Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

Translate

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image

Tuesday, 28 July 2020

6 वी सामान्य विज्ञान 8.आपली अस्थिसंस्था व त्वचा Online Test

आपली अस्थिसंस्था व त्वचा
खालील ठळक मुद्दे अभ्यासा आणि सर्वात खाली चाचणी सोडविण्यासाठी क्लिक करा .....

● आपल्या शरीराच्या पोकळीमध्ये विविध इंद्रिय सुरक्षित असतात .मानवी सांगाडा मुळे आतील इंद्रियाचे संरक्षण होते, म्हणून मानवी सांगाडा हा संरक्षक कवच असतो.
अस्थी म्हणजे हाड .शरीरातील कुठल्याही भागातील हाड मोडले तर त्याला अस्थिभंग असे म्हणतात .अस्थिभंग यामुळे वेदना होते व त्या भागावर सूज येते.
अस्थिभंग झालेल्या व्यक्तीला न हलवता वैद्यकीय उपचारासाठी घेऊन जातात.
क्ष-किरण प्रतिमा काढून नेमकी इजा कोठे झाली याबाबत माहिती  मिळवली जाते .
रोंन्टजेन या शास्त्रज्ञाने क्ष-किरणांचा शोध लावला.


● अस्थी संस्थेचे कार्य
> हाडा मुळे शरीराला आकार प्राप्त होतो.
>  शरीराला आधार मिळतो.
> यामुळे शरीरातील नाजूक इंद्रियाचे संरक्षण होते.
> हाडांमध्ये खनिजे आणि क्षार यांचा साठा केलेला असतो यामुळे शरीराची हालचाल होऊ शकते.

हाडांची रचना-
हाडे कठीण आणि मजबूत असतात आणि त्यामधील कूर्चा लवचिक असतात .
हाडे अस्थि पेशींनी बनलेले असतात.
हाडांमध्ये कॅल्शियम कार्बोनेट आणि कॅल्शिअम फॉस्फेट ही खनिजे
असतात .
हाडांची लांबी व आकार हा प्रत्येक व्यक्तीनुसार बदलत जातो .
शरीराची वाढ होत असताना हाडे मजबूत होतात ,लांब होतात .एका विशिष्ट मर्यादेपर्यंत हाडांची वाढ होते. हाडांचे चार प्रकार पडतात- चपटी हाडे ,लहान हाडे, अनियमित हाडे ,लांब हाडे.

◆ मानवी अस्थिसंस्था
मानवी कवटी -
मानवी कवटी मध्ये 22 हाडे असतात. त्यापैकी चेहऱ्यामध्ये 14 व डोक्यामध्ये 8 हाडे असतात .
हे मेंदूचे रक्षण करतात .

● छातीचा पिंजरा-
छातीच्या पिंजऱ्यामध्ये 25 हाडे असतात.
त्यापैकी बरगड्या मध्ये 24 व उरोस्थि म्हणून 1 हाड असते .

● पाठीचा कणा -
पाठीच्या कन्या मध्ये 33 मणके असतात.
हे चेता रज्जूचे संरक्षण करतात .

● उपांगे.
हातामध्ये प्रत्येकी 30 हाडे असतात .
पायामध्ये सुद्धा प्रत्येकी 30 हाडे असतात.
विविध काम आणि हालचाल करणे हे यांचे कार्य असते.

 प्रौढ माणसाच्या शरीरात 206 हाडे असतात.
 तर लहान मुलांच्या शरीरात 270 हाडे असतात.

सांधा
शरीरातील दोन किंवा जास्त हाडे अस्थि बंधाने जेथे जोडली जातात अशा जोडणी ला सांधा म्हणतात. सांध्याचे प्रकार चल व अचल सांधे

चल सांधे हालचाल करू शकतात
बिजागरी चा सांधा
कोपर ,गुडघा ,हातापायाची बोटे यामध्ये बिजागरीच्या सांधा असतो .
हे 180 अंश कोनात हालचाल करतात.
उखळीचा सांधा
खांदा ,खुबा याठिकाणी असतात.
हे 360 अंश कोनात हालचाल करू शकतात .
सरकता सांधा -मनगट, घोटा.
हे सांधे एकमेकावर सरकणाऱ्या हाडांच्या मध्ये असतात.

 ◆ अचल सांधे
हालचाल न करणारे
उदाहरणार्थ कवटीची हाडे

त्वचा
आपल्या शरीराचे बाह्य आवरण म्हणजे त्वचा होय.
त्वचा हे पाच ज्ञानेंद्रिये पैकी एक ज्ञानेंद्रिय आहे.
त्वचेमुळे मुळे आपल्याला स्पर्श ज्ञान होते
त्वचेची रचना
त्वचेची रचना- त्वचेचे दोन थर असतात .
बाह्यत्वचा व अंतसत्वचा .
बाह्य त्वचा म्हणजे बाहेरचा थर असतो .
या थरांमध्ये मेलॅनिन हे रंगद्रव्य असते. अंतसत्वचामध्ये घर्मग्रंथी असतात.
ज्यामधून आपल्या शरीरातील घाम बाहेर पडतो.
त्याखाली रक्तवाहिन्या आणि चेतातंतू यांचे जाळे असते. व त्याखाली शरीराच्या तापमानाचे नियंत्रण करणारा थर असतो .

त्वचेचे कार्य
शरीराच्या आतील भागाचे रक्षण करणे.
उष्णता व थंडी यापासून शरीराचे संरक्षण करणे. सूर्यप्रकाशाच्या साह्याने डी जीवनसत्व निर्माण करणे. शरीरातील आद्रता राखून ठेवण्याचे काम करणे. शरीरातून घामाचे उत्सर्जन करणे.
आणि शरीरातील पाण्याच्या प्रमाणाचे व तापमानाचे समतोल नियंत्रण करणे हे त्वचेचे कार्य असते .

त्वचेमध्ये घर्मग्रंथी असतात .या घाम तयार करण्याच्या ग्रंथी असतात .
शरीराच्या तापमानाचे संतुलन घामामुळे होते.
आपल्या शरीराचे तापमान नेहमी 37 अंश सेल्सिअस च्या जवळपास असते.


वृद्धत्व
आल्यावर त्वचेवर सुरकुत्या पडतात. त्वचेखाली असणार्‍या चरबीचे प्रमाण कमी झाल्यामुळे या सुरकुत्या येतात.

मेलॅनिन
मेलॅनिन हे रंगद्रव्य त्वचेतील विशिष्ट ग्रंथींमध्ये तयार होते .
या रंगद्रव्यामुळे त्वचेचा रंग ठरतो .
मेलॅनिन प्रखर उन्हातील अतिनील किरणांपासून आपले रक्षण करते.
ज्यांच्या शरीरामध्ये जास्त मेलॅनिन असते, त्यांची त्वचा गडद रंगाची असते.
वातावरणानुसार सुद्धा त्वचेचा रंग बदलतो.

चाचणी सोडवण्यासाठी
क्लिक करा

No comments:

Post a Comment