Class 6 th English Unit
Four 4.6 - The Worth of A Fabric Story
दोन हजार वर्षापूर्वी थीरुवल्लुवर नावाचा संत होऊन गेला. तो व्यवसायाने विणकर होता. अतिशय शांत, कमी बोलणारा, कधीही कोणावर न मुद्रा रागावणारा अशी त्याची ख्याती होती. त्याच गावात एक श्रीमंत उनाड मुलगा राहात होता. तो कुठलाही काम धंदा करत नसे. आपले मित्र जमा करणे आणि गावभर भटकून इतरांना त्रास देणे हाच त्याचा उदयोग होता. जेव्हा थिरुवल्लुवरच्या शांत स्वभावाविषयी त्याने ऐकले तेव्हा त्याचा त्यावर विश्वास बसला नाही. एखाद्या व्यक्तिला रागच येत नाही हे तो मान्य करायला तयार नव्हता.
एक दिवस तो आपल्या मित्रांना म्हणाला, "आज मी थिरुवल्लुवरला राग आणतो की नाही ते बघाच, मला खात्री आहे की तो आज रागावल्याशिवाय राहणार नाही. असे म्हणून तो आपल्या मित्रांना घेऊन बाजारात थिरुवल्लुवरच्या दुकानात गेला. कपड्याच्या गठ्ठातील एक सुंदर कापड निवडून हातात घेतले आणि विचारले, काय दर आहे या कापडाचा ? संत थिरुवल्लुवर म्हणाले आठ मुद्रा.
तरुणाने कापड उकलले आणि मधून फाडून त्याचे दोन तुकडे केले आणि विचारले, आता या कापडाची किमती किती चार मुद्रा थिरुवल्लुवर शांतपणे म्हणाले. तरुणाला उत्तर ऐकून आश्चर्य वाटले आणि तो विचार करू लागला, या माणसाला राग का येत नाही. रागाने त्याने आधीच फाडलेल्या कापडाचे अजून दोन तुकडे केले आणि विचारले आता, याची किंमत ? उत्तर आले. दोन मुद्रा. आता मात्र तरुण भलताच संतापून हातवारे करू लागला. त्याला स्वतःला काबूत ठेवणे अशक्य झाले आणि त्याने त्या कापडाच्या चिंध्या करायला सुरुवात केली. प्रत्येक वेळेस तो विचारायचा आता याची किमंत किती ?" थिरुवल्लुवर प्रत्येक वेळेस फाटलेल्या कापडाची किंमत कमी करत होता. सरतेशेवटी कापडचे फक्त तुकडेच शिल्लक राहिले. थिरुवल्लूवर त्यावर शांतपणे म्हणाले. “आता हे कापड संपूर्ण ख़राब झाले आहे त्यामुळे आता त्याला कुठलीच किंमत उरली नाही. हे ऐकून तरुणाला काय बोलावे हेच कळेना. पण त्याला त्याच्या श्रीमंतीचा गर्व होता. म्हणून त्याने संत थिरुवल्लुवरला आठ मुद्रा देऊ केल्यात. ते बघून थिरुवल्लुवर प्रथमच त्या तरुणाकडे बघून हसले. पण त्यांनी मुद्रा घेण्यास नकार दिला आणि म्हणाले, हे तरुण माणसा आता हे कापड कोणाच्याच उपयोगाचे राहिलेले नाही. त्यामुळे त्याला कुठलीही किमंत राहिलेली नाही. कारण हे वस्त्र आता कोणीही परिधान करू शकणार नाही. तुला कदाचित याची कल्पना नसेल की हे कापड तयार होण्यासाठी अनेकांनी कष्ट उपसले आहेत. हे कापड काही एका दिवसात तयार झालेले नाही. यासाठी सर्व प्रथम शेतकऱ्याने मेहनत घेऊन सरकी पेरली, कापसाच्या रोपट्याची त्याने उन्हा- तान्हात काळजी घेतली. कापसाच्या बोंडाकधून कापूस वेचला त्याला जिनामध्ये पाठवून त्याची सरकी वेगळी केली. त्यानंतर त्या रुई पासून एकसारखा लांब धागे तयार केले. त्यानंतर हे धागे हातमागावर विणून मी आणि माझ्या बायकोनी वेगवेगळ्या रंगसंगतीचे सुंदर चित्रे, आकृत्या असलेले कापड तयार केले.कापड पूर्ण झाल्यावर आम्हाला असे वाटले की कोणीतरी आनंदाने हे कापड़ विकत घेईल व परिधान करेल. व आम्हाला आम्ही केलेल्या मेहनतीचे बक्षीस मिळेल. परंतु जेव्हा तू ह्या कापडाच्या चिंध्या केल्यास त्याचवेळेस तू आमच्या प्रेमाचा आणि कष्टाचा चुराडा केलास. हे झालेले नुकसान पैशाने कधीही भरून येवू शकत नाही.
संत थिरुवल्लुवरांचे वरील शब्द तरुणाच्या हृदयाला भिडले. आणि त्याला आता स्वत:ची लाज वाटायला लागली. ते पुढे म्हणाले, “मी यासारखे दुसरे कापड पुन्हा विणू शकतो. परंतु आपले जीवन देखील या कापडासारखेच आहे. जर तुम्ही ते अतिरेकी अविचाराने फाडून टाकले तर ते नाश होईल. आणि ते तुम्हाला पुन्हा परत मिळणार नाही.' संत थिरुवल्लूवरांच्या शब्दाने त्या तरुणाचे डोळे उघडले आणि तद्नंतर त्या तरुणाने त्याच्या सर्व वाईट सवयींचा आणि आळशीपणाचा नेहमीसाठी त्याग केला.
Sai Harichandra Mhatre
ReplyDeleteAditya patil
ReplyDelete