Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

Translate

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image

Monday, 7 October 2024

Importance of the day 8 ऑक्टोबर दिनविशेष

 


Importance of the day 8 ऑक्टोबर  दिनविशेष

आजचा दिनविशेष - घटना

:

1932 : इंडियन एअर फोर्स अ‍ॅक्ट द्वारे भारतीय वायूदलाची स्थापना झाली.

1939 : दुसरे महायुद्ध – जर्मनीने पोलंडचा पश्चिम भाग ताब्यात घेतला.

1959 : स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पुणे विद्यापीठाने सन्माननीय डी-लिट पदवी घरी येऊन दिली.

1962 : अल्जीरीयाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.

1962 : नाट्य निकेतन निर्मित, आचार्य अत्रे लिखित व प्रभाकर पणशीकर दिग्दर्शित तो मी नव्हेच या नाटकाचा पहिला प्रयोग दिल्ली येथील आयफॅक्स थिएटर येथे झाला.

1972 : वन्यजीव सप्ताह

1978 : ऑस्ट्रेलियाच्या केन वॉर्बीने पाण्यावर 317.60 ताशी मैल वेगाचा विक्रम केला.

1982 : पोलंडने सॉलिडॅरिटी व इतर सर्व कामगार संघटनांवर बंदी घातली.

2001 : सप्टेंबर 11 च्या अतिरेकी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाची स्थापना केली.

2005 : काश्मीर मध्ये झालेल्या 7.6 रिश्टर भूकंपा मुळे सुमारे 86,000 – 87,500 लोक मृत्युमुखी पडले, 69,000- 72,500 जण जखमी झाले आणि 2.8 दशलक्ष लोक बेघर झाले.

2014 : थॉमस एरिक डंकन, इबोलाचे निदान झालेल्या युनायटेड स्टेट्समधील पहिल्या व्यक्तीचे निधन झाले.

2023 : आदल्या दिवशी हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायल-हमास-2023 युद्ध घोषित केले गेले



आजचा दिनविशेष - जन्म :

1850 : ‘हेन्‍री लुईस ली चॅटॅलिअर’ – फ्रेन्च रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 17 सप्टेंबर 1936)

1889 : ‘कॉलेट ई. वूल्मन’ – डेल्टा एअर लाईन्स चे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 11 सप्टेंबर 1966)

1891 : ‘शंकरराव वासुदेव किर्लोस्कर’ – उद्योजक, साहित्यिक व चित्रकार यांचा जन्म. (मृत्यू : 1 जानेवारी 1975)

1922 : ‘गोपालसमुद्रम नारायण अय्यर रामचंद्रन’ – संशोधक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जैवभौतिक शास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 7 एप्रिल 2001 – चेन्नई, तामिळनाडू)

1924 : ‘थिरूनलूर करुणाकरन’ – भारतीय कवि आणि स्कॉलर यांचा जन्म. (मृत्यू : 5 जुलै 2006)

1926 : ‘कुलभूषण पंडित तथा राजकुमार’ – जबरदस्त आवाजाने संवादफेक करून प्रेक्षकांना खूष करणारा हिन्दी चित्रपट अभिनेता यांचा जन्म. (मृत्यू : 3 जुलै 1996)

1928 : ‘नील हार्वे’ – ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू यांचा जन्म.

1930 : ‘अलेसदैर मिल्ने’ – भारतीय इंग्रजी दिग्दर्शक आणि निर्माता यांचा जन्म. (मृत्यू : 8 जानेवारी 2013)

1935 : ‘मिल्खा सिंग’ – द फ्लाइंग सिख यांचा जन्म.

1960 : ‘रीड हेस्टिंग्स’ – नेटफ्लिक्स चे सहसंस्थापक यांचा जन्म.

1993 : ‘डॉ. काजल तांबे’ – पशुवैद्यक यांचा जन्म.

1997 : ‘बेला थोर्न’ – अमेरिकन अभिनेत्री यांचा जन्म



आजचा दिनविशेष - मृत्यू :

1317 : ‘फुशिमी’ – जपानचे सम्राट यांचे निधन. (जन्म : 10 मे 1265)

1888 : ‘महादेव मोरेश्वर कुंटे’ – कवी व संस्कृतचे प्राध्यापक यांचे निधन. (जन्म : 1 ऑगस्ट 1835 – माहुली, सांगली, महाराष्ट्र)

1936 : ‘धनपतराय श्रीवास्तव ऊर्फ प्रेमचंद’ – हिन्दी साहित्यिक यांचे निधन. (जन्म : 31 जुलै 1880)

1967 : ‘क्लेमंट अ‍ॅटली’ – इंग्लंडचे पंतप्रधान यांचे निधन. (जन्म : 3 जानेवारी 1883)

1979 : ‘जयप्रकाश नारायण’ – स्वातंत्र्यसैनिक व सर्वोदयी नेतेलोकनायक यांचे निधन. (जन्म : 11 ऑक्टोबर 1902)

1996 : ‘गोदावरी परुळेकर’ – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका यांचे निधन. (जन्म : 14 ऑगस्ट 1907)

1998 : ‘इंदिराबाई हळबे’ – देवरुख येथील मातृमंदिर संस्थेच्या संस्थापिका, कोकणच्या मदर तेरेसा यांचे निधन.

2012 : ‘नवल किशोर शर्मा’ – केन्द्रीय मंत्री व गुजरातचे राज्यपाल यांचे निधन. (जन्म : 5 जुलै 1925)

2012 : ‘वर्षा भोसले’ – पत्रकार व पार्श्वगायिका यांचे निधन.

भारतीय हवाई दल दिन

भारतीय हवाई दल दिन दरवर्षी 8 ऑक्टोबरला साजरा केला जातो, जो 1932 साली भारतीय हवाई दलाच्या स्थापनेची आठवण करून देतो. या दिवसाचा उद्देश हवाई दलाच्या शौर्य, समर्पण, आणि त्यागाला सन्मान देणे आहे. भारतीय हवाई दल देशाच्या हवाई संरक्षणासाठी आणि आंतरराष्ट्रीय शांतीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.


भारतीय हवाई दलाने विविध युद्धांमध्ये आणि आपत्ती व्यवस्थापनात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विशेषतः 1965 आणि 1971 च्या युद्धांमध्ये, तसेच कारगिल युद्धात हवाई दलाने देशाच्या संरक्षणात निर्णायक भूमिका निभावली. आधुनिक तंत्रज्ञान, अत्याधुनिक लढाऊ विमानं, आणि कुशल पायलट्स यांच्या बळावर भारतीय हवाई दल जगातील प्रमुख हवाई दलांमध्ये गणले जाते.


हवाई दल दिनाच्या निमित्ताने विविध ठिकाणी विमानांचे भव्य प्रदर्शन, पथ संचलन, आणि शौर्य पदके प्रदान समारंभ आयोजित केले जातात. हा दिवस भारतीय हवाई दलाच्या पराक्रमाला आणि देशाच्या संरक्षणातील त्यांच्या योगदानाला आदरांजली वाहण्याचा एक खास दिवस आहे.




No comments:

Post a Comment