दिनदर्शिका अभ्यास ➤
सामान्य वर्ष : एकूण दिवस 365 = 52 आठवडे + 1 दिवस यामुळे एखाद्या तारखेचा वार 1 दिवस पुढे सरकतो. जसे, 2013 या वर्षी 3 ऑगस्ट रोजी शनिवार आहे तर 2014 ला 3 ऑगस्ट रोजी रविवार असेल.
➤ 1 जानेवारीला जो वार असेल, तोच वार त्या वर्षी 31 डिसेंबरला असतो (लीप वर्षात मात्र वार एक दिवस
पुढचा असेल) त्यामुळे ,1 जानेवारी रोजी असलेला वार त्या वर्षात 53 वेळा येतो
➤ सोमवारी सुरू होणारा सप्ताह रविवारी (7 दिवसांनी) संपतो आठव्या दिवशी पुन्हा सोमवार येतो
➤ लीप वर्ष इसवीसनाच्या ज्या संख्येला 4 ने पूर्ण भाग जातो आणि ज्या शतक वर्षाला 400 ने भाग जातो त्यांना लीप वर्ष म्हणतात लीप वर्षचे दिवस 366 असतात 52 आठवडे व 2 दिवस यामुळे, एखाद्या दिवशी असलेला वार पूढील वर्षात 2 दिवस पुढे सरकतो
➤ लीप वर्षात फेब्रुवारी महिन्याचे 29 दिवस असतात यामुळे । जानेवारी, व 2 जानेवारीला असलेले वार वर्षात 53 वेळा येतात.
➤ लीप वर्षात 1 जानेवारीला बुधवार असेल तर पुढील वर्षाच्या । जानेवारीला शुक्रवार असेल. लीप वर्षातील 28 फेब्रुवारीपर्यंतच्या दिवसांचे वार पुढील वर्षात दोन दिवसांनी पुढे जातात
➤ महिन्यातील 1. 2. 3 या तारखांना जे वार येतात तेय वार अनुक्रमें 29 30. 31 तारखाना येतात
महिन्यातील कोणते वार पाच वेळा येतात. हे यावरून ठरवता येते .
➤ लीप वर्ष नसेल, तर फेब्रुवारी व मार्च मधील कोणत्याही तारखेचे वार सारखेच असतात.
➤ एखादया महिन्यात जेवढे दिवस असतील त्यांना 7 ने भागले की एकूण पूर्ण आठवडेमिळतात
जेवढी शिल्लक राहते, तेवढया दिवसांनी एखाद्या तारखेचा वार पुढच्या महिन्यात पुढे सरकतो.
Pruthviraj sharad Vadar
ReplyDelete