Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

Translate

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image

Thursday 22 August 2024

Importance of the day - 23 ऑगस्ट दिनविशेष



 Importance of the day -

 23 ऑगस्ट  दिनविशेष

आजचा दिनविशेष - घटना :

1839 : युनायटेड किंग्डमने हाँगकाँगचा ताबा घेतला.

1914 : पहिले महायुद्ध – जपानने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.

1942 : मो. ग. रांगणेकर यांच्या कुलवधू नाटकाचा पहिला प्रयोग.

1942 : दुसरे महायुद्ध – स्टॅलिनग्राडची लढाई सुरू झाली.

1966 : लूनार ऑर्बिटर-1 या मानवरहित यानाने चंद्रावरून पृथ्वीची पहिली छायाचित्रे घेतली.

1990 : आर्मेनियाला सोव्हिएत युनियनपासून स्वातंत्र्य मिळाले.

1991 : सार्वजनिक वापरासाठी वर्ल्ड वाइड वेब लाँच केले गेले.

1997 : हळदीच्या पेटंटसाठी भारताने अमेरिकेसोबत सुरू असलेली कायदेशीर लढाई जिंकली. एखाद्या विकसनशील देशाने अमेरिकेच्या पेटंटला आव्हान देण्याची ही पहिलीच वेळ आहे.

2005 : कविवर्य विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान.

2011 : लिबियाचा हुकूमशहा मुअम्मर गद्दाफीची सत्ता संपुष्टात.

2012 : राजस्थानमध्ये अतिवृष्टीमुळे 30 जणांचा मृत्यू.

2023 : चांद्रयान-3 मिशनने भारतीय इतिहासातील पहिले चंद्र लँडिंग सुरू केले.

*📝Class 6 th science*

*The living world*

https://www.dnyaneshwarkute.com/2021/06/class-6-th-science-2the-living-world.html

आजचा दिनविशेष - जन्म :

1754 : ‘लुई (सोळावा)’ – फ्रान्सचा राजा यांचा जन्म. (मृत्यू : 21 जानेवारी 1793)

1852 : ‘राधा गोबिंद कार’ – भारतीय वैद्य आणि दानकर्ते यांचा जन्म. (मृत्यू : 19 डिसेंबर 1918)

1872 : ‘तांगुतरी प्रकाशम’ – भारतीय वकील आणि राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू : 20 मे 1957)

1890 : ‘हॅरी फ्रँक गग्नेहॅम’ – न्यूज-डे चे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 22 जानेवारी 1971)

1918 : ‘गोविंद विनायक करंदीकर’ – श्रेष्ठ कवी यांचा जन्म. (मृत्यू : 14 मार्च 2010)

1944 : ‘सायरा बानू’ – चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म.

1951 : ‘नूर’ – जॉर्डनची राणी यांचा जन्म.

1961 : ‘भूपेश बघेल’ – छत्तीसगडचे मुख्यमंत्री यांचा जन्म.

1973 : ‘मलायका अरोरा’ – मॉडेल आणि अभिनेत्री यांचा जन्म.

1988 : ‘वाणी कपूर’ – भारतीय अभिनेत्री यांचा जन्म.

आजचा दिनविशेष - मृत्यू :

634 : 634ई.पुर्व : ‘अबू बकर’ – अरब खलिफा यांचे निधन.

1363 : ‘चेन ओंलियांग डहाण’ – राजवटीचे संस्थापक यांचे निधन.

1806 : ‘चार्ल्स कुलोम’ – फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 14 जून 1736)

1892 : ‘डियोडोरो डा फोन्सेका’ – ब्राझीलचे पहिले अध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 5 ऑगस्ट 1827)

1971 : ‘हंसा वाडकर’ – मराठी हिंदी चित्रपट अभिनेत्री यांचे निधन. (जन्म : 24 जानेवारी 1924)

1974 : ‘डॉ. शंकर दामोदर पेंडसे’ – मराठी ग्रंथकार आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक यांचे निधन. (जन्म : 28 फेब्रुवारी 1897)

1975 : ‘पं. विनायकराव पटवर्धन’ – नामवंत शास्त्रीय गायक, गुरू, संगीतप्रसारक व अभिनेते यांचे निधन. (जन्म : 22 जुलै 1898)

1994 : ‘आरती साहा’ – इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला जलतणपटू यांचे निधन. (जन्म : 24 सप्टेंबर 1940)

1997 : ‘एरिक गेयरी’ – ग्रेनाडा चे पहिले पंतप्रधान यांचे निधन. (जन्म : 18 फेब्रुवारी 1922)

2013 : ‘रिचर्ड जे. कॉर्मन’ – आर.जे. कॉमन रेल्वेमार्ग गटाचे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 22 जुलै 1955)


No comments:

Post a Comment