स्वाध्याय - इयत्ता सातवी - सामान्य विज्ञान-भौतिक राशींचे मापन
प्रश्न 1. रिकाम्या जागा भरा :
(1) भौतिक राशींचे परिमाण सांगण्यासाठी .मूल्य, व एकक यांचा वापर करतात.
(2) वस्तुमानावर जेवढे गुरुत्वीय बल कार्य करते, त्याला वजन असे म्हणतात.
(3) चाल ही राशी.अंतर, आणि काळ या राशींचे गुणोत्तर आहे.
(4) .पायाभूत राशींचे प्रमाण कधीही बदलते असता कामा नये.
(5) सात पायाभूत राशींवर आधारित अशी एककांची आंतरराष्ट्रीय पद्धती, System
International (SI). सध्या जगभरात वापरली जाते.
प्रश्न 2. एक चुकीचा शब्द असलेली काही विधाने दिलेली आहेत. हा शब्द बदलून विधाने दुरुस्त करा :
(1) लांबी ही सदिश राशी आहे.
(2) पदार्थातील द्रव्यसंचयाला आकारमान म्हणतात.
(3) वस्तुमान ही सदिश राशी आहे, तर वजन ही अदिश राशी आहे.
(4) एमकेएस (MKS) या मापन पद्धतीत लांबी सेंटिमीटरमध्ये, वस्तुमान ग्रॅममध्ये व काळ (वेळ) सेकंदांत
मोजतात.
(5) लोह आणि अल्युमिनिअम संमिश्राचा एक भरीव दंडगोल पॅरिस येथील आंतरराष्ट्रीय वजनमाप संस्थेमध्ये
ठेवला आहे.
(6) इजिप्तमध्ये माणसाच्या कोपरापासून मधल्या बोटाच्या टोकापर्यंतच्या अंतरास 'वीत' असे म्हणत असत.
उत्तरे : (1) रस्त्याची लांबी ही अदिश राशी आहे.
(2) पदार्थातील द्रव्यसंचयाला वस्तुमान म्हणतात.
(3) वस्तुमान ही अदिश राशी आहे, तर वजन ही सदिश राशी आहे.
(4) एमकेएस (MKS)
या मापन पद्धतीत लांबी मीटरमध्ये, वस्तुमान किलोग्रॅममध्ये व काळ (वेळ) सेकंदांत
मोजतात.
(5) प्लॅटिनम-इरिडियम संमिश्राचा एक भरीव दंडगोल पॅरिस येथील आंतरराष्ट्रीय वजनमाप संस्थेमध्ये ठेवला आहे.
(6) इजिप्तमध्ये माणसाच्या कोपरापासून मधल्या बोटाच्या टोकापर्यंतच्या अंतरास 'क्युबिट' असे म्हणत असत.
📋सरावासाठी ऑनलाईन टेस्ट
📚 इयत्ता - 4 थी
*भाषा,गणित,इंग्रजी, परि सर अभ्यास*
*https://www.studyfromhomes.com/p/blog-page_28.html*
प्रश्न 3. सांगा लावू मी कोणाशी जोडी ? (जोड्या लावा.)
(1)
(1) वेग - मीटर/सेकंद
(2) क्षेत्रफळ - चौरस मीटर
(3) आकारमान - लीटर
(4) वस्तुमान - किलोग्रॅम
(5) घनता - किलोग्रॅम / घनमीटर
(2)
(1) एमकेएस - किलोग्रॅम
(2) विस्थापन - सदिश राशी
(3) हात - अंदाजे माप
(4) मीटर - प्रमाणित माप
(5) काळ - पायाभूत राशी
'
4. उदाहरणांसहित स्पष्ट करा :
(1) अदिश राशी.
उत्तर : अदिश राशी केवळ परिमाणाच्या साहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येते. उदाहरणार्थ, लांबी, वस्तुमान,
क्षेत्रफळ, तापमान, घनता, कालावधी, कार्य इत्यादीचा राशी व्यक्त करण्यासाठी केवळ परिमाणाचा म्हणजेच मूल्य
व एककाचा वापर होतो. यात दिशेचा अंतर्भाव नसतो.
(2) सदिश राशी.
उत्तर : सदिश राशी या परिमाण व दिशा यांच्या साहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येतात. विस्थापन, वेग
या सदिश राशी आहेत.
उदाहरणार्थ, (1) (i) उत्तर दिशेस 20 किलोमीटर विस्थापन व (ii) पूर्व दिशेस 20 किलोमीटर विस्थापन यांत
फरक आहे. येथे अंतर समान आहे पण भाग (ii) मध्ये विस्थापानाची दिशा वेगळी आहे.
(2) (i) आकाशात दक्षिणेकडे 500 किमी प्रतितास वेगाने चाललेले विमान व आकाशात पूर्वेकडे 500 किमी प्रतितास
वेगाने चाललेले विमान यात फरक आहे. येथे चाल समान आहे परंतु भाग (ii) मध्ये गतीची दिशा वेगळी आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
💥महात्मा ज्योतिबा फुले
https://mystudyfromhomes.in/our-idials-jyotiba-phule/
*💥 राजर्षी शाहू महाराज*
https://mystudyfromhomes.in/our-ideals-rajarshi-shahu-maharaj/
*💥लोकमान्य टिळक*
https://mystudyfromhomes.in/our-ideals-lokmanya-tilak/
*🌀 9 th English Test*
*https://mystudyfromhomes.in/http:/mystudyfromhomes.in/.html/9-th-english-online-test/*
*🌀 9 th General Science*
https://mystudyfromhomes.in/http:/mystudyfromhomes.in/.html/9-th-english-online-test/
*🌀 10 वी विज्ञान आणि तंत्रज्ञान*
https://cutt.ly/6C8rfsF
*🌀 सामान्यज्ञान*
https://cutt.ly/aC8rVPq
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रश्न 5. पुढील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा :
(1) प्रत्येक ग्रहावर एकाच वस्तूचे वजन वेगवेगळे का भरते?
उत्तर : एखाद्या वस्तूवर जेवढे गुरुत्वीय बल कार्य करते, त्याला त्या वस्तूचे वजन म्हणतात.एखादया• वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने आकर्षित करते, त्याला त्या वस्तूचे पृथ्वीवरील वजन म्हणतात. एखादया ग्रहावरील गुरुत्वाकर्षण निरनिराळे असते. त्यामुळे एकाच वस्तूचे निरनिराळ्या ग्रहांवरवेगवगळे वजन भरते.
*(2) दैनंदिन जीवनामध्ये अचूक मापनासंदर्भात तुम्ही कोणती काळजी घ्याल?
उत्तर : (1) कोणतेही मापन करतांना योग्य साधने वापरावीत. (2) या साधनांचा योग्य पद्धतीने वापर करावा..
(3) आपण घेत असलेल्या वस्तू प्रमाणित मापाने योग्यरीत्या मोजल्या आहेत की नाहीत याची शहानिशा करावी.
(4) दुकानदार, भाजीवाले इत्यादी कोणता तराजू वापरतात, त्याच्यावर प्रमाणित असल्याचा छाप आहे की नाही,
आणि त्याचा काटा स्थिर आहे की नाही, तराजूच्या पारड्यांची खालची बाजू कशी आहे या सर्व बाबी
प्रत्येक खरेदीच्या वेळी तपासून पाहिल्या पाहिजेत. (5) वापरण्यात येणारी वजने योग्य आहेत की त्यांच्याऐवजी
एखादा दगड वापरला जातो हे लक्षात घेतले पाहिजे.
(3) वस्तुमान व वजन यांमध्ये काय फरक आहे ?
उत्तर :
वस्तुमान
1. पदार्थातील द्रव्यसंचयाला वस्तुमान म्हणतात.
2. वस्तुमान ही अदिश राशी आहे.
3. वस्तुमान सर्व परिस्थितीत तेवढेच भरते.
वजन
1. वस्तूवर जेवढे गुरुत्वीय बल कार्य करते, त्याला त्यावस्तूचे वजन असे म्हणतात.
2. वजन ही सदिश राशी आहे.
3. वजन निरनिराळ्या परिस्थितींत आणि निरनिराळ्या स्थळी वेगळे असते.
(4) मापनात आढळणाऱ्या त्रुटी उदाहरणाच्या साहाय्याने स्पष्ट करा.
उत्तर : मापनात आढळणाऱ्या महत्त्वाच्या त्रुटी म्हणजे :
(अ) योग्य साधनांचा वापर न करणे.
(1) काही वेळा भाजीवाले किंवा दुकानदार प्रमाणित वजने वापरत नाहीत. त्याऐवजी दगड किंवा तत्सम
साधने वापरतात. त्यामुळे ते करीत असलेल्या वजनात फेरफार होतो. (2) कधी कधी तराजू नीट कार्य करीत नसतो.
(3) पेट्रोल किंवा डिझेल विकत घेताना इंडिकेटरवर योग्य पद्धतीने लक्ष दिले जात नाही.
(ब) साधनांचा योग्य पद्धतीने वापर न करणे.
(1) दैनंदिन जीवनात मापन करण्याची साधने म्हणजे तराजू, ताणकाटा, फूटपट्टी, मोजमापाची टेप,
निरनिराळी वजने, दूध मापनाची मापे इत्यादींचा वापर योग्य पद्धतीने केला जात नाही. (2) मापन करताना
तराजूचा काटा फेरफार करून वापरला जातो. (3) ताग्यातून कापड मापताना त्याचे योग्य मापन केले जात नाही.
वरील बाबींविषयी ग्राहकाने विशेष दक्षता घेऊन आपण फसवले तर जात नाही ना याची खात्री केली पाहिजे.
(5) अचूक मापनाची आवश्यकता व त्यासाठी वापरायची साधने कोणती ते स्पष्ट करा.
उत्तर : अचूक मापनाची आवश्यकता पुढील बाबींवर अवलंबून असते :
(1) दैनंदिन व्यवहारात तसेच शास्त्रीय संशोधनात कुठल्याही वस्तूचे मापन अचूक असले पाहिजे; अन्यथा
त्याचे दूरगामी अनिष्ट परिणाम होऊ शकतात. (2) मापन करावयाच्या वस्तू मौल्यवान, विशेष महत्त्वाच्या आणि
अल्प प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या असतील तर त्यांचे मोजमाप नेहमीच अधिक काटेकोरपणे केले पाहिजे.
प्रश्न 6. शास्त्रीय कारणे लिहा :
(1) शरीराच्या भागांचा वापर करून मोजमाप करणे योग्य नाही.
उत्तर : प्रत्येक व्यक्तीच्या शरीराच्या भागांची मापे निरनिराळी असतात. त्यांत काहीही प्रमाणीकरण नसते.
त्यामुळे शरीराच्या भागांचा वापर करून मोजमाप करणे योग्य नाही.
*(2) ठरावीक कालावधीनंतर वजन व मापे प्रमाणित करून घेणे आवश्यक असते.
उत्तर : सतत वापराने वजन व मापे प्रमाणित न राहण्याची शक्यता असते. त्यामुळे मापनाच्या वेळी ग्राहकांची
फसवणूक होऊ नये म्हणून वेळोवेळी वजन आणि मापे यांची तपासणी करणे जरुरीचे आहे.
(3) आपले वस्तुमान चंद्र आणि पृथ्वी या दोन्ही ठिकाणी एकसारखे असते.
उत्तर : एखाद्या वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्या वस्तूमधील द्रव्यसंचय होय. वस्तू विश्वात कोठे आहे यावर
तिचे वस्तुमान अवलंबून नसते. म्हणून आपले वस्तुमान चंद्र आणि पृथ्वी या दोन्ही ठिकाणी एकसारखे असते.
No comments:
Post a Comment