Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

Translate

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image
Showing posts with label सहावी भूगोल. Show all posts
Showing posts with label सहावी भूगोल. Show all posts

Sunday, 24 January 2021

Thursday, 24 December 2020

Saturday, 28 November 2020

Wednesday, 19 August 2020

August 19, 2020

इयत्ता सहावी भूगोल ५- तापमान Online Test

५-तापमान  

चाचणी सोडविण्यासाठी -  Click Here

 सूर्यापासून पृथ्वीला मिळणाऱ्या उष्णतेच्या वितरणातील असमानता :

(१) पृथ्वी गोल असल्यामुळे पृथ्वीपृष्ठावर सूर्यकिरण सर्वत्र लंबरूप पडत नाहीत. हे किरण काही भागात लंबरूप

तर काही भागात तिरपे पडतात. त्यामुळे सूर्यापासून पृथ्वीला मिळणाऱ्या उष्णतेचे वितरण हे असमान होते.

(२) तापमानाच्या वितरणानुसार पृथ्वीचे विषुववृत्तापासून ध्रुवांपर्यंत उष्ण, समशीतोष्ण व शीत अशा तीन

कटिबंधात विभाजन असते .

. तापमानाच्या असमान वितरणास कारणीभूत घटक :

(१) तापमानाच्या असमान वितरणास कारणीभूत असणारा मुख्य घटक म्हणजे अक्षांश होय.

(२) अक्षांशाशिवाय समुद्रसानिध्य, खंडांतग्गता, समुद्रसपाटीपासूनची उंची, प्राकृतिक रचना, ढगांचे आच्छादन,

वारे, वनाच्छादन, नागरीकीकरण, औदर्योगिकीकरण इत्यादी घटकांचासुद्धा स्थानिक हवामानावर परिणाम होतो.


३. जमीन व पाणी यांचे तापणे व थंड होणे :

(१) जमीन व पाणी यांचे तापणे व थंड होणे यांत नेहमी असमानता असते.

(२) जमीन लवकर तापते व लवकर थंड होते. उलट पाणी उशिरा तापते व उशिरा थंड होते.

(३) परिणामी खंडांतर्गत भागात समुद्रकिनारी भागापेक्षा हवेचे तापमान दिवसा जास्त असते व रात्री कमी असते.

याउलट समुद्रकिनारी भागात खंडांतर्गत भागापेक्षा हवेचे तापमान दिवसा कमी तर रात्री जास्त असते.

. समताप रेषा :

(१) पृथ्वीवरील समान तापमान असणाऱ्या ठिकाणांना जोडणाऱ्या रेषा, म्हणजे 'समताप रेषा' होय

(२) समताप रेषा सर्वसाधारणपणे अक्षवृत्तांना समांतर असतात.

(३) दक्षिण गोलार्धातील समताप रेषा अक्षवृत्तांना समांतर आढळतात. उत्तर गोलार्धात समताप रेषांमधील अंतर

कमी-जास्त होताना आढळते. त्यामुळे समताप रेषा उत्तर गोलार्धात अधिक प्रमाणात वक्र झाल्याचे दिसून येते.


तापमापक :

(१) हवेचे तापमान मोजण्यासाठी 'तापमापक' हे उपकरण वापरतात.

(२) तापमापकात पारा किंवा अल्कोहोल या द्रव्यांचा वापर करण्यात येतो

August 19, 2020

इयत्ता सहावी भूगोल ३-पृथ्वी गोल, नकाशा तुलना व क्षेत्र भेट Online Test

 ३-पृथ्वी गोल, नकाशा तुलना व क्षेत्र भेट

चाचणी सोडविण्यासाठी -  Click Here 

द्विमितीय वस्तू - लांबी आणि रुंदी 

त्रिमितीय वस्तू - लांबी ,रुंदी आणि उंची 

नकाशे -             द्विमितीय 

पृथ्वी गोल 

क्षेत्र भेट 


August 19, 2020

इयत्ता सहावी भूगोल २- चला वृत्ते वापरुयात Online Test

 २- चला वृत्ते वापरुयात

चाचणी सोडविण्यासाठी -  Click Here 

कर्कवृत्त : विषुववृत्तापासून उत्तरेकडील २३°३०' उ. या अक्षवृत्तास 'कर्कवृत्त' म्हणतात.

मकरवृत्त : विषुववृत्तापासून दक्षिणेकडील २३°३०' द. या अक्षवृत्तास 'मकरवृत्त' म्हणतात.

आर्किटिक वृत्त : विषुववृत्तापासून उत्तरेकडील ६६°३०' उ. या अक्षवृत्तास 'आर्क्टिक वृत्त' म्हणतात.

अंटार्किटिक वृत्त : विषुववृत्तापासून दक्षिणेकडील क६६°३०' द. या अक्षवृत्तास 'अंटार्क्टिक वृत्त' म्हणतात.

उत्तर ध्रुव : विषुववृत्तापासून उत्तरेकडील ९०° उ. या अक्षवृत्तास 'उत्तर ध्रुव' म्हणतात.

दक्षिण ध्रुव : विषुववृत्तापासून दक्षिणेकडील ९०° द. या अक्षवृत्तास 'दक्षिण ध्रुव' म्हणतात.


August 19, 2020

इयत्ता सहावी भूगोल १-पृथ्वी आणि वृत्ते Online Test

१-पृथ्वी आणि वृत्ते

चाचणी सोडविण्यासाठी -  Click Here 

 काल्पनिक वर्तुळे, म्हणजे 'अक्षवृत्ते' होय.

(२) अक्षवृत्ते ही कोनीय अंतर मोजून काढलेली असल्यामुळे त्यांची मूल्ये अंशात सांगितली जातात. या मूल्यांना

अक्षांश' म्हणतात.

(३) सर्व अक्षवृत्ते एकमेकांना समांतर असतात.

(४) अक्षवृत्ते या काल्पनिक वर्तुळाकार आडव्या रेषा असतात.


५. विषुववृत्त, उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध आणि उत्तर धुरुव व दक्षिण ध्रुव :

 ०°चे व सर्वांत मोठ्या आकाराचे अक्षवृत्त, म्हणजे 'विषुववृत्त'होय. त्याला 'मूळ अक्षवृत्त' असेही म्हणतात.

(२) विषुववृत्तामुळे पृथ्वीचे उत्तर आणि दक्षिण असे दोन समान भाग होतात. उत्तरेकडील भागास

उत्तर गोलार्ध' व दक्षिणेकडील भागास 'दक्षिण गोलार्ध' म्हणतात.

(३) विषुववृत्ताकडून उत्तरेकडे व दक्षिणेकडे अक्षवृत्तांचे मूल्य वाढत जाते व अक्षवृत्ते आकाराने व लहान-लहान होत जातात.

(४) पृथ्वीच्या उत्तर व दक्षिण या दोन्ही टोकांना अक्षवृत्ते बिंदुस्वरूप असतात. त्यांना अनुक्रमे 'उत्तर ध्रुव'

व 'दक्षिण ध्रुव' म्हणतात.

६. पृथ्वीवरील एकूण अक्षवृत्ते :

(१) पृथ्वीवर प्रत्येकी १० च्या अंतराने एकूण १८१ अक्षवृत्ते काढता येतात.