सातवी मराठी 7 - माझी मराठी कविता
कवितेचा अर्थ
मराठी भाषेची थोरवी सांगताना व तिचे गुणगान गाताना कवयित्री म्हणतात - माझी मराठी भाषा माझी आई
आहे. तो माझ्या मनातल्या भावनांना अर्थ देते. मो मराठी भाषेच्या ऋणात कायम राहू इच्छिते. कृतज्ञ राहते. तिच्या उपकारांची फेड कधी करूच नये. तिच्या ऋणातून उतराई होऊ नये, असे वाटते.
माझ्या मराठीच्या एक-एक शब्दाला रत्नाचे, सुवर्णाचे मोल आहे. माझा मराठी शब्द अनमोल आहे. कधी उष्ण लोखंडासारखी धग त्यात असते. तर कधी तो थंडगार चांदण्यासारखा सुखद असतो.
माझी मराठी भाषा रानवान्याच्या वासात भिजते. तिला रानातल्या वाऱ्याचा सुवास असतो. विविध बोलीभाषा
अंगावर परिधान करून माझी मराठी भाषा सजली आहे. (अनेक बोलीभाषांच्या वैभवाने नटलेली आहे.)
माझ्या मराठी भाषेचे अमृत (गोडवा) जो कोणी पिऊन घेईल, (समजून घेईल) तो खराखुरा भाग्यवान ठरेल,
नशीबवान असेल. कोणताही पंथ असो वा समाज असो मराठी कोणताही भेदभाव करीत नाही. (मराठीला सगळे
पंथ समान आहेत.) माझ्या मराठी भाषेची महती मी काय वर्णन करावी. ती अवर्णनीय आहे. दरदरच्या देशात
माझी मराठी भाषा पसरली आहे. माझ्या मराठीची ओवी लांबवरच्या देशातही ऐकू येते.
स्वाध्याय - प्रश्नोत्तरे
कवितेतील समान शेवट असणारे शब्द लिहा :
१) मोल - शीतल
(२) भिजली - सजली
(३) थोरवी - ओवी.
प्रश्न (१) मराठी भाषा कशाच्या गंधात भिजते ?
उत्तर - रानवाऱ्याच्या
प्रश्न कोणत्याही पंथाबाबत मराठी भाषा काय करीत नाही?
उत्तर - दुजाभाव
प्रश्न काय लेवून मराठी भाषा सजते ?
उत्तर - नाना बोली
प्रश्न - पुढे दिलेल्या अर्थाच्या कवितेतील ओळी शोधून लिहा :
मराठी भाषा दूरवर पसरली आहे.
माझ्या मराठीची ओवी दूर देशातही ऐकायला मिळते.
उत्तर : दूर देशी ऐकू येते ,माझ्या मराठीची ओवी
No comments:
Post a Comment