◆ इतिहास आणि कालसंकल्पना
● खालील ठळक मुद्द्यांचे काळजीपूर्वक वाचन करा आणि सर्वात खाली या घटकावरील चाचणी सोडविण्यासाठी क्लिक करा.
◆ काळाची विभागणी आणि कालरेषा
काळ समजावून घेण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. काळ हा अखंड असतो आणि त्याचा आपल्या सोयीनुसार आपण त्याचे विभाजन करत असतो. पूर्वीच्या काळी सूर्योदय झाला की दिवस उगवला, सकाळ झाली असे म्हटले जायचे.
सूर्यास्त झाला की संध्याकाळ झाली आणि अंधार पडून रात्र झाली अशा प्रकारे काळाचे विभाजन दिवस आणि रात्र या दोन घटकांमध्ये केले जात असे.
आपली पृथ्वी ही एका ठराविक गतीने स्वतःच्या आसाभोवती फिरते तिलाच आपण परिवलन असे म्हणतो. तसेच ती सूर्याभोवती फिरते.
सूर्य हा स्वयंप्रकाशित आहे. सर्व ग्रहांना सूर्यापासून प्रकाश मिळतो त्यामुळे आपल्याला फक्त दिवसा प्रकाश दिसतो आणि रात्री अंधार कारण आपली पृथ्वी ही सतत स्वतःच्या आसाभोवती फिरत असते.
● पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती फिरत असताना जो पृष्ठभाग सूर्यासमोर येतो तेथे उजेड असतो आणि जो पृष्ठभाग सूर्याच्या समोर नसतो त्या ठिकाणी अंधार असतो.
पृथ्वीला स्वतःच्या आसाभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण होण्यास 24 तासाचा अवधी लागतो. सुमारे बारा तासांचा दिवस आणि बारा तासांची रात्र असा हा 24 तासाचा अवधी असतो. अशाच प्रकारचा एक दिवस आणि एक रात्र मिळून होणाऱ्या काळाला एक दिवस असे म्हणतात.
असा एक दिवस म्हणजे आपण त्याला एक वार असे म्हणतो.
● सोमवार ते रविवार असा सात वारांचा एक आठवडा, दोन आठवडे मिळून एक पंधरवडा, चार आठवड्यांचा म्हणजे दोन पंधरवड्याचा एक महिना, बारा महिन्यांचे एक वर्ष अशाप्रकारे क्रमवार काळाची विभागणी केली जाते.
वर्षामागून वर्ष संपत गेले की शंभर वर्षाचा काळ संपला म्हणजेच एक शतक पूर्ण झाले. अशी दहा शतके पूर्ण झाली की एक हजार वर्षे संपली म्हणजेच एक सहस्त्र पूर्ण होते अशा प्रकारे काळाच्या विभागणीला एकरेखिक विभागणी म्हणतात.
● इसवी सनाचा काळ
एकरेखिक विभागणी मध्ये एकापाठोपाठ येणाऱ्या वर्षाची क्रमवार मांडणी केली जाते.
आपण वापरतो ती दिनदर्शिका इसवीसन यावर आधारलेली असते.
येशू ख्रिस्त यांच्या स्मरणार्थ इसवी सनाची सुरुवात झाली. मराठीतील हा शब्द येशू या नावाशी संबंधित आहे.
इसवी सनाचे पहिले वर्ष हे 1 या संख्येने दाखविले जाते नंतर पुढे येणाऱ्या शंभर वर्षाचा काळ हा पहिल्या शतकाचा काळ असा समजला जातो.
◆ इसवी सनापूर्वीचा काळ
इसवी सनाची सुरुवात होण्यापूर्वीच्या या काळाला इसवीसनपूर्व काळ असे म्हटले जाते. इसवी सनापूर्वीच्या पहिल्या शतकाची सुरुवात इसपू 100 या वर्षी झाली आणि ते 1 यावर्षी संपले.
इसवी सनापूर्वीच्या पहिल्या शंभर वर्षाचा म्हणजेच पहिल्या शतकाचा काळ म्हणजे इसवी सन पूर्व 100 ते 1 अशाप्रकारे लिहिला जातो.
इसवी सनापूर्वीच्या कालखंड लिहिण्याची पद्धत ही इसपू 527 ,599 अशाप्रकारे होती.
◆ कालगणना आणि कालगणनेच्या पद्धती
कालगणना म्हणजे काळाची लांबी मोजणे.
काळ मोजण्याची एकके सेकंद, मिनिट ,तास, दिवस, आठवडा, पंधरवाडा, महिना, वर्ष, शतक, सहस्त्र हे आहेत. त्यामधील सर्वात छोटे एकक हे सेकंद आहे. जगभरामध्ये कालगणनेच्या अनेक पद्धती अस्तित्वात आहेत.
त्यामध्ये इसवीसन ही पद्धत अधिक प्रचारामध्ये आहे.
●कालगणनेच्या इतर पद्धती
इसवी सनाची सुरुवात येशू ख्रिस्त यांच्या स्मरणार्थ झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने इसवी सन 1674 मध्ये राज्याभिषेक शक या शकाची सुरुवात केली.
शालिवाहन शक आणि विक्रम संवत या भारतात प्रचलित असलेल्या कालगणना आहेत.
इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी मक्के हून मदिनेला स्थलांतर केले, या स्थलांतराच्या काळापासून हिजरी या कालगणनेची सुरुवात झाली. भारतामध्ये पारशी समाज उपयोगात आणत असलेली कालगणना शहेनशाही कालगणना या नावाने ओळखले जाते.
◆ इतिहासाची काल विभागणी
इतिहासाच्या काल विभागणी मध्ये प्रामुख्याने दोन टप्पे मानले जातात.
प्रागैतिहासिक काळ व ऐतिहासिक काळ
● प्रागैतिहासिक काळ
ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध नाही अशा काळाला प्रागैतिहासिक काळ असे म्हणतात. प्राक म्हणजे पूर्वीचा.
● ऐतिहासिक काळ
ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होतो त्या काळाला ऐतिहासिक काळ असे म्हणतात.
चाचणी सोडविण्यासाठी- क्लिक करा
No comments:
Post a Comment