Education with Technology शैक्षणिक तंत्रज्ञान

Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

Translate

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image

Tuesday, 4 November 2025

Monday, 20 October 2025

October 20, 2025

देशभक्तीपर गीत - झेंडा आमचा

 देशभक्तीपर गीत - झेंडा आमचा

झेंडा आमचा प्रिय देशाचा, फडकत वरी महान

करितो आम्ही प्रणाम याला, करितो आम्ही प्रणाम  ।।धृ।।



लढले गांधी याच्याकरिता, टिळक, नेहरु, लढली जनता

समर धुरंधर वीर खरोखर, अर्पूनि गेले प्राण...

करितो आम्ही प्रणाम याला, करितो आम्ही प्रणाम ।।१।।



भारतमाता आमची माता, आम्ही गातो या जयगीता

हिमालयाच्या उंच शिखरावर, फडकत राही निशाण...

करितो आम्ही प्रणाम याला, करितो आम्ही प्रणाम।।२।।



या देशाची पवित्र माती, जुळवी आमच्या मधली नाती

एक नाद गर्जतो भारता, तुझा आम्हा अभिमान...

करितो आम्ही प्रणाम याला, करितो आम्ही प्रणाम ।।३।।



गगनावरि अन् सागरतीरी, सळसळ करिती लाटालहरी

जय भारत जय, जय भारत जय, गाताती जयगान...

करितो आम्ही प्रणाम याला, करितो आम्ही प्रणाम ।।४।।

                                         -वि.म. कुलकर्णी


October 20, 2025

देशभक्तीपर गीत- या भारतात बंधुभाव नित्य वसू दे

 

देशभक्तीपर गीत- या भारतात बंधुभाव नित्य वसू दे

या भारतात बंधुभाव नित्य वसू दे। 

दे वरचि असा दे ।।धृ।।


हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसूदे

नांदोत सुखे गरीब अमीर एकमंतानी

संग हिंदू असो, ख्रिश्चन वा हो इस्लामी

स्वातंत्र्य-सुखा या सकलामाजी वसू दे। 

दे वरचि असा दे ।।१।।


सकळास कळो मानवता, राष्ट्रभावना।

हो सर्व स्थळी मिळूनी समुदाय प्रार्थना।

उद्योगी तरुण शीलवान येथे असू दे। 

दे वरचि असा दे ।।२।।

जातीभाव विसरुनिया एक हो आम्ही

अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी

खळ-निंदका मनीही सत्य न्याय वसू दे। 

दे वरचि असा दे ।।३।।


सौंदर्य रमो घरघरांत स्वर्गियापरी

ही नष्ट होऊ दे विपती भीती बावरी

तुकडयादास सदा या सेवेमाजी वसू दे।

दे वरचि असा दे ।।४।।

            -श्री संत तुकडोजी महाराज

October 20, 2025

देशभक्तीपर गीत-आचंद्रसूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे

 

देशभक्तीपर गीत-आचंद्रसूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे

हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे

आचंद्रसूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे।।धृ.।।


कर्तव्यदक्ष भूमी, सीतारघूत्तमाची

रामायणे घडावी, येथे पराक्रमाची

शिर उंच उच व्हावळे, हिमवंत पर्वताचे

आचंद्रसूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे  ।।१।।


येथे नसो निराशा, थोड्या पराभवाने

पार्थास बोध केला, येथेच माधवाने

हा देश स्तन्य प्याला, गीतख्य अमृताचे

आचंद्र नांदो, स्वातंत्र्य भारताचे ।।२।।


येथेच मेळ झाला, सामर्थ्य संयमाचा

येथेच जन्म झाला, सिद्धार्थ गौतमाचा

हे क्षेत्र पुण्यदायी, भगवान् तथागताचे

आचंद्रसूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे ।।३।।


हे राष्ट्र विक्रमाचे, हे राष्ट्र शांततेचे

सत्यार्थ झुंड घ्यावी, या जागत्या प्रथेचे

येथे शिव-प्रतापी, नरसिंह योग्यतेचे

आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे ।।४।।

            - ग. दि. माडगूळकर