Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

Translate

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image

Tuesday, 25 August 2020

8 वी - इतिहास (4) -1857 चा स्वातंत्र्यलढा अभ्यास आणि चाचणी

वी -  इतिहास (4) -1857 चा स्वातंत्र्यलढा 


खालील मुद्दे काळजीपूर्वक वाचा आणि खाली दिलेली  चाचणी सोडवा .......

इ.स                                                           प्रमुख घटना 

१८०३                                 इंग्रजांनी ओडिशा जिंकून घेतले.

१८०६                                 वेल्लोर येथील लष्करी छावणीतील हिंदी शिपायांनी उठाव केला.

१८१७                                ओडिशातील पाइकांनी इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव केला.

१८२४                                बराकपूर येथे हिंदी शिपायांनी उठाव केला.

१८३२                                उमाजी नाईकांचा उठाव मोडून त्यांना फाशी देण्यात आले.

१८५७ :                              बराकपूर येथे मंगल पांडे यांनी इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली. स्वातंत्र्यलढ्याला                                            सुरुवात.

                                        मेरठ छावणीतील हिंदी शिपायांनी दिल्लीचा ताबा घेऊन मुघल बादशाह बहादुरशाह                                             यांना लढ्याचे नेतृत्व   दिले.

 १८५७                               खानदेशात कजारसिंग यांच्या नेतृत्वाखाली भिल्लांचा लढा. 

१८५८                                स्वातंत्र्यलढा समाप्त. राणी व्हिक्टोरिया हिचा भारतीयांसाठी जाहीरनामा प्रसिद्ध.

१८५८                                भारतातील ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात. इंग्लंडच्या पार्लमेंटच्या हाती                                                   भारताची सत्ता देण्यात आली. 

 आता लढा समजून घेवूया 

(१) १८५७ पूर्वी इंग्रजी सत्ता असलेल्या प्रदेशातील लोकांना या सत्तेचे दुष्परिणाम भोगावे लागत होते.

२) कंपनी सरकार करीत असलेल्या आर्थिक शोषणामुळे जनतेत असंतोष वाढत गेला.

(३) १७७० मधील बंगाल प्रांतात पडलेल्या दुष्काळाच्या काळात इंग्रजांनी कोणत्याही उपाययोजना न करता ते           संवेदनशून्य वागले.

(४) शेतकरी व सामान्य जनता दरिद्री झाली.

१८५७ पूर्वीचे लढे :

   प्रदेश                                                           लढा दिलेल्या वर्गाचे नाव / माहिती


१)बंगाल                       १७६३ ते १८५७ या काळात प्रथम संन्याशांच्या व नंतर फकिरांच्या नेतृत्वाखाली                                                     शेतकऱ्यांनी लढे दिले.


२)महाराष्ट्र                 (i) उमाजी नाईक यांनी रामोशी युवकांना संघटित करून लढा दिला.

                                   (ii) भिल्ल  कोळी, रामोशी यांनी लढे दिले.

                                   (iii) कोल्हापूर परिसरात गडकऱ्यांनी उठाव केला. 

                                   (iv) कोकणात फोंड-सावंतांनी लढा दिला.

 ३)ओडिशा                  गोंड जमातीने उठाव केला.


४)बिहार                     संथाळांनी लढा दिला.

५)छोटा   नागपूर        कोलाम जमातीने उठाव केला.

६)वेल्लोर                  १८०६ मध्ये कंपनी सरकारच्या सेवेतील हिंदी सैनिकांनी बंड केले.

७)बराकपूर               १८२४ मध्ये बराकपूरच्या छावणीत   हिंदी सैनिकांनी उठाव केला.

 १८५७ च्या लढ्याची कारणे :

(अ) आर्थिक कारणे :

(१) नव्या महसूल पद्धतीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खालावली.

(२) महसूल रोखीने व जबरदस्तीने वसूल करण्याच्या पद्धतीमुळे शेतीव्यवस्था कोलमडली.

(३) गावगाड्याचे स्वरूप बदलून जनतेत अस्थिरता व असुरक्षिततेची भावना निर्माण झाली.

(४) उदघोगधंदघांवरील जाचक करांमुळे भारतीय उदयोगधंदयांचा ऱ्हास झाला.

(५) कामगार वर्ग, कारागीर बेकार झाले, त्यामुळे जनतेत असंतोष वाढीस लागला.

(ब) सामाजिक कारणे

(१) आपल्या चालीरीती, परंपरा, रूढी यात इंग्रज हस्तक्षेप करीत असल्याची भावना समाजात निर्माण झाली.

(२) सतीबंदी, विधवाविवाहाला मान्यता असे कायदे सरकारने केले. त्यामुळे सरकार जीवनपद्धती मोडू पाहत असल्याची भावना आपल्या समाजात निर्माण झाली.

(क) राजकीय कारणे :

(१) इंग्रजांनी १८४८ पूर्वी अनेक राज्ये जिंकलेली होतीच.

(२) १८४८ ते १८५६ दरम्यान डलहौसीने अनेक संस्थाने खालसा केली 

(ड) हिंदी सैनिकांत असंतोष :

(१) हिंदी सैनिकांना तुच्छतेची व दुजाभावाची वागणूक मिळे.

(२) सुभेदारपदापेक्षा वरचे पद मिळत नसे.

(३) इंग्रज सैनिकापेक्षा हिंदी सैनिकाचा पगार कमी असे.

(४) सुरुवातीस मिळणारे भत्तेही हळूहळू कमी झाले.

(इ) तात्कालिक कारण :

(१) १८५६ साली हिंदी सैनिकांना नव्या एन्फिल्ड बंदुका देण्यात आल्या.

(२) त्यातील काडतुसांवरील आवरणाला गायीची व डुकराची चरबी लावली जाते अशी बातमी छावणीत पसरली.

(३) हे आवरण दाताने तोडावे लागे, त्यामुळे सैनिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या.

 (४) ही काडतुसे नाकारणाऱ्या सैनिकांवर शिस्तभंगाची| कारवाई करून सैनिकांना जबर शिक्षा देण्यात आल्या।

४. उठावातील घटनाक्रम :

(१) काडतुसे वापरण्याची सक्ती करणाऱ्या इंग्रश अधिकार्यावर बराकपूर छावणीतील मंगल पांडे यांनी २९ मार्च १८५७ रोजी गोळी झाडली.

(२) मंगल पांडे यांना फाशी दिल्याची वार्ता समजताच मेरठ येथील पलटणीने बंड पुकारले.

(३) या सैनिकांनी दिल्लीला कूच करून १२ मे १८५७ रोजी दिल्ली जिंकून घेतली.

(४) मुघल बादशाह बहादुरशाह याला त्यांनी 'भारताचा सम्राट' म्हणून घोषित केले.


५. स्वातंत्र्यलढ्याची व्याप्ती:

(१) स्वातंत्र्यलढ्याचे लोण बिहारपासून राजपुतान्यापर्यंत पसरले.

(२) लखनौ , अलाहाबाद, कानपूर, बनारस, बरेली, झाशी अशा उत्तर पट्ट्यात उठावाला प्रारंभ झाला.

(३) दक्षिणेत नागपूर, सातारा, कोल्हापूर, नरगुंद येथे बंडाने पेट घेतला.

(४) खानदेशातील उठावात चारशे भिल्ल स्त्रिया  सहभागी झाल्या.

(५) नाशिक जिल्ह्यातील पेठ-सुरगाण्याच्या राणी सामील झाल्या.

लढयाला आलेले राष्ट्रीय स्वरूप 

(१) लढ्याची  सुरुवात  हिंदी सैनिकांमधील असंतोषाच्या उद्रेकाने  झाली .

(२) त्यात शेतकरी, कारागीर ,सामान्य जनता. जमीनदार आणि राजेही सामील झाले.

(३) इंग्रजांच्या वर्चस्वातून  मुक्त होणे. हेच  सर्वाचे समान ध्येय होते.

(४) हिंदू-मुस्लोम, विविध जाती-जमाती, अमीर- उमराव या लढ्यात  सहभागी झाल्याने या लढ्याला  व्यापक राष्ट्रीय  स्वरूप प्राप्त झाले.


अपयशाची कारणे 

(१) संपूर्ण भारतभर एका वेळी लढ़ा झाला नाही.

(२) राजपुताना, बंगाल, ईशान्य भारत, दक्षिण  भारत लढ्यापासून  लांब राहिला.

(३) लढयाला एककेंद्री नेतृत्व नव्हते.

(४) अनेक संस्थानिक इंग्रजांशी एकनिष्ठ राहिले.

(५) लष्करी डावपेच आखण्यात भारतीय कमी पडले.

(६) सैनिकांकडे पुरेशी शस्त्रे नव्हती, अद्ययावत शस्त्र  नव्हती.

(७) अनुभवी  नेतृत्व , आर्थिक ताकद यांचा अभाव होता.

(८) दळणवळणाची साधने इंग्रजांकडे असल्याने सैन्याच्या जलद हालचाली त्यांना करता आल्या.


१० स्वातंत्र्य लढयाचे परिणाम 

(१) इंस्ट इंडिया कंपनीच्या कारभाराविरुद्ध भारतीय जनतेत असंतोष आहे. याची जाणीव इंग्लंडच्या राणीला   झाली.

(२) भारतातील इंग्रजांची सत्ता कंपनीच्या हाती सुरक्षित नाही याची त्यांना खात्री झाली.

(३) १८५८ मध्ये ब्रिटिश पालमेंटने कायदा करून कंपनीची भारतातील सत्ता  संपुष्टात आणून पालमेंटची सत्ता प्रस्थापित करण्यात आली.

(४) दूरगामी परिणाम म्हणजे भारतात प्रादेशिक निष्ठांच्या जागी राष्ट्रीय भावनेचा उदय झाला.

(५) इंग्रजी सत्तेला संघटित विरोध केला पाहिजे, याची भारतीयांना जाणीव झाली.

(६) या लढयाची प्रेरणा भारतीय स्वातंत्र्य चळवळीला मिळाली.

११. राज्यकारभारातील बदल :

(१) ब्रिटिश पार्लमेंटने कंपनी सरकारचे गवर्नर  जनरल हे पद रद्द करून 'व्हाईसराय ' हे नवीन  पद निर्माण केले.

(२) भारताविषयी कारभार करण्यासाठी 'भारतमंत्री' हे पद इंग्लंडच्या शासनात निर्माण केले.

(३) या बदलाप्रमाणे लॉर्ड कॅनिंग हा भारतातील शेवटचा  गव्हर्नर जनरल आणि पहिला व्हाइसरॉय ठरला.


१२. राणीचा जाहीरनामा :

(१) इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिने १८५८ साली एक जाहीरनामा प्रसिद्ध करून भारतीयांना आश्वासने दिली.

(२) सर्व भारतीय आमचे प्रजाजन आहेत.

(३) वंश, धर्म, जात किंवा जन्मस्थान यांवरून त्यांच्यात भेदभाव केला जाणार नाही.

(४) गुणवत्ता लक्षात घेऊनच नोकऱ्या  दिल्या जातील.

(५) सरकार लोकांच्या धार्मिक बाबतीत हस्तक्षेप करणार नाही.

(६) यापुढे  संस्थानिकांशी केलेले करार पाळले जातील.

(৩) कोणत्याहौ कारणाने संस्थाने खालसा केली जाणार नाहीत.


१३. लष्कराची पुनर्रचना :

(१) भारतीय सैनिक एकत्र येऊन पुन्हा लढा उभारू नये; म्हणून लष्कराची पुनर्रचना करण्यात आली.

(२) लष्करातील इंग्रज सैन्याचे प्रमाण वाढवण्यात आले.

(३) महत्त्वाच्या जागी इंग्रज अधिकार्यांच्या नेमणुका करण्यात आल्या.

(४) तोफखान्यावर पूर्णपणे इंग्रज अधिकाऱ्याचे नियंत्रण ठेवले गेले.

 (५) लष्करी तुकड्यांची जातवार विभागणी करण्यात आली.


१४. धोरणात्मक बदल :

(१) भारतीय समाज सामाजिक दृष्टीने एकसंघ न होण्याची काळजी घेण्यास सुरुवात.

(२) सामाजिक व धार्मिक बाबतीत हस्तक्षेप करायचा नाही.

(३) जात, धर्म, वंश, प्रदेश या कारणांवरून भारतीयांत मने कलूषित  होतील, असे प्रयत्न करणे.

(४) फोडा आणि राज्य करा ही नीती  वापरून इंग्रजांनी सत्ता दृढ करण्यावर भर दिला.

3 comments: