स्वाध्यायमाला - प्रश्नोत्तरे इयत्ता सातवी भूगोल 2 -सूर्य ,चंद्र व पृथ्वी
प्रश्न १. योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा :
उत्तरे
(१) चंद्र अंशतः झाकला जातो, त्या स्थितीला खंडग्रास चंद्रग्रहण म्हणतात.
(२) सूर्यग्रहण अमावास्येला होते.
(३) चंद्रग्रहण पौर्णिमेला. होते.
प्रश्न २. जी विधाने चुकीची आहेत ती दुरुस्त करून लिहा :
(१) चंद्र हा सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतो.
उत्तर : चूक. चंद्र हा पृथ्वीच्या भोवती प्रदक्षिणा घालतो.
(२) पौर्णिमेला चंद्र, सूर्य व पृथ्वी हा क्रम असतो.
उत्तर : चूक. पौर्णिमेस चंद्र, सूर्य व पृथ्वी यांचा सूर्य, पृथ्वी व चंद्र असा क्रम असतो.
(३) पृथ्वीची परिभ्रमण कक्षा आणि चंद्राची परिभ्रमण कक्षा ही एकाच पातळीत आहे.
उत्तर : चूक. पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा एकाच पातळीत नाही. चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी सुमारे ५° चा कोन करते.
(४) चंद्राच्या एका परिभ्रमण काळात चंद्राची कक्षा पृथ्वीच्या कक्षेशी एकदाच छेदते.
उत्तर : चूक, चंद्राच्या एका परिभ्रमण काळात चंद्राची कक्षा पृथ्वीच्या कक्षेशी दोनदा छेदते.
(५) सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे बरोबर आहे.
उत्तर : चूक. सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे योग्य नाही. सूर्यग्रहण पाहण्यासाठी काळी काच किंवा दिशिषएट प्रकारचे गाँगल्स वापरणे योग्य ठरते.
(६) चंद्र पृथ्वीशी उपभू स्थितीत असताना कंकणाकृती सूर्यग्रहण होते.
उत्तर : चूक. चंद्र पृथ्वीशी अपभू स्थितीत असताना कंकणाकृती सूर्यग्रहण होते.
प्रश्न ४. पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा :
(१) अमावास्येला चंद्र, सूर्य आणि पृथ्वी यांचा क्रम कसा असतो?
उत्तर : अमावास्येला चंद्र, सूर्य आणि पृथ्वी यांचा क्रम सूर्य चंद्र पृथ्वी असा असतो.
(२) सूर्यग्रहणाचे प्रकार लिहा.
उत्तर : खग्रास, खंडग्रास आणि कंकणाकृती सूर्यग्रहण हे सूर्यग्रहणाचे तीन प्रकार आहेत.
(३) चंद्रग्रहणाचे प्रकार लिहा.
उत्तर : खग्रास आणि खंडग्रास हे चंद्रग्रहणाचे दोन प्रकार आहेत.
4) उपभू स्थितीत कोणत्या प्रकारची सूर्यग्रहणे होतील?
उत्तर : उपभू स्थितीत खग्रास सूर्यग्रहण व खंडग्रास सूर्यग्रहण या प्रकारची सूर्यग्रहणे होतील.
(५) चंद्राची अक्षीय गती म्हणजे काय?
उत्तर : चंद्र स्वतःभोवती ज्या गतीने फिरतो ती गती म्हणजे चंद्राची 'अक्षीय गती होय.
(६) चंद्राची कक्षीय गती म्हणजे काय ?
उत्तर : चंद्र पृथ्वीभोवती ज्या गतीने फिरतो, ती गती म्हणजे चंद्राची 'कक्षीय गती' होय.
(७) सूर्यग्रहणाच्या दिवशी पृथ्वीवरील कोणत्या भागातून ग्रहण दिसणार नाही ?
उत्तर : सूर्यग्रहणाच्या दिवशी पृथ्वीवरील ज्या भागावर चंद्राची दाट किंवा विरळ सावली पडणार नाही, त्या भागातून ग्रहण दिसणार नाही.
(८) कंकणाकृती आणि खग्रास असे सूर्यग्रहण एकाय वेळी होऊ शकते काय ?
उत्तर : कंकणाकृती आणि खग्रास असे सूर्ग्रहण एकाच वेळी होऊ शकत नाही.
(९) चंद्रावर गेल्यास तुम्हांला कोणकोणती ग्रहणे दिसू शकतील ?
उत्तर : चंद्रावर गेल्यास तेथून खग्रास व खंडप्रास सूर्यग्रहणे दिसू शकतील.
प्रश्न ५. पुढील संज्ञा स्पष्ट करा :
(৭) शुक्ल पक्ष : अमावास्येपासून पौर्णिमिपर्यंतच्या पंधरा दिवसांच्या चंद्राचा प्रकाशित भाग वाढत जाण्याच्या काळास शुक्ल पक्ष म्हणतात.
(२) कृष्ण पक्ष : पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंतच्या पंधरा दिवसांच्या चंद्राचा प्रकाशित भाग कमी होत जाण्याच्या काळास शुक्ल पक्ष म्हणतात.
(३) पौर्णिमा : ज्या रात्री पृथ्वीच्या समोर असलेला चंद्राचा संपूर्ण भाग प्रकाशित दिसतो, त्या रात्रीला पौर्णिमा म्हणतात.
(४) अमावास्या : ज्या रात्री पृथ्वीच्या समोर असलेला चंद्राचा प्रकाशित भाग आपल्याला अजिबात दिसत नाही, त्या रात्रीला अमावास्या म्हणतात.
प्रश्न ६. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा :
৭) दर अमावास्येस व पौर्णिमेस चंद्र, पृथ्वी, सूर्य एका सरळ रेषेत का येत नाहीत ?
उत्तर : (१) पृथ्वीची सूर्याभोवतीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची पृथ्वीभोवतीची परिप्रमण कक्षा एकाच पातळीत नाहीत. (२) चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिप्रमण कक्षेशी सुमारे ५° चा कोन करते. त्यामुळे दर अमावास्येस व पौर्णिमेस चंद्र, पृथ्वी, सूर्य एका सरळ रेपेत येत नाहीत.
(२) खग्रास सूर्यग्रहण होत असताना पृथ्वीवर खंडग्रास सूर्यग्रहणही का अनुभवास येते ?
उत्तर : (१) अमावास्येच्या दिवशी सूर्य, चंद्र व पृथ्वी हे तीन खगोल अनुक्रमे एकाच सरळ रेषेत आले तर चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. (२) एकाच वेळी पृथ्वीच्या काही भागावर चंद्राची दाट छाया पडते, तर काही भागावर चंद्राची विरळ छाया पडते. (३) पृथ्वीच्या ज्या भागावर चंद्राची दाट छाया (सावली) पडते, त्या भागातून सूर्य पूर्णपणे झाकलेला दिसतो व या भागातून खपरास सूर्यप्रहण अनुभवास येते. (४) त्याच वेळी पृथ्वीच्या ज्या भागावर चंद्राची विरळ छाया (सावली) पडते, त्या भागातून सूर्याचा काही भाग दिसतो, तर काही भाग झाकलेला दिसतो, म्हणजेच या भागातून खंडग्रास सूर्यप्रहण अनुभवास येते. ( ५) याशिवाय पृथ्वीवरील काही भाग प्रथम चंद्राच्या विरळ छायेत आला असता व त्यानंतर चंद्राच्या दाट छायेत आला असता, त्या भागातून प्रथम खंडग्रास सूर्यग्रहण व त्यानंतर खंग्रास सूर्यग्रहण अनुभवास येते. अशा प्रकारे, खग्रास सूर्यग्रहण होत असताना पृथ्वीवर खंडग्रास सूर्यप्रहणही अनुभवास येते.
३) सूर्यग्रहण पाहताना कोणती काळजी घ्याल?
उत्तर : (१) सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे डोळ्याना इजा होऊ शकते, त्यामुळे सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे कटाक्षाने टाळू (२) सूर्यग्रहण पाहताना काळया काचेचा किंवा विशिष्ट प्रकारच्या गॉंगल्सचा वापर करू.
(४) चंद्राची उपभू व अपभू स्थिती म्हणजे काय ?
उत्तर : (१) चंद्राची पृथ्वीभोकतीची परिभ्रमण कक्षा लंबवतुतुळाकार आहे. त्यामुळे चंद्र पृथ्वीभोवती प्रदकषिणा घालताना पृथ्वी व चंद्र यांमधील अंतर सर्वत्र सारखे नसते. (२) जेव्हा चंद्र त्याच्या पृथ्वीभोवतीच्या प्रदक्षिणा मार्गात जवळ असतो, त्या स्थितीला चंद्राची उपभू स्थिती म्हणतात. उपभू स्थितीत चंद्र पृथ्वीपासून सुमारे ३,५६.००० किमी अंतरावर असतो. (३) याउलट, जेव्हा चंद्र त्याच्या पृथ्वीभोवतीच्या प्रदक्षिणा मार्गात पृथ्वीपासून जास्तीत जास्त दूर असतो, त्या स्थितीला चंद्राची अपभू स्थिती म्हणतात. अपभू स्थितीत चंद्र पृथ्वीपासून सुमारे ४,०७,००० किमी अंतरावर असतो.
प्रश्न - सूर्यग्रहणाची वैशिष्ट्ये लिहा.
उत्तर : (१) सूर्यग्रहण अमावास्येला होते, परंतु ते प्रत्येक अमावास्येला होत नाही. (२) ज्या अमावास्येला सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे अनुक्रमे एका सरळ रेषेत व एका पातळीत येतात, केवळ त्याच अमावास्येला सूर्यग्रहण होते. (३) पृथ्वीच्या ज्या भागावार चंद्राची दाट सावली पडते, त्या भागातून खग्रास सूर्यग्रहण दिसते, तर पृथ्वीच्या ज्या भागावर चंद्राची विरळ सावली पडते, त्या भागातून खंडग्रास सूर्यग्रहण दिसते. (४) खग्रास सूर्यग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी ७ मिनिटे २० सेकंद (४४० सेकंद) इतका असतो.
(६) चंद्रग्रहणाची वैशिष्ट्ये लिहा.
उत्तर : (१) चंद्रग्रहण पौर्णिमेला होते, परंतु ते प्रत्येक पौर्णिमेला होत नाही. (२) ज्या पौरणिमिला सूर्य, पृथ्वी आणि चंद्र हे अनुक्रमे एका सरळ रेषेत व एका पातळीत येतात, केवळ त्याच पौर्णिमेला चंद्रग्रहण होते. (३) पृथ्वीच्या दाट सावलीत चंद्र संपूर्णपणे झाकला गेला असता, खग्रास चंद्रग्रहण दिसते; तर पृथ्वीच्या दाट सावलीत चंद्राचा काही भाग झाकला गेला असता, खंडग्रास चंद्रग्रहण दिसते. (४) खग्रास चंद्रप्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी १०७ मिनिटे इतका असतो.
(७) सूर्यग्रहणाच्या वेळी पशुपक्ष्यांचे वर्तन कसे असते ?
उत्तर : (१) सूर्यग्रहणाच्या कालावधीत अचानक निर्माण होणाऱ्या काळोखामुळे अनेक पक्षी, प्राणी गोंधळतात. (२) त्यांच्या जैविक घड्याळापेक्षा वेगळी घटना असल्यामुळे त्यांचा या घटनेला मिळणारा प्रतिसाद वेगळा असतो.
(८) चंद्र, पृथ्वी व सूर्य यांची कृष्ण व शुक्ल पक्षातील अष्टमीची तसेच अमावास्येच्या दिवशीची सापेक्ष स्थिती लक्षात घ्या. या दिवशी चंद्र-पृथ्वी - सूर्य यांच्यातील कोन किती अंशाचे असतील ? प्रत्येक महिन्यात असे कोन किती वेळा होतील ?
उत्तर : चंद्र-पृथ्वी सूर्य यांच्यातील कोन कृष्ण व शुक्ल पक्षातील अष्टमीच्या दिवशी तसेच अमावास्येच्या दिवशी पुढीलप्रमाणे असतील : (१) कृष्ण पक्षातील अष्टमी चंद्र -पृथ्वी सूर्य यांच्यातील कोन ९०° (२) शुक्ल पक्षातील अष्टमी : चंद्र-पृथ्वी सूर्य यांच्यातील कोन- ९०° (३) अमावास्या : चंद्र - पृथ्वी सूर्य यांच्यातील कोन - ०° [(४) पौर्णिमा : चंद्र-पृथ्वी सूर्य यांच्यातील कोन- १८०°], प्रत्येक महिन्यात अष्टमीच्या स्थितीतील कोन दोन वेळा व अमावास्या (व पौर्णिमा) स्थितीतील कोन एक वेळा होईल
प्रश्न ७. पुढील विधानांची भौगोलिक कारणे लिहा :
(१) चंद्राची दुसरी बाजू पृथ्वीवरून कधीही दिसत नाही.
उत्तर : (१) चंद्राचा परिवलन व परिभ्रमण काळ जवळजवळ सारखाच असतो. (२) म्हणजेच चंद्राची अक्षीय गतीव कक्षीय गती जवळजवळ सारखीच असते. परिणामी पृथ्वीवरून चंद्राची विशिष्ट बाजूच सतत दिसत राहते. त्यामुळे चंद्राची दुसरी बाजू पृथ्वीवरून कधीही दिसत नाही.
(२) दर अमावास्येस सूर्यग्रहण होत नाही.
उत्तर : (१) अमावास्येस सूर्य, चंद्र आणि पृथ्यी अनुक्रमे एकाच सरळ रेषेत आले, तर सूर्यग्रहण होते. (२) परंतु पृथ्वीचा सूर्याभोवतीचा प्रदक्षिणा मार्ग व चंद्राचा पृथ्वीवरचा प्रदक्षिणा मार्ग एकाच पातळीत नाहीत. त्यांच्यात ५ अंशांचा कोन आहे. (३) त्यामुळे दर अमावास्येस सूर्य घंद्र आणि पृथ्वी एकाच सरळ रेषेत येत नाहीत. त्यामुळे दर अमाधास्येस सूर्यप्रहण होत नाही.
(३) दर पौणिमेस चंद्रग्रहण होत नाही.
उत्तर : (१) पौणिमेस सूर्य पृथ्वी आणि चंद्र अनुक्रमे एकाच सरळ रेषेत आले, तर चंद्रग्रहण होते. (२) परंतु पृथ्वीचा सू्याभोवतीचा प्रद्षिणा मार्ग व चंद्राचा पृथ्वीवरधा प्रदक्षिणा मार्ग एकाचर पातळीत नाहीत. त्यांच्यात ५ अंशांचा कोन आहे. (३) त्यामुळे दर पौर्णिमेस सूर्य, पृथ्वी आणि घंद्र एकाच सरळ रेषेत येत नाहीत त्यामुळे दर पौर्णिमेस चंद्रग्रहण होत नाही.
(४) चंद्रग्रहण कंकणाकृती का दिसणार नाही ?
उत्तर : (१) चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. चंद्राच्या आकारमानापेक्षा पृथ्वीचे आकारमान खूप मोठे आहे व चंद्र पृथ्वीच्या (सूर्याच्या तुलनेत) जवळ आहे. (२) परिणामी, चंद्रग्रहणाच्या वेळी पृथ्वीची दाट सावली चंद्रापर्यंत न पोहोचता ती अवकाशातच संपली अशी स्थिती उद्भवू शकणार नाही. त्यामुळे चंद्रग्रहण कंकणाकृती दिसणार नाही.
(५) इतर ग्रहांमुळे होणारी सूर्यग्रहणे आपण का पाहू शकत नाही ?
उत्तर : (१) चंद्र या उपप्रहाच्या तुलनेत इतर ग्रह पृथ्वीपासून दूर अंतरावर आहेत. (२) इतर ग्रहांच्या दाट किंवा विरळ छाया पृथ्वीवर पडत नाहीत. त्यामुळे इतर ग्रहामळे होणारी सूर्यग्रहणे आपण पाहू शकत नाही.
प्रश्न ८. थोडक्यात टिपा लिहा :
(१) खग्रास सूर्यग्रहण :
(१) अमावास्येच्या दिवशी सूर्य, चंद्र व पृथ्वी हे तीन खगोल अनुक्रमे एकाच सरळ रेषेत आले, तर चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. (२) पृथ्वीच्या ज्या भागावर चंद्राची दाट छाया ( सावली) पडते, त्या भागातून सूर्य पूर्णपणे झाकलेला दिसतो. यालाच खग्रास सूर्यग्रहण म्हणतात. (३) खग्रास सूर्यग्रहण फार थोडया भागातून अनुभवता येते.
(२) खंडग्रास सूर्यग्रहण :
(१) अमावास्येच्या दिवशी सूर्य, चंद्र व पृथ्वी हे तीन खगोल अनुक्रमे एकाच सरळ रेषेत आले, तर चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. (२) पृथ्वीच्या ज्या भागावर चंद्राची विरळ छाया (सावली) पडते, त्या भागातून सूर्याचा काही भाग दिसतो, तर काही भाग झाकलेला दिसतो. यालाच खंडग्रास सूर्यहण म्हणतात
(३) कंकणाकृती सूर्यग्रहण :
(१) अमावास्येच्या दिवशी सूर्य चंद्र व पृथ्वी हे तीन खगोल अनुक्रमे एकाच सरळ रेषेत असतील व चंद्र अपभू स्थितीत असेल, तर अशा वेळी चंद्राची दाट सावली पृथ्वीवर पोहोचू शकत नाही, ती अवकाशातच संपते. (२) अशा वेळी पृथ्वीवरील अगदी थोड्या भागातून सूर्याची फक्त प्रकाशमान कडा एखादया बांगडीप्रमाणे दिसते. (३) अशा प्रकारच्या सूर्यप्रहणास कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात. (४) कंकणाकृती सूर्य्रहण क्वचितच दिसते
(४) खग्रास चंद्रग्रहण :
(१) पौर्णिमेच्या दिवशी सूर्य पृथ्वी व चंद्र है तीन खगोल अनुक्रमे एकाच सरळ रेषेत आले, तर चंद्राचा पृथ्वीभोवतीचा प्रदक्षिणा मार्ग पृथ्वीच्या दाट सावलीतून जातो. (२) चंद्र पृथ्वीच्या दाट सावलीत आल्यामुळे पूर्णपणे झाकला गेल्यास, त्या स्थितीला खास चंद्रप्रहण] म्हणतात.
(५) खंडग्रास चंद्रग्रहण
(१) पौर्णिमेच्या दिवशी सूर्य, पृथ्वी व चंद्र हेै तीन खगोल अनुक्रमे एकाच सरळ रेषेत आले, तर चंद्राचा प्रदक्षिणा मार्ग पृथ्वीच्या दाट सावलीतून जातो. (२) चंद्र पृथ्वीच्या दाट सावलीत आल्यामुळे अशतः झाकला गेल्यास, त्या स्थितीला खंडयास चंद्रप्रहण म्हणतात.
प्रश्न ९. पुढील तक्ता पूर्ण करा :
चंद्रग्रहण
तिथी दिवस : पौर्णिमा
स्थिती चंद्र-पृथ्वी - सूर्य
ग्रहणांचे प्रकार : खग्रास व खंडग्रास
खग्रासचा जास्तीत जास्त कालावधी १०७ मिनिटे
सूर्यग्रहण
तिथी दिवस : अमावास्या
स्थिती : पृथ्वी - चंद्र- सूर्य
ग्रहणांचे प्रकार :खग्रास, खंडग्रास व कंकणाकृती
खग्रासचा जास्तीत जास्त कालावधी ७ मिनिटे २० सेकंद
आकृती काढा
No comments:
Post a Comment