमाण व दिशा दोन्ही असतात.  -      बरोबर. 

(6) वस्तूचा सरासरी वेग शून्य असू शकतो.    बरोबर.

प्रश्न -   वेगळा घटक ओळखा     त्वरण, बल, वेग, चाल.

उत्तर : चाल       (चाल ही अदिश राशी आहे; तर त्वरण, बल व वेग या सदिश राशी आहेत.)


प्रश्न-   पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा :

(1) बल ही राशी व्यक्त करण्यासाठी कोणत्या बाबी सांगाव्या लागतात?

उत्तर : बल ही राशी व्यक्त करण्यासाठी बलाचे परिमाण व दिशा या बाबी सांगाव्या लागतात.

(2) गतिमान वस्तूवर तिच्या गतीच्या दिशेत बल लावल्यास काय होते ?

उत्तर : वस्तूवर तिच्या गतीच्या दिशेत बल लावल्यास, तिची चाल वाढते.

(3) वस्तूवर तिच्या गतीच्या विरुद्ध दिशेत बल लावल्यास काय होते ?

उत्तर : वस्तूवर तिच्या गतीच्या विरुद्ध दिशेत बल लावल्यास, तिची चाल कमी होते.


प्रश्न . बल, कार्य, विस्थापन, वेग, त्वरण, अंतर या विविध संकल्पना तुमच्या शब्दांत दैनंदिन जीवनातील उदाहरणांसह स्पष्ट करा.

उत्तर :

आपल्या देनंदिन जीवनातल्या अनेक क्रिया आपण बल वापरून करतो. उदा., सामान उचलणे, वाहन ढकलणे, वस्तू खालच्या मजल्यावरून वरच्या मजल्यावर नेणे इत्यादी. 

F या बलाने केलेले कार्य, w = F × s   येथे  s    हे वस्तूचे बलाच्या दिशेने झालेले विस्थापन होय.

बलाचा वापर करुन काही अंतर हातगाडी ढकलत नेल्यावर कार्य होते. आपले दप्तर उचलून शाळेत नेणे हे ही आपण रोज करीत असलेले कार्य आहे. घरातून शाळेतून जाताना ठरावीक अंतर कापले जाते, या वेळी आपले घर ते शाळा हे विस्थापन होय. त्या वेळी आपण वेग बदलत असतो. वाहन वापरताना देखील आपण ठरावीक अंतर ठरावीक वेगाने कापत जातो. हे वाहन सामान्यत: एकसमान वेगाने कधीच जात नाही. वाहनाचा वेग वाढवला तर त्वरण घन असते, तर ब्रेक दाबून वेग कमी केल्यास त्वरण ऋण असते.


प्रश्न  आकृतीचे निरीक्षण करा व प्रश्नांची उत्तरे दया :

सचिन आणि समीर मोटरसायकलवरुन A या ठिकाणाहून निघाले. B या फाट्यापाशी वळून C येथे काम करून CD मार्गे ते D या फाटयाशी आले व पुढे E येथे पोहोचले. त्यांना एकूण 1 तास एवढा वेळ लागला.  त्यांचे A पासून E पर्यंतचे प्रत्यक्ष कापलेले अंतर व विस्थापन काढा. त्यावरून चाल काढा. A पासून E पर्यंत AE या दिशेने त्यांचा वेग किती होता ? या वेगाला सरासरी वेग म्हणता येईल का?

उत्तर : सचिन आणि समीरने कापलेले अंतर :

A →B (3 किमी), B→ C (4 किमी), C→ D (5 किमी), D→ E (3 किमी).

एकूण अंतर : 3+4+5+3 = 15 किमी

प्रत्यक्ष कापलेले अंतर = 15 किमी

एकूण विस्थापन : A पासून E पर्यंत = 3 +3+3 =  9 किमी

एकूण विस्थापन  = 9 किमी

चाल = अंतर/काळ = 15 किमी /1 तास (hour)  = 15 किमी/तास

वेग = विस्थापन/काळ =  9 किमी / 1 तास (hour  =  9 किमी/तास

A पासून E पर्यंत वेग  = 15 किमी/तास

याला सरासरी वेग म्हणता येईल.

प्रश्न - योग्य जोड्या जुळवा 

उत्तरे 

A                 B               C

कार्य          ज्यूल         अर्ग

बल            न्यूटन      डाईन

विस्थापन   मीटर        सेमी

प्रश्न . तारेवर बसलेला पक्षी उडून एक गिरकी घेऊन पुन्हा बसलेल्या जागी येतो. त्याने एका गिरकीत कापलेले एकूण अंतर व त्याचे विस्थापन यांबाबत स्पष्टीकरण दया.

उत्तर: जर पक्षी गिरकी घेऊन पुन्हा त्याच जागी येतो म्हणजे वक्र मार्गाने फिरून पुन्हा त्याच जागी येतो. त्याने गिरकीत त्याचे कापलेले अंतर हे त्या वक्र मार्गाच्या लांबीइतके होय. पक्ष्याचे बसलेल्या जागेपासून पुन्हा त्याच जागी येणे म्हणजे त्याचे विस्थापन शुन्य होय.

प्रश्न . व्याख्या लिहा व त्या त्या राशींची SI आणि CGS पट्धतीतील एकके लिहा.

(1) अंतर व विस्थापन.

उत्तर : एखादया वस्तूची दोन बिंदुंमधील गती विचारात घेता : (1) अंतर म्हणजे त्या दोन बिंदूंच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण म्हणजेच प्रत्यक्ष आक्रमिलेल्या मार्गाची लांबी होय .अंतर तसेच विस्थापन, या राशींचे SI पद्घतीतील एकक मीटर (मी. m) आहे व CGS पद्धतीतील एकक सेंटीमीटर (सेमी, Cm) आहे.

(2) वेग.

उत्तर : एखादया वस्तूने एकक काळात विशिष्ट दिशेने कापलेल्या अंतरास वेग म्हणतात. 

वेग = विस्थापन/वेळ. या राशीचे SI एकक मौटर/सेकंद (m/s) आहे व CCS एकक सेंटिमीटर/सेकंद (cm/s) आहे.

(3) चाल.

उत्तर : एखादया वस्तूने एकक वेळात कापलेल्या अंतरास चाल म्हणतात.

चाल = अंतर/वेळ.

या राशीचे SI एकक मीटर/सेकंद (m/s) आहे व CGS एकक सेंटिमीटर/सेकंद (cm/s) आहे.

(4) त्वरण.

उत्तर : वेगामधील वेळेच्या संदर्भात होणाऱ्या बदलाला त्वरण म्हणतात.

त्वरण (a) =   वेग बदल /  काळ     U- u / t     येथे u  = वस्तूचा सुरुवातीचा वेग व v  = वस्तूचा t कालावधीनंतरचा वेग (अंतिम वेग).

वेगाचे SI पद्घतीतील एकक m / s आहे व CGS पद्घतीतील एकक cm/s आहे.

त्वरणाचे SI पद्घतीतील एकक  =  m/s square

प्रश्न , फरक स्पष्ट करा :

(1) अंतर आणि विस्थापन

उत्तर :

अंतर   

1. अंतर म्हणजे दोन बिंदूंच्या दरम्यान गतिमान असणाच्या वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण म्हणजेच प्रत्यक्ष आक्रमिलेल्या मार्गाची लांबी होय.

2. या राशीला दिशा नसते.

3. हे विस्थापनाच्या परिमाणाएवढे किंवा त्याहून जास्त  असते.

विस्थापन

1. विस्थापन म्हणजे वस्तूच्या गतिमानतेच्या आरंभ बिंदूपासून अंतिम बिंदूपर्यंतचे सर्वांत कमी अंतर होय.

2. या राशीला दिशा असते.

3. याचे परिमाण अंतराएवढे किंवा त्याहून कमी असते.

(2) चाल आणि वेग

उत्तर :

चाल  

1. एखादया वस्तूने एकक काळात विशिष्ट दिशेने कापलेल्या अंतरास वेग म्हणतात.

2. या राशीला दिशा नसते.

वेग

1. एखादया वस्तूने एकक वेळात कापलेल्या अंतरास चाल म्हणतात.

2. या राशीला दिशा असते.

प्रश्न. शास्त्रीय कारणे लिहा :

(1) अंतर आणि विस्थापन या वेगवेगळ्या संकल्पना आहेत.

उत्तर : (1) अंतर म्हणजे दोन बिंदूंच्या दरम्यान गतिमान असणाऱ्या वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण म्हणजेच प्रत्यक्ष आक्रमिलेल्या मार्गाची लांबी होय. हे त्या दोन बिंदूंना जोडणाऱ्या सरळ रेषेच्या लांबीपेक्षा जास्त असू शकते. अंतर या संकल्पनेत दिशेचा अंतर्भाव होत नाही. (2) विस्थापन म्हणजे वस्तूच्या गतिमानतेच्या आरंभ बिंदूपासून अंतिम बिंदुपर्यंतचे सर्वांत कमी अंतर होय. विस्थापन या संकल्पनेत दिशेचा अंतर्भाव होतो. यावरुन स्पष्ट होते की अंतर आणि विस्थापन या वेगवेगळ्या संकल्पना आहेत.

(2) जेव्हा एखादी वस्तू मुक्तपणे जमिनीवर पडते, तेव्हा गतीचे त्वरण एकसमान असते.

उत्तर : (1) मुक्तपणे खाली पडणाऱ्या वस्तूवर फक्त पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल कार्य करीत असते. (2) पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ दिलेल्या वस्तूवर कार्य करणारे पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल जवळजवळ एकसमान असते. त्यामुळे एखादी वस्तू मुक्तपणे जमिनीवर पडते, तेव्हा गतीचे त्वरण जवळजवळ एकसमान असते.

प्रश्न  पुढील उदाहरणे सोडवा :

(1) एकसारख्या वेगाने चाललेल्या मोटारीला थांबवण्यासाठी 1000 N बल लावले, तरीही मोटार 10 मीटर अंतर चालून थांबली. या ठिकाणी कार्य किती झाले ?

उत्तर : येथे बल व विस्थापन यांच्या दिशा परस्परविरुद्ध आहेत. म्हणजेच

F = 1000 N

s = - 10 m

W = F× s

= 1000 N x (-10 m)

=  -10000 J.

(2) 20 किलोग्रॅम वस्तुमानाची गाडी सपाट व गुळगुळीत रस्त्यावरून 2 N इतके बल लावल्यावर

50 मीटर सरळ रेषेत गेली, तेव्हा बलाने किती कार्य केले?

उत्तर : बल (F) = 2 N

विस्थापन (s)=  50 मीटर

W = F x S

(बलाने केलेले कार्य)

W = 2 N x 50 m

= 100 J.

(3) एक व्यक्ती 72 किमी प्रवास 4 तासांत करते; तर तिची सरासरी चाल मीटर/सेकंदमध्ये काढा.

उत्तर : दिलेले s = 72 किमी  = 72000 मीटर,   t  = 4 तास 3 4x 60 x 60 सेकंद  = 14400 सेकंद.

सरासरी चाल = ? 

v = s/ t =   72000 मीटर/  14400 सेकंद =   720/  144 मीटर/सेकंद

= 10 /2  मीटर/सेकंद   =  5 मीटर/सेकंद

व्यक्तीची सरासरी चाल = 5 मीटर/सेकंद.

Tuesday, 13 October 2020

October 13, 2020

स्वाध्यायमाला - प्रश्नोत्तरे | General Science |सामान्य विज्ञान - 6 - भौतिक राशींचे मापन

स्वाध्यायमाला -सामान्य विज्ञान - 6 - भौतिक राशींचे मापन 


प्रश्न 1. रिकाम्या जागा भरा :
 (1) भौतिक राशींचे परिमाण सांगण्यासाठी मूल्य  एकक  यांचा वापर करतात. 
 (2) वस्तुमानावर जेवढे गुरुत्वीय बल  कार्य करते, त्याला वजन असे म्हणतात. 
 (3) चाल ही राशी अंतर  आणि काळ  या राशींचे गुणोत्तर आहे. 
 (4) पायाभूत  राशींचे प्रमाण कधीही बदलते असता कामा नये. 
 (5) सात पायाभूत राशींवर आधारित अशी एककांची आंतरराष्ट्रीय पद्धती,  Systerm Internationalसध्या जगभरात वापरली जाते.  
पश्न 2. एक चुकीचा शब्द असलेली काही विधाने दिलेली आहेत. हा शब्द बदलून विधाने दुरुस्त करा : 
 (1) लांबी ही सदिश राशी आहे. 
उत्तर  - रस्त्याची लांबी ही अदिश राशी आहे
(2) पदार्थातील द्रव्यसंचयाला आकारमान म्हणतात.
उत्तर   पदार्थातील द्रव्यसंचयाला वस्तुमान म्हणतात. 
(3) वस्तुमान ही सदिश राशी आहे, तर वजन ही अदिश राशी आहे.
उत्तर  वस्तुमान ही अदिश राशी आहे, तर वजन ही सदिश राशी आहे 
(4) एमकेएस (MKS) या मापन पद्धतीत लांबी सेंटिमीटरमध्ये, वस्तुमान ग्रॅममध्ये व काळ (वेळ) सेकंदांत ३. मोजतात.
उत्तर  -  एमकेएस (MKS) या मापन पद्धतीत लांबी मीटरमध्ये, वस्तुमान किलोग्रॅममध्ये व काळ (वेळ) सेकंदार मोजतात. 
 (5) लोह आणि अॅल्युमिनिअम संमिश्राचा एक भरीव दंडगोल पॅरिस येथील आंतरराष्ट्रीय वजनमाप संस्थेमध्ये ठेवला आहे.
उत्तर   - प्लॅटिनम-इरिडियम संमिश्राचा एक भरीव दंडगोल पॅरिस येथील आंतरराष्ट्रीय वजनमाप संस्थेमध्ये ठेवला आहे. 
(6) इजिप्तमध्ये माणसाच्या कोपरापासून मधल्या बोटाच्या टोकापर्यंतच्या अंतरास 'वीत' असे म्हणत असत. उत्तर    इजिप्तमध्ये माणसाच्या कोपरापासून मधल्या बोटाच्या टोकापर्यंतच्या अंतरास 'क्युबिट' असे म्हणत असत. 

जोड्या जुळवा 
उत्तरे 
 1 ) वेग मीटर/सेकंद 
 2 ) क्षेत्रफळ चौरस मीटर 
 3) आकारमान लीटर - 
 4) वस्तुमान किलोग्रॅम - 
 5) घनता किलोग्रॅम/घनमीटर - 

उत्तरे 
 (1) एमकेएस किलोग्रॅम - 
 (2) विस्थापन सदिश राशी - 
 (3) हात अंदाजे माप - 
 (4) मीटर - प्रमाणित माप 
 (5) काळ पायाभूत राशी - * 
प्रश्न 4. उदाहरणांसहित स्पष्ट करा : 
 (1) अदिश राशी. 
 उत्तर : अदिश राशी केवळ परिमाणाच्या साहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येते. उदाहरणार्थ, लांबी, वस्तुमान, क्षेत्रफळ, तापमान, घनता, कालावधी, कार्य इत्यादीचा राशी व्यक्त करण्यासाठी केवळ परिमाणाचा म्हणजेच मूल्य व एककाचा वापर होतो. यात दिशेचा अंतर्भाव नसतो. 
 (2) सदिश राशी
 उत्तर : सदिश राशी या परिमाण व दिशा यांच्या साहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येतात. विस्थापन, वेग या सदिश राशी आहेत. उदाहरणार्थ, (1) (1) उत्तर दिशेस 20 किलोमीटर विस्थापन व ( i) पूर्व दिशेस 20 किलोमीटर विस्थापन यांत फरक आहे. येथे अंतर समान आहे पण भाग ( i) मध्ये विस्थापानाची दिशा वेगळी आहे. (2) (i) आकाशात दक्षिणेकडे 500 किमी प्रतितास वेगाने चाललेले विमान व आकाशात पूर्वेकडे 500 किमी प्रतितास वेगाने चाललेले विमान यात फरक आहे. येथे चाल समान आहे परंतु भाग (i) मध्ये गतीची दिशा वेगळी आहे.

 प्रश्न 5. पुढील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा : 
 1) प्रत्येक ग्रहावर एकाच वस्तूचे वजन वेगवेगळे का भरते? 
उत्तर : एखादया वस्तुवर जेवढे गुरुत्वीय बल कार्य करते, त्याला त्या वस्तूचे वजन म्हणतात. एखादया वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने आकर्षित करते, त्याला त्या वसम्तूचे पृथ्वीवरील वजन म्हणतात. एखादया ग्रहावरील गुरुत्वाकर्षण निरनिराळे असते. त्यामुळे एकाच वस्तूचे निरनिराळया ग्रहांवर वेगवगळे वजन भरते. 
(2) दैनंदिन जीवनामध्ये अचूक मापनासंदर्मात तुम्ही कोणती काळजी च्याल? 
उत्तर : (1) कोणतेही मापन करतांना योग्य सायने वापरावीत, (2) या साधनांचा योग्य पद्थतीने वापर करावा. (3) आपण घेत असलेल्या वस्तू प्रमाणित मापाने योग्यरीत्या मोजल्या आहेत की नाहीत याची शहानिशा करावी. (4) दुकानदार, भाजीवाले इत्यादी कोणता तराजु वापरतात, त्थाच्यावर प्रमाणित असल्याचा छाप आहे की नाही, तराजू आणि त्याचा काटा स्थिर आहे की नाही. तराजच्या पारडयांची खालची बाज कशी आहे या सर्व बाबी प्रत्येक खरेदीच्या वेळी तपासून पाहिल्या पाहिजेत (5) वापरण्यात येणारी बजने योग्य आहेत की त्यांच्याऐवजी एखादा दगड वापरला जातो है लक्षात घेतले पाहिजे, 
(3) वस्तुमान व वजन यांमध्ये काय फरक आहे ? 
उत्तर :   
वस्तुमान  
1 पदार्थातील ट्रव्यसंचयाला वस्तुमान म्हणतात. 
2 वस्तुमान ही अदिश राशी आहे. 
3. वस्तुमान सर्व परिस्थितीत तेवढेव भरते. 
वजन 
1. वस्तूवर जेवढे गुरुत्वीय बल कार्य करते, त्याला त्या वस्तूचे वजन असे म्हणतात. 
2 वजन ही सदिश राशी आहे. 
 3. वजन निरनिराळया परिस्थितींत आणि निरनिराळ्या स्थळी वेगळे असते. 

(4) मापनात आढळणाच्या त्रुटी उदाहरणाच्या साहाय्याने स्पष्ट करा. 
 उत्तर : मापनात आढळणाच्या महत्त्वाच्या त्रुटी म्हणजे 
(अ) योग्य साधनांचा वापर न करणे. (1) काही वेळा भाजीवाले किंवा दुकानदार प्रमाणित वजने वापरत नाहीत. त्याऐवजी दगड किंवा तत्सम साधपरतात. त्यामुळे ते करीत असलेल्या वजनात फेरफार होतो. (2) कधी कधी तराजू नीट कार्य करीत नसतो (3) पेट्रोल किंवा डिझेल विकत घेताना इंडिकेटरवर योग्य पद्घतीने लक्ष दिले जात नाही. 
(ब) साधनांचा योग्य पद्यतीने वापर न करणे. (1) दैनंदिन जीवनात मापन करण्याची साधने म्हणजे तराजू ताणकाटा फूटपट्टी, मोजमापाची टेप, निरनिराळी वजने, दूध मापनाची मापे इत्यादींचा वापर योग्य पद्धतीने केला जात नाही. (2) मापन करताना तराजूचा काटा फेरफार करून वापरला जातो. (3)ताग्यातून कापड मापताना त्याचे योग्य मापन केले जात नाही. वरील बाबीविषयी ग्राहकाने विशेष दक्षता घेऊन आपण फसवले तर जात नाही ना याची खात्री केली पाहिजे.  
(5) अचूक मापनाची आवश्यकता व त्यासाठी वापरायची साधने कोणती ते स्पष्ट करा
 उत्तर : अचूक मापनाची आवश्यकता पुढील बाबीवर अवलंबून असते (1) दैनंदिन व्यवहारात तसेच शास्त्रीय संशोधनात कुठल्याही वस्तूचे मापन अचूक असलते पाहिये: अन्यथा त्याचे दूरगामी अनिष्ट परिणाम होऊ शकतात. (2) मापन करावयाच्या वस्तु मौल्यवान विशेष महत्वाच्या आणि अल्प प्रमाणात वापरल्या जाणार्या त्यांचे मोजमाप नेहमीच अधिक काटेकोरपणे केले पाहिजे 
उदा.. सोने, चांदी इत्यादींच्या वस्तुमानाचे मापन करताना ही दक्षता घेतली पाहिजे. (3) योग्य त्या साधनाचा उपयोग मापनासाठी केला पाहिजे.  (4) शरीराचे अचूक तापमान बघण्यासाठी तापमापक देखील आता डिजिटल पद्धतीचे  झाले आहेत. (5) ऑलिम्पिक स्पर्धेसारख्या अत्यंत महत्त्वाच्या क्रीडास्पर्याशी निर्मति अंतरे व काळ मापन करावयाला विशेष डिजिटल उपकरणे वापरली जातात. 

(6) सेकंद कसे प्रमाणित केले गेले? 
उत्तर  : सेकंद प्रमाणित करताना पृथ्वीच्या एका परिवलनास जो सरासरी वेळ लागतो, तो अचूक साधनाने मोजला गेला.तास धरून एक दिवस प्रमाणित करण्यात आला. एका तासाची 60 मिनिटे (60 समभाग व एका मिनिटाचे 60 सेकंद (60 समभाग) याप्रमाणे एक सेकंदाचे प्रमाणीकरण करण्यात आले. 

प्रश्न 6. शास्त्रीय कारणे लिहा
(1) शरीराच्या भागांचा वापर करून मोजमाप करणे योग्य नाही. 
उत्तर  : प्रत्येक व्यक्तीच्या  शरीराच्या भागांची मापे निरनिराळी असतात. त्यांत काहीही प्रमाणीकरण नसते त्यामुळे शरीराच्या भागांचा वाकरून मोजमाप करणे योग्य नाही. 
(2) ठरावीक कालावधीनंतर वजन व मापे प्रमाणित करुन घेणे आवश्यक असते. 
उत्तर : सतत वापराने वजन व मापे प्रमाणित न राहण्याची शक्यता असते. त्यामुळे मापनाच्या वेळी ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून वेळोवेळी वजन आणि मापे यांची तपासणी करणे जरूरीचे आहे. 
(3) आपले वस्तुमान चंद्र आणि पृथ्वी या दोन्ही ठिकाणी एकसारखे असते
उत्तर : एखादया बस्तूचे वस्तुमान म्हणजे त्या वस्तूमधील द्रव्यसंचय होय. वस्तू विश्वात कोठे आहे यावर  तिचे वस्तुमान अवलंबून नसते. म्हणून आपले वस्तुमान चंद्र आणि पृथ्वी या दोन्ही ठिकाणी एकसारखे असते 

प्रश्न 7. जरा डोके चालवा :  
(1) वस्तूचे वजन ध्रुवावर  जास्तीत जास्त, तर विषुववृत्तावर सर्वांत कमी का राहील?  
उत्तर : पृथ्वी हा ग्रह पूर्णपणे गोल आकाराचा नाही. त्याच्या ध्रुवीय  टोकांना तो थोडासा दबलेला आहे आणि विषुववृत्तीय प्रदेशात थोडा जास्त फुगीर आहे. त्यामुळे विषुववृत्तीय त्रिज्या ही ध्रुवीय त्रिज्येपेक्षा जास्त आहे विषुववृत्ताच्या मानाने पृथ्वीचे ध्रुव  हे पृथ्वीच्या केंद्राच्या जास्त जवळ येतात. पृथ्वीच्या केंद्राशी पृथ्वीचे गुरुत्वत्वरण शून्य असते. पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण हे विषुववृत्ताच्या मानाने ध्रुवावर जास्त असते. म्हणून वजन शून्य असते. त्यामुळे वस्तूचे वजन ध्रुवावर  सर्वांत जास्त भरते आणि विषुवववृत्तावर सर्वात कमी भरते. 
(2) वस्तूचे वजन उंच जागेवर समुद्रसपाटीपेक्षा कमी का राहील?  
उत्तर : जिथे गुरुत्वीय बल कमी तेथे वजन कमी भरते. जसजशी एखादी वस्तू उंचावर जाते, तसतशी है पृथ्वीच्या मध्यकेंद्रापासून दूर जाते. उंचावरचे गुरुत्वीय बळ समुद्रसपाटीवरच्या गुरुत्वीय बळापेक्षा कमी असते त्यामुळे उंचावरच्या वस्तूचे वजन समुद्रसपाटीवरध्या वस्तूच्या वजनापेक्षा कमी भरते. 

(1) अनुघड्याळ म्हणजे काय? ते कोठे ठेवले आहे
उत्तर : अणुघड्याळ हे अतिशय काटेकोरपणे चालणारे उपकरण आहे. अणू आणि रेणुच्या कपनांवर याचे कार्य अवलंबून असते. सेसियम किंवा अमोनिया यांच्या रेण्वीय संख्येवर हे चालवले जाते. नवी दिल्ली येथीत राष्ट्रीय भोतिकी प्रयोगशाळेत अशा प्रकारचे अणुघड्याळ आहे.
 (2) मीटर हे प्रमाण निश्चित करण्यासाठी प्रकाशाच्या वेगाचा उपयोग कसा करतात? 
 उत्तर : प्रकाशकिरण निर्वात पोकळीतून 1/299792458 इतक्या सेकंदात जितके अंतर मार्गक्रमण करतो, त्या अंतराला एक मीटर म्हणतात. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर प्रकाशकिरण निर्वात पोकळीमध्ये 299792458 मीटर प्रति सेकंद इतक्या वेगाने प्रवास करतो. अशा रितीने मीटर हे प्रमाण निश्चित करण्यासाठी प्रकाशाच्या वेगाचा उपयोग करतात.

Sunday, 11 October 2020

October 11, 2020

स्वाध्यायमाला - प्रश्नोत्तरे | General Science |सामान्य विज्ञान - 5 - अन्नपदार्थाची सुरक्षा

स्वाध्यायमाला -     सामान्य विज्ञान - 5  - अन्नपदार्थाची सुरक्षा 

 प्रश्न 1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा :



(कॅल्शिअम कार्बाईड, गोठणीकरण, किरणीयन, अन्नबिघाड, अंतःस्थ, अल्युमिनिअम फॉस्फॉइडचा, निर्जलीकरण, पाश्चरीकरण, मेलॅथिऑनचा, नैसर्गिक परिरक्षक, सूक्ष्मजीवांची, रासायनिक परिरक्षक)

(1) शेतातील धान्य प्रखर सूर्यप्रकाशात सुकवणे याला निर्जलीकरण असे म्हणतात.

(2) दूध व तत्सम पदार्थ विशिष्ट तापमानापर्यंत तापवून ताबडतोब थंड करतात. अन्नपदार्थांच्या परिरक्षणाच्या या पद्धतीला असे पाश्चरीकरण म्हणतात.

(3) मीठ हे नैसर्गिक परिरक्षक आहे.

(4) व्हिनेगर हे रासायनिक परिरक्षक आहे.

(5) पोषकद्रव्यांचा नाश होणे म्हणजे अन्नबिघाड होय.

(6) अन्नपदार्थांत बदल अंतःस्थ घटकांमुळेच होतात.

(7) परिरक्षणाच्या विविध पद्धतींमुळे अन्नपदार्थात होणारी सूक्ष्मजीवांची वाढ रोखली जाते.

(8) केळी पिवळी धमक दिसण्यासाठी कॅल्शिअम कार्बाईड या रसायनाचा वापर करतात.

प्रश्न 2. पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा व चुकीची विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा

(1) काही अन्नपदार्थांचा धातूशी संपर्क झाल्यास रासायनिक प्रक्रियेमुळे ते बिघडतात-  बरोबर

(2) आपल्या देशात व संपूर्ण जगात आता लोक भरपूर अन्न खाऊन झोपी जातात. 

चूक, (आपल्या देशात व संपूर्ण जगात अनेक लोक दररोज अन्नाशिवाय  झोपी जातात.

(3) पंगतीसारख्या पारंपरिक जेवण पद्धतीत अनावश्यक आग्रह केल्याने अन्न वाचते. 

चूक पंगतीसारख्या पारंपरिक जेवण पद्धतीत अनावश्यक आग्रह केल्याने अन्न वाया जाते

(4) अन्न आणि औषधे यांचे प्रमाणीकरण करून त्यांच्या निर्मितीवर व वाटपावर नियंत्रण ठेवणारी ही खाजगी यंत्रणा आहे.

चूक - (अन्न आणि औषधे यांचे प्रमाणीकरण करून त्यांच्या निर्मितीवर व वाटपावर नियंत्रण ठेवणारी शासकीय यंत्रणा आहे.)

(5) ताटात घेतलेले सर्व पदार्थ संपवावेत.- बरोबर

(6) द्राक्षे, आंबे यांच्या अयोग्य हाताळणीमुळे संख्यात्मक नासाडी होते.

 चूक.   द्राक्षे, आंबे यांच्या अयोग्य हाताळणीमुळे गुणात्मक नासाड़ी होते

आमच्यातील वेगळा कोण हे शोधा :

(1) मीठ, व्हिनेगर, सायट्रिक आम्ल, सोडिअम बेन्झोएट.     - मीठ

(2) लाखीची डाळ, विटांची भुकटी, मेटॅनिल यलो, हळद पावडर. -   हळद पावडर

(3) केळी, सफरचंद, पेरू, बदाम. -  बदाम

(4) साठवणे, गोठवणे, निवळणे,सुकवणे.  - साठवणे.

तक्ता पूर्ण करा 

1] उत्तरे -

पदार्थ                  भेसळ

हळद पावडर    मेटॅनिल यलो

मिरी             पपईच्या बिया

रवा             लोहकीस

मध           गुळाचे पाणी

2] उत्तरे -

पदार्थ             भेसळीचे पदार्थ

दूध         -         पाणी, युरिया

लाल तिखट-   विटांची भुकटी

काळे मिरी -  पपईच्या बिया

आइस्क्रीम  -   धुण्याचा सोडा, कागदाचा लगदा

प्रश्न  काय करावे बरे ?

(1) बाजारात अनेक मिठाईवाले उघड्यावर मिठाईची विक्री करतात.

उत्तर : उघड्यावर ठेवलेली मिठाई कघीही खाऊ नये. त्यावर हमखास माश्या बसलेल्या असतात. असे अन्न दूषित असते व त्यामुळे पोटाचे आजार होऊ शकतात. अन्नसुरक्षितता आणि मानांकने कायदा 2006 अनुसार अशा दूषित अन्न विक्रेत्यांवर कारवाई करता येते. त्यासाठी नजीकच्या नगरपालिका कार्यालयात तक्रार करावी. इतर ग्राहकांना अशी दूषित मिठाई घेण्यापासून परावृत्त करावे.

(2) पाणीपुरी विक्रेता अस्वच्छ हातानेच पाणीपुरी बनवत आहे.

उत्तर : अस्वच्छ हातानेच पाणीपुरी बनवणाऱ्या पाणीपुरी विक्रेत्याला जागरुक करावे. अस्वच्छतेमुळे कोणते विकार होतील याची जाणीव त्याला करून दयावी. आपण अशा ठिकाणी खाणे टाळावे.

(3) बाजारातून भरपूर भाजीपाला, फळे विकत आणली आहेत.

उत्तर : बाजारातून भाजीपाला व फळे आणल्यावर ती स्वच्छ करावीत. व्यवस्थित धुवून कोरडी करावीत.त्यानंतर ती रेफ्रिजरेटरच्या भाजी ठेवायच्या कप्प्यात सुरक्षित ठेवावी. फ्रिज नसेल तर टोपलीत किंवा कापडी पिशवीत नीट झाकून ठेवावीत.

(4) उंदीर, झुरळ, पाल यांपासून अन्नपदार्थांचे रक्षण करायचे आहे.

उत्तर : अन्नपदार्थ नीट झाकून ठेवावेत. जिथे उंदीर व झुरळे फिरकणार नाहीत अशी उंचावरील जागा निवडावी फडताळात किंवा रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यास अन्नपदार्थ सुरक्षित राहतील.

प्रश्न . पुढील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा :

(1) दूधाचे पाश्चरीकरण कसे करतात?

उत्तर : पाश्चरीकरण पद्धतीने दूध तापमानापर्यंत 15 मिनिटे तापवले जाते व नंतर ताबडतोब ते थंड केले जाते. यामुळे दुधातील सूक्ष्मजीवांचा नाश होऊन दूध दीर्घकाळ टिकते.

(2) भेसळयुक्त अन्नपदार्थ का खाऊ नयेत ?

उत्तर : भेसळयुक्त अन्नामुळे खाणाच्याच्या आरोग्याला घोका पोहोचतो. अन्नातील येगवेगळ्या भेसळीचे परिणाम शरीरावर होतात. पोटाचे आजार किंवा विषवाधा होऊ शकते. दीर्घकाळपर्यंत भेसळयुक्त अन्न खाल्ल्याने शरीरातील महत्त्वाच्या अवयवांच्या कार्यावर विपरीत परिणाम होतात . दुर्धर आजार संभवतो.

(3) अन्नरक्षण आणि अन्नपरिक्षण यांतला नेमका फरक कोणता ?

उत्तर : अन्नरक्षण व परिरक्षण यांत पुढोल महत्त्वाचा फरक आहे : (1) अन्नरक्षणात अन्न सुरक्षित ठेवणे है केले जाते. त्यासाठी अन्नाला सूक्ष्मजीवांपासून जपणे, कीड लागू न देणे असे उपाय केले जातात. (2) अन्नपरिरक्षणात वेगवेगळ्या परिरक्षकांचा वापर करून अन्नामध्ये अंतर्गत घटकांमुळे होणारे विधाड टाळले जातात. या पद्घतीने अन्न दीर्घ काळ टिकवले जाते.

(4) अन्नाची संख्यात्मक नासाडी म्हणजे काय ? अशी नासाडी कशामुळे होते ?

उत्तर : (1) अन्नाच्या संख्येत किंवा प्रमाणात नाश होऊन घट होणे म्हणजे अन्नाची संख्यात्मक नासाडी होणे. शेती करताना चुकीच्या पद्धती वापरणे. उदा., मुठीने पेरणे, अव्यवस्थित मळणी करणे इत्यादी.(2) अयोग्य साठवण व वितरणाच्या चुकीच्या पद्घधतांचा वापर करणे, अशाने अन्नाची संख्यात्मक नासाडी होते. (3) इच्छा नसताना अन्न वाढले जाणे. पंगतीसारख्या पारंपरिक जेवण पद्धतीत अनावश्यक आग्रह केल्याने तसेच बफे जेवणात देखील उगाचच ताट भरून घेणे आणि मग फेकून देणे अशामुळे संख्यात्मक अन्ननासाडी होते.

(6) अन्नबिघाड कसा होतो? अन्नबिघाड करणारे विविध घटक कोणते ?

उत्तर : (1) अन्नाचा विघाड अतिशय सहजरीत्या होतो. शेतापासून ते ग्राहकापर्यंत अन्न वाहतूक करतानाच अन्नपदार्थांना इजा पोहोचू शकते. (2) अयोग्य हाताळणी, अयोग्य साठवण, अयोग्य वाहतूक इत्यादींमुळे अन्न खराब होते. काही नाशिवंत अन्नपदार्थ लवकर खराब होतात. (3) दूध, मांस इत्यादी आम्ल किंवा आम्लारियुक्त असतात.त्यांच्यात अंतःस्थ बदल होत असतात. (4) रासायनिक प्रक्रिया होऊन अन्नपदार्थ विघडतात.  (5) हवा, पाणी, जमीन यांमधील सूक्ष्मजीव किंवा परिसरातले कीटक अन्नामध्ये प्रवेश करतात; त्यामुळे अन्नबिघाड होतो.

(7) अन्नभेसळ म्हणजे काय ?

उत्तर : चांगल्या अन्नपदार्थात त्यासारखेच परंतु स्वस्त अतिरिक्त पदार्थ मिसळणे वाला अन्नाची भेसळ असे म्हणतात. भेसळीचे पदार्थ अशुद्ध आणि हानिकारक असतात. त्यामुळे असे पदार्थ खाणे अथोग्य आहे. भेसळयुक्त पदार्थ खाऊ नयेत. अन्नाची भेसळ करणे हा कायघाने गुन्हा आहे.

(8) अन्नाची नासाडी होऊ नये यांसाठी तुमची भूमिका काय असेल?

उत्तर : अन्नाची नासाडी टाळण्यासाठीचे उपाय : (1) आवश्यकतेपेक्षा जास्त अन्न ताटात वाढून घेऊ नये. (2) ताटात वाढून घेतलेले सर्व पदार्थ संपवावेत, (3) जास्त वेळ अन्न शिजवू नये. (4) उरलेले अन्न टाकू नये,योग्य पद्धतीने साठवून ते पुन्हा वापरावे. (5) आवश्यक तेवढेच अन्नधान्य, फळे, भाज्या यांची खरेदी करा. अधिक खरेदीचा मोह टाळा. (6) खरेदी करून आणलेले अन्नपदार्थ योग्य पद्धतीने साठवावेत. (7) हवाबंद डबे बाटल्या घेतांना 'एक्सपायरी डेट' पाहूनच खरेदी करावी. दिलेल्या तारखेनंतर तो पदार्थ खाण्यायोग्य राहत नाही.

प्रश्न   असे का घडते ते लिहून त्यावर काय उपाय करता येतील ते सांगा :

(1) गुणात्मक अन्ननासाडी होत आहे.

उत्तर : (1) अन्नाच्या गुणात किंवा दर्जात नाश होऊन घट होणे म्हणजे अन्नाची गुणात्मक नासाडी होणे. पुढील कारणांनी अन्नाची गुणात्मक नासाडी होते. (2) अन्नसुरक्षेच्या चुकीच्या पद्घती वापरून अन्नरक्षण करणे.(3) परिरक्षकांचा प्रमाणाबाहेर म्हणजेच अतिरेकी वापर करणे. (4) अन्न अति शिजवणे, भाज्या चिरून नंतर धुणे अशा चुकीच्या पद्धती स्वयंपाक होऊन ते ग्राहकापर्यंत पोहोचण्यास लागणाऱ्या वेळेचा अंदाज चुकणे, (8)द्राक्षे  आंबे अशा नाशवंत फळांची अयोग्य हाताळणी करणे.

उपाय : ज्या कारणांनी अशी गुणात्मक अन्ननासाडी होते तो कारणे प्रथम शोपून काढावीत. जर स्वयंपाकघरात चुकीच्या पद्धतीने अन्न शिजवणे किंवा अन्नाची साठवणूक होत असेल, तर ती थांबवली पाहिजे. बाजारातून फळे, भाज्या आणताना त्यांची हाताळणी सूयोग्यरीत्या केली पाहिजे.

(2) शिजवलेला भात कच्चा लागत आहे.

उत्तर : भात शिजवताना पुरेसे पाणी त्यात घातलेले नसेल, तर भात कच्चा राहतो.

उपाय : अशा भाताला पुन्हा वाफ काढावी आणि तो खावा. फेकून देऊ नये.

(3) बाजारातून आणलेला गहू थोडा ओलसर आहे.

उत्तर : बाजारातून आणलेला गहू योग्य पद्धतीत साठवलेला नसला की तो दमट आणि ओलसर होऊ शकतो. पावसाळी वातावरणात असे बच्याच वेळा होऊ शकते. आपण बाजारातून आणताना देखील त्याला ओल लागलेली असू शकते.

उपाय : गहू  उन्हात वाळत घालावा. अशा प्रकारे तीन-चार वेळा उन्हात वाळवल्यावर कोरडया, हवाबंद डब्यात भरून ठेवावा.

(4) दहयाची  चव आंबट / कडवट लागत आहे.

उत्तर : दही विरजवताना लावलेले विरजण खराब झाले असेल, तर दही आंबट किंवा कडवट लागते. कधी कधी जास्त दिवस उलटून गेले असतील तरी असे दही आंबट किंवा कडवट लागते. दहयाची साठवण योग्य त्या तापमानाला व्यवस्थित केली नसेल तरी दही खराब होते.

उपाय : कडवट दही टाकूनच दधावे लागते. आंबट दहयाचे ताक करून किंवा साखर घालून वापरता येते.

(5) खूप वेळापूर्वी कापलेले फळ काळे पडले आहे.

उत्तर : कापलेल्या फळात रासायनिक प्रक्रिया चालू होतात आणि त्यामुळे ते काळे पडते.

उपाय : कापल्याबरोबर लगेच अशी फळे बंद डब्यात झाकून ठेवावीत. त्या फोडींना हलकासा मिठाचा किंवा साखरेचा थर लावला तरी है काळे पडण्याचे प्रमाण कमी होते.

प्रश्न . कारणे लिहा :

(1) 5° सेल्सिअस (5°C) तापमानाला अन्नपदार्थ सुरक्षित राहतात.

उत्तर : थंड तापमानात जैविक प्रक्रिया होत नाहीत. जीवाणू, बुरशी असे उपद्रवी सूक्ष्मजीव अन्नावर परिणाम करू शकत नाहीत. म्हणून अन्नपदार्थ 5° सेल्सिअस तापमानाला सुरक्षित राहतात.

(2) सध्या मोठ्या समारंभात बुफे पद्धतीचा वापर करतात.

उत्तर : बुफे पद्धतीत आपल्याला हवे तितकेच जेवण-खाणे प्लेटमध्ये घ्यायचे असते. अन्नाचा अपव्यय होऊ नये म्हणून ही पद्धत सुरू करण्यात आली असावी. पारंपरिक पंगतीच्या भोजनात आग्रह करून अन्नाची नासाडी केली जाते. म्हणून सध्या मोठ्या समारंभात बुफे पद्घतीचा वापर करतात.

October 11, 2020

स्वाध्यायमाला - प्रश्नोत्तरे | General Science |सामान्य विज्ञान - 4 - सजीवातील पोषण

 सामान्य विज्ञान - 4 - सजीवातील पोषण 



प्रश्न 1. गाळलेल्या जागा भरा :

(1) पोषकद्रव्यांचे बृहत् पोषकद्रव्ये आणि सूक्ष्म पोषकद्रव्ये या दोन गटांत वर्गीकरण केले जाते.

(2) वनस्पती पानांमध्ये अन्न तयार करतात. या क्रियेला   प्रकाश-संश्लेषण म्हणतात.

(3) पानांवरील छिद्रांना पर्णरंध्रे म्हणतात.

(4) वनस्पतींमध्ये  जलवाहिन्या,व रसवाहिन्या अशा स्वरूपात दोन वहन व्यवस्था असतात.

(5) अझिटोबॅक्टर. हे सूक्ष्मजीव हवेतील नायट्रोजनचे त्यांच्या संयुगात रूपांतर करतात.

प्रश्न . पुढील विधानात एक शब्द चुकीचा आहे. तो बदलून वाक्य दुरुस्त करा व पूर्ण वाक्य पुन्हा लिहा :

(1) सर्वच प्राणी स्वयंपोषण दाखवतात.

उत्तर  सर्वच प्राणी परपोषण दाखवतात.

(2) प्रकाश-संश्लेषणाच्या क्रियेत कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडला जातो.

उत्तर  प्रकाश-संश्लेषणाच्या क्रियेत ऑक्सिजन बाहेर सोडला जातो.

(3) पानांमध्ये तयार झालेले अन्न जलवाहिन्यांमार्फत वनस्पतींच्या इतर भागांकडे वापरण्यासाठी व साठवण करण्यासाठी वाहून नेले जाते.

उत्तर  पानांमध्ये तयार झालेले अन्न रसवाहिन्यांमार्फत वनस्पतींच्या इतर भागांकडे वापरण्यासाठी व साठवण करण्यासाठी वाहून नेले जाते.

(4) अझिटोबॅक्टर हे सूक्ष्मजीव दुविदल शिंवावगीय वनस्पतींच्या मुळांवरील असलेल्या गाठींमध्ये असतात

 उत्तर  रायझोबिअम हे सूक्ष्मजीव द्विदल शिंबावगीय वनस्पतींच्या मुळांवरील असलेल्या गाठींमध्ये असतात

(5) नायट्रोजनच्या वातावरणीय स्थिरीकरणामध्ये नायट्रिक ऑसिड तयार होते.

उत्तर  नायट्रोजनच्या वातावरणीय स्थिरीकरणामध्ये नायट्रिक ऑक्साइड तयार होते.

प्रश्न. योग्य जोड्या जुळवा :

1 उत्तरे

(1) परजीवी वनस्पती  अमरवेल

(2) कीटकभक्षी वनस्पती - ड्रॉसेरा

(3) मृतोपजीवी वनस्पती - भूछत्र

(4) सहजीवी वनस्पती  दगडफूल

2 उत्तरे- 

(1) अन्नग्रहण    अन्नाचा शरीरात प्रवेश

(2) पचन       विद्राव्य घटकांत रूपांतर

(3) शोषण   विद्राव्याचे रक्तात मिसळणे

(4) सात्मीकरण - पेशी व ऊतींमध्ये वहन व ऊर्जानिर्मिती

(5) उत्सर्जन  उर्वरित अन्नघटक शरीराबाहेर टाकणे

3 उत्तरे

(1) नायट्रोजन       प्रथिने व हरितद्रव्यातील महत्त्वाचा घटक

(2) फॉस्फरस      प्रकाश ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर

(3) मॅग्नेशिअम व लोह - हरितद्रव्य निर्मिती

(4) मँगनीज व झिंक  प्रमुख संप्रेरक निर्मिती

(5) पोटॅशिअम   चयापचय

प्रश्न . पुढील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा :

(1) सजीवांना पोषणाची गरज का असते?

उत्तर : (1) सजीवांमध्ये काही जीवनप्रक्रिया अखंडपणे सुरू असतात. (2) या जीवनक्रिया सुरळीत चालू राहाव्यात, यासाठी पोषण आवश्यक असते. (3) आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी आणि शरीर निरोगी राखण्यासाठी देखील पोषणाची गरज असते.

(2) वनस्पतीची अन्न तयार करण्याची प्रक्रिया स्पष्ट करा.

उत्तर : (1) 'प्रकाश-संश्लेषण' या प्रक्रियेने वनस्पती अन्न तयार करतात. जमिनीतील पाणी, क्षार व इतर पोषकतत्त्वे आणि हवेतील कार्बन डायऑक्साइडचा उपयोग करून हरितद्रव्य (Chilorophyll) व सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने वनस्पती पानांमध्ये अन्न तयार करतात. (2) म्हणून वनस्पतींना स्वयंपोषी म्हटले जाते.

(3) परपोषी वनस्पती म्हणजे काय ? परपोषी वनस्पतींचे विविध प्रकार उदाहरणासह लिहा. किंवा परपोषी वनस्पती कशा जगत असतील? त्या कोठून अन्न मिळवत असतील?

उत्तर : (1) ज्या वनस्पतीत हरितद्रव्य नसते, अशा वनस्पतींना परपोषी वनस्पती असे म्हणतात. यांचे पूढील प्रकार आहेत : कीटकभक्षी, परजीवी आणि मृतोपजीवी. त्या स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत. (2) अन्नासाठी या वनस्पती इतर सजीवांच्या शरीरात किंवा शरीरावर वाढतात आणि त्यांच्यापासून आपले अन्न मिळवतात. अशा वनस्पतींना परजीवी वनस्पती म्हणतात. (3) यांचे दोन प्रकार आहेत : 

(अ) अर्ध परजीवी. उदा., बांडगूळ, बांडगूळ आधारासाठी मोठ्या वृक्षावर असतो. या वृक्षाकडून क्षार व पाणी शोषून स्वतःचे अन्न तयार करतो. 

(ब) संपूर्ण परजीवी. उदा., अमरवेलीत अजिबात हरितद्रव्य नसते त्यामुळे ती संपूर्णरीत्या आश्रयी वनस्पतींबरच अन्नासाठी अवलंबून असते. (4) कीटकांचे भक्षण करुन जगणाच्या वनस्पतंना कीटकभक्षी बनस्पती म्हणतात. उदा., घटपणीं, ड्रॉंसेरा (5) मृतोपजीवी वनस्पती मृत अवशेषाचे विघटन करून पोषकद्रवये शोषण करतात. उदा.. कवकवर्गीय सजीव.

(4) दगडफुलाचे वैशिष्ट्य काय?

उत्तर : दगडफूल हे सहजीवी पोषणाचे उदाहरण आहे. यात शेवाल व बुरशी एकत्र राहून एकच रचना बनते. बुरशी शैवालाला निवारा, पाणी व क्षार पुरवते ; तर त्या बदल्यात शैवाल प्रकाशसंश्लेषण करून बुरशीला अन्न पुरवते. या शैवाल व बुरशीला स्वतचे स्वतंत्र अस्तित्व नसते. हेच वैशिष्ट्य दगडफुलात आहे.

(5)) ड्रॉसेरा  वनस्पतीची माहिती लिहा.

उत्तर : (1) ड्रॉसेरा बनस्पती कीटकमक्षी असून ती प्रामुख्याने नायट्रोजन संयुगांचा अभाव असणाऱ्या जमिनीत आढळते. (2) ड्रॉसेराची रचना एखादया फुलासारखी दिसते. ती जमिनीलगत वाढते. (3) पाने आकर्षक, गुलाबी, लाल रंगाची असून त्यांच्या कडांना बारीक केसतंतू असतात. या तंतूंबर कीटकांना आकर्षून घेणारे चिकट द्रवाचे बिंदू असतात. (4) श्रीलंकेत जोहान्स बर्मन या शास्त्रज्ञाने इ.स. 1737 मध्ये या वनस्पतीचा शोध लावला. त्यांच्या सन्मानार्थ या वनस्पतीच्या जातीचे नाव बर्मानी असे आहे 

6] प्राण्यामधील  पोषणाचे विविध टप्पे स्पष्ट करा.

उत्तर : प्राण्यांमध्ये पोषणाचे पाच महत्वाचे ट्पे आहेत. ते म्हणजे अन्नग्रहण, पचन, शोषण, सात्मीकरण, उत्सर्जन.

1) अन्नग्रहण : अन्न मुखाबटे शरीरात घेणे म्हणजे अन्नग्रहण करणे. हा पहिला टप्पा आहे.

2) पचन : निरनिराळ्या विकरांच्या साहाय्याने अन्नाचे रूपांतर विद्वाव्य घटकांत केले जाणे म्हणजे पचन. संपूर्ण पचन संस्थेत अन्नाचे पचन होत असते.

(3) शोषण : या टप्प्यात पचनातून तयार झालेले विद्वाव्य रक्तात शोषले जाते. लहान आतड्यात हे शोषण होते.

4] सात्मीकरण: आतडयातील रक्तवाहिन्यांत शोषलेले द्रावणीय अन्नघटक शरीरातील पेशी व ऊत्तीमधे वाहून नेणे आणि त्यापासून ऊर्जानिर्मिती केली जाणे म्हणजे सात्मीकरण होय.

5) उत्सर्जन : या शेवटच्या टप्प्यात पचन व शोषण न झालेले उर्वरित अन्न गुदद्वारावाटे शरीराबाहेर टाकले जातात.

 7] एकाच पेशीत सर्व जीवनक्रिया होणारे एकपेशीय सजीव कोणते ?

उत्तर  : पोषणासंबंधीच्या सर्व क्रिया एकाच पेशीत होणारे प्राणी म्हणजे अमीबा, युग्लीना आणि पॅरामेशिअम हे सारे एकपेशीय सजीव आहेत.

(8) अमीबासारख्या एकपेशीय सजीवामध्ये अन्नग्रहण कसे होते ?

उत्तर : (1) अमीबामध्ये अन्नग्रहणासाठी वेगळे अवयव नसतात. हा एकपेशीय प्राणी आहे. (2) हा पेशीच्या कोणत्याही पृष्ठभागातून अन्न आत घेऊ शकतो. (3) अन्नप्रहणाच्या वेळी अन्नकणाला छद्मपादाच्या साहाय्याने सर्व बाजूंनी वेढून समाविष्ट करतो. (4) त्यानंतर अन्नकणांवर विविध विकरांच्या सहाय्याने  पचन क्रिया धडून तो विद्वाव्य स्वरूपात रूपांतरित केला जातो. (5) छदमपादाच्या साहाय्याने पुढे सरकताना अमीबा न पचलेला उरलेला भाग तेथेच मागे सोडून देतो.

(9]  वनस्पती  कोणकोणते पदार्थ उत्सर्जित करतात? का? 

उत्तर : वनस्पती चीक, डिंक, तेल, राळ अशा पदार्थाच्या स्वरूपात उत्सर्जन करतात. वनस्पतींना उत्सर्जन संस्था नसते. विसरण क्रियेने वायुरूप पदार्थ बाहेर सोडले जातात आणि इतर टाकाऊ पदार्थ खोडाच्या साली साठवले जातात किंवा जीर्ण जलवाहिनीत ते साठवले जातात. या पदार्थांचा वनस्पतींना उपयोग नसतो,

प्रश्न 6. कारणे लिहा :

(1) कीटकभक्षी वनस्पतींचा रंग आकर्षक असतो.

उत्तर : कीटकभक्षी वनस्पती कीटक खातात आणि आपल्या अन्नाची गरज भागवतात. असे कीटक स्वत:कडे आकर्षित करून घेण्यासाठी त्यांचा रंग आकर्षक असतो.

(2) फुलपाखराला नळीसारखी लांब सोंड असते.

उत्तर : कीटकामध्ये खास कार्य करणारे मुखावयव असतात. फुलपाखरू फुलातला रस शोषते, त्यासाठी त्याला नळीसारखी सौंड असते. याचा वापर करून ते अन्नग्रहण करते.

प्रश्न  विचार करा व पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा :

(1) आपण वेगवेगळे अन्नपदार्थ घरात तयार करतो, म्हणजे आपण स्वयंपोषी आहोत का ?

उत्तर : आपण जरी वेगवेगळे अन्नपदार्थ घरात तयार करीत असलो, तरी ते पदार्थ वनस्पती किंवा इतर प्राण्यांनी दिलेल्या अन्नपदार्थांपासून बनवतो. जसे गह, तांदूळ किंवा कडधान्य, अंडी इत्यादी. आपण वनस्पतीप्रमाणे प्रकाश-संश्लेषण करु शकत नाही. त्यामुळे आपण स्वयंपोषी नाही.

(2) स्वयंपोषी व परपोषी सजीवांपैकी कोणाची संख्या जास्त असते? का?

उत्तर : स्वयंपोषी सजीवांची संख्या जास्त असते. कारण वनस्पतौंची संख्या जास्त असेल, तरच त्यावर गुजराण करणारे प्राणी तग धरुन राहतील. जर स्वयंपोषी सजीव संख्येने कमी झाले, तर त्यावर अवलंबून असणारे परपोषी सजीव पण नष्ट होतील. म्हणून निसर्गातील अन्नसाखळीत स्वयंपोषी सजीव परपोषी सजीवांपेक्षा जास्त संख्येने असतात.

(3) वाळवंटी भागात परपोषींची संख्या कमी आढळते, मात्र समुद्रामध्ये जास्त संख्येने परपोषी आढळतात.असे का?

उत्तर :  वाळवंटी भागात स्वयंपोषी देखील कमी संख्येने असतात. त्यामुळे अवलंबुन राहणारे परपोषी कमी असतात. (2) जिथे अन्नाची चणचण असते, तेथे खाणाच्यांची संख्या रोडावते. (3) समुद्रात आपल्याला दिसत नसले तरी खुप मोठ्या प्रमाणात वनस्पती-प्लवक नावाचे तरंगणारे जीव असतात. (4) त्यांच्यावर आणि प्राणी प्लवकांवर समुद्रातील अन्नसाखळी अवलंबून असते. म्हणून समुद्रामध्ये वाळवंटी भागापेक्षा जास्त संख्येने परपोषी आढळतात.

(4) हिरव्या भागांव्यतिरिक्त वनस्पतीच्या इतर अवयवांत अन्न का तयार होत नाही?

उत्तर : हिरव्या भागांत हरितद्रव्य असते. हरितद्रव्य असलेल्या भागातच प्रकाश-संश्लेषण होते. त्यातूनच अन्ननिर्मिती होते. म्हणून हिरव्या भागांव्यातिरिक्त वनस्पतीच्या इतर अवयवांत अन्न तयार होत नाही.

(5) बाह्यपरजीवी व अंतःपरजीवी प्राण्यांमुळे काय नुकसान होते ?

उत्तर : परजीवी प्राणी अन्नासाठी पोशिंदघावर अवलंबून असतात. बाह्यपरजीवी चूषकासारखे किंवा सुईसारखे मुखावयव वापरून रक्त शोषतात. उदा., डास, ढेकूण इत्यादी. डासांसारखे कीटक मलेरिया, ढेंगू यांसारखे रोग संक्रमित करतात. अंतःपरजीवी शरीरात राहत असल्यामुळे निरनिराळ्या प्रकारचे रोग निर्माण करू शकतात. आपल्या शरीरातले विद्राव्य अन्न शोषून ते आपले कुपोषण करतात. बाह्यपरजीवी व अंतःपरजीवी प्राण्यांमुळे आरोग्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.

प्रश्न  जरा डोके चालवा

(1) बांडगूळ वनस्पतीमध्ये प्रकाश-संश्लेषण क्रिया कोणामार्फत होते ?

उत्तर : बांडगूळ स्वतःच प्रकाश-संश्लेषण क्रिया करू शकतो. 

(2) त्यांना पाणी व क्षार कोठून मिळतात?

उत्तर : प्रकाश-संश्लेषण क्रियेसाठी आवश्यक असलेली खनिजे आणि पाणी यांचा पुरवठा तो आधारक वनस्पतींकडून शोषून घेतो. त्यासाठी त्याच्यात विशेष अनुकूलित अवयव असतात.

(3) बांडगूळ वनस्पती ही अर्धपरजीवी वनस्पती म्हणून का ओळखली जाते ?

उत्तर : बांडगूळ पूर्णपणे आधारक वनस्पतीवर अवलंबून नसते. आधारक वृक्षाकडून खनिज व पाणी शोषून घेतल्यावर स्वत:चे अन्न ते स्वतः बनवू शकते म्हणून त्याला अर्धपरजीवी वनस्पती असे ओळखले जाते.

(4) घटप्णींमध्ये प्रकाश-संश्लेषण क्रिया होत असूनही ती कीटकभक्षण का करते ?

उत्तर : घटपणी वनस्पती ज्या मातीत वाढते तेथे नायट्रोजनची कमतरता असते. वाढीसाठी आणि प्रथिन- निर्मितीसाठी आवश्यक नायट्रोजन मातीतून मिळत नसल्याने घटपण्णी वनस्पती कीटकभक्षण करते.

(5) पिवळ्या, जांभळ्या तसेच तांबड्या रंगाच्या पानांमध्ये प्रकाश-संश्लेषण क्रिया कशी होते ? 

उत्तर : रंगीत वनस्पतींमध्ये कॅरोटीनॉइड, अन्थोसायॅनिन आणि झॅन्थोफिल अशा प्रकारची रंगद्रव्ये असतात. कॅरोटीनॉइड सूर्यप्रकाशातला हिरवा-निळा वर्ण शोषून घेतो. त्याच्याकडून जो प्रकाश परावर्तित होतो तो आपल्याला केशरी पिवळा भासतो. झॅन्थोफिलमुळेही पिवळा रंग येतो. अॅन्थोसायॅनिनमुळे वनस्पती जांभळ्या, तांबड्या रंगांच दिसतात. ही रंगद्रव्ये जरी असली, तरी त्या सर्व पानांत हरितद्रव्य-क्लोरोफिल असतेच. केवळ या रंगद्रव्यांचे प्रमाण जास्त असल्याने पाने हिरवी भासत नाहीत. प्रकाश-संश्लेषण क्लोरोफिलच्याच साहाय्याने होते. पण बाकीचं रंगद्रव्ये काही प्रमाणात सौर-ऊर्जा शोषून हरित द्रव्याच्या रेणूंना देतात.

(6) रासायनिक संश्लेषण म्हणजे काय ? कोणत्या वनस्पती या क्रियेतून अन्न तयार करतात ? 

उत्तर : (1) कार्बन डायऑक्साइड, मिथेन, हायड्रोजन, हायड्रोजन सल्फाइड अशा रासायनिक पदार्थांचा वापर  करून त्यांतून ऊर्जा घेऊन अन्ननिर्मिती करणे म्हणजे रासायनिक संश्लेषण होय.(2) कोणतीही स्वयंपोषी वनस्पती रासायनिक संश्लेषण करीत नाही. केवळ जीवाणू रासायनिक संश्लेषण करु शकतात. जिथे सूर्यप्रकाश पोहोचू शकत नाही तेथे अशा प्रकारचे जीवाणू अन्ननिर्मिती करीत असतात. जीवाणू वनस्पती नाहीत. ते वेगळ्या सजीव सृष्टीत समावेश केलेले आहेत.

October 11, 2020

स्वाध्यायमाला - प्रश्नोत्तरे | General Science |सामान्य विज्ञान - 3 - नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म

सामान्य विज्ञान - 3 - नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म 



(1) हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता हवेच्या आर्द्रता, प्रमाणे ठरते.

(2) पाण्याला स्वतःचा आकार नाही, परंतु निश्चित घनता वस्तुमान आहेत.

(3) पाणी गोठताना त्याचे आकारमान  वाढते 

(4) उदासीन  मृदेचा pH 7 असतो.

(5) वातावरणाचा दाब सर्व दिशांनी समान असतो

(6) हवेतल्या दाबात पडलेल्या फरकाचा परिणाम म्हणजे वाहणारे वारे होय.

प्रश्न  पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा. चुकीची विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा :

(1) रेताड मृदेची जलधारण क्षमता कमी असते.

बरोबर 

(2) समुद्राचे पाणी विजेचे दुर्वाहक आहे.

चूक  - समुद्राच्या पाण्यात वीजवाहकता असते.

(3) ज्या पदार्थात द्राव्य विरघळते त्याला द्रावक म्हणतात.

बरोबर

(4) हवेमुळे पडणाच्या दाबाला वातावरणीय दाब म्हणतात.

बरोबर

(5) समुद्रसपाटीला वातावरणाचा दाब हा सुमारे 101400 न्यूटन प्रतिचौरस मीटरइतका असतो.

बरोबर

जोड्या जुळवा 

1]  उत्तरे 

(1) हवा - प्रकाशाचे विकिरण

(2) पाणी - उत्सर्जन क्रिया

(3) मृदा- आकार्यता

2] उत्तरे

(1) आम्लयुक्त मृदा -  pH 6.5 पेक्षा कमी

(2) उदासीन मृदा    - pH 6.5 ते 7.5

(3) आम्लारिधर्मी  मृदा-   pH 7.5 पेक्षा जास्त

काय होईल ते सांगा 

प्र -  1] हवेतील बाष्याचे प्रमाण वाढले.

उत्तर : हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढले की वातावरणातील आर्द्रता वाढेल. अशी हवा दमट वाटते.

(2) जमिनीत सातत्याने एकच पीक घेतले.

उत्तर : जमिनीत सातत्याने एकच पीक घेतले तर जमिनीत असणारी पोषकद्रव्ये कमी होतील. पीक घेताना रासायनिक खते जास्त प्रमाणात वापरली असतील, तर जमिनीचा पोत बिघडेल. जमीन पेरणीयोग्य राहणार नाही. पीक योग्यरीत्या येणार नाही.

(3) रिकामी बाटली बूच न लावता उलटी करून पाण्याच्या पसरट भांड्यात तिरपी धरली.

उत्तर : बाटलीतली हवा बुडबुड्यांच्या स्वरूपात बाटलीतून बाहेर पडते.

(4) प्रकाशकिरण हवेतील सूक्ष्म कणांवर पडले.

उत्तर : हवेतील सूक्ष्म कण प्रकाशाचे विकिरण घडवून आणतात. प्रकाशकिरण त्यामुळे सर्व दिशेने विखुरतात


(1) डॅनिअल बनोलीने 1726 साली मांडलेले महत्त्वाचे तत्त्व कोणते?

उत्तर : डेनिअल बनोलीने 1726 साली मांडलेले महत्त्वाचे तत्त्व :

 (1) हवेचा वेग वाढला की तिचा दाब कमी होतो. (2) हवेचा वेग कमी झाला. तर दाब वाढतो. (3) एखादी वस्तू हवेमपून गतिमान जात असल्यास, त्या वस्तूच्या गतीच्या लंब दिशेला हवेचा दाव कमी होतो. त्यामुळे त्या वस्तूच्या आजूबाजूची हवा जास्त दावाकडून कमी दाबाकडे जोराने वाहू लागते.

(2) हवेमुळे प्रकाशाचे विकिरण कसे होते ?

उत्तर : (1) प्रकाशकिरणांचे सर्व दिशांना विखुरणे म्हणजे प्रकाशाचे विकिरण होय. (2) हवेमध्ये काही वायू तसेच धूळ, पूर व बाण्प यांच्या अतिसूक्ष्म कणांचे मिश्रण असते. (3) जेव्हा सूर्यांचे प्रकाशकिरण हवेतील या सूक्ष्म  कणावर पडतात, तेव्हा हा प्रकाश सर्व दिशांनी विखुरतो. अशा रितीने प्रकाशाचे विकिरण होते.

(3) ध्वनीच्या प्रसारणामध्ये हवेचे महत्त्व काय?

उत्तर : (1) ध्वनीचे प्रसारण होण्यासाठी हवेची माध्यम म्हणून आवश्यकता असते. (2) आपल्याला कानावर पडणारे सर्व आवाज भोवतालच्या हवेमुळेच आपण ऐकू शकतो. (3) हवेच्या माध्यमातूनच ते आपल्यापर्यंत येऊन पोहोचतात. (4) हवेचे माध्यम नसेल तर आपण ऐकूव शकणार नाही. म्हणून हवा हीच ध्वनीच्या प्रसारणासाठी महत्त्वाची आहे.

(4) बर्फ पाण्यावर तरंगताना का दिसतो?

उत्तर : पाणी गोठताना त्याचे द्रवातून स्थायुत अवस्थांतर होते. त्या वेळी पाण्याचे आकारमान वाढते व घनता कमी होते. घनरूप बर्फ होताना मूळच्या ट्रवरूप पाण्यापेक्षा हलका होतो. पाण्यापेक्षा बर्फ हलका असल्यामुळे बफ्फाचे खडे पाण्यावर तरंगतात.

(5) पाण्याने पूर्ण भरलेली काचेची बाटली कधीही फ्रीझरमध्ये का ठेवू नये ?

उत्तर : (1) बर्फ होत असताना पाण्याच्या असंगत वर्तनाप्रमाणे तो प्रसरण पावतो. (2) 4 C तापमानाच्या खाली तापमान गेल्यास पाण्याची घनता कमी होऊ लागते आणि आकारमान वाढू लागते. (3) फ्रीजरमध्ये 4 °C च्या खाली तापमान असल्यामुळे पाणी प्रसरण पावून बाटली फुटू शकते. (4) काचेची बाटली असल्याने तुटक्या काचांनी इजा होईल. म्हणून पाण्याने पूर्ण भरलेली काचेची बाटली कधीही फ्रीझरमध्ये ठेवू नये.

(6) पाण्याचे विविध गुणधर्म स्पष्ट करा.

उत्तर : पाण्याचे पुढील गुणधर्म आहेत

(1) प्रवाहिता : पाण्याला प्रवाहिता असल्यामुळे ते जलवाहतुकीसाठी उपयोगी ठरते. जनित्राच्या साहाय्याने वीजनिर्मिती करताना उंचावरून खाली पडणाच्या पाण्याच्या प्रवाहाचा वापर केला जातो. 

(2) उत्तम शीतक : तापलेल्या गाड्यांच्या रेडिएटर्सचे तापमान नियंत्रित करण्यासाठी पाणी वापरले जाते.

 (3) वैश्विक द्वावक : पाण्यात अनेक पदार्थ विरघळतात. म्हणून त्याला बैश्विक द्रावक असे म्हणतात.द्रावक म्हणून पाण्याचा अनेक ठिकाणी उपयोग होतो. उदा.., कारखाने, प्रयोगशाळा, अन्नपदार्थ शिजवताना.

(4) शरीराच्या अंतर्गत होणार्या अनेक जैविक प्रक्रिया. उदा., पचन, उत्सर्जन इत्यादी क्रिया पाण्यामुळेव शक्य होतात.

(5) स्वच्छक : आपल्या जीवनातील रोजची नैमित्तिक कामे पाण्याच्याच मदतीने होतात. अंघोळ करणे, कपडे धुणे, भांडी स्वच्छ करणे इत्यादींसाठी पाण्याचा स्वच्छक म्हणून उपयोग होतो.

(7) समुद्राच्या पाण्याची घनता पावसाच्या पाण्यापेक्षा जास्त का असते?

उत्तर : समुद्राच्या पाण्यात बरेच क्षार असतात. त्यामुळे त्या पाण्याची घनता जास्त असते.

(৪) चांगल्या मृदारचनेचे महत्त्व काय आहे ?

उत्तर : (1) मृदेच्या रचनेवर जमिनीचौ सुपीकता अवलंबून असते. चांगली मृदारचना असेल तर मुळांना पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा होतो. (2) अशा मृदेतून पाण्याचा निचरा चांगला होतो, त्यामुळे वनस्पतींच्या मुळांची योग्य वाढ होते.

(9) मृदेचे विविध उपयोग कोणते ?

उत्तर : मृदेचे उपयोग पुढीलप्रमाणे आहेत :

(1) वनस्पती संवर्धन : वनस्पतींच्या वाढीस मदत करणे.

(2) जलसंधारण मृदा पाणी धरून ठेवत असल्यामुळे आपल्याला बारा महिने पाणी मिळू शकते.

(3) आकार्यता मृदेला हवा तसा आकार देता येण्याच्या गुणधर्माला आकार्यता म्हणतात. या गुणधर्मामुळे मृदेपासून आपण विविध आकारांच्या मातीच्या वस्तू बनवू शकतो. या वस्तू भाजून टणक करता येतात. उदा., माठ, रांजण, पणत्या, मूर्ती, विटा.

(10) मृदापरीक्षणाची शेतकऱ्यांच्या दुष्टीने गरज व महत्त्व काय आहे?

उत्तर : (1) शेतकर्याला उत्तम पीक काढणे अपेक्षित असते. (2) मूदेचे परीक्षण केल्याने त्याला त्याच्या शेतजमिनीतील विविध घटकांचे प्रमाण लक्षात येते. (3) मृदापरीक्षण केल्यानंतर त्याला मृदेचा रंग, पोत तसेच त्यातील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण समजते. (4) मृदेमध्ये कोणत्या घटकांची कमतरता आहे व ती दूर कशी करावी याचे उपाय कोणते हे मृदापरीक्षणातून समजते. (5) मातीचा pH (सामू) आणि विदधुतवाहकता या दोन परीक्षणांचा शेतकऱ्याला विशेष उपयोग होतो.

(11) मृदेची सुपीकता कमी होण्याची कारणे कोणती?

उत्तर : मृदेची सुपीकता कमी होण्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत : (1) मृदेचा सामू आम्लयुक्त (pH 6 पेक्षा कमी) किंवा आम्लारिधर्मी (pH 8 पेक्षा जास्त) असणे. (2) सुपीकता आणणाच्या सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण कमी होणे. (3) जमिनीतील पाण्याचा निचरा न होणे. (4) पुन्हा पुन्हा एकच पीक घेणे. (5) खाऱ्या पाण्याचा सतत वापर करणे. (6) रासायनिक खते व कीटकनाशके यांचा अतिवापर करणे.

(12) तेलाने माखलेल्या ताटलीत थोडेसे पाणी ओतल्यानंतर ते पाणी ताटलीत न पसरता पाण्याचे अनेक छोटे छोटे गोलाकार थेंब तयार होतात. असे का होते ? 

उत्तर : तेलकट पृष्ठभागावर पडलेला पाण्याचा थेंब गोलाकार असतो. पाण्याचे रेणू एकमेकांना आकर्षित करून घेतात. मात्र ते तेलाच्या रेणूंपासून निराळे राहतात. त्यामुळे तेल आणि पाणी एकमेकांत मिसळत नाही. म्हणून तेलाने माखलेल्या ताटलीत थोडेसे पाणी ओतल्यानंतर पाणी ताटलीत न पसरता पाण्याचे अनेक छोटे छोटे गोलाकार थेंब तयार होतात.


प्रश्न - असे का म्हणतात? (शास्त्रीय कारणे दघा) :

1) हवा हे वेगवेगळ्या वायूंचे एकजिनसी मिश्रण आहे.

उत्तर : हवेत अनेक प्रकारचे वायू व इतर घटक आहेत. हे सर्व मिश्रणाच्या स्वरूपात एकत्र असतात.त्यांच्या एकट्याच्या अस्तित्वाची जाणीव होत नाही, म्हणून हवा है वेगवेगळया वायूंचे एकजिनसी मिश्रण आहे असे म्हटले जाते.

(2) पाण्याला वैश्विक द्रावक  म्हटले जाते.

उत्तर : पाण्यात अनेक प्रकारचे पदार्थ विरघळतात. म्हणून त्याला वैश्विक द्रावक म्हटले जाते.

(3) स्वच्छतेसाठी पाण्याशिवाय दुसरा पर्याव नाही.

उत्तर : पाण्यात अनेक पदार्थ विरधळ शकतात. अंधोळ करणे, कपडे व भांडी पुणे अशा कामांकरिता  पाण्याचा स्वच्छक म्हणून उपयोग करणे] सोपे जाते. पाण्यासारखा दुसरा स्वस्त सहज आणि सोपा पर्याय  स्वच्छतेसाठी नाही. म्हणून असे म्हणतात की स्वच्छतेसाठी पाण्याशिवाय दूसरा पर्याय नाही.

(4) सिरिंजचा बाहेर खेचलेला दटट्या सोडून दिला की तो लगेच आत ढकलला जातो.

उत्तर : ज्या वेळी सिरिंजचे छिद्र बंद करून आपण दट्ट्या खेचतो, तेव्हा सिरिंजमघल्या हवेला जास्त जागा उपलब्ध होते. त्यामुळे ती विरळ होते. सिरिंजमधल्या हवेना दाब अशा रितीने कमी होतो. बाहेरचा दाब मात्र तुलनेने खूप जास्त असल्यामुळे बाहेर खेचलेला दट्ट्या सोडून दिला की तो लगेच आत ढकलला जातो.

(5) पृथ्वीचा पृष्ठभाग उबदार राहतो.

उत्तर : सूर्याकडून पृथ्वीला जी ऊर्जा मिळते ती ऊर्जा उष्णतेच्या रूपात परत बाहेर, वातावरणात फेकली जाते. पृथ्वीभोवती असलेल्या वातावरणातील हवेत बाण्प आणि कार्बन डायऑक्साइड यांसारखे घटक या उष्णतेचा काही भाग शोषून घेतात. तो पृथ्वीवरच्या इतर घटकांना देतात. त्यामुळे पृथ्वीचा पृष्ठभाग उबदार राहतो, थंडी पडली की पहाटे दवबिंदु जास्त प्रमाणात दिसतात.

(6) थंडीत पहाटे दूरच्या आगगाडीचा आवाज स्पष्ट ऐकू येतो.

उत्तर : आपण सर्व आवाज भोवतालच्या हवेच्या माध्यमातून प्रसारित झाल्यामुळे आपण ते ऐकू शकतो. तापमानातील बदलामुळे हवेची घनता बदलते. थंडीमध्ये हवेची घनता वाढते. त्यामुळे आपल्याला ट्रचे आवाज स्पष्ट ऐकू येतात. म्हणून थंडीत पहाटे दूरच्या आगगाडीचा आवाज स्पष्ट ऐकू येतो.

प्रश्न , जरा होके चालवा :

(1) हवेचे तापमान वाढले की, त्याचा हवेच्या दाबावर काय परिणाम होतो ? 

उत्तर : कोणतीही हवा एखादया बंदिस्त जागेत असेल, तर तापमान वाढवल्यावर त्यातील दाब देखील वाढेल. वाढलेल्या तापमानामुळे या हवेतील निरनिराळे घटक रेणू जोराने कंप पावतात. त्यामुळे त्यांच्याकरवी हाच दाब वाढतो. मात्र हवा बंदिस्त नसेल, तर जसजसे हवेचे तापमान वाढेल, तसतशी हवा वातावरणाच्या वरच्या थरालासरकेल यामुळे हवेचा दाब कमी होईल.

(2) उन्हाळ्यात ओले कपड़े चटकन वाळतात. पण पावसाळ्यात मात्र ते लवकर बाळत नाहीत. असे का घडते ? 

उत्तर : पावसाळ्यात हवेची आर्द्रता जास्त असते. हवेत आधीच जास्त प्रमाणात ओल्या कपड्यातले बाष्प, बाष्पीभवन होऊन लवकर जात नाही. ओले कपड़े त्यामुळे वाळत नाहीत. उन्हाळ्यात तापमान जास्त असते. हवेची आर्द्रता पण कमी असते. कोरड्या हवेमुळे कपड़े लवकर वाळतात.

(3) आपल्या अवतीभोवतीची सर्व हवा जर काढून टाकली, तर काय होईल?

उत्तर : सजीव हवेवाचून जगू शकणार नाहीत. श्वसन, ज्वलन इत्यादी प्रक्रिया बंद पडतील ध्वनी  प्रसारण, उष्णता,आर्द्रता  अशा बाबी घडणार नाहीत. पृथ्वीवर ऋतू निर्माण होणार नाहीत आणि पाऊसही पडणार नाही. त्यामुळे पाणी नाहीसे होईल. हवेशिवाय सर्व जीवनच नष्ट होईल.

(4) अवकाशात आवाज ऐकू येईल का? 

उत्तर : सर्व प्रकारचे आवाज भोवतालच्या हवेमुळेच आपण ऐकू शकतो. हवा हे ध्वनी प्रसारणाचे माध्यम आहे. अवकाशात हवेचे माध्यम नसल्याने आवाज ऐकू येणार नाही.

(5) अतिथंड प्रदेशात नदी, तलाव गोठल्यावरही जलचर जिवंत का राहू शकतात?

उत्तर : पाण्याच्या असंगत वर्तनामुळे नदी, तलाव वरगरे केवळ वरच्या थरातच गोठतात. अतिथंड प्रदेशात तापमान खूप कमी असते, ते शून्याच्या खाली देखील जाते. अशा वेळी जलाशयाच्या वरच्या थरातले पाणी थंड होत जाते. पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान जेव्हा 4°C पेक्षा कमी होते, तेव्हा त्याची घनता कमाल होते. या जास्त घनतेमुळे पाणी खालच्या थराकडे सरकू लागते. त्यामुळे खालच्या थरातले पाणी वरच्या बाजूला सरकते. हे पाणी पुन्हा 4 °C या तापमानाला जाते व पुन्हा जास्त घनतेचे झाल्यामुळे खाली उतरते. जसे तापमान आणखी उतरते तसे जलाशयाचा वरचा पृष्ठभाग 0°C तापमानाला जातो. अशा अवस्थेत पृष्ठभाग गोठतो मात्र खालच्या थराचे पाणी 4°C तापमानालाच द्रवरूपात राहत असल्याने तेथे जलचर सुरक्षित राहतात. पृष्ठभागावरचा बर्फाचा थर असल्याने बाहेरची थंड हवा जलाशयाच्या खालच्या थरात पोहोचत नाही.

(6) चिकण मृदेला 'मशागतीला जड' मृदा असे का म्हणतात? 

उत्तर : चिकण मृदेमध्ये सूक्ष्म कणांचे प्रमाण सर्वांत जास्त असते. त्या कणांना स्पर्श केला तर ते हाताला चिकटून बसतात. या मातीत जरुरीपेक्षा जास्त पाणी अडकून राहते. त्यामुळे चिकण मृदा 'मशागतीला जड' मृद ठरते.

(7) रेताड मृदेला 'मशागतीला हलकी' मृदा असे का म्हणतात? 

उत्तर : रेताड मृदेत वाळूचे आणि मोठ्या कणांचे प्रमाण सर्वांत अधिक असते. त्यामुळे पाण्याचा येथून जलद निचरा होतो. मातीचे कण पाण्यात विरघळत नाहीत. अशा मातीचे थर वरखाली करणे कठीण पडत नाही.त्यामुळे सहज मशागत करता येते. म्हणून रेताड मृदेला 'मशागतीला हलकी' मृदा असे म्हणतात.

(৪) पोयटा मृदेची जलधारण क्षमता कशी असते? 

उत्तर : पोयटा मृदा मध्यम आकाराच्या करणांची असते. याची जलधारण क्षमता जास्त असते. गाळाची मृदा' असेही म्हणतात. पोयटा आणि चिकण मातीच्या मिश्रणात जास्त जलधारण क्षमता असते. 

(9) कोणती मृदा पिकांसाठी योग्य आहे ? का

उत्तर : चिकण मृदा, थोडी रेताड मृदा आणि पोयटा यांचे योग्य मिश्रण शेतीसाठी चांगले ठरते. चिकण मुदा चांगल्या जलधारण क्षमतेची असते. पोयटा मृदेत अन्नद्रव्ये मुबलक प्रमाणात असतात याच मृदेत सेंद्रिय पदार्थ जास्त प्रमाणात मिसळले की त्याची सूपीकता अधिक वाढते.


Saturday, 3 October 2020

October 03, 2020

स्वाध्यायमाला प्रश्नोत्तरे -7 वी सामान्य विज्ञान 2 - वनस्पती रचना व कार्ये

वनस्पती रचना व कार्ये 

 प्रश्न 1. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा :

(1) बीच्या आतून जमिनोच्या दिशेने वाढणाऱ्या भागास आदिमूळ  म्हणतात.

(2) मुळांच्या टोकांच्या भागांवर मूलरोम  हे केसासारखे धागे असतात.

(3) एकदल वनस्पतीमध्ये  तंतूमय मुळे असतात.

(4) खोडाच्या दोन पेरांतील अंतराला कांडे  म्हणतात.

(5) पानाचया पसरट भागाला  पर्णपत्र,  म्हणतात, तर पुढच्या टोकाला पणाग्र म्हणतात.

(6) कळी अवस्थेत पाकळया हिरव्या रंगाच्या पानासारख्या निदलपुंज. या आवरणाने झाकलेल्या असतात.

प्रश्न . पुढील वाक्ये चूक आहे  की बरोबर ते लिहा. चुकीची विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा :

(1) जमिनीच्या वर वाढणाऱ्या भागास आदिमूळ म्हणतात.

 चूक. (जमिनीच्या वर वाढणाऱ्या भागास अंकुर म्हणतात.)

(2) खोडापासून फुटणाऱ्या तंतूसारख्या मुळांना तंतुमय मुळे म्हणतात.

बरोबर. 

(3) गाजर व मुळा ही रूपांतरित खोडे आहेत.

चूक. (गाजर मुळा ही रूपांतरित मुळे आहेत.)

(4) एकच पर्णपत्र असून एकच मध्यशीर असणाऱ्या पानांना संयुक्त पान म्हणतात.

चूक. (एकच पर्णपत्र असून एकच मध्यशीर असणाऱ्या पानांना साधे पाন म्हणतात.) 

(5) अंडाशयातील बोजांडांचे फलन होऊन त्याचे रूपांतर फळात होते.

 चूक. (अंडाशयातील बोजांडांचे फलन होऊन त्याचे रूपांतर बीमध्ये होते.)


प्रश्न-  प्रत्येक गुणधर्माचे एक पान शोधून वनस्पतीचे वर्णन लिहा

गुळगुळीत पृष्ठभाग, खडबडीत पृष्ठभाग, मांसल पर्णपत्र, पर्णपत्रावर काटे.

उत्तर : (1) गुळगुळीत पृष्ठ भाग : केळ केळीच्या झाडाला गुळगुळीत पाने असतात. केळीचे झाड हे जगातली सर्वांत मोठी मांसल खोड असलेली सपुष्प वनस्पती आहे. केळीचे झाड कंदापासून निर्माण होते. याचे खोड छदमखोड असते. खरे खोड नसते. पानांचेच तळ रुंद होऊन एकमेकांभोवती घट्टपणे गुंडाळले जातात.याला आपण केळीचे खांब असेही म्हणतो. केळीची पाने मऊ, गुळगुळीत आणि मोठी असतात. त्यांचा उपयोग जेवणासाठी पण केला जातो. केळीच्या झाडाला फूल येते, त्याला केळफूल म्हणतात. केळफुलापासूनच केळयाचे घड मिळतात. एका घडात साधारणपणे 20 पर्यंत केळी असतात.

2) खडबडीत पृष्ठभाग : पारिजातक - पारिजातकाचे पान खडबडीत असते. पारिजातक/प्राजक्त हे छोटे झुडूप आहे. 10 मीटरपर्यंत वाढणाऱ्या या झाडाला लालचुटुक देठाची पांढरी शुभ्र फुले येतात. सकाळी पारिजातकाच्या झाडाखाली अशा फुलांचा सडा पडलेला दिसतो. याची पाने खरखरीत व खडबडीत दिसतात. परंतु यात खूप औषधी गुणधर्म आहेत. आयुर्वेदिक आणि होमिओपथिक औषधांत प्राजक्ताच्या पानांचा वापर केला जातो. पारिजातकाच्या झाडाबद्दल पुराणात अनेक आख्यायिका आहेत. इंग्रज मात्र याला दुःखी झाड किंवा दु:खाचे झाड म्हणतात याची फुले सूर्य उगवल्यावर सुकत जातात.

3) मांसल पर्णपत्र : जलपर्णी- जलपरणींची पाने मांसल असतात. जलपर्णी ही पाण्यात वाढणारी आणि पाण्यावर तरंगणारी वनस्पती आहे. त्याचे खोडदेखील फुगीर आणि हिरवे असते. या वनस्पतीला वर्षभर निळया रंगाची फुले येतात. एका वर्षात एक वनस्पती तीन हजारांहन अधिक वियांची निर्मिती करू शकते. तिचा प्रसार झपाट्याने होतो आणि तिचे नियंत्रण करावे लागते. जलपणींच्या अनियंत्रित वाढीमुळे माशांना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या वाढीवर, जलपरिसंस्थेवर आणि जैवविविधतेवर विपरीत परिणाम होतो.पाणवठ्याचा नाश होतो. याला जलाचे समृद्धीकरण असेही म्हणतात.1

4) पर्णपत्रावर काटे : केवडा - केवड्याच्या पर्णपत्रावर काटे असतात. केवड्याची वनस्पती साधारणपणे  1 मीटर उंचीचे छोटे झुडूपच असते. याचे खोड मजबूत आणि मध्यम आकाराचे असते. झाडाच्या वरच्या टोकाला पानाचा मुकुट असल्यासारखा भासतो. केवडयाची सुगंधी पाने स्त्रिया केसात माळतात. स्त्री-पुष्प आणि नर-पुष्प निरनिराळ्या झाडांवर येतात.

प्रश्न  पुढील प्रश्नांची उत्लरे लिहा

(1) वनस्पतींच्या अवयवांची कार्य स्पष्ट करा.

उत्तर : (1) मूळ, खोड, पाने, फुले, फळे हे बनस्पतींचे निरनिराळे अवयव आहेत.

(2) मुळांची कार्ये : (अ) बनस्पतीला मातीत घट्ट रोबून आधार देणे. (ब) मातीतील पाणी व क्षार यांचे

शोषण करणे. (क) काही मूळे रूपांतरित होतात. यांच्याकरवी श्वसन, प्रजनन, अन्नसंचय, आधार देणे कार्ये केली जातात.

3) खोडांची कार्ये (अ) पर्णसंभार पकन ठेवणे. (ब) निवडुंगाचे खोड प्रकाश-संश्लेषण काते.

(क) रुपांतरित खोडे अन्नसंचय, प्रजनन, आधार देणे अशी कार्ये करतात. ( ड) मुळांनी शोषलेले पाणी आणि

पानांत तयार झालेले अन्न बनस्पतीच्या इतर भागांना पोहोचवणे.

(4) पानांची कार्ये (अ) प्रकाश-संश्लेषण करुन अन्ननिर्मिती (ब) बाश्पोत्सर्जन (क) रूपांतरित पाने प्रजनन, अन्नसंचय, आधार देणे अशी कार्ये करतात.

फुलांची कार्ये प्रजनन किंया पुनरुत्पादन करणे.

(फळांची कार्ये : अन्नसंचय करणे आणि बीजाचे संरक्षण करणे.

2) सोटमुळाची रचना स्पष्ट करा.

उत्तर : (1) सोटमूळ हे द्विदल वनस्पतीतील मुख्य मूळ असते. ते आदिमुळापासून तयार होते. (2) या

सोटमुळाला जमिनीमध्ये उपमुळे फुटतात. (3) उपमुळे तिरपी वाढून जमिनीत दूरवर पसरतात. त्यामुळे झाडाला

आधार मिळतो. (4) सोटमुळांच्या टोकांच्या भागांवर मूलरोम हे केसांसारखे धागे असतात. यातून पाणी व क्षार यांवच शोषण होते. (5) मुळाच्या टोकाला मूलटोपी असते. टोकाकडचा भाग नाजूक असल्याने त्याला इजा होऊ नये यासाठी मूलटोपीचा उपयोग होतो.

(3) मुळाचे विविध प्रकार लिहा.

उत्तर : (1) सोटमूळ व तंतुमय मूळ है मुळांचे दोन प्रमुख प्रकार आहेत. (2) सोटमूळ द्विदल वनस्पतीमध्ये असते, तर एकदल वनस्पतींमध्ये तंतुमय मुळे असतात. (3) काही विशिष्ट कार्य करण्यासाठी मुळांत रूपांतर होते. अशा मुळांना रूपांतरित मुळे म्हणतात हवाई मुळे, आपार मुळे, पावती मुळे, श्वसन मुळे ही रूपांतरित मुळे आहेत. (4) काही कनस्पतोंत जमिनीच्या वरील खोडांपासून मुळे फुटतात. यांना आगंतुक मुळे असे म्हणतात.

(4) खोडाचे विविध भाग कोणते?

उत्तर : (1) खोडावर जेथून पाने फुटतात त्याला पेरे म्हणतात. (2) खोडाच्या दोन पेरांतील अंतराला कांडे म्हणतात. (3) खोडाच्या अग्रभागावर मुकुल असतो. (4) जिथे फांदधा फुटतात, तेथे देखील मुकुल असतात.

(5) पानाच्या विविध भागांचे वर्णन करा.

उत्तर : (1) बहतेक बनस्पतौंची पाने हिरव्या रंगाची असतात. (2) पानाचा पसरट भाग म्हणजे पर्णपत्र आणि पर्णपत्राची कडा म्हणजे पर्णधारा होय. पर्णपारा निरनिराळया प्रकारच्या असतात. जसे, सलग, खंडित किंवा दंतेरी) पर्णपत्राचे पुढचे टोक म्हणजे पर्नाग्र होय. याचे मुख्यतः निमुळते. रोकदार व गोलाकार असे प्रकार आहेत. (4) काही पानांना देठ असतात, तर काही पाने देठाशिवाय असतात. 

शिराविन्यास म्हणजे काय? त्याचे उदाहरणासहित प्रकार लिहा.

उत्तर : (1) पानांमध्ये असण्याच्या शिरांची रचना म्हणजे शिराविन्यास होय. जाळीदार शिराविन्यास आणि
समांतर शिराविन्यास असे दोन मुख्य प्रकार आहेत. (2) जेव्हा पर्णपत्राच्या मधोमघ एक जाड शीर असते आणि
या शिरेस उपशिरा फुटून त्याचे जाळे तयार होते, त्यास जाळीदार शिराविन्यास म्हणतात. (3) मध्यशिरेमुळे मुख्य पर्णपत्र दोन भागांत विभागल्यासारखे दिसते. (4) पानातील सर्व शिरा या पर्णपत्राच्या खोडाला चिकटलेल्या
भागापासून ते टोकाकडे अशा एकमेकांस समांतर जातात, तेव्हा त्यास समांतर शिराविन्यास असे म्हणतात.
(5) उदाहरणे : जाळीदार शिराविन्यास-द्विदल वनस्पती पिंपळ, जास्वंद. समांतर शिराविन्यास-एकदल वनस्पती मका, गह, इत्यादी.

पानांच्या मांडणीनुसार आणि पर्णपत्रांच्या आकारानुसार त्यांचे प्रकार कोणते ?
उत्तर : पानांच्या मांडणीनुसार एकांतरित, आवर्ती, संमुख आणि वर्तुळाकार असे प्रकार आहेत. पानांच्या
आकारानुसार गोलाकार, हस्ताकार, तरफदार आणि लंबाकार असे प्रकार आहेत.


चिंच, आंबा या वनस्पतींची मुळे तंतुमय असती, तर काय झाले असते?
उत्तर : चिंच आणि आंबा हे मोठे वृक्ष आहेत. त्यांना आधार देणारी मुळेसुद्घा तितकीच भक्कम पाहिजेत.
जर या वृक्षांची मुळे तंतुमय असती, तर ते उन्मळून पडले असते
.
मुळांच्या टोकाला इजा झाली तर काय होईल ?
उत्तर : मुळांच्या टोकाला इजा झाली तर झाडाची वाढ खुंटेल. सुरुवातीच्या काळात झाड तग धरेल परंतु
इजा झालेल्या मुळातून पाणी आणि अन्न यांचे आवश्यक तितके शोषण न झाल्याने झाड कमकुवत होईल.
आधारही व्यवस्थित न मिळाल्याने थोडयाच दिवसांत झाड मरेल.

मेथी, पालक, कांदा या वनस्पतींची मुळे कोणत्या प्रकारची आहेत ?
उत्तर : मेथीमध्ये सोटमूळ असते. परंतु हे खोलवर जात नाही. पालकाचेही सोटमूळ असते; परंतु पालकाच्या
मुळांना खूप उपशाखा फुटतात. त्या मुळांच्या काही शाखा आडव्याही पसरतात. कांदघाला तंतुमय मुळे असतात.
त्यांच्या रूपांतरित चकतीवजा खोडातून ती फुटतात.
फुलांवर भिरभिरणाऱ्या फुलपाखरांचा वनस्पतींना कोणता उपयोग होतो ? 
उत्तर : फुलपाखरे परागीभवन करतात. एका फुलापासून दुसऱ्या फुलापर्यंत परागकण वाहन नेण्याचे कार्य करते

Tuesday, 29 September 2020

September 29, 2020

स्वाध्यायमाला प्रश्नोत्तरे -7 वी सामान्य विज्ञान सजीव सृष्टी अनुकूलन व वर्गीकरण

स्वाध्याय- सजीव सृष्टी अनुकूलन व वर्गीकरण

प्रश्न- परिच्छेद वाचा व पूढे दिलेल्या प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा :

1) मी पेंग्विन , बर्फाळ प्रदेशात राहतो. माझ्या शरीराची पोटाकडची बाजू ही रंगाने पांढरी आहे. माझी त्वचा ही जाड आहे व त्वचेखाली चरबीचे आवरण आहे. माझे शरीर दोन्ही टोकांना निमुळते झालेले आहे. माझे पंख आकाराने लहान आहेत. माझी बोटे ही पातळ त्वचेने एकमेकांना जोडलेली आहेत. आम्ही नेहमी थव्याने राहतो.


प्रश्न (1) माझी त्वचा जाड, पांढऱ्या रंगाची व त्याखाली चरबीचे आवरण कशासाठी असावे?

उत्तर : पेंग्विन हा थंड हिमप्रदेशात राहतो. तेथे सतत हिमाचे आवरण असते. शरीराचे तापमान टिकावे यासाठी पेंग्विनमध्ये जाड त्वचा असून त्याखाली चरबीचे आवरण असते. पांढऱ्या रंगामुळे तो आजूबाजूच्या हिमात मिसळून जातो व चटकन दृष्टीस पडत नाही. त्यामुळे तो भक्षकापासून संरक्षण मिळवतो.

प्रश्न (2) आम्ही नेहमी थव्याने एकमेकांना चिकटून का राहतो ?

उत्तर : 

नेहमी एकत्र राहिल्यामुळे भक्षकापासून संरक्षण मिळते. पिल्लांची काळजी घेणे सोपे जाते . एकमेकांना चिकटल्यामुळे थंडी-वाऱ्यापासून ऊब मिळते.

प्रश्न (3) ध्रुवीय प्रदेशात कायमस्वरूपी वास्तव्य करण्यासाठी तुमच्यामध्ये कोणते अनुकूलन हवे आणि का?

उत्तर : ध्रुवीय प्रदेशात कायमस्वरूपी वास्तव्य करण्यासाठी शीत तापमानात राहणे व जगणे जमले पाहिजे.त्यासाठी शरीरावर जाड त्वचा, चरबीचा जाड थर किंवा लव, केस यांचा जाड थर असला पाहिजे.

प्रश्न (4) मी कोणत्या भौगोलिक प्रदेशात राहतो ? का?

उत्तर : मी ध्रुवीय प्रदेशात राहतो. माझे खाद्य भरपूर प्रमाणात इथे मिळते म्हणून विशेष करून अंटाटिका 

खंडातच जास्त प्रमाणात माझे वास्तव्य आहे.

प्रश्न 5. पुढील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा :

१]   निवडुंग, बाभूळ व इतर वाळवंटी वनस्पती कमी पाण्याच्या प्रदेशांत सहज का जगू शकतात ?

उत्तर : निवडुंग, बाभूळ व इतर वाळवंटी वनस्पतींत कमी पाण्याच्या प्रदेशात राहण्यासाठी अनुकूलन

झालेली असतात. ही अनुकूलने पूढीलप्रमाणे आहेत :

 (1) त्यांना पाने नसतात किंवा ती खूप बारीक असतात.पानांचे रूपांतर काट्यांत झालेले असते. 

(2) यामुळे पानांवाटे शरीरातले बाष्प बाहेर जात नाही. 

(3) खोडसुद्धा अन्न आणि पाणी साठवते आणि मांसल बनते. त्यावर मेणचट पदार्थाचा जाड थर असतो. 

(4) प्रकाश-संश्लेषणाचे कार्य खोडावाटे चालते. 

(5) मुळे पाण्याच्या शोधात खूप खोलवर जमिनीत जातात.

(2) हिमप्रदेशामधील वनस्पतींमध्ये कोणकोणती अनुकूलने दिसून येतात ?

उत्तर : (1) हिमप्रदेशात सूचिपणी वृक्ष असतात. 

(2) या वृक्षांचा आकार शंकूसारखा असतो. 

(3) त्यांच्या फांदघांची रचना उतरती असते. त्यामुळे हिम घसरून जाते.

 (4) या वृक्षांच्या साली जाड असतात.

(3) नायट्रोजनची कमतरता असलेल्या जमिनीत कोणत्या वनस्पती आढळून येतात ? का?

उत्तर : (1) नायट्रोजनची कमतरता असलेल्या जमिनीत कीटकभक्षी वनस्पती आढळून येतात.

 (2) वनस्पतींच्या वाढीसाठी काही घटकांची आवश्यकता असते. उदा., नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅशिअम. 

(3) याकरिता घटपणीं,व्हीनस फ्लायट्रॅप, ड्रॉसेरा या कीटकांचे भक्षण करुन आपली नायट्रोजनची गरज भागवतात.


(4) बेडकात अनुकूलन कशा प्रकारे झालेले आहे ? त्याला उभयचर का म्हणतात ?

उत्तर : (1) बेडूक पाण्यात, तसेच जमिनीवर राहू शकतो. 

(2) पाण्यात असताना पोहण्यासाठी पायांच्या बोटांतील पडदे, बुळबुळीत त्वचा आणि त्रिकोणी डोके ही अनुकूलने उपयोगी पडतात. 

(3) त्याच्या पाठीवरील रंगामुळे त्याला गवतात लपता येते. 

(4) जमिनीवर तो शक्तिशाली मागच्या पायांनी लांबवर उड्या मारू शकतो.तसेच लांब जिभेने कीटक पकडतो. 

(5) बेडूक पाण्यात असताना त्वचेच्या साहाय्याने श्वसन करतो. जमिनीवर असताना नाकाद्वारे आणि फुप्फुसांच्या साहाय्याने श्वसन करतो. त्यामुळे त्याला उभयचर असे म्हणतात.

(5) उंटाला वाळवंटातील जहाज' का म्हणतात?

उत्तर : (1) उंटाची त्वचा जाड असते. 

(2) त्याचे पाय लांब व तळवे गादीसारखे व पसरट असतात.

(3) नाकावर त्वचेची घडी असते, त्यामुळे गरम हवेपासून त्याचे संरक्षण होते. 

(4) लांब व जाड पापण्या डोळ्यांचे संरक्षण करतात. 

(5) त्याच्या पाठीवरच्या कुबडात मेद साठवलेला असल्याने तो पाण्याशिवाय बराच काळ राहू शकतो. 

(6) या सर्व अनुकूलनांमुळे उंट वाळवंटातून चालू शकतो. वाळवंटात वाहतूक करण्यासाठी तोच चांगला पर्याय आहे. म्हणून उंटाला 'वाळवंटातील जहाज' असे म्हणतात.

(6 ) सजीवांचे वर्गीकरण कसे केले जाते ?

उत्तर : 

(1) वेगवेगळ्या गुणघर्मांचे निकष लावून वनस्पतींचे व प्राण्यांचे स्वतंत्रपणे वर्गीकरण केले जाते.

(2) यासाठी त्यांच्या शरीररचनेचा सखोल अभ्यास केला जातो. 

(3) सजीवांच्या गुणधर्मातील ठळक आणि मूलभूत साम्य व भेद यांच्या आधारे त्यांचे ठळक गट तयार केले जातात. 

(4) सजीवांतील साम्य व भेद लक्षात घेऊन वर्गीकरणाची एक उतरंड बनवली जाते. यालाच 'वर्गीकरणाचा पदानुक्रम' म्हणतात. अशा रितीने सजीवांचे वर्गीकरण केले जाते.


प्रश्न . पुढील विधाने वाचून त्याआधारे अनुकूलन संदर्भात परिच्छेद लेखन करा :

(1) वाळवंटात खूप उष्णता आहे.

उत्तर : खूप उष्णता असलेल्या ठिकाणी टिकाव धरून राहण्यासाठी तेथील सजीवांच्या शरीरक्रियेत आणि

शरीररचनेत त्याप्रमाणे अनुकूलन झालेले असते. येथे उंटासारखा प्राणी राहू शकतो. उंदीर, साप. कोळी, सरडे

असे प्राणी बिळे करून त्यात राहतात. त्यामुळे इथल्या उष्णतेच्या तडाख्यापासून ते सुरक्षित राहतात. येथे

निवडुंगासारख्या वनस्पती आहेत. त्यांची मुळे जमिनीत खोलवर जाऊन पाण्याचा शोध घेतात. रेताड आणि

रखरखीत प्रदेशांतही नेमक्याच वनस्पती आणि प्राणी वास्तव्य करून आहेत.

(2) गवताळ प्रदेश हिरवागार असतो.

उत्तर : गवताळ प्रदेशात पाण्याचे प्रमाण मुबलक असते. त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणावर खुरटी झुडपे व गवताचे विविप प्रकार आढळून येतात. गवताच्या तंतुभय मुळांमुळे जमिनोची पूप होत नाही. पाणी आणि योग्य सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे विषुववृत्तीय प्रदेशातील गवत खूप उंच असते. थंड प्रदेशात उंचीने खुजे गवत दिसते. डोंगरउतारावर, पठारी व मेदानी प्रदेशांत मोठ्या प्रमाणावर कुरणे आढळतात. हा सगळा प्रदेश गवतामुळे हिरवागार असतो.

(3) कीटक जास्त प्रमाणात आढळतात.

उत्तर : कीटक वर्गातौल प्राणी कोणत्याही परिस्थितीला चांगल्या प्रकारे अनुकूलित झालेले असतात. काही कीटक हवेत उडू शकतात. त्यांच्यात तशी अनुकूलने झालेली आहेत. उदा., हलके शरीर, पंखांच्या दोन जोड्या इत्यादी. पाण्यावर आणि पाण्यात राहणारे कीटकही त्याप्रमाणे अनुकूलित असतात. आपल्या रंगसाधम्यने ते परिसरात मिसळून जातात. त्यांची प्रजननक्षमता देखोल जास्त असते. कीटक म्हणूनच जास्त प्रमाणात आढळतात.

(4) आम्ही लपून बसतो.

उत्तर : लपून राहणाऱ्या प्राण्यांपैकी आम्ही काही दुबळे प्राणी आहोत, म्हणून भक्षकापासून संरक्षण होण्यासाठी आम्ही लपून राहतो. त्यासाठी आमच्या शरीरावरचे रंगकाम आजूबाजूच्या परिसराशी मिळतेजुळते असते. तर दूसरे स्वतःच भक्षक असतात. जसा सरडा, कॅमेलियॉन वगैरे परिसराशी साधम्म्य बाळगून स्वतः दिसेनासे होतात. पण नेमके भक्ष्य पकडण्यासाठीं झेप घालतात.

(5) आमचे कान लांब असतात.

उत्तर :  आम्ही शाकाहारी प्राणी आहोत. कधीही आमच्यावर एखादा मांसाहारी भक्षक उडी घालून आम्हांला ठार करू शकतो. त्यामुळे आम्ही नेहमी कानोसा घेत असतो. आम्ही आमचे लांब कान इकडे-तिकडे वळवून आम्ही दूरवरच्या आवाजाचा वेध घेतो. कसल्याही धोक्याची जाणीव झाली की आम्ही कळपाने तेथून पळ काढतो.