◆ गती व गतीचे प्रकार-
खालील ठळक मुद्दे यांचा अभ्यास करा आणि सर्वात खाली चाचणी सोडविण्यासाठी क्लिक करा.
◆ विस्थापन -
जेव्हा एखादी वस्तू तिची जागा बदलते तेव्हा तिचे विस्थापन होत असते.
ज्या कालावधीमध्ये वस्तूचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी विस्थापन होत असते, त्या कालावधीला वस्तूची गती म्हणतात.
● गतीचे प्रकार रेषीय गती, नैकरेषीय गती.
◆ रेषीय गती -
एका सरळ रेषेमध्ये जेव्हा वस्तू विस्थापन करत असते तेव्हा त्या गतीला रेषीय गती म्हणतात. रेषीय गती चे दोन प्रकार पडतात रेषीय एकसमान गती ,रेषीय असमान गती.
● रेषीय एकसमान गती मध्ये एकक कालावधीमध्ये वस्तूचे सरळ रेषेमध्ये पार केलेले अंतर जेव्हा सारखेच असते तेव्हा त्या गतीला रेषीय एकसमान गती म्हणतात .
सैनिकांच्या संचलनाची गती ही रेषीय एकसमान गती असते कारण या गतीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल दिसून येत नाही.
● रेषीय असमान गती -
ठराविक एकक कालावधीमध्ये वस्तूने सरळ रेषेत पार केलेले अंतर जेव्हा सतत बदलत जाते तेव्हा त्या गतीला रेषीय असमान गती म्हणतात.
घसरगुंडीवरुन घसरणाऱ्या मुलाची गती ही सतत बदलत असते म्हणून या गतीला रेषीय असमान गती असे म्हणतात.
◆ नैकरेषीय गती -
जेव्हा एखादी वस्तू एका सरळ रेषेमध्ये विस्थापन करत नसेल तेव्हा त्या गतीला नैकरेषीय गती म्हणतात.
नैकरेषीय गतीचे चार प्रकार पडतात.
आंदोलित गती ,वर्तुळाकार गती, यादृच्छिक गती, नियतकालिक गती
1. आंदोलित गती-
एका टोकाहून दुसऱ्या टोकापर्यंत जाऊन पुन्हा त्याच टोकाला परत येणे या गतीला आंदोलित गती म्हणतात.
उदाहरण . झोपाळ्याचे झोके, घड्याळाचा लंबक, पक्षांच्या पंखांची हालचाल ,शिवण यंत्र चालू असताना हलणारी सुई, ढोल-ताशांचा कंप पावणारा पडदा .
2. वर्तुळाकार गती -
वर्तुळाकार मार्गात फिरणाऱ्या वस्तूच्या गतीला वर्तुळाकार गती म्हणतात .अशा वस्तू जेथून विस्थापन सुरू करतात त्याच जागी त्या पुन्हा येतात .
उदाहरण. घरातील विजेचे पंखे, मेरी गो राऊंड.
3.नियतकालिक गती-
जेव्हा एखादी गतिमान वस्तू ठराविक वेळेनंतर एका विशिष्ट बिंदूतून पुन्हापुन्हा जाते तेव्हा तिची गती नियतकालिक गती असते .
उदाहरण .घड्याळाचा मिनिट काटा नेहमी 60 मिनिटात एक फेरी पूर्ण करतो .
4. यादृच्छिक गती -
गतीमध्ये जेव्हा सतत बदल होत असतो, चाल बदल होत असते तेव्हा त्या गतीला यादृच्छिक गती म्हणतात.
उदाहरण .रांगणारे बाळ, उडणारी फुलपाखरे भटकणारे जनावरे.
◆ चाल -
एखाद्या वाहनाचा ताशी वेग शोधून काढण्यासाठी आपल्याला त्या वाहनाचा वेग आणि कापलेले अंतर यांचे गुणोत्तर लक्षात घ्यावे लागते.
एकक कालावधीमध्ये वस्तूने पार केलेल्या अंतराला चाल म्हणतात.
चाल मोजण्याचे एकक- किलोमीटर प्रति तास किंवा मीटर प्रति सेकंद हे असते.
◆ वेगवेगळ्या प्रकारच्या गती -
आकाशात उडत असणाऱ्या पक्ष्यांच्या हालचाली मध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या गती दिसून येतात .
● आकाशातील उडणारे पक्षी हे आंदोलित गतीने पंख फडफडवत असतात.
त्याचबरोबर बहुतेक पक्षी हे रेषीय गती दाखवतात तर घारी सारखे काही पक्षी वर्तुळाकार घिरट्या घालताना दिसतात यामध्ये आपल्याला वर्तुळाकार गती दिसून येते.
● सायकल चालवत असताना सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव येतो सायकल चालवताना पॅडल मारावे लागते यावेळी आपल्याला वर्तुळाकार गती मध्ये हे पॅडल फिरवावे लागते .
त्यानंतर प्रवासाची दिशा निश्चित करून आपण रेषीय गतीने सायकल चालवतो .त्याचबरोबर सायकलचे हँडल आपल्याला वळवताना आपण कधीकधी वर्तुळाकार गती मध्ये ते फिरवतो. त्याचबरोबर गती कमी अधिक करीत असलो तर ती रेषीय असमान गती होते.
●अनेक वाद्यांमध्ये आपल्याला आंदोलित गती चा अनुभव येतो. सर्व प्रकारच्या चर्मवाद्य यामध्ये आंदोलित गती अनुभवता येते. त्यामध्ये तबला, ढोल ,नगारे ,डमरू इत्यादी वाद्यांची चामडे
आंदोलित होत वाजत असते.
त्याचबरोबर तंतुवाद्य मध्ये सुद्धा तारा आंदोलित गती दाखवतात. सतार, गिटार ,व्हायोलिन या वाद्यांच्या तारा आंदोलित गती मुळे ध्वनी निर्माण करतात.
● वरील उदाहरणांमधून आपल्या असे लक्षात येईल की एखादी वस्तू गतिमान असली तर तिच्या मध्ये एकाच प्रकारची गती असेलच असे नाही.
या घटकावरील चाचणी सोडविण्यासाठी
क्लिक करा

![]() |
मेरी गो राउंड |

बागेत खेळणारे मूल |

Wow
ReplyDeleteOmshinbe
ReplyDelete