1- संसदीय शासन पद्धतीची ओळख अभ्यास आणि चाचणी

अ) शासनसंस्थेच्या शाखा व त्यांची मुख्य कामे
(१) कायदेमंडळ कायदयाची निर्मिती करणे.
(२) कार्यकारी मंडळ : कायदयाची अंमलबजावणी करणे.
(३) न्यायमंडळ : न्यायदान करणे.
(ब) शासनपद्धतीचे प्रकार :
संसदीय शासनपद्धती,
अध्यक्षीय शासनपद्धती
(१) संसदीय शासनपद्धती :
(अ) इंग्लंडचे योगदान
(१) संसदीय शासनपद्धती इंग्लंडमध्ये विकसित झाली.
(२) रूढ संकेतांच्या आधारे बराचसा कारभार चालणार्या इंग्लंडमध्ये अलिखित संविधान आहे.
(३) इंग्लंडची पालमेंटसुद्धा उत्क्रांत झालेली संस्था आहे.
(४) भारताने इंग्लंडच्या संसदीय शासनपद्घतीचा स्वीकार केलेला असला तरी दोन्हींमध्ये काही बाबतींत फरकही आहे.
(ब) भारतीय संसदीय शासनपद्धतीची वैशिष्टे
(१) राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा मिळून भारताचे
कायदेमंडळ तयार होते.
(२) लोकसभेतील सदस्यांची निवड थेट जनतेकहून
होते.
(३) बहुमत मिळवणारा पक्ष सरकार बनवतो.
(४) लोकसभेत एखादधा पक्षाला बहुमत मिळ
नाही, तर आषधाडी करून सरकार बनवले जाते.
(५) बहुमतातील पक्षाचा नेता प्रधानमंत्री होतो व तो
आपले मंत्रिमंडळ निवडतो
(क) जबाबदार शासनपद्धती
(१) प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ आपल्या कामासाठी. .कायदेमंडळाला (संसदेला) जबाबदार असते.
(२) कायदेमंडळाला विश्वासात घेऊनच मंत्रिमंडळाळ काम करावे लागते.
(३) एखादया खात्याचा निर्णय हा संपूर्ण मंत्रिमंडळाचा निर्णय मानला जातो.
(४) सामूहिक जबाबदारीच्या तत्त्वावर मंत्रिमंडळ काम करीत असते.
(ड) अविश्वासाचा ठराव : नियंत्रणाचे प्रभावी साधन :
(१) संसदीय शासनपद्धतीत कायदेमंडळाच्याविश्वासावरच कार्यकारी मंडळ काम करते.
(२) संसदेच्या इच्छेनुसार कार्यकारी मंडळ कार्य करीत नसेल तर संसद मंत्रिमंडळाविरुद्ध अविश्वासाचा ठराव आणू शकते.
(३) संसदेने (लोकसभेने) बहुमताने अविश्वासाचा ठराव मंजूर केल्यास मंत्रिमंडळाला राजीनामा दयावा लागतो.
(४) अविश्वासाचा ठराव हे मंत्रिमंडळावर नियंत्रणठेवण्याचे प्रभावी साधन असते.
(२) संसदीय शासनपद्धती आपण स्वीकारण्याची कारणे
(१) ब्रिटिश काळातच भारतात संसदीय शासनपद्धतीचा पाया घातला गेला.
(२) ब्रिटिशांनी भारतात याच पद्धतीने राज्यकारभार केला
(३) अध्यक्षीय शासनपद्धतीची वैशिष्ट्ये :
(१) राष्ट्राध्यक्ष थेट जनतेकडून निवडून येतो.
(२) कायदेमंडळ कार्यकारी मंडळापासून अलिप्त असले तरी परस्परांवर योग्य नियंत्रणही असते.
(३) राष्ट्राध्यक्षाला कायद्यांच्या अंमलबजावणीचे अधिकार असतात.
(४) अमेरिकेने अध्यक्षीय पद्धतीचा स्वीकार केला आहे.
(५) फ्रान्स, जर्मनी, स्वित्झर्लंड, श्रीलंका येथे या दोहोंपेक्षा अन्य शासनपद्धत्तींचा स्वीकार केला आहे
खूप छान पद्धत
ReplyDelete