1.6 - Grandpa's Story -Tit For Tat
खूप खूप वर्षापूर्वी, एका नदीच्या शेजारी एक उंट आणि एक कोल्हा, पाण्याच्या काठाजवळ राहत होते.
आणि त्या नदीच्या दुसर्या बाजूला शेते आणि शेतमळे असलेला एक गाव होता. तो कोल्हा खूप हुशार होता. आपले खाणे आनंदाने चघळत असलेल्या त्याच्या मित्राला - उंटाला- त्याने युक्तीने फसवण्याचा प्रयत्न केला. कोल्हा त्याला एका शेतकऱ्याच्या शेतातील उसाच्या मेजवानील. जाण्याकरिता भुरळ घालू लागला. सुरुवातीला तो उंट घुटमळला (त्याने होय-नाही केले). परंतु अखेरीस त्याने कोल्ह्याबरोबर जाऊन उसाच्या शेतावर धाड घालण्याचे कबूल केले
कोल्हा उंटाच्या पाठीवर बसला आणि त्या दोन मित्रांनी ती नदी ओलांडली. उसाच्या शेतात त्यांनी अगदी पोट भरून ऊस खाल्ला. अचानक तो कोल्हा मोठ्याने केकाटू (विव्हळू) लागला.
"चू5प्!"' उंट म्हणाला"तू त्या शेतकऱ्यालाजागे करशील. " परंतु लबाड कोल्हा मोठ्याने केकाटतच राहिला. साहजिकच, तो शेतकरी व त्याचे नोकर शेताकडे धावत आले. तो खोडसाळ कोल्हा निसटून पळून गेला, परंतु गरीब बिचाऱ्या उंटाला तसे करता आले नाही. शेतकऱ्याने त्याला भरपूर चोप दिला आणि त्याला हाकलून लावले.तो कोल्हा नदीकिनारी उंटाची वाट पाहत होता. तो म्हणाला, "माफ कर, बंधू. परंतु रात्रीच्या चांगल्य जेवणानंतर मला गाण्याची सवय आहे. मला वाटते, तू ते फारसे मनाला लावून घेतलेले नसावेस.'"'
उंट काहीच बोलला नाही. त्याने कोल्ह्याला आपल्या पाठीवर बसू दिले व तो नदीत शिरला. त्या नदीच्या मध्याजवळ पाणी खूप खोल होते. तेथे त्या उंटाने नदीमध्ये बुडी मारायला सुरुवात केली. कोल्हा घाबरला.अरे तू हे असे काय करतो आहेस मूर्खासारख! तू मला बुडवण्याचा प्रयत्न करीत आहेस का?" "नाही, बंधू," उंट म्हणाला, "एवढेच की, चांगल्या जेवणानंतर मला नदीत बुडी मारण्याची सवय आहे. मला आशा आहे, तुला वाईट वाटले नसेल!"
त्या खोडसाळ कोल्ह्याला चांगला धडा मिळाला. त्याने त्या उंटाला पुन्हा कधीही त्रास दिला नाही.
No comments:
Post a Comment