Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

Translate

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image

Friday, 21 August 2020

इयत्ता आठवी मराठी ३- लाखाच्या कोटीच्या गप्पा Online Test

 ३- लाखाच्या कोटीच्या गप्पा 

चाचणी सोडविण्यासाठी -     Click Here

वाक्याच्या अर्थाच्या अनुरोधाने वाक्याचे चार प्रकार आहेत

() विधानार्थी वाक्य  () प्रश्नार्थी वाक्य () उद्गारा्थी वाक्य  () आज्ञार्थी वाक्य.

(१) विधानार्थी वाक्य: ज्या वाक्यामध्ये केवळ विधान केलेले असते, त्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात.

उदा., मी दररोज व्यायाम करतो.

(२)प्रश्नार्थी वाक्य :  ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो, त्यास प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात.

उदा. तू कधी जेवण करतोस?

(३) उद्गारार्थी वाक्य : ज्या वाक्यात भावनेचा उद्गार व्यक्त झालेला असतो, त्यास उद्गारार्थी वाक्य म्हणतात.

उदा., अबब ! केवढी मोठी गाडी!

 (४) आज्ञार्थी वाक्य : ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंतंी उपदेश

या गोष्टींचा बोध होतो, त्या वाक्यास आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात.

उदा., मुलांनो, चांगला खेळ दाखवा.

(१) गुलाब सुंदर आहे.- हे विधानार्थी वाक्य आहे 

(२) तुला गुलाब आवडतो का ? - हे प्रश्नार्थी वाक्य आहे 

(३) किती सुंदर आहे गुलाब ! - हे उद्गारा्थी वाक्य आहे 

(४) गुलाबाचे फूल कोटाला लाव. -हे आज्ञार्थी वाक्य आहे.

6 comments: