खालील मुद्दे काळजीपूर्वक वाचा समजून घ्या आणि खाली दिलेली चाचणी सोडवा.
१८२८ राजा राममोहन रॉय यांनी बंगाल प्रांतात 'ब्राहमो समाजा'ची स्थापना केली.
१८४८: महात्मा फुले यांनी पुण्यातील भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा काढली.
१८४९ : दादोबा पांडरंग तर्खंडकर यांनी मंबई येथे 'परमहंस सभे'ची स्थापना केली.
:
१८७३ महात्मा फुले यांनी 'सत्यशोधक समाजा'ची स्थापना केली.
:
१८७५ स्वामी दयानंद सरस्वती यांनी 'आर्य समाजा'ची स्थापना केली
१८९३ अमेरिकेतील शिकागो येथे भरलेल्या विश्वधर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांनी भारताचे प्रतिनिधित्व केले.
१८९७: स्वामी विवेकानंदांनी 'रामकृष्ण मिशन'ची स्थापना केली.
१९१५: 'हिंदू महासभे'ची स्थापना.
१९२५ डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी नागपूर येथे 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघा'ची स्थापना केली.
१. ब्राह्मो समाज १८२८
राजा राममोहन रॉय
(१) अद्वैतवादी विचारसरणी विकसित केली.
(२) एकेश्वरवाद, उच्च-नीच असा भेदभाव न पाळणे.
कर्मकांडास विरोध व प्रार्थनेचा मार्ग अनुसरणे ही तत्वे
(३) सती प्रथा, बालविवाह, पडदा पद्धती यांना विरोध.
(४) विधवा विवाह, स्त्रियांचे शिक्षण यांना समर्थन.
(५) कोलकाता येथे हिंदू कॉलेजची स्थापना.
(६) 'संवाद कौमुदी' या वृत्तपत्राद्वारे जनजागृती.
२. परमहंस सभा ३१ जुलै१८४९
दादोबा पांडुरंग
तर्खडकर
(१) मुंबई येथे स्थापना.
(२) जातिसंस्थेला विरोध.
३. प्रार्थना समाज ३१ मार्च १८६७
आत्माराम पांडुरंग तर्खडकर
(१) मूर्तिपूजेला विरोध, एकेश्वरवाद व कर्मकांडांना विरोध,
(२) उपासना व प्रार्थनेवर भर
(३) अनाथालये, स्त्री-शिक्षण संस्था, कामगारांसाठी रात्रशाळा, दलितांसाठी संस्था सुरू केल्या.
(४) न्या. महादेव गोविंद रानडे, डॉ. रा. गो. भांडारकर, महपी विठ्ठल रामजी शिंदे हे सभासद.
४. सिंगसभा इ. स. १८७०
(१) शिखांमधील धर्मसुधारणेसाठी स्थापना.
(२) शोख समाजात शिक्षणाचा प्रसार आणि आधुनिकीकरण घडवुन आणले.
(३) हेच कार्य पुढे अकाली चळवळीने चालू
५. सत्यशोधक समाज १८७३
महात्मा जोतीराव फुले
(१) समतेच्या तत्त्वावर आधारित समाजनिर्मितीचे कार्य.
(२) स्पृश्य अस्पृश्याला विरोध.
(३) बहुजन समाजाच्या शिक्षणाचा पुरस्कार.
(४) स्त्री-शिक्षणाचा पुरस्कार.
(५) स्त्री-पुरुष व माणसा-माणसांमध्ये भेद करणाऱ्या चालीरितींवर कठोर टीका
(६) 'ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी', शेतकर्यांचा आसूड',
'सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथांदवारे समाज प्रबोधनाचा प्रयत्न
६. आर्य समाज १८७५
स्वामी दयानंद सरस्वती
(१) 'सत्यार्थ प्रकाश' हा वेदांवर भाष्य करणारा ग्रंथ लिहिला.
(२) प्राचीन वैदिक धर्म हाच खरा धर्म ही विचारसरणी.
(३) वैदिक काळात जातिभेद नव्हते, स्त्री-पुरुष समानता होती.
म्हणून 'वेदांकडे परत चला' हे संस्थेचे ब्रीदवाक्य होते.
(४) आर्य समाजाने भारतभर शाखा उघडल्या.
(५) ठिकठिकाणी शिक्षणसंस्था स्थापन केल्या.
७. रामकृष्ण मिशन १८९७
स्वामी विवेकानंद
(१) दुष्काळग्रस्तांना मदत, रोगी, दीनदुबळे यांना औषधोपचार,
स्त्री-शिक्षण इत्यादी लोकोपयोगी कामे केलौ.
(२) १८९३ सालो अमेरिकेतील शिकागो येथे भरलेल्या
विश्वधर्म परिषदेत हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले.
(३) उठा, जागे व्हा व ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका' हा
भारतीय तरुणांना संदेश दिला.
(४) आध्यात्मिक उन्नतीचे कार्य केले
डिप्रेस्ड क्लासेस मिशन १८ ऑक्टो १९०६
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
(१) अस्पृश्य उद्धार करणे हे मुख्य उद्दिष्ट.
सामाजिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुधारकाचे नाव--- स्त्री-उन्नतीसाठी केलेले कार्य
१. राजा राममोहन रॉय
(१) सतीबंदीचा कायदा करण्यासाठी मोठे आंदोलन उभे केले.
(२) त्यामुळे १८२९ साली लॉर्ड बेंटिंक याने सतीबंदी कायदा केला
२. गोपाळ हरी देशमुख
(लोकहितवादी)
(१) लोकहितवादींनी प्रभाकर' या वृत्तपत्रातून विविध प्रश्नांवर [१०४ पत्रे यांनाच 'शतपत्रे असे म्हणतात.
(२) या शतपत्रांतील अनेक पत्रांतून त्यांनी स्त्री -पुरुष समतेचा पुरस्कार केला.
(३) स्त्री-विषयक दुष्ट रूढीवर कठोर टीका केली
३. महात्मा फुले
(१) १८४८ साली पुण्यातील भिडे वाड्यात पहिली मुलीची शाळा' सुरू केली
(२) बालहत्या प्रतिबंधक गृह' स्थापन केले. .
(३) केशवपनाची पद्धत बंद व्हावी म्हणून नाभिकांचा संप केला.
४. सावित्रीबाई फुले
कर्मठ समाजाची टीका सहन करीत शाळेत मुलीना शिकवण्याचे कार्य केले.
५. पंडित ईश्वरचंद्र
विदयासागर
(१) विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्न.
(२) या कामात विष्णुशास्त्री पंडित व वीरेशलिंगम पंतल यांचेही मोलाचे सहाय्य मिळाले
६. गोपाळ गणेश आगरकर
बालविवाह, संमतीवयाचा कायदा यांवर आपल्या 'सुधारक' वृत्तपत्रातून परखड टीका केली.
७. मह्षी विठ्ठल रामजी शिंदे
(१) मुंबई येथे देवदासी प्रथेविस्द्ध परिषद भरवली .
(२) बहुजन समाजातील स्त्रियांसाठी सुधारणेची चळवळ उभारली.
८. ताराबाई शिंदे
(१) 'स्त्री-पुरुष तुलना' हा ग्रंथ लिहिला.
(२) या ग्रंथातून स्त्रियांच्या हक्कांचा पुरस्कार केला.
९. महर्षी धोंडो केशव कवें
(१) विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रमा ची स्थापना केली.
(२) परित्यक्त्या आणि अन्य महिलांना स्वावतलंबी करण्याचा प्रयत्न,
(३) भारतातील पहिले महिला विदयापीठ त्यांच्या प्रयत्याने उभे राहिले.
१०. पंडिता रमाबाई
(१) 'शारदाश्रम 'संस्थेची स्थापना केली.
(२) दिव्यांग मुले-मुली, स्त्रिया यांच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली,
११. रमाबाई रानडे
(१) सेवासदन संस्था स्थापन करून त्यादवारे स्त्रियांसाठी परिचारिका अभ्यासक्रम सुरू केला.
(२) स्त्रियांच्या मतदानाच्या अधिकाराची मागणी सरकारकडे केली
१२. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
स्त्रियांवरील अन्यायाला लेखनातून वाचा फोडली
१३. महात्मा गांधी
(१) स्त्री-शिक्षणाचा पुरस्कार केला.
(२) स्त्रियांना स्वातंत्र्य
-चळवळीत योगदान देण्याची प्रेरणा दिली
७. हिंदू समाजातील चळवळ
संस्थेचे नाव हेतू / माहिती
१. हिंदू महासभा
(१) १९१५ साली स्थापना.
(२) हिंदू समाजाला सन्मानाचे स्थान मिळावे हा हेतू.
२. बनारस हिंदू विद्यापीठ .
(१) पंडित मदन मोहन मालवीय यांनी स्थापना केली.
(२) गरीब मुलांना उच्च शिक्षण मिळावे हा हेतू.
३. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
(१) डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी १९२५ साली स्थापना केली.
(२) हिंदुत्ववादी तरुणांची शिस्तबद्ध व चारित्र्यसंपन्न संघटना उभारणे,
हे ध्येय.

४. पतितपावन मंदिर
(१) स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी रत्नागिरी येथे उभारणी केली.
(२) हिंदू धर्मातील सर्व जातींना मुक्त प्रवेश.
(३) सहभोजनादी कार्यक्रम राबवले गेले.
No comments:
Post a Comment