Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

Translate

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image

Saturday, 18 October 2025

'युगंधर' - कादंबरी - Pdf

'युगंधर' - कादंबरी - Pdf.


'युगंधर' शब्दरूप झाली! मन एका अननुभूत कार्यपूर्तीच्या अवर्णनीय आनंदानं कसं शिगोशीग भरून आलंय. खरंतर या वेळी मनोगत म्हणूनसुद्धा एकही शब्द लिहू नये, असे अबोध मनाच्या तळवटातून प्रकर्षानं जाणवतं आहे. जे काय बोलायचं असेल,ते जाणत्या भारतीय मनावर गेली हजारो वर्ष निर्विवाद अधिराज्य गाजविणाऱ्या 'काळ्याला त्याच्या वर्णासारख्याच गडद 'करंद' भाषेत मनमुक्त बोलू देत.आपण आपलं आता,गेली तीस वर्ष हा कृष्णवेध घेणाऱ्या थकल्या देहमनाला का हे आचमन घेताना- आचमन हे शीर्षक लिहितानाच या मनोगताला 'आचमन' हे नाव का? हे स्पष्ट करणं भाग आहे. 'आचमन' म्हणजे सदहेतूनं समष्टीच्या श्रेयसासाठी,
कल्याणासाठी परमशक्तीला मनोमन आवाहन करून प्राशन केलेली जलांजली! वाचून झाल्यावर वाचकाला याचा नक्कीच प्रत्यय येईल, याचा श्रीकृष्णकृपेन पूर्ण विश्वास आहे. म्हणून तर हे मनोगताच प्रकट-अप्रकट शब्द मिसळलेल आचमन! या वेळी काही श्रद्धेय सुहृदांच्या तीव्र स्मरणानं लेखणी क्षणैक मुग्ध-स्तब्ध झालीय,
त्यांनी वेळोवेळी कुठवर आलाय युगधर?', 'कधी पडणार हातात" अशी आत्मभावान वारंवार केलेली विचारणा ऐकताना मलाच उत्तर माहिती नसल्यामुळे देहूच्या तुक्या वाण्यासारम्बा माझा माझ्याशीच मूक संवाद जुंपत असे. 

पुस्तक Pdf स्वरूपात वाचण्यासाठी व डाऊनलोड करण्यासाठी खालील पुस्तकाच्या चित्रावर क्लिक करा 


 

No comments:

Post a Comment