6 - कोन भाग - 2 कोनमापक
कोनमापक हे साधन अर्धवर्तुळाकृती असते.कोनमापकाच्या अर्धवर्तुळाकार कडेचे समान 180 भाग केलेले असतात. प्रत्येक भाग म्हणजे 'एक अंश' होय. 'एक अंश' हे चिन्ह वापरून '1°" असे लिहितात.
कोनमापकावरील भागांचे म्हणजेच अंशांचे क्रमांक दोन प्रकारे लिहिलेले असतात. त्यांपैकी एका प्रकारात 0, 10, 20, 30, ,180 या भागदर्शक संख्यांच्या खुणा घड्याळाच्या काट्याच्या...विरुद्ध दिशेने म्हणजेच उजवीकडून डावीकडे क्रमाने केलेल्या असतात; तर दुसऱ्या प्रकारात 0, 10, 20, 30, ..., 180 या भागदर्शक संख्यांच्या खुणा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजेच डावीकडून उजवीकडे क्रमाने केलेल्या असतात.कोनमापक ज्या वर्तुळाचा निम्मा भाग असतो, त्या वर्तुळाच्या केंद्राला कोनमापकाचे केंद्र म्हणतात व त्याच्या व्यासाला कोनमापकाची 'संदर्भरेघ' किंवा 'तळरेघ' म्हणतात.
places test pathva and I places
ReplyDelete