7-गती ,बल व कार्ये
खालील ठळक मुद्दे काळजीपूर्वक वाचा व सर्वात खाली चाचणी सोडविण्यासाठी क्लिक करा..
◆गती
वस्तूचे ठरावीक वेळेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होणारे विस्थापन म्हणजेच त्या वस्तूची
गती होय. गतीमध्ये बदल हा बलामुळे होतो.
◆. अंतर (Distance) व विस्थापन (Displacement) :
● अंतर :
गतीच्या दिशेचा विचार न करता, एखाद्या गतिमान वस्तूने प्रत्यक्ष पूर्ण केलेल्या मार्गाची लांबी
म्हणजे अंतर होय.
अंतर ही अदिश राशी आहे.
(2) विस्थापन:
एखादया गतिमान वस्तूने आरंभीच्या ठिकाणापासून अंतिम ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी एकाच
दिशेने म्हणजेच सरळ रेषेत पार केलेले कमीत कमी अंतर म्हणजे विस्थापन होय.
विस्थापन ही सदिश राशी आहे.
विस्थापनामध्ये अंतर व दिशा या दोन्ही गोष्टींचा विचार होतो.
(3) अंतर व विस्थापन या दोन्ही राशींचे SI व MKS मापन पद्धतींत एकक मीटर (m) आहे.
(4) वेग :
वेग म्हणजे विशिष्ट दिशेने एकक कालावधीत वस्तूने कापलेले अंतर होय.
(5) वस्तूच्या वेगाचे सूत्र :
वेग = विस्थापन/ विस्थापनाला लागलेला वेळ
◆. चाल व वेग (Speed and Velocity) :
चाल सांगत असताना गतीची दिशा सांगण्याची आवश्यकता नसते.
गाडीची चाल 50 किमी प्रतितास असे सांगितले जात असताना गाडीच्या गतीची दिशा स्पष्ट करण्याची गरज
नाही. परंतु वादळ एखादया विशिष्ट ठिकाणी येणार की नाही याची कल्पना येण्यासाठी वादळाच्या दिशेचा
उल्लेख करणे जरुरीचे ठरते.
चाल व वेग दोन्हीचे SI एकक मीटर/सेकंद (m/s) आहे.
● एखाद्या वस्तूने एकक कालावधीत कापलेल्या अंतरास चाल म्हणतात.
चाल = कापलेले अंतर/ वेळ
◆ सरासरी वेग व तात्कालिक वेग :

एखादी वस्तू सरळ रेषेत जात असतांना तिचा वेग बदलत जाऊ शकतो.
(1) सरासरी वेग :
वस्तूचे विस्थापन/त्या विस्थापनाला लागलेला कालावधी
(2) तात्कालिक वेग : एका विशिष्ट क्षणी असलेल्या वेगाला तात्कालिक वेग म्हणतात. तात्कालिक वेग
वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा असू शकतो.
◆. त्वरण (Acceleration) :
(1) वेगामधील वेळेच्या संदर्भात होत असलेल्या बदलाला त्वरण म्हणतात.
ही सदिश राशी आहे. वेग वाढत असल्यास
त्वरण धन असते. वेग कमी होत असल्यास त्वरण ऋण असते. वेग बदलत नसल्यास त्वरण शून्य असते.
त्वरणाचे सूत्र :
वेगातील बदल/बदलास लागलेला कालावधी
त्वरणाचे SI एकक
मीटर/सेकंद×सेकंद (m/s').
◆. बल (Force) :
(1) त्वरण घडवणाच्या आंतरक्रियेला बल असे म्हणतात. म्हणजेच बलामुळे वस्तूच्या वेगात बदल होतो. बल हे
वस्तूवर कार्य करते.
बल = वस्तुमान x त्वरण.
बल ही सदिश राशी आहे.
2) सर आयझक न्यूटन या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम बल आणि त्यामुळे घडणाऱ्या त्वरणा संबंधीचा अभ्यास केता
◆. न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम :
(1) एखद्या वस्तूवर बल कार्य करीत नसेल, तर त्या वस्तूचा वेग बदलत नाही. म्हणजेच बल लावले नसताना
वस्तू जर स्थिर असेल तर ती स्थिर राहते व तिला गती असेल, तर ती एकाच वेगाने म्हणजेच एकाच
चालीने एकाच दिशेने सतत पुढे जात राहते.
(2) जर वस्तूवर कार्य करणारे एकूण बल 0 असेल तर वस्तूचे त्वरणसुद्धा 0 असते.
(3) न्यूटन : एक किलोग्रॅमचे प्रमाण घर्षण नसलेल्या पृष्ठभागावर ठेवले आणि 1 m/s' इतक्या त्वरणाने ओढले तर त्यासाठी लावलेल्या बलाला 1 न्यूटन किंवा 1 N म्हणतात.
◆. बल, विस्थापन व कार्य (Force, Displacement and Work) :
बल, विस्थापन व कार्य यांचा एकमेकांशी संबंध पुढील सूत्रात दाखवला आहे :
बलाने केलेले कार्य (W)= वस्तूवर लावलेले बल x बलाच्या दिशेत झालेले वस्तूचे विस्थापन
W = FXs
बल, विस्थापन या सदिश राशी आहेत.
पण कार्य ही अदिश राशी आहे.
* SI पद्धतीत कार्याचे एकक- ज्यूल
* बलाचे एकक- न्यूटन (N) आणि विस्थापनाचे एकक--मीटर (m)
* CGS पद्धतीत कार्याचे एकक- अर्ग (erg)
टेबलावरील लाकडी ठोकळ्याला टेबलाच्या पृष्ठभागाशी
समांतर असे 1 N इतके बल लावले आणि एक मीटर
इतके ठोकळ्याचे विस्थापन केले, तर बलाने 1 ज्यूल
इतके कार्य केले असे समजतात.
चाचणी सोडविण्यासाठी --क्लिक करा

No comments:
Post a Comment