■ मानवाची वाटचाल-
खालील ठळक मुद्यांचे काळजीपूर्वक वाचन करा आणि सर्वात खाली चाचणी सोडविण्यासाठी क्लिक .करा
◆ एप वानरापासून आदिमानव निर्माण झाला आणि पुढे आदिमानवाने हातांचा उपयोग करून हत्यारांची निर्मिती केली. मानवाच्या या वाटचालीचा प्रवास बघूया.
◆ कुशल मानव ते आधुनिक मानव -
कुशल मानव
हाताच्या कुशलतेने वापर करणारा मानव म्हणजे कुशल मानव होय.मानवाच्या अस्तित्वाचा सर्वप्रथम पुरावा आफ्रिका खंडामध्ये टांझानिया, केनिया या दोन देशांच्या परिसरामध्ये मिळाला.
या मानवाचा शोध लुई लिकी या शास्त्रज्ञाने लावला आणि त्याने याला होमो हॅबिलीस हे नाव दिले. कारण त्याच्या अवशेषासोबत त्याने बनवलेली काही हत्यारे सुद्धा मिळाली होती. लॅटिन भाषेमध्ये होमो या शब्दाचा अर्थ मानव असा होतो. याचा अर्थ हाताचा कुशलतेने वापर करणारा.
कुशल मानव दोन पायावर उभा राहून चालू शकत होता. मात्र त्याच्या पाठीचा कणा पूर्णपणे ताठ नव्हता त्यामध्ये बाक होता.मानवाचा मेंदू एप वानरापेक्षा अधिक मोठा होता आणि त्याच्या चेहऱ्याची व हाता-पायांचे वैशिष्ट्ये मात्र काही अंशी त्याच्यासारखीच होती.
● कुशल मानवाने बनवलेली हत्यारे प्राण्यांची शिकार करण्यासाठी उपयोगात येत नव्हती. ही हत्यारे फक्त मांस खरवणे ,हाडांच्या आतील मगज मिळवणे, हाडे फोडणे या कामासाठी उपयोगी होती. त्यामुळे तो इतर प्राण्यांनी केलेल्या शिकारीतील उरलेसुरले मांस खात असावा असा अंदाज बांधला गेला आहे.छोट्या प्राण्यांची शिकार करत असावा तसेच खाण्यासाठी पक्ष्यांची अंडी आणि फळे कंदमुळे गोळा करत असावा असा सुद्धा अंदाज आहे.
◆ ताठ कण्याचा मानव
ताठ कण्याचा मानव हा मानवाच्या उत्क्रांती मधील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा होय. इरेक्ट म्हणजे ताठ उभा राहणारा म्हणून त्याला होमो इरेक्टस असे नाव दिले गेले. कुशल मानवाच्या तुलनेमध्ये त्याचा मेंदू अधिक विकसित होता.तो समूहाने राहत होता या मानवाला अग्नीची ओळख जंगलात लागणाऱ्या वनवा पासून झाली. झाडांच्या जळत्या फांद्या आणून अग्नीचा वापर करण्याचे तंत्र या मानवाला कळाले असावे. याच्या काळात पृथ्वीवरील फार मोठा प्रदेश हिममय होता त्यामुळे हवामान अतिशीत होते कमालीच्या अतिशीत वातावरणामध्ये राहणे याला शक्य झाले.
या मानवाची हत्यारे पूर्वीच्या हत्यारापेक्षा प्रमाणबद्ध होती.या मानवाने हातकुऱ्हाडी बनवायला सुरुवात केली. आफ्रिका ,आशिया आणि युरोप या खंडात ताठ कण्याच्या मानवाचे अवशेष आणि हत्यारे मिळाली आहे.
◆ शक्तिमान मानव
मानवाच्या क्रांतीमध्ये विकासाचा आणखी एक टप्पा म्हणजे शक्तिमान शक्तिमान. मानवाची शरीरयष्टी धिप्पाड होती या मानवाचे अवशेष सर्वप्रथम जर्मनी या देशांमध्ये निअँडरथल येथे मिळाले म्हणून या माणसाला निअँडरथल मॅन असं म्हणतात.
शक्तिमान मानव त्याचा मेंदू ताठ कण्याच्या मानवापेक्षा अधिक विकसित होता.
शक्तिमान मानव प्रामुख्याने गुहांमध्ये वस्ती करून राहत होता.तो दगडाचे गोटे आणि गोटेत असून निघालेले खिलके यापासून वेगवेगळ्या आकाराची हत्यारे बनवत असे. तो आगीवर अन्न भाजून खात असे.
कठीण लाकडाच्या काट्यांच्या घर्षणातून किंवा गारगोटीचे दगड एकावर एक आपटून ठिणग्या पडून अग्नी निर्माण करण्याची कला त्याला साध्य झाली होती. त्याने काही कलात्मक कौशल्य सुद्धा अंगीकारली होती.
समूहातील एखादा सदस्य मृत झाल्यास त्याचे दफन करताना शक्तिमान मानव मृत व्यक्ती सोबत हत्यारे प्राण्यांची शिंगे यासारख्या वस्तू सुद्धा दफन करत असे. काळाच्या ओघामध्ये शक्तिमान मानवाच्या काही समूहांनी आफ्रिकेतून बाहेर पडून युरोप आणि आशिया खंडात पर्यंत स्थलांतर केले. साहजिकच वातावरणाला त्यांना तोंड द्यावे लागले त्यामुळे जगण्यासाठी आवश्यक असलेल्या हत्यारांच्या पद्धतीमध्ये सुद्धा त्यांनी सुधारणा केली.
◆ शक्तिमान मानव या पेक्षा अधिक प्रगत असणाऱ्या मानवाला बुद्धिमान मानव या नावाने ओळखले जाते. शक्तिमान मानव आणि बुद्धिमान मानव काहीकाळ युरोपमध्ये बरोबरीने राहत होते.
बुद्धिमान मानवाच्या समुहा बरोबरचा संघर्ष पर्यावरणातील बदलाशी जुळवून न घेता येणे अशा काही कारणांमुळे शक्तिमान मानवाचे अस्तित्व संपुष्टात आले असावे असे मानले जाते.
◆ बुद्धिमान मानव आधीच्या कोणत्याच मानवापेक्षा विचार करण्याची अधिक क्षमता असलेल्या मानवाला बुद्धिमान मानव असे म्हटले गेले.
बुद्धिमान मानवालाच होमो सेपियन असे म्हणतात.
सेपियन शब्दाचा अर्थ बुद्धिमान. त्याला युरोपमध्ये क्रोमनोन या नावाने ओळखले गेले. बुद्धिमान मानवाचे अवशेष आफ्रिका, आशिया आणि युरोप या खंडांमध्ये सापडले आहेत. तो गरजेनुसार विविध प्रकारची हत्यारे आणि अवजारे सुद्धा बनवत असे. उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये बुद्धिमान मानवाची स्वरयंत्र पूर्णपणे विकसित झाले होते. तो ध्वनीच्या बारकाव्यांसह विविध विचार करण्यासाठी त्याला ते उपयुक्त बनले होते. त्याच्या जवळच्या आणि तोंडाची आतील स्नायूंची रचना सुद्धा विकसित झालेली होती. त्याला लवचिक जीभ आली होती. त्यामुळे तो विविध ध्वनीचा विचार करून आवाजाला हवे तसे वळण देऊ शकत होता .म्हणूनच बुद्धिमान मानव हा विचार करणारा मानव अशा नावानेसुद्धा ओळखला जाऊ लागला.
◆ प्रगत बुद्धीचा मानव आणि संस्कृती
प्रगत बुद्धीचा
मानव बुद्धिमान मानवाची वैचारिक क्षमता अधिक प्रगत झाली तेव्हा त्याला प्रगत बुद्धीचा मानव या नावाने ओळखले गेले. त्याला आज होमो सेपियन सेपियन असे म्हणतात.
होमो सेपियन सेपियन याच्या मेंदूची क्षमता आणि त्याबरोबरीने त्याची आकलन क्षमता सतत विकसित होत गेली.
● प्रगत बुद्धीचा मानव म्हणजेच आधुनिक मानव म्हणजेच आपण. माणसाचे रंगरूप आरोग्यविषयक वैशिष्ट्ये इत्यादी बाबी पूर्वजांची साम्य दर्शवणाऱ्या असतात. याच बाबीला अनुवंशिकता असं म्हणतात.
अनुवांशिकतेचा अभ्यास करणारे शास्त्र असते त्याला जनुकशास्त्र असे म्हणतात.
● जनुकशास्त्र संशोधनाच्या आधारे मानवामध्ये शक्तिमान मानवाचा काही अंश असल्याचे आढळून आले आहे. त्याच्याच आधारे शक्तिमान मानव आणि बुद्धिमान मानव हे दोघे आधुनिक मानवाचे पूर्वज आहेत असे म्हटले जाते.
◆ आधुनिक मानवाचे प्रगत बुद्धीचा मानव हे नाव त्याच्या शारीरिक क्षमतेपेक्षा त्याच्या बौद्धिक आणि सांस्कृतिक क्षमतेनुसार जास्त निदर्शक ठरली. अन्न मिळण्याची मूलभूत गरज सर्वच प्राणी पूर्ण करतात परंतु आधुनिक मानव त्यावरच समाधान मानत नाही.
कल्पकता, बुद्धिकौशल्य आणि हस्तकौशल्य यांच्या आधारे स्वतःचे जीवन समृद्ध करण्याच्या सततच्या प्रयत्नातून मानवी संस्कृती उदयाला आली आणि पुढे ती विकसित होत राहिली. पशुपालनाला आणि शेतीला सुरुवात झाल्यापासून मानवाने केलेली तांत्रिक आणि सांस्कृतिक वाटचाल ही अतिशय वेगवान आहे. माणूस सदृश्य वानरापासून सुरू झालेला मानवाचा वाटचालीचा हा इतिहास पुढे अनेक टप्प्यांमध्ये विभागला गेला आहे.
चाचणी सोडविण्यासाठी - क्लिक करा
Nice platform
ReplyDeletePlease test pathva
ReplyDelete