Importance of the day 26 ऑक्टोबर दिनविशेष
Importance of the day
26 ऑक्टोबर दिनविशेष
आजचा दिनविशेष - घटना :
1863 : लंडनमध्ये जगातील सर्वात जुनी फुटबॉल संघटना सुरू झाली.
1905 : नॉर्वे स्वीडनपासून स्वतंत्र झाला.
1936 : हूवर धरणातील पहिले विद्युत जनरेटर पूर्णपणे कार्यान्वित झाले.
1947 : जम्मू-काश्मीर राज्य भारतात विलीन झाले.
1958 : पॅन अमेरिकन एअरवेजने पहिली व्यावसायिक विमानसेवा सुरू केली.
1962 : ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील भारतीय विद्याभवन येथे झाला.
1994 : जॉर्डन आणि इस्रायलमध्ये शांतता करार.
1999 : राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील संशोधक व्ही. व्ही. रानडे यांना केंद्र सरकारतर्फे स्वर्णजयंती फेलोशिप जाहीर.
2003 : सीडर फायर, कॅलिफोर्नियाच्या इतिहासातील तिसरी सर्वात मोठी वणवा, 15 लोकांचा मृत्यू झाला, 250,000 एकर खाक झाला आणि सॅन दिएगोच्या आसपास 2,200 घरे नष्ट झाली.
2006 : कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण प्रतिबंधक नियम लागू झाले.
2012 : मायक्रोसॉफ्टने विंडोज 8 लोकांसाठी रिलीझ केले आणि ते नवीन पीसीवर उपलब्ध केले
आजचा दिनविशेष - जन्म :
1270 : ‘संत नामदेव’ – यांचा जन्म. (मृत्यू : 3 जुलै 1350)
1855 : ‘गोवर्धनराम त्रिपाठी’ – गुजराती कादंबरीकार यांचा जन्म.
1890 : ‘गणेश शंकर विद्यार्थी’ – भारतीय पत्रकार आणि राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू : 25 मार्च 1931)
1891 : ‘वैकुंठ मेहता’ – सहकारी चळवळीचे प्रवर्तक यांचा जन्म. (मृत्यू : 27 ऑक्टोबर 1964)
1900 : ‘इर्झा मीर’ – माहितीपट निर्मितीचे आद्य प्रवर्तक यांचा जन्म. (मृत्यू : 7 मार्च 1993)
1916 : ‘फ्रान्सवाँ मित्राँ’ – फ्रान्सचे 21 वे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 8 जानेवारी 1996)
1919 : ‘मोहम्मद रझा पेहलवी’ – शाह ऑफ इराण यांचा जन्म. (मृत्यू : 27 जुलै 1980)
1937 : ‘हृदयनाथ मंगेशकर’ – संगीतकार व गायक यांचा जन्म.
1947 : ‘हिलरी क्लिंटन’ – अमेरिकेच्या 67 व्या परराष्ट्रमंत्री यांचा जन्म.
1954 : ‘लक्ष्मीकांत बेर्डे’ – नाट्य आणि चित्रपट अभिनेते यांचा जन्म. (मृत्यू : 16 डिसेंबर 2004)
1963 : ‘नवज्योत सिंग सिद्धू’ – भारतीय राजकारणी व माजी भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
1974 : ‘रवीना टंडन’ – चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म.
1978 : ‘वीरेंद्र सेहवाग’ – माजी भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
आजचा दिनविशेष - मृत्यू :
1909 : ‘इटो हिरोबुमी’ – जपानचे पहिले पंतप्रधान यांचे निधन. (जन्म : 16 ऑक्टोबर 1841)
1930 : ‘डॉ. वाल्डेमर हाफकिन’ – प्लेग व कॉलरा प्रतिबंधक लशीचा शोध लावणारे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 15 मार्च 1860)
1979 : ‘चंदूलाल नगीनदास वकील’ – अर्थशास्त्रज्ञ यांचे निधन.
1991 : ‘अनंत काशिनाथ भालेराव’ – स्वातंत्र्यसैनिक, लेखक, दैनिक मराठवाडा चे संपादक यांचे निधन. (जन्म : 14 नोव्हेंबर 1919)
1999 : ‘एकनाथ इशारानन’ – भारतीय-अमेरिकन लेखक आणि शिक्षक यांचे निधन. (जन्म : 17 डिसेंबर 1910)
2023 : ‘बाबा महाराज सातारकर’ – कीर्तनकार यांचे निधन.