Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

Translate

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image

Thursday, 1 October 2020

स्वाध्यायमाला - प्रश्नोत्तरे - सातवी मराठी ४ - श्रावणमास

  ४ - श्रावणमास 

प्र   - कवितेत आलेली  प्राणी यांची नावे

उत्तर-  प्राणी हरिणी, पाडसे, खिल्लारे

प्र   - कवितेत आलेली  पक्षी यांची नावे

उत्तर  -बगळे पाखरे,

प्र   - कवितेत आलेली  फुले यांची नावे

उत्तर - सोनचाफा, केवडा. पारिजातक.

(१) देवदर्शनाला निघालेल्या-  ललना

2)  फुले-पाने खुडणाऱ्या  -   सुंदर बाला

3)  गाणी गात फिरणारा  - गोप

प्रश्न. सुंदर बाला या फुलमाला' या ओळीत सारख्या वर्णाचा उपयोग अधिक केल्यामुळे गोड नाद निर्माण

होतो. त्यामुळे पंक्ती गुणगुणाव्याशा वाटतात. कवितेतील अशा ओढळी शोधून लिहा.

उत्तर -  श्रावण मासी हर्ष मानसी,  तरुशिखरांवर, उंच घरांवर उठती वरती जलदांवरती, उतरनि येती अवनीवरती ,सुंदर हरिणी हिरव्या कुरणी

प्रश्न. पुढील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधून लिहा :
(१) क्षणात पाऊस पडतो, तर क्षणात ऊन पडते.
उत्तर : कवितेतील ओळी क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे.या ओळी आहेत 
२) झाडांवर, घरांवर कोवळे कोवळे ऊन पडते.
उत्तर : कवितेतील ओळी तरुशिखरांवर, उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे.या ओळी आहेत 
३) हरिणी आपल्या पाडसांसह कुरणात बागडत आहेत
उत्तर : सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती.या ओळी आहेत 

पुढील प्रसंगी कार्य घडते ते लिहा :
पहिला पाऊस आल्यावर
उत्तर : कडक उन्हाळ्यात वातावरण तापलेले असते. घामाच्या धारांनी जीव हैराण झालेला असतो. पहिला
पाऊस पडतो तेव्हा मन आनंदून जाते. हवेत गारवा येतो. सारी सृष्टी पावसात न्हाऊन प्रसन्न दिस लागते.
पहिला पाऊस सर्व प्राणिमात्रांना हवाहवासा वाटतो.
सरीवर सरी कोसळल्यावर...
उत्तर : आषाढ महिन्यात खूप मुसळधार पाऊस येतो. सरीवर सरी कोसळतात. तेव्हा पावसात चिंब भिजावेमे
बाटते. झरे, नदी, नाले ओसंडून वाहतात. पशु-पक्ष्यांना मुवलक पाणी मिळते. सर्व सृष्टी न्हाऊन निघते, पशु-पक्षी निवारा शोधतात. शेतकरी आनंदित होतात.
प्रश्न - श्रावण व वैशाख या दोन्ही महिन्यांतील निसर्गात जाणवणारा फरक तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर : वैशाखात कडक ऊन पडते. जमिनीला भेगा पडतात. अंगाची लाहीलाही होते. घामाच्या धार.
लागतात. नदीनाले आटतात. गुराढोरांना हिरवा चारा मिळत नाही. तहानेने प्राणिमात्रांचा जीव व्याकुळ होतो.
श्रावणात पावसाची रिमझिम बरसात होते. ऊन कोवळे होते. ऊनपावसाचा आनंददायी लपंडाव सुरू होतो.
हवेत सुखद गारवा येतो. शेतात पेरलेले बियाणे उगवून येते. शेतकरी आनंदात असतात. नदीनाले भरभरून वाहतात.गुराढोरांना हिरवा चारा मिळतो. सगळी सृष्टी हिरवीगार होते. पशु-पक्षी व माणसे आनंदात व उत्साहात वावरतात.
प्रश्न  पाऊस व छत्री या दोघांमधील संवादाची कल्पना करा व लिहा.
पाऊस : तापलेल्या धरतीला गारवा मिळावा; म्हणून मी इतक्या उंचावरून खाली येतो नि तू मला का अडवतेस?
छत्री : नाही, भाऊ! मी तुम्हांला अडवत नाही. मी फक्त माणसांना भिजण्यापासून वाचवते.
पाऊस : पण कधी तरी माणसांनी भिजावं की! गुरेढोरे, सारी सृष्टी भिजते... मग माणसांचे एवढे ते काय?
छत्री: तसे नव्हे! माणसे भिजली तर त्यांना पडसे, खोकला येतो. डॉक्टरकडे जावे लागते. विशेषत.बालकांची मलाच काळजी घ्यावी लागते.
पाऊस : खरं आहे तुझे. तू त्यांचं संरक्षण करतेस. पण एक विचारू?
छत्री -विचारा ना!
पाऊस : तू माणसांचे रक्षण करतेस. मग तू का भिजतेस?
छत्री: उत्तर एकदम सोप् आहे! अहो, वर्षभर मी अडगळीत असते. तम्ही आलात की मला अथोळीचा
आनंद मिळतो. हो की नाही? ?
पाऊस : धन्य आहे गं तुझी बाई।।

No comments:

Post a Comment