इयत्ता 8 वी भूगोल 10. क्षेत्रभेट | Online study
क्षेत्रभेट :
१) स्वरूप :
क्षेत्रभेट ही भूगोल विषयासाठी अत्यंत महत्त्वाची अभ्यासपद्धती आहे.
२)क्षेत्रभेटीचे महत्त्व :
क्षेत्रभेटीद्वारे भौगोलिक संकल्पनांचा व प्रक्रियांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो, मानव व पर्यावरण यांतील सहसंबंध जाणून घेता येतो.
३)क्षेत्रभेटीचे नियोजन :
क्षेत्रभेटीचा विषय, ठिकाण, कालावधी यांनुसार क्षेत्रभेटीचे नियोजन करणे आवश्यक असते.
(४)क्षेत्रभेटीची पूर्वतयारी :
क्षेत्रभेटीच्या पूर्वतयारीत नोंदवही, नमुना प्रश्नावली, कॅमेरा, पेन, पेन्सिल इत्यादी साहित्य सोबत ठेवणे, परवानगी पत्र मिळवणे, क्षेत्रभेटीसाठी ठिकाण, दिवस व वेळ आणि हेतू निश्चित करणे आणि प्रश्नावली तयार करणे इत्यादी बाबींचा समावेश होतो.
(५)क्षेत्रभेटी दरम्यान घ्यायची खबरदारी :
क्षेत्रभेटीदरम्यान पर्यावरणास हानी पोहोचणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक असते
२. क्षेत्रभेटीचे अहवाल लेखन
(१) स्वरूप :
क्षेत्रभेट पूर्ण झाल्यानंतर क्षेत्रभेटीद्वारे संकलित केलेल्या माहिती लिखित स्वरूपात/अहवाल स्वरूपात मांडणे आवश्यक ठरते.
(२) साधने/आधार :
क्षेत्रभेटीद्वारे संकलित केलेली माहिती, नकाशे, तक्ते -आराखडे, आलेख, चित्रे, छायाचित्रे इत्यादी साधनांच्या आधारे अहवाल लेखन केले जाते.
(३) मुद्दे :
प्रस्तावना, क्षेत्रभेटीद्वारे संकलित केलेल्या माहितीचे सादरीकरण, निष्कर्ष, आभार, संदर्भसूची इत्यादी मुद्द्यांच्या आधारे अहवाल लेखन केले जाते.
(१) क्षेत्रभेट पूर्ण झाल्यानंतर लिहिलेल्या अहवालाचे वर्गात गटनिहाय/वैयक्तिकरीत्या सादरीकरण करणे उपयुक्त ठरते.
(२) क्षेत्रभेटीद्वारे संबंधित क्षेत्रातील सामाजिक, आर्थिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक परिस्थितीचा अभ्यास करता येतो.
No comments:
Post a Comment