Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

Translate

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image

Saturday, 17 October 2020

Class 8 th English - 2.5 A Heroine of the Sea - Story

Class 8 th English - 2.5 A Heroine of the Sea -  Story

 सागराची नायिका 

इंलंडच्या खडकाळ किनार्याभोवती अनेक एकेकटे दीपस्तंभ उभे आहेत. त्यांचे समुद्रावर चमकणारे प्रकाशझोत खलाशांना रात्रीच्या वेळी धोकादायक खडकांचा इशारा देत असतात. ते दिवे पाहिल्यावर खलाशी आपली जहाजे समुद्रात दूर नेतात. पण कधी  कधी भयंकर वादळे जहाजांना खडकांपर्यंत भेलकांडत  आणतात. 1838 सालच्या रात्री घडलेली, एका शूर मुलीची आणि खडकावरील एका जहाजफुटीची ही कथा आहे.

ग्रेस डालिंग ही एका दीपस्तंभ राखणदाराची मुलगी होती. तिचे सारे आयुष्य तिने गावा -शहरापासून दूर एकाकी दीपस्तंभांमध्ये घालवले होते. त्यांच्या घराजवळ एकही गाव नव्हते. सर्वात जवळचे शेजारीही कित्येक मैल दूर होते. पण ग्रेसचे वडील हुशार आणि सुशिक्षित होते. त्यांनी आपल्या मुलांना अतिशय काळजीपूर्वक वाढवले होते. ग्रेस आणि तिच्या सर्व बहीणभावांना लिहिता-वाचता येत होते. आणि त्यांच्या वडिलांनी त्यांना प्रामाणिक, निर्भय आणि निःस्वार्थीपणाचे धडे दिले होते.

 ग्रेस दहा वर्षांची असताना सारे कुटुंब लॉगस्टोन दीपस्तंभामध्ये राहायला गेले. त्यांचे नवे घर इंग्लंडच्या पूर्व किनार्यावरील कुठल्याशा निर्जन बेटावर होते.डालिंगांची मुले तिथेच मोठी झाली. मोठी झाल्यावर सगळी मुले एकेक करून, शहरांत काम शोधण्यासाठी ते एकाकी घर सोडून बाहेर पडली. अखेर, सगळेजण दीपस्तंभ सोडून बाहेर पडले, फक्त ग्रेस आईवडीलांना मदत करण्यासाठी मागे थांबली. तिची उंची फारशी वाढली नव्हती, ती लहानखुरीच होती. ती अजिबात तिच्या वडिलांसारखी दिसायची नाही, कारण ते चांगले सहा फुटांपेक्षा जास्त उच होते.

सहा सप्टेबर 1838 च्या त्या रात्री, भयंकर वादळ घोंगावत  होते. ग्रेसला वादळांची सवय होती.ती स्वतः त्या मोठया दोपस्तंभामध्ये आरामात व सुरक्षित होती. पण तिला नेहमीच वादळात सापडलेल्या समुद्रातल्या बिचार्या खलाशांसाठी वाईट वाटत असे, त्या रात्री काहीतरी अतिभयंकर  घडणार आहे याची तिला कल्पनाही नव्हती. त्या रात्री एक जहाज खडकांवर आदळून फुटले होते. ग्रेस आणि तिच्या आईवडील यांना त्या धडकेचा आवाज ऐकूही आला नाही. वारयाचा आणि लाटांचा आवाज इतका अतिप्रचंड होता की दुसरे काहीही ऐकू येत नव्हते. पण फॉर्फशायर नावाचे ते गलबत दीपस्तंभापासून मैलभर अंतरावर खडकांवर आपटले होते. बरेचसे प्रवासी बुडाले होते, पण पुरुष आणि स्त्रिया मिळून नऊजण मात्र खडकावर चढू शकले होते. वार्याने त्यांना समुद्रात जवळपास फेकलेच होते, पण ते कसेबसे त्या खडकाला लगटून राहिले होते. दूरवर त्यांना दीपस्तंभाचा उबदार दिवा दिसत होता. पण त्यांच्या आरोळ्या आणि किंकाळया तिथपर्यंत अर्थातच ऐकू जात नव्हत्या, ते रात्रभर तसेच त्या वादळात खडकाला धरून राहिले. दुसर्या दिवशी सकाळी सहा वाजता ग्रेस तयार होत होती. तिने खिडकीबाहेर पाहिले, तर अजूनही वादळ घोंगावत  होते. अचानक ती थबकली! दूरवरच्या खडकांवर काहीतरी दिसत तर नव्हते ? पुन्हा नीट पाहत तिने वडिलांना हाक मारली. हो नक्कीच, काही माणसे तिथे खडकांना लटकलेली होती. पण ती अर्धी समुद्रात होती!

"ते लोक बुडायच्या आत आपण त्यांना वाचवलं पाहिजे! ग्रेस ओरडली.  बाबा, ते लोक मेले तर तुम्ही पुन्हा (शांतपणे) झोपू शकाल का? विल्यम डालिंग हे शूर गृहस्थ होते, पण त्यांनी आपले डोके हलवले. 'काही उपयोग नाही, ते  म्हणाले, 'आपण काही करू शकत नाही. मी स्वत:च या लाटांमधून नाव कशी वल्हवत नेणार आहे? एखादा पुरुष माझ्या मदतीला असता तर!" 

'मी तुम्हांला मदत करीन, बाबा!' ग्रेस ओरडली.

'मलाही एका पुरुषाइतकीच चांगली नाव वल्हक्ता येते, हो की नाही? मी लहान असले तरी कणखर आहे. तुम्ही आणि मी अनेकदा एकत्र वल्हवले आहे.आपण त्या दुर्दैवी लोकांपर्यंत पोहोचू शकतो।" मिसेस डालिंग पती आणि मुलीबरोबर खिडकीशी उभ्या होत्या. 'नाही, नाही! त्या ओरडल्या. 'तुम्हीच बुडालात तर त्याबिचार्या लोकांना कशी मदत होणार? या वादळात तुम्ही वल्हवू शकणार नाही. तसा प्रयत्नही करू नका. ग्रेस, तुझ्यासारखी मुलगी,

एका पुरुषाचे काम करू शकणार नाही. पती, आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करू, देव कदाचित त्यांना वाचवू शकेल, पण आपण नाही!

ग्रेस मात्र ठाम होती. वडील तयार होईपर्यंत ती वाद घालत राहिली. बिचार्या मिसेस डालैंगने, जड अंत:करणाने, त्यांना नाव बाहेर काढण्यास मदत केली ते निघाले तशी त्यांच्याकडे पाहत ती प्रार्थना करीत राहिली.ज्यांनी कुणी समुद्रातले वादळ पाहिले आहे. ते त्या प्रवासाची कल्पना करू शकतात. पर्वता एवढ्या उंच  उसळणार्या लाटांबरोबर ती नाव वर- खाली होत होती. कधी ती या टोकावर, तर कथी त्या टोकावर उभी राहत होती. एकदा तो एका लाटेच्या पार वरच्याटोकापर्यंत गेली, आणि मग लाटांमधल्या खोल दरीतून खाली खाली येत राहिली. प्रत्येक वेळी बोटीने खाली येताना ते जवळजवळ पाण्याच्या खाली गेले.पण, हूह सगळी ताकद लावून बलत ते खडकांच्या जवळ जाऊन पोहोचले. वार्याचा आणि पावसाचा जोर एवढा होता की ग्रेसला खडकाला लटकलेले ते पुरुष व स्त्रिया दिसू शकत नव्हते. तिला फक्त ते मदतीसाठी करीत असलेला आक्रोश ऐकू येत होता. तिच्यापेक्षा आकाराने मोठे असलेले बल्हे पकडून ठेवण्यासाठी तिला तिची सर्व शक्ती पणाला लावावी लागत होती.अखेर ते खडकांपाशी पोहोचले, विल्यम डार्लिंगने खडकावर उडी मारली; तर ग्रेसने एकटीने दोन माणसांना बोटीवर धरून ठेवले. त्या फुटलेल्या जहाजावरच्या दोन खलाशांना वल्हवता येत होते. त्यांनी डालिंग्जना परत दीपस्तंभाकडे जाण्याच्या मोठया प्रवासात वल्हवायला मदत केली. मग ग्रेस आणि तिघी स्त्रिया  खाली उतरल्या. वयस्कर विल्यम डालिगआणि दोघे खलाशी पुन्हा त्या भयाण समुद्रात अजूनही खडकावर अडकलेल्या बाकी चौघाची सुटका  करण्यासाठी परत गेले.

ग्रेसला आता विश्रातीसाठी अजिबात वेळ नव्हता.ती पूर्ण दिवस ती सुटका केलेल्या प्रवाशांना आराम देण्यात आणि खाऊ घालण्यात आपल्या आईबरोबर व्यस्त होती. अनेक दिवसांनी ते प्रवासी ईंग्लंडला आपल्या घरी परत जाऊ शकले. त्यानी त्यांच्या कुटुंबीयांना आणि मित्रपरिवाराला या शूर मुलीची आणि तिच्या वडिलांची कथा सांगितली. अचानक प्रेस डालिंग व तिचे वडील सुप्रसिद्ध झाले. त्यांच्या शौर्याच्या कथा वर्तमानपत्रांतून छापून आल्या सर्व दीपस्तंभ राखणदारांचे एकाकी व धोकादायक जीवन सुधारण्यासाठी मदतनिधी उभारला गेला. ग्रेस आणि तिच्या वडिलांना त्यांच्या शौर्यासाठी विशेष पुरस्कार देण्यात आला. बिचारी ग्रेस त्या सुटकेच्या घटनेनंतर जास्त काळ जगली नाही. वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी ती मरण पावली. पण तिच्या निःस्वार्थी धैर्यासाठी आजही तिचे स्मरण केले जाते, कारण इतरांसाठी तिने तिचे आयुष्य धोक्यात घातले होते.

1 comment:

  1. Apane jivan sathi ko kush kaise rakhe
    Ashya jahirati yethe yogya nahi sir.
    Baki content khup changala Aahe.

    ReplyDelete