Study Tour 2- The Mouse Merchant Story
एकदा, एक श्रीमंत व्यापारी त्याच्या आळशी मूलाची खरडपटटी काढत (खडसावत) होता. "मी तुझा स्वतःचा व्यवसाय सुरू करावा म्हणून एवढे पैसे दिले तरीही तु काहीच कमावले नाही. तू अगदी कुचकामी आहेस! या मेलेल्या उंदराकडे पाहा. एखादा कार्यक्षम माणस अशा एखादया निरुपयोगी वस्तूपासून सुद्धा व्यवसाय सुरू करू शकतो!"
सोमदत्त या गरीब अनाथ मूलाने त्याचे हे शब्द ऐकले तो आत गेला आणि त्याने त्या व्यापाऱ्याला विनंती केली. "कृपया मला हा उंदीर भांडवल म्हणून उसना कया आणि मी माझे नशीब अजमावतो." तो व्यापारी मोठ्याने हसला, परंतु तरीही, त्याने तो उंदीर सोमदत्तला दिला आणि सोमदत्तने त्याला लिहुून दिलेली पावती घेतली.
तो मेलेला उंदीर हातात घेऊन सोमदल रस्त्याने चालला होता, त्याचवेळी दुसन्या एका दुकानदाराने त्याला
बोलावले, "मुला, इकडे ये. मला तो उंदीर माझ्या मांजराला खाऊ घालण्याकरिता पाहिजे. मी त्याकरिता तुला दोन मूठभर हरभरे देईन." सोमदत्तने ते हरभरे स्वीकारले. सोमदत्तने घरी ते हरभरे चांगले भाजले. नंतर त्याने पाण्याची एक सुरई घेतली आणि त्याच्या हरभव्यांसह आणि पाण्यासह रस्त्यांच्या फाट्यावर उभा राहिला. त्याने खुप वेळ प्रतीक्षा केली.
संध्याकाळी, मजूर लोक जंगलातून परत येत असताना, त्यांनी भाजलेले हरभरे आणि पाणी घेऊन असलेल्या त्या मुलाला पाहिले. सोमदत्तने त्यांना नम्रपणे ते हरभरे व पाणी दिले. "परंतु आमच्याकडे पैसे नाहीत. आम्ही तुला फक्त लाकडाच्या दोन काठ्या देऊ शकतो!"
'या साध्या भोजनाकरिता ही चांगली बिदागी आहे!" सोमदत्त उद्गारला. प्रत्येक मजुराकडून दोन काठ्या घेऊनसोमदत्तने काठ्यांची एक मोळी गोळा केली. त्याने ती मोळी बाजारात नेली, ती विकली आणि त्यातून त्याने आणखी काही हरभरे आणले.
सोमदत्त असे दर दिवशी करू लागला. केवळ दोन काठ्यांकरिता चवदार हरभरे व ताजे पाणी देणारा छानसा मुलगा म्हणून तो मजुरांमध्ये प्रसिद्ध झाला. त्यांच्यापैकी अनेक जण, जंगलातून परत येताना, त्याचे हरभरे दरदिवशी विकत घेवू लागले. सोमदत्तला दरदिवशी काठ्यांच्या अनेक मोळ्या मिळू लागल्या, कारण त्याला आता भरपूर ग्राहक मिळू लागले होते.
एकदा बाजारात सोमदत्त त्या काठ्या विकत् असताना, त्याला एक कुंभार भेटला. त्याला आपल्या भट्टीत जाळण्याकरिता लाकडे पाहिजे होती. त्या काठयांच्या बदल्यात, त्या कुंभाराने सोमदत्तला हरभऱ्यांकरिता मातीची भांडी आणि पाण्याकरिता थोड्या सुरया दिल्या. सोमदत्तने कोणतेही पैसे वाया घालवले नाहीत. तो सकाळी लाकडे विकण्याकरिता आणि संध्याकाळी हरभरे विकण्याकरिता खूप मेहनत करू लागला. एक दिवस, त्याच्याकडे त्या मजुरांकडून सर्वच्या सर्व लाकडे विकत घेण्याए्वढे पैसे जमा झाले. त्याने ती लाकडे बाजारात चांगल्या किमतीने विकली. काही काळानंतर त्याने बाजारात स्वत:च्या मालकीचे दुकानसुद्धा थाटले (उभे केले).तो आपल्या ग्राहकांशी नेहमी नम्रपणे वागत असे, त्या ग्राहकांपिकी काही जण त्याला रोख पैसे देत असत, तर काहीजण त्याला वस्तूंच्या स्वरूपात किमत देत असत. ज्या ज्या वस्तू त्यांना देता येऊ शकतील, त्या त्या वस्तू त्याला देत असत. सोमदत्त नेहमीच त्या वस्तू गरज असलेल्या लोकांना विकण्याचा कोणता तरी मार्ग शोधत असे.
काही वर्षांनंतर, सोमदत्त त्या शहरातील एक श्रीमंत व्यापारी बनला. एके दिवशी, त्याने एका सोनाराला त्याच्यासाठी एक लहान सोन्याचा उंदीर तयार करायला सांगितले. तो ते (सोन्याचा) उंदीर त्या श्रीमंत व्यापाऱ्याकडे घेऊन गेला.
"बऱ्याच वर्षांपूर्वी मी तुमच्याकडून, भांडवल म्हणून, एक मेलेला उंदीर उसना घेतला होता. आज मी तो
तुम्हांला परत करायला आलो आहे. कृपया, हा सोन्याचा उंदीर स्वीकारा."
तो श्रीमंत व्यापारी अत्यंत आश्चर्यचकित झाला. सोमदत्तच्या व्यापारी कौशल्याने तो एवढा प्रभावित झाला की,त्याने त्याचे त्याच्या स्वत:च्या मुलीशी लग्न लावून दिले. अशा प्रकारे, गरीब अनाथ असलेला सोमदत्तने, त्याची बुद्धिमत्ता, मेहनत आणि नम्रता यांमुळे पैसा आणि सन्मान मिळवला.
त्या श्रीमंत माणसाचा मुलगा सोमदत्तकडून काही कौशल्ये शिकला की नाही, ते समजले नाही.
No comments:
Post a Comment