३- ब्रिटिश सत्तेचे परिणाम अभ्यास आणि चाचणी
इ.स घटना
१७६५ बंगाल प्रांतात रॉबर्ट क्लाइव्हने दूहेरी राज्यव्यवस्था अमलात आणली.
१७७३ रेग्युलेटिंग अॅक्ट संमत.
१७८२ सालबाईचा तह होऊन पहिले मराठा-इंग्रज युद्ध संपले.
१७८४ : पिटचा भारतविषयक कायदा मंजूर झाला.
१८०२ : दुसर्या बाजीराव पेशव्याने वसईचा तह करून इंग्रजांची तैनाती फौज स्वीकारली.
१८१८ : इंग्रज-मराठा यांच्यात तिसरे युद्ध. बाजीराव पेशव्यांचा पराभव. मराठा सत्तेचा अस्त.
१८२७ : छत्रपती प्रतापसिंह यांनी लिहिलेला 'सभानीति' हा राजनीतीविषयक ग्रंथ प्रसिद्ध झाला.
१८२९ : लॉर्ड बेंटिंकने सतीबंदीचा कायदा केला.
१८३५ : लॉर्ड मेकॉलेच्या शिफारशीने भारतात इंग्रजी शिक्षण सुरू झाले.
१८४८ लॉर्ड डलहौसीने दत्तक विधान नामंजूर करून सातारचे राज्य खालसा केले.
१८५३ (i) भारतात मुंबई-ठाणे अशी पहिली रेल्वे धावली.
(ii) कावसजी नानाभॉय दावर यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली.
१८५५ : बंगालमधील रिश्रा येथे तागाची पहिली गिरणी झाली.
१८५६ : लॉर्ड डलहौसीने विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा संमत केला.
१८५७ : कोलकाता, मुंबई व मद्रास (चेन्नई) येथे विद्यापीठांची स्थापना झाली
१. सत्तास्पर्धा :
(१) भारतीय बाजारपेठ काबीज करण्यासाठी डच,पो्तुंगीज, फ्रेंच व इंग्रज यांच्यात तीव्र स्पर्धा सुरू झाली.
(२) सुरुवातीस इंग्रजांविषयी पोतुंगिजांचा असलेला कडवा विरोध पुढे मावळला.
(३) फ्रेंच, डच व स्थानिक सत्ता यांच्याशी मात्र इंग्रजांना झगडावे लागले.
२. इंग्रज-मराठे यांच्यातील युद्धे :
(अ) इंग्रजांचा शिरकाव
(१) इंग्रजांच्या मुंबई या भारतातील प्रमुख केंद्राच्या आसपासच्या प्रदेशावर मराठ्यांची प्रभावी सत्ता होती.
(२) या सत्तेमुळे इंग्रजांना सत्ताविस्तार करता येत नव्हता.
(३) माघवरावांच्या मृत्यूनंतर पेशवेपदाच्या लालसेमुळे त्यांचे चुलते रघुनाथराव याने इंग्रजांची मदत मागितली.
(४) या घटनेमुळे इंग्रजांचा मराठ्यांच्या राजकारणात शिरकाव झाला.
(ब) पहिले युद्ध :
(१) १७७४ ते १८१८ या दरम्यान इंग्रज व मराठे यांच्यात तीन युद्धे झाली.
(२) पहिल्या युद्धात मराठा सरदारांनी एकजुटीने लढाई केल्याने मराठ्यांचा विजय झाला.
(३) १७८२ साली सालबाईचा तह होऊन पहिले युद्ध संपले.
(क) दुसरे युद्ध :
(१) १८०२ मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला.
(२) वसईचा हा तह काही मराठा सरदारांना मान्य नसल्याने इंग्रज-मराठा यांच्यात दुसरे युद्ध झाले.
(३) या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला.
(ड) तिसरे युद्ध :
(१) राज्यकारभारात इंग्रजांचा हस्तक्षेप वाढत चालला.
(२) हा हस्तक्षेप असहय झाल्याने दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले.
(३) १८१८ साली झालेल्या या तिसऱ्या युद्धात पराभव झाल्याने मराठा सत्तेचा शेवट झाला
तैनाती फौज :
(१) इंग्रजांचे भारतावर वर्चस्व निर्माण व्हावे. या हेतुने लॉर्ड वेलस्ली याने १७९८ मध्ये तैनाती फौजेची पद्धत सुरू केली.
(२) तैनाती फौजेचा करार करणाऱ्या सत्ताधीशाचे संरक्षण करण्यासाठी लष्करी फौज दिली जात असे.
(३) तैनाती फौज स्वीकारणाऱ्या राजाला पुढील अटी मान्य कराव्या लागत -
(i) भारतीय राज्यकत्त्यांनी इंग्रजांचे लष्कर आपल्या पदरी बाळगावे.
(ii) त्या लष्कराच्या खर्चासाठी राज्यकर्त्याने इंग्रजांना रोख रक्कम किंवा तेवढ्या उत्पन्नाचा प्रदेश दयावा.
(iii) इंग्रजांच्या मध्यस्थीनेच त्या राज्यकत्त्यने इतर राज्यकर्त्यांशी संबंध ठेवावेत.
(iv) इंग्रजांचा रेसिडेंट (प्रतिनिधी) राजांनी आपल्या दरबारी ठेवावा.
४) तैनाती फौज स्वीकारणारा राजा आपले स्वातंत्र्य गमावून इंग्रजांचा मांडलिक बनत असे.
छत्रपती प्रतापसिंह :
१) पेशवाईच्या अस्तानंतरही सातारच्या गादीवर छत्रपती प्रतापसिंह होते.
२) त्यांच्या मदतीस ग्रँट डफ या अधिकाऱ्याची इंग्रजांनी नेमणूक केली.पुढे त्यांना पदच्युत करून काशी येथे ठेवले.
त्यांचे कारभारी रंगो बापूजी गुप्ते यांनी इंग्लंडमध्ये जाऊन या अन्यायाविरुद्ध दाद मागूनही यश मिळू शकले नाही.
१८४७ साली प्रतापसिंहांचा मृत्यू झाल्यावर १८४८ साली लॉर्ड डलहौसीने दत्तकविधान नामंजूर करून सातारचे राज्य खालसा केले
Mayur
ReplyDelete