१- जय जय महाराष्ट्र माझा
अर्थ समजून घेवूया ........
माझ्या महाराष्ट्राचा विजय असो. या माझ्या महाराष्ट्राचा जयघोष करा. ।। ध्रु।।
रेवा, वरदा, कृष्णा, कोयना, भद्रा, गोदावरी या नदयांमधले पाणी मातीच्या घागरी एकजूटीने भरतात.
भीमेच्या काठावरच्या या शिंगरांना (मर्द मराठा मावळ्यांना) उत्तर
खंडातील यमुनेच्या पाण्याचा स्पर्श व्हावा. (महाराष्ट्रातील लोक भारतीय लोकांशी प्रेमाने व एकोप्याने
वागते.) ।। १ ।।
आकाशात गडगडणाच्या ढगांची आम्हांला मुळीच भीती वाटत नाही. हे अस्मानी संकट येवो अथवा
परकीय आक्रमणाचे सुलतानी संकट येवो, आम्ही या संकटांना तोडीस तोड जवाब देऊ, सामना करू. सहयाद्रीचे
सिंह असले श्रीछत्रपती शिवाजी महाराजांच्या धेर्यांचा व पराक्रमाचा वारसा येथील जनता वागवत आहे. त्यामुळे
महाराष्ट्राच्या जयजयकाराचा नाद दरीदरीतून निनादत आहे. । २ ॥
मराठी माणसाच्या काळ्याकभिन्न कातळासारख्या खंबीर छातीवर अभिमानाची लेणी कोरलेली आहेत.
मराठी मनाची पोलादी मनगटे, पोलादी कर्तृत्व कधीही जीवघेणी संकटे लीलया झेलायला तयार आहेत. मराठी
माणसे कष्ट करून घामाने थबथबली आहेत. दारिद्र्याच्या उन्हात जरी शिणत असली तरी भारताच्या थोरवीसाठी
सतत झटायला तयार आहेत. दिल्लीचे सिंहासन राखणाच्या माझ्या महाराष्ट्राचा जयजयकार असो. ।। ३ ।।
Divya Dada chavan
ReplyDelete