Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

Translate

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image

Friday 25 September 2020

इयत्ता पाचवी - परिसर अभ्यास १ - १४ - वाहतूक अभ्यास

 परिसर अभ्यास १ - १४ - वाहतूक 

१. वाहतूक : 

माणसे किंवा साहित्य (सामान) एका ठिकाणाहून दुसरीकडे वाहून नेणे, म्हणजे 'वाहतूक' होय.

आजच्या गतिमान युगात प्रवासासाठी व साहित्याची ने-आण करण्यासाठी वाहतुकीची विविध साधने वापरली

जातात. वाहतुकीचे चांगले व वाईट असे दोन्हीही परिणाम दिसून येतात.




२. वाहतुकीचे फायदे :

वाहतुकीमुळे वेळेची व श्रमांची बचत होते. 

कामे जलद गतीने होतात. 

देशांतर्गत तसेच जागतिक पातळीवर व्यापारात वाढ होते. 

लोकांचे जीवनमान सुधारते. 

पर्यटन, आरोग्य, शिक्षण इत्यादी सुविधा गतिमान होतात. 

जगातील विविध प्रदेश एकमेकांशी जोडले जाऊन जग जवळ येते.


३. वाहतुकीचे दुष्परिणाम : 

वाहतुकीमूळे ध्वनो प्रदषण व वायू (हवा) प्रदूषण वाढते. 

त्यामुळे मानव, प्राणी व वनस्पती याना विविध विकार जड़तात त्यांचे आरोग्य  धोक्यात येते. 

प्राणी व वनस्पती यांच्या अधिवासास बाधा पोहोचते , 

वाहनांच्या अपघातांमुळे जखमी होणे. मृत्यू  येणे., वाहनांचे नुकसान होणे इत्यादी समस्या उदभवतात.



४. वाहतुकीसाठी योग्य पर्यायाची निवड :

वाहतुकीच्या  पर्यायांची व साधनांची आवश्यकतेनुसार योग्य प्रकारे निवड केल्यास वेळेची व श्रमांची बचत होते. त्यामुळे वाहतुकीचे वाईट परिणाम कमी करता येतात.


५. प्रदूषण कमी करण्यासाठी उपाय : 

आपले पर्यावरण संवेदनशील असते. 

प्रदूषणाचे पर्यावरणावर विघातक परिणाम होतात. ते आपल्यासह सर्व सजीवांसाठी हानिकारक असतात.

 त्यामुळे प्रदूषण टाळणे अत्यावश्यक आहे.


प्रदूषण कमी करण्यासाठी पुढील उपाय अवलंबता येतात : 

(१) प्रदूषणकारी इंधनांचा वापर टाळून कमी प्रदूषण करणाऱ्या ईंधनांचा वापर करणे. 

(२) वेळच्या वेळी वाहनांची देखभाल व दुरुस्ती करणे.

(३) सार्वजनिक वाहनांचा वापर करणे. 

(४) खासगी वाहनांचा मर्यादित वापर करणे. 

(५) वृक्षांची लागवड व जोपासना करणे. 

(६) वाहनांसाठी CNG किंवा L.PG यांसारख्या इंधनांचा वापर करणे.

No comments:

Post a Comment