10 - गोमू माहेरला जाते
कवितेचा अर्थ समजून घेवूया ...........
अहो, नावाडी दादा, नुकतीच लम्न झालेली नववधू गोमू सासरहून कोकणात माहेराला जाते आहे.(ती व तिचा पती होडीत बसले आहेत.) तिच्या नवऱ्याला कोकणातला निसर्ग दाखवा.कोकणातली निळ्या पाण्याची खाडी दाखवा. खाडीच्या दोन्ही काठांवर असलेली हिरवीगार झाडांची राई दाखवा. भगव्या रंगाचा अबोलीच्या फुलांचा मनोहर गुच्छ दाखवा.कोकणात राहणारी माणसे अगदी साधी, भोळी-भाबडी आहेत. त्यांच्या मनात जणू कोवळ्या नारळाचे गोड पातळ खोबरे आहे. (म्हणजे कोकणी माणसांची मने मृदू आहेत.) किनाऱ्यावर उंचच उंच माडांची रांग आहे. त्यांची उंची जवळून मापता येईल. त्यांना माडांची झाडे दाखवा.हे अवखळ, चंचल वाऱ्या, आता तुझा सर्व खोडकरपणा सोडून या होडीच्या शिडामध्ये ये. इकड़े तिकड़े न फिरता शिडात शीर म्हणजे होडी किनाऱ्याला लागेल. पाहा, किनारा अगदी जवळ आला. आता आपली नौका पटकन किनाऱ्याला टेकवूया. (नववधू माहेराला जायला अधीर झाली आहे.)
कोकणची वैशिष्ट्ये
कोकणच्या खाडीच्या पाण्याचा रंग निळा आहे.
कोकणातली शहाळयासारखी गोड व साधीभोळी आहेत.
खाडीच्या हिरवीगर्द झाडी व उंचच उंच माड आहेत.
भगव्या रंगाच्या फुलांचा ताटवा सर्वत्र फुललेला दिसतो
प्रश्न पुढील ओळींचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा :
(१) काळजात त्यांच्या भरली शहाळी -
उत्तरे : (१) शहाळे म्हणजे कोवळा नारळ होय. शहाळयातले पाणी मधुर व खोबरे गोड असते. माणसांची मने कोमल व स्वभाव गोड असतो.
(२) झणी धरणीला गलबत टेकवा
गोमू कोकणात माहेराला होडीत बसून येत आहे. तिला माहेरची खूप ओढ आहे. माहेराला [जायला "तिचे मन आतुर झाले आहे. त्यामुळे हे गलबत पटकन धरतीला टेकवा म्हणजे गोमू माहेराला लवकर जाईल.
No comments:
Post a Comment