५-तापमान
चाचणी सोडविण्यासाठी - Click Here
सूर्यापासून पृथ्वीला मिळणाऱ्या उष्णतेच्या वितरणातील असमानता :
(१) पृथ्वी गोल असल्यामुळे पृथ्वीपृष्ठावर सूर्यकिरण सर्वत्र लंबरूप पडत नाहीत. हे किरण काही भागात लंबरूप
तर काही भागात तिरपे पडतात. त्यामुळे सूर्यापासून पृथ्वीला मिळणाऱ्या उष्णतेचे वितरण हे असमान होते.
(२) तापमानाच्या वितरणानुसार पृथ्वीचे विषुववृत्तापासून ध्रुवांपर्यंत उष्ण, समशीतोष्ण व शीत अशा तीन
कटिबंधात विभाजन असते .
. तापमानाच्या असमान वितरणास कारणीभूत घटक :
(१) तापमानाच्या असमान वितरणास कारणीभूत असणारा मुख्य घटक म्हणजे अक्षांश होय.
(२) अक्षांशाशिवाय समुद्रसानिध्य, खंडांतग्गता, समुद्रसपाटीपासूनची उंची, प्राकृतिक रचना, ढगांचे आच्छादन,
वारे, वनाच्छादन, नागरीकीकरण, औदर्योगिकीकरण इत्यादी घटकांचासुद्धा स्थानिक हवामानावर परिणाम होतो.
३. जमीन व पाणी यांचे तापणे व थंड होणे :
(१) जमीन व पाणी यांचे तापणे व थंड होणे यांत नेहमी असमानता असते.
(२) जमीन लवकर तापते व लवकर थंड होते. उलट पाणी उशिरा तापते व उशिरा थंड होते.
(३) परिणामी खंडांतर्गत भागात समुद्रकिनारी भागापेक्षा हवेचे तापमान दिवसा जास्त असते व रात्री कमी असते.
याउलट समुद्रकिनारी भागात खंडांतर्गत भागापेक्षा हवेचे तापमान दिवसा कमी तर रात्री जास्त असते.
. समताप रेषा :
(१) पृथ्वीवरील समान तापमान असणाऱ्या ठिकाणांना जोडणाऱ्या रेषा, म्हणजे 'समताप रेषा' होय
(२) समताप रेषा सर्वसाधारणपणे अक्षवृत्तांना समांतर असतात.
(३) दक्षिण गोलार्धातील समताप रेषा अक्षवृत्तांना समांतर आढळतात. उत्तर गोलार्धात समताप रेषांमधील अंतर
कमी-जास्त होताना आढळते. त्यामुळे समताप रेषा उत्तर गोलार्धात अधिक प्रमाणात वक्र झाल्याचे दिसून येते.
तापमापक :
(१) हवेचे तापमान मोजण्यासाठी 'तापमापक' हे उपकरण वापरतात.
(२) तापमापकात पारा किंवा अल्कोहोल या द्रव्यांचा वापर करण्यात येतो
No comments:
Post a Comment