The lion,the Man and the Statue Story and Test
एकदा एक मनुष्य व एक सिंह एकमेकांशी बोलत होते. आपल्या शक्तीचा गर्व असलेला सिंह म्हणाला.
मी पशुंचा राजा आहे. मी माणसापेक्षा ताकदवान असल्यामुळे माणसे मला घाबरतात.
मनुष्याला आपल्या बुद्धीचा गर्व होता. "तुमच्यापेक्षा माणसे अधिक बुद्धिवान असल्यामुळे ते तुमची शिकार
करतात किंवा तुम्हांला बंदिस्त करतात." त्या माणसाने त्या सिंहाला, एका बागेतील महान
योद्धा हर्क्युलस याच्या पुतळ्याकडे नेले. त्या पुतळयात एक मृत सिंह हर्क्युलसच्या पावलांशी पडलेला
दाखवला होता.
'बघ, हा पुतळा माणसे अधिक श्रेष्ठ आहेत, हे सिद्ध करतो," त्या माणसाने दावा केला.
"मुळीच नाही !" तो सिंह लगेच म्हणाला, " तो पुतळा माणसाने तयार केला आहे, हेच फक्त तो पुतळा दर्शवतो.
सिंहांनी पुतळा तयार केला असता, तर सिंह उभा राहिलेला आणि माणूस त्याच्या पंजांशी मरून पडलेला दाखवला
असता.
या गोष्टीवरून, कोणतीही गोष्ट, गोष्ट सांगणाऱ्या व्यक्तीच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते, हे लक्षात येते.
No comments:
Post a Comment