7- सम ,विषम ......अभ्यास आणि चाचणी
(1) सम संख्या :
ज्या संख्येला 2 ने नि:शेष भाग जातो, ती सम संख्या असते. सम संख्येच्या एककस्थानी 2
किवा 0 यांपैकी कोणताही एक अंक असतो.
(2) विषम संख्या :
ज्या संख्येला 2 ने भागले असता बाकी 1 उरते ती विषम संख्या असते. विषम संख्येच्या एकक स्थानी ।, 3, 5, 7 किंवा 9 यांपैकी कोणताही एक अंक असतो.
(3) कोणतीही सम संख्या तिच्या आधीच्या सम संख्येपेक्षा 2 ने मोठी असते. एक सम संख्या x मानल्यास
तिच्या लगतची पुढची सम संख्या (x+ 2) ही असते.
दोन लगतच्या विषम संख्यांमधील फरक 2 असतो. एक विषम संख्या x मानल्यास तिच्या लगतची पुढचा
विषम संख्या (x +2) व
लगतची मागची विषम संख्या (x - 2) ही असते.
दोन सम संख्यांची बेरीज सम संख्याच असते. उदा. 18 + 10 = 28.
दोन सम संख्यांचा गुणाकार सम संख्याच असतो. उदा., 4 x 6 = 24.
दोन विषम संख्यांची बेरीज सम संख्याच असते. उदा., 23 + 25 = 48.
दोन विषम संख्यांचा गुणाकार विषम संख्या असतो. उदा., 9 x 11 = 99.
दोन विषम संख्यांच्या बेरजेला एखाद्या विषम संख्येने नि:शेष भाग जात असेल, तर येणारा भागाकार सम संख्या असतो.
मूळ संख्या : एकाहून मोठ्या अशा ज्या संख्येला 1 किंवा तीच संख्या याशिवाय दुसऱ्या कोणत्याही संख्येने
नि:शेष भाग जात नाही, त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात.
2 ते 100 मधील मूळ संख्यांचा पुढील तक्ता पाहा व त्या लक्षात ठेवा :
संख्या मूळ संख्या
2 ते 10 2,3,5,7
11 ते 20 11,13,17,19
21 ते 30 23,29
31 ते 40 31. 37
41 ते 50 41,43,47
51 ते 60 53,59
61 ते 70 61,67
71 ते 80 71,73,79
81 ते 90 83,89
91 ते 100 97
संयुक्त संख्या :
ज्या संख्येला । व ती संख्या याशिवाय इतरही संख्यांनी निःशेष भाग जात असेल, तर ती संख्या संयुक्त संख्या असते. उदा., 6 या संख्येला 1 व 6 यांव्यतिरिक्त 2 व 3 या संख्यांनी सुद्धा नि:शेष भाग जातो. म्हणून 6 ही संयुक्त संख्या आहे.
2 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या व 74 संयुक्त संख्या आहेत.
1 ही संख्या मूळ संख्याही नाही व संयुक्त संख्याही नाही.
जोडमूळ संख्या : ज्या दोन मूळ संख्यांमध्ये 2 चा फरक असतो,
संख्या किंवा जुळ्या मूळ संख्या असे म्हणतात. उदा., 3, 5; 5, 7; 11, 13; 29, 31 या जुळ्या मूळ अशा जोडीतील मूळ संख्यांना जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत.
1 व 100 च्या दरम्यान अशा जोडमूळ संख्यांच्या 8 जोड्या आहेत.
No comments:
Post a Comment