Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

Translate

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image

Friday, 25 September 2020

8 Scholarship गणित - विभाज्यता अभ्यास

 2, 4 व 8 च्या कसोट्या :

(a) संख्येच्या एकक स्थानी जर 0. 2.4. 6. 8 यांपैकी एखादा अंक असल्यास त्या संख्येला 2 ने नि:शेष भाग

जातो. उदा., 16, 22, 38, 50.

(b) ज्या संख्येतील एकक व दशक स्थानच्या अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला 4 ने निःशेष भाग जातो. त्याचप्रमाणे ज्या संख्येमध्ये शेवटी दोन शून्ये असतात. अशा संख्येला 4 ने नि:शेष भाग जातो.

उदा., 200,

(c) ज्या संख्येतील एकक, दशक व शतक स्थानच्या अंकांनी तयार होणार्या संख्येला 8 ने नि:शेष भाग जातो.

त्याचप्रमाणे ज्या संख्येमध्ये शेवटी तीन शুन्ये असतात. त्या संख्येला 8 ने नि:शेष भाग जातो.

उदा. 4000,

2) 3, 6 व 9 च्या कसोटया

(a) ज्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला 3 ने नि:शेष भाग जातो, तसेच कोणत्याही तीन अंकी संख्येत तीनही

अंक समान असतील, तर त्या संख्येला 3 ने नि:शेष भाग जातो. उदा., 123.

(b) ज्या सम संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला 3 ने नि:शेष भाग जातो, त्या संख्येला 6 ने नि:शेष भाग जातो.

उदा., 462.

(c) ज्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला 9 ने नि:शेष भाग जातो, त्या संख्येला 9 ने नि:शेष भाग जातो.

उदा., 1278.

(3) 5 व 10 च्या कसोट्या :

(a) ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 किंवा 0 यांपैकी एखादा अंक असेल, त्या संख्येला 5 ने नि:शेष भाग जातो.

उदा., 375, 2500.

(b) ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य हा अंक असतो, त्या संख्येला 10 ने नि:शेष भाग जातो.

उदा., 90, 2010.

(4) 7 ची कसोटी :

दिलेल्या संख्येतील एकक स्थानची दुप्पट ही उरलेल्या अंकांनी तयार होणाऱ्या संख्येतून वजा केली असता

वजाबाकी शून्य अथवा 7 ने विभाज्य असेल, तर त्या संख्येला 7 ने नि:शेष भाग जातो. 

(5) 11 ची कसोटी :

एखाद्या संख्येतील सम स्थानच्या अंकांची बेरीज व विषम स्थानच्या अंकांची बेरीज यांमधील फरक शुन्य

अथवा 11 च्या पटीत असल्यास, त्या संख्येला 11 ने नि:शेष भाग जातो. उदा., 1474 या संख्येत विषम स्थानच्या अंकांची बेरीज = 1 +7=৪ आणि सम स्थानच्या अंकांची बेरीज = 4 + 4 = 8, बेरजेतील फरक = 8-8=0. 

1474 या संख्येला 11 ने नि:शेष भाग जातो.

No comments:

Post a Comment