मराठी 9 - नात्याबाहेरचं नातं
वाक्प्रचार समजून घेवूया ...............
(१) आगेकूच करणे - पुढे जाणे.
(२) रंग चढणे - आनंदाचे अत्युच्च शिखर गाठणे.
(३) आश्चर्याचा धक्का बसणे - अचानक चकित होणे.
(४) सुन्न होणे - बधिर होणे.
(५) भास होणे - भ्रम होणे.
(६) नजर खिळणे - एका जागेवर लक्ष लागणे.
(७) नखशिखान्त न्याहाळणे - आपादमस्तक नीट पाहणे.
(८) भंग करणे - मध्येच खंडित करणे.
(९) कणव निर्माण होणे - दया येणे.
(१०) हायसे वाटणे - जिवाला शांती मिळणे, बरे वाटणे.
(११) चेहरा खुलणे - मुखावर आनंद दिसणे.
(१२) चोरट्या नजरेने पाहणे - गुपचूप पाहणे.
(१३) आपुलकी निर्माण होणे - प्रेम वाटणे.
(१४) मनात घिरट्या घालणे - (एखादा विचार) मनात फिरत राहणे.
(१५) मुक्या शब्दांचा मार देणे- न बोलता समज देणे.
(१६) उत्साह द्विगुणित करणे - उत्साह वाढवणे.
(१७) भुरळ घालणे - भूल पडणे, मोह होणे.
(१८) दातखिळी बसणे - घाबरून बोलता न येणे.
(१९) मनात घर करणे - - मनात रुतून बसणे.
(२०) घाबरगुंडी उडणे घाबरून जाणे.
(२१) काळजात धस्स होणे - घाबरल्यामुळे धक्का बसणे.
(२२) छाप पाडणे - ठसा उमटवणे, प्रभाव पाडणे.
(२३) शिरकाव करणे आत घुसणे.
(२४) चाहूल घेणे अंदाज घेणे.
(२५) बोबडी वळणे - घावरल्यामुळे शब्द न फुटणे.
(१) लेखकांनी कुत्र्याच्या पिल्लाला थेट घरी आणले.
उत्तर : थंडीने कुडकुडणार्या व कण्हत असलेल्या कुत्र्याच्या पिल्लाला कायमचा आधार मिळावा म्हणून लेखकांनी त्याला थेट घरी आणले.
(२) लेखकांनी कुत्र्याच्या पिल्लाचे नाव 'डांग्या ' ठेवले.
उत्तर : कुत्र्याच्या पिल्लाचे शरीर दांडगे होते, म्हणून लेखकांनी त्याच्या शरीराला साजेसे असे त्याचे नाव डांग्या' ठेवले.
(३) लेखक डांग्याला 'पक्क्या हिमतीचा राखण्या' म्हणतात.
उत्तर : डांग्याची शेतामधली रखवाली अशी होती की, अट्टल चोरांचीही दातखिळी बसायची डांग्याच्या नुसत्या कर्तबगारीने भल्याभल्यांची बोबडी वळायची. म्हणून लेखक डांग्याला 'पक्क्या हिमतीचा राखण्या' म्हणतात.
थंडीच्या झंकाराची वैशिष्ट्घे १) हळवा. २) सर्वांगाला वेढून टाकणारा. ३) रान, पानाफुलांना आपल्या इशान्यावर नाचवणारा. ४) नदीच्या झुळझुळणाच्या पाण्याला मंद लहरीवर खेळवणारा.
No comments:
Post a Comment