स्वाध्यायमाला - प्रश्नोत्तरे इयत्ता सातवी भूगोल 4 - हवेचा दाब
प्रश्न १. गाळलेल्या जागी कंसांतील योग्य पर्याय लिहा :
उत्तरे :
(१) हवा उंच गेल्यावर विरळ होते.
(२) हवेचा दाब मिलिमीटर या परिमाणात सांगतात.
(३) पृथ्वीवर हवेचा दाब असमान आहे.
(४) ५' उत्तर ते ५° दक्षिण अक्षवृत्तांदरम्यान विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा आहे.
प्रश्न २. पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा :(१) हवेचे तापमान कमी झाले, तर हवेच्या दाबावर कोणता परिणाम होईल ?
उत्तर : हवेचे तापमान कमी झाले, तर हवेचा दाब वाढेल.
(२) हवेचे तापमान कमी झाल्यामुळे हवेचा दाब का वाढेल ?
उत्तर : हवेचे तापमान कमी झाल्यामुळे हवेची घनता वाढेल व त्यामुळे हवेचा दाब वाढेल.
(३) विषुववृत्तावर हवेचा दाब कमी असतो, तर हवेचा दाब आर्क्टिक वृत्तावर कसा असेल ?
उत्तर : विषुववृत्तावर हवेचा दाब कमी असतो, तर आर्क्टिक वृत्तावर हवेचा दाब जास्त असेल.
(४) हवेच्या दाबावर कोणते घटक परिणाम करतात?
उत्तर : प्रदेशाची उंची, हवेचे तापमान आणि बाष्पाचे प्रमाण हे घटक हवेच्या दाबावर परिणाम करतात.
प्रश्न ३. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा :
(१) हवेच्या दाबावर तापमानाचा कोणता परिणाम होतो?
उत्तर : (१) तापमान व हवेचा दाब यांचा जवळचा संबंध आहे. (२) जेथे तापमान जास्त असते, तेथे हवेचा दाब कमी असतो. (३) जास्त तापमानामुळे हवा गरम होते व प्रसरण पावते. त्यामुळे हवेची घनता कमी होऊन ती हलकी होते. (४) जमिनीलगतची अशी हवा आकाशाकडे वर जाते. त्यामुळे सदर प्रदेशातील हवेचा दाब कमी होतो.
(२) उपध्रुवीय भागात कमी दाबाचा पट्टा का निर्माण होतो ?
उत्तर : (१) पृथ्वीच्या धुवांकडे जाणारा भाग तौलनिकदृष्ट्या वक्राकार आहे. (२) त्यामुळे धुवांकडील प्रदेशाचे क्षेत्र कमी होत जाते. (३) या आकारामुळे वाऱ्याना बाहेर पडण्यास जास्त वाव मिळतो. (४) पृथ्वीच्या पृष्ठभागावरील हवेच्या कमी घर्षणामुळे तसेच पृथ्वीच्या परिवरलनाच्या गतीमुळे या भागातील हवा बाहेर फेकली जाते. त्यामुळे उपधृवीय भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो.
(३) हवादाबमापकाविषयी थोडक्यात माहिती लिहा.
उत्तर : (१) हवेचा दाब मोजण्यासाठी हवादाबमापक हे उपकरण वापरले जाते. (२) पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळील हवेच्या दाबाची नोंद या उपकरणाद्वारे केली जाते. (३) हवादाबमापकाच्या साहाय्याने हवेचा दाब मिलिबार या एककात मोजला जातो.
(४) हवेच्या दाबाचे परिणाम स्पष्ट करा.
उत्तर : (१) हवेच्या दाबामुळे वारे व वादळे निर्माण होतात. (२) एखादया ठिकाणची समुद्रसपाटीपासूनची उंची हवेच्या दाबाच्या आधारे मोजणे शक्य होते. (३) हवेच्या दाबामुळे आरोह पर्जन्याची निर्मिती होते. (४) हवेच्या दाबाचा सजीवांच्या श्वसनक्रियेवरही परिणाम होतो.
प्रश्न ४. पुढील विधानांची भौगोलिक कारणे लिहा :
(१) हवेचा दाब उंचीनुसार कमी होतो.
उत्तर : (१) हवेत धूलिकण, बाष्प, जड वायू इत्यादी घटक असतात. हवेतील या घटकांचे प्रमाण भूपुष्ठालगत जास्त असते. (२) भूपुष्ठापासून जसजसे उंचावर जावे, तसतसे हवेतील या घटकांचे प्रमाण कमी होत जाते. परिणामी जसजशी उंची वाढत जाते, तसतशी हवा विरळ होत जाते व त्यामुळे हवेचा दाबही कमी होतो. अशा प्रकारे हवेचा दाब उंचीनुसार कमी होतो.
(२) हवादाबपट्ट्यांचे आंदोलन होते.
उत्तर : (१) सूर्यांचे उत्तरायण आणि दक्षिणायन (भासमान ध्रमण) होते. (२) सूर्याचे उत्तरायण आणि दक्षिणायन या क्रियांमुळे पृथ्वीवर पहणाच्या सूर्यप्रकाशाचा कालावधी आणि तीव्रता विषुववृत्तापासून उत्तर व दक्षिण गोलार्धादरम्यान बदलत जाते परिणामी तापमानपट्यावर अवलंबून असलेल्या ह्वादाबट्याच्या स्थानात बदल होतो (४) सर्वसाधारणपणे उत्तरायणात हवादाबपटटे ५ ते ७ उत्तरेकडे व दक्षिणायनात ५ ते ७ दक्षिणेकडे सरकतात अशा प्रकारे, हवादाबपट्टयांचे आंदोलन होते.
प्रश्न ५. टिपा लिहा :
(१) मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचे पट्टे :
(१) विषूववृत्तीय प्रदेशातून आकाशाकडे गेलेली उष्ण व हलकी हवा अधिक उंचीवर गेल्यानंतर धुवीय प्रदेशाकडे उत्तर व दक्षिण दिशेत वाहू लागते. (२) उंचावरील कमी तापमानामुळे हवा थंड होऊन जड़ होते. (३) जड झालेली ही हवा उत्तर व दक्षिण गोलार्धात २५' ते ३५'अक्षवृताच्या दिशेने खाली येते. (४) परिणामी, उत्तर आणि दक्षिण गोलार्धात २५' ते ३५' अक्षवृताच्या दरम्यान हवेच्या जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात. (५) हवेचे हे पट्टे मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचे पट्टे म्हणून ओळखले जातात. (६) मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्यांतील हवा कोरडी असते. परिणामी पृथ्वीवरील बहुतेक उष्ण वाळवंटे या प्रदेशात आढळतात
(२) हवेच्या दाबाचे क्षितिजसमांतर वितरण :
(१) पृथ्वीच्या पृष्ठभागावर आडव्या दिशेत अथवा क्षितिजसमांतर दिशेत वायुदाब सारखा नसतो. (२) वायुदाबात प्रदेशानुसार फरक पडतो. (३) हवेच्या दाबाच्या अशा वितरणास आडव्या दिशेतील वितरण किंवा क्षितिजसमातर वितरण म्हणतात.
(३) धुवीय जास्त दाबाचे पट्टे :
(१) उत्तर व दक्षिण धुवीय प्रदेशांत वर्षभर तापमान शून्य अंश सेल्सिअसपेक्षाही कमी असते. (२) त्यामुळे तेथील हवा थंड असते. (३) परिणामी, धुवीय प्रदेशांत पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ हवेच्या जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात. (४) त्यांना धुवीय जास्त दाबाचे पट्टे म्हणतात. (५) धुवीय जास्त दाबाचे पट्टे उत्तर व दक्षिण गोला्धात ८० ते ९०° या अक्षवृत्तांच्या दरम्यान दिसून येतात.
प्रश्न ६. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा :
(१) ३० अक्षवृत्तापाशी जास्त दाबाचा पट्टा कसा तयार होतो ? तो भाग वाळवंटी का असतो?
उत्तर : (अ) ३० अक्षदृत्तापाशी जास्त दाबाच्या पट्ट्याची निर्मिती : (१) विषुववृत्तीय प्रदेशातून आकाशाकडे गेलेली उष्ण व हुलकी हवा अधिक उंचीवर गेल्यानंतर धुरुवीय प्रदेशाकडे उत्तर व दक्षिण दिशेत वाहू लागते. (२) उंचावरील कमी तापमानामुळे हवा थंड होऊन जड होते. (३) जड झालेली ही हवा उत्तर व दक्षिण गोलार्धांत २५' ते ३५' अक्षृत्तांच्या दरम्यान जमिनीच्या दिशेने खाली येते. (४) परिणामी, उत्तर आणि दक्षिण गोलाधांत २५° ते ३५ अक्षवृत्तांच्या दरम्यान हवेच्या जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात. हवेचे हे पट्टे मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचे पट्टे म्हणून ओळखले जातात. (५) अशा प्रकारे ३०° अक्षवृत्तापाशी जास्त दाबाचा पट्टा तयार होतो.
(ब) ३०° अक्षवृत्तापाशी असणार्या जास्त दाबाच्या पट्टयातील भाग बाळवंटी असल्याची कारणे
(१) मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्यातील (उत्तर व दक्षिण गोलार्धांत २५' ते ३५ अक्षृत्तांच्या दरम्यान) हवा कोरडी असते. (२) कोरड्या हवेत बाष्याचे प्रमाण कमी असते. त्यामुळे या भागात पर्जन्याचे प्रमाणही कमी असते.(३) परिणामी ३०० अक्षवृत्तापासचा भाग वाळवंटी असतो.
(२) तापमानपट्टे व हवादाबपट्टे यांतील फरक स्पष्ट करा.
उत्तर : तापमानपट्टे व हवादाबपट्टे यांतील फरक पुढीलप्रमाणे आहे : (१) तापमानपट्टे सलग असतात. याउलट हवादाबपट्टे सलग नसतात. (२) तापमानपट्टे विषुवृत्ताकडून दोन्ही धुवांकडे जास्त तापमान ते कमी तापमान यांप्रमाणे पसरलेले असतात. याउलट हवादाबपट्टे हे कमी व जास्त हवादाबाची क्षेत्रे यांनुसार विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवांकडे जाताना वेगवेगळ्या भागांत आढळतात. (३) तापमानपट्ट्यांचा अक्षवृत्तीय विस्तार हा जास्त असतो. उष्ण कटिबंध (तापमानपट्टा) उत्तर व दक्षिण गोलार्धात उत्तर व दक्षिण गोलार्धात २३अंश३० ' ते ६६*३०' अक्षवृत्तांच्या दरम्यान आढळतो. शीत कटिबंध (तापमानपट्टा) उत्तर व दक्षिण गोलाधांत ६६'३०' ते ९०° अक्षवृत्तांच्या दरम्यान आढळतो. याउलट हवादाबपट्ट्यांचा अक्षवृत्तीय विस्तार हा मर्यादित असतो. सर्वसाधारणपणे तो १०° अक्षवृत्त इतका असतो.
प्रश्न ७.
(१) उष्ण कटिबंधीय प्रदेशांमध्ये कोणता दाबपट्टा प्रामुख्याने आढळतो?
उत्तर : उष्ण कटिबंधीय प्रदेशांमध्ये प्रामुख्याने विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा आढळतो.
(२) धुवीय वाऱ्याची निर्मिती कोणत्या दाबपट्ट्यांशी निगडित आहे ?
उत्तर : धुवीय वाऱ्याची निर्मिती ध्रुवीय जास्त दाबपट्ट्यांशी निगडित आहे.
(३) ध्रुवीय वारे कोणत्या कटिबंधात येतात?
उत्तर : ध्रुवीय वारे शीत कटिबंधात येतात.
(४) उष्ण कटिबंधीय प्रदेशात हवेचा दाब कमी असण्याचे कारण कोणते ?
उत्तर : उष्ण कटिबंधीय प्रदेशात (कर्कवृत्त ते मकरवृत्त यांदरम्यान) सूर्याची किरणे लंबरूप पडतात. त्यामुळे या प्रदेशात हवा जास्त तापते. ही जास्त तापलेली हवा प्रसरण पावून विरळ होते. विरळ हवेची घनता कमी असते. त्यामुळे उष्ण कटिबंधीय प्रदेशात हवेचा दाब कमी असतो.
(५) समशीतोष्ण कटिबंधातून वाहणारे वारे कोणत्या दाबपट्ट्याशी संबंधित आहेत ?
उत्तर : समशीतोष्ण कटिबंधातून वाहणारे वारे मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबपट्ट्याशी संबंधित आहेत.
(६) कमी दाबाचे पट्टे कोणकोणत्या अक्षवृत्तांदरम्यान आहेत ?
उत्तर : कमी दाबाचे पट्टे उत्तर व दक्षिण गोलार्धात ०° ते ५° अक्षवृत्त आणि ५५ ते ६५ अक्षवृत्त या दरम्यान आहे
प्रश्न ९. हवेचे दाबपट्टे दर्शवणारी सुबक आकृती काढून नावे दया :
उत्तर
No comments:
Post a Comment