■ उत्क्रांती
◆ खालील घटकाचे काळजीपूर्वक वाचन करा आणि सर्वात खाली या घटकावर आधारित चाचणी सोडविण्यासाठी क्लिक करा...
◆ उत्क्रांतीची संकल्पना
उत्क्रांती या शब्दाचा अर्थ सतत आणि संथ वेगाने होणारा बदल असा होतो. सजीवांच्या जीवनामध्ये उत्क्रांतीच्या संकल्पनेचे स्पष्टीकरण खालील प्रमाणे करता येईल.
पर्यावरणातील बदलाशी जुळवून घेण्याच्या आणि आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याच्या प्रयत्नात एखाद्या विशिष्ट प्राणी जातीतील प्राण्यांच्या शरीररचनेचा मध्ये जे अंतर्गत बदल घडून येतात, कालांतराने तेच बदल त्या प्राणी जातीच्या पुढील पिढ्यांमध्ये अनुवंशिक रुपाने पुढे येतात.अशा तऱ्हेने मूळ प्राणी जातीपेक्षा काही वेगळे वैशिष्ट्य असणारी एक नवीन प्रजाती उदयाला येते. अशी नवीन प्रजाती मूळ प्राणी जातीपेक्षा अधिक उत्क्रांत असते आणि या प्रक्रियेमध्ये अनेकदा मूळ प्राणी जात नष्ट सुद्धा पावते.
● चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने उत्क्रांतीची ही संकल्पना सुस्पष्ट स्वरूपात पहिल्यांदा मांडली.
◆ सक्षम तोच टिकेल
ज्या प्राणी प्रजाती बदलत्या पर्यावरणाशी जुळवून घेण्यासाठी सक्षम असतात ,अशाच प्रजाती पुढे टिकून राहतात.
एखादे अचानक आलेले संकट किंवा पर्यावरणात झालेला आकस्मिक बदल हे डायनासोर या प्रजाती नष्ट होण्याचे कारण असावे असे मानले जाते.
पंख नसलेल्या डायनासोरचे अश्मीभूत अवशेष मिळाले आहेत.
◆ प्राण्यांच्या उत्क्रांतीचे टप्पे
सजीव सृष्टीच्या निर्मितीची सुरुवात आदि जीवापासून झाली आहे. हा पहिला आदिजीव पाण्यामध्ये निर्माण झाला.
एकपेशीय सजीव यापासून बहुपेशीय सजीव निर्माण झाले.बहुपेशीय सजीव हळूहळू उत्क्रांत होत गेले आणि यामधून वनस्पती आणि प्राण्यांची निर्मिती झाली.
● अपृष्ठवंशीय सजीव
अपृष्ठवंशीय सजीव म्हणजे ज्या प्राण्यांच्या कणा नाही असे.
उदाहरण - गोगलगाय
● पृष्ठवंशीय सजीव म्हणजेच त्यांच्या पाठीला कणा आहे.
उदाहरण- मासा हा जलचर पृष्ठवंशीय सजीव आहे.
उभयचर पाणी आणि जमीन दोन्ही ठिकाणी राहू शकतील असे सजीव .
उदाहरण बेडूक
पक्ष्यांमध्ये घार,
सरपटणारे प्राणी उदाहरण-साप
सस्तन प्राणी या गटामध्ये गाय हा पृष्ठवंशीय सजीव आहे.
◆ सस्तन प्राणी
पृष्ठवंशीय प्राण्यांच्या वर्गामध्ये सर्वात अधिक उत्क्रांतचा टप्पा म्हणजेच सस्तन प्राणी होय.
पोटात पिल्लांची वाढ पूर्ण झाल्यावर आईने त्या पिलाला जन्म देणे आणि जन्मानंतर काही काळ तिच्या अंगच्या दुधावर त्याचे पोषण करणे हे सस्तन प्राण्याचे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे.
या सस्तन प्राणी गटांमध्ये अपवाद आहे बदकचोच्या या सस्तन प्राण्याचा आणि मुंगी खाऊ प्राण्यांच्या काही प्रजातींचा हे सस्तन प्राणी अंडी घालतात.
● माणसासारखा दिसणारा वानर म्हणजेच मानवाशी साम्य असणारा वानर यालाच एप वानर म्हणतात. या एप वानरापासून मानवी प्रजाती ची सुरुवात झाली.
मानवांची प्रजाती अस्तित्वात आली. हे प्रथम आफ्रिका खंडामध्ये घडले. या मानवालाच आपण आदिमानव असे म्हणतो. आदी या शब्दाचा अर्थ प्रारंभी आणि प्रारंभी आढळलेला माणूस प्रजातीतील प्राणी म्हणजेच आदिमानव.
◆ जाणून घेऊया चार्ल्स डार्विन यांच्या बद्दल
इसवी सन 1859 मध्ये चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने त्याच्या ओरिजिन ऑफ स्पशिज या ग्रंथामध्ये उत्क्रांतीची संकल्पना मांडली.
डार्विन च्या आधी कार्ल लिनियस या शास्त्रज्ञाने प्राणी जातीचे द्विनाम पद्धती मध्ये वर्गीकरण केले.
शरीर रचनेचा विचार करता वानराच्या काही प्रजातींचा आणि मानवात काही संबंध असावा असे मत त्यांनी व्यक्त केले होते.
डार्विनने त्याच्या पहिल्या ग्रंथांमध्ये क्रांतीच्या प्रक्रियेत वानर आणि मानव यांचा नेमका काय संबंध असू शकतो याविषयी निश्चित मत व्यक्त केले नव्हते.इसवीसन 1871 मध्ये त्यांनी त्याचा दुसरा ग्रंथ प्रकाशित केला. मानवाचे अवतरण या ग्रंथांमध्ये त्याने माणसांना शेपटी नसली तरी त्यांच्या पाठीच्या कण्याची शेवटची हाड हे शेपटीचा अवशिष्ट भाग आहे या गोष्टीकडे लक्ष केंद्रित केले.. माणसाच्या शरीरातील अक्कलदाढ यासारख्या काही अनावश्यक गोष्टी उत्क्रांतीचे निदर्शक असल्याचे त्यांनी नमूद केले.
याच आधारावर आफ्रिकेतल्या जंगलातील गोरिला,चिंपँझी यासारख्या बिनशेपटीच्या प्राण्यांपासून मानव उत्क्रांत झाला असावा अशा अनुमानाला मान्यता मिळाली. त्याच्या अनुमानाला पुष्टी देणारे पुरावे मात्र अजून मिळाले नव्हते व ते पुरावे मिळण्याची सुरुवात विसाव्या शतकामध्ये सुरू झाली होती.
चाचणी सोडविण्यासाठी - क्लिक करा
No comments:
Post a Comment