५- सुरांची जादूगिरी
चाचणी सोडविण्यासाठी - Click Here
१. खेड्यातील जीवन हे निसर्गाच्या अधिक जवळ असते.त्यामुळे ते नेहमीच ताजे व टवटवीत असते. खेड्यातल्या
परिसरात नेहमीच चैतन्यपूर्ण आवाज भरून राहिलेले असतात.
२. गावामध्ये दिवसाची सुरुवात कोंबड्याच्या आरवल्यावर होते.दळणाचे आवाज सुरू होतात. त्यांना आईच्या गोड गळ्यातील ओव्यांची साथ मिळते.
३. थोड्या वेळाने अंधार विरळ होतो. अवतीभोवतीच्या वस्तू, सर्व दिशा अस्पष्ट, अंधुकशा दिसू लागतात.
प्रकाश अधिकाधिक उजळ होतो, तसतसे आसमंतातील आकार स्पष्ट होत जातात. चिमण्या, कावळे, पोपटा यांचे आवाज कानांवर पडू लागतात.
४. आवाजांत भर पडत जाते. भुकेलेल्या वासरांचे आवाज,बकरीचा आवाज, गोठ्यातल्या जनावरांच्या गळ्यातीलघंटांची किणकिण, गाईची धार काढताना होणारा भांड्यात पडणाच्या दुधाचा आवाज, विहिरीवरीलरहाटाचा आवाज, मोटेचा आवाज हे सर्व आवाज आसमंतात भरून राहतात.
५. आसमंतात आवाजांचे संमेलन भरते. त्यात शाळेतल्या प्रार्थनेचा आवाज असतो. जनावरांचे हंबरणे असते.लहान मुलांचे आवाज तर आभाळभर पसरतात. घरातल्या भांड्यांचे आवाज, स्वयंपाक करतानाचे विविध आवाज, पशुपक्ष्यांचे आवाज, झऱ्यांचे आवाज,ओढ्यांची खळखळ, पानांची सळसळ, कुत्र्यांचे आवाज,कोंबड्यांचे आवाज, देवळातल्या घंटांचे आवाज,जनावरांच्या खुरांचे आवाज, बायकांच्या कांकणांची किणकिण अशा शेकडो आवाजांचे रंगतदार संमेलन खेड्यात भरत असते .
No comments:
Post a Comment