Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

Translate

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image

Wednesday, 25 September 2024

Importance of the day 26 सप्टेंबर दिनविशेष

 


Importance of the day 

26 सप्टेंबर  दिनविशेष

आजचा दिनविशेष - घटना :

46 : 46 इ.स.पू. : ज्युलियस सीझर यांनी आपल्या पौराणिक पूर्वज व्हिनस गेनेटिक्स यांना एक मंदिर अर्पण केले.

1777 : अमेरिकन क्रांती – ब्रिटिश सैनिक फिलाडेल्फिया शहरात दाखल झाले.

1905 : अल्बर्ट आइनस्टाईन यांनी सापेक्षतेच्या विशेष सिद्धांतावर पहिला शोधनिबंध प्रकाशित केला.

1910 : स्वदेशभिमानी रामकृष्ण पिल्लई या भारतीय पत्रकाराला त्रावणकोर सरकारवर टीका केल्याबद्दल अटक करून हद्दपार करण्यात आले.

1950 : इंडोनेशिया संयुक्त राष्ट्र संघात सामील झाला.

1954 : जपानमध्ये तोया मारू ही फेरी वादळात बुडाली. 1,172 लोक मृत्युमुखी.

1959 : टायफून व्हेरा, रेकॉर्ड केलेल्या इतिहासात जपानला धडक देणारा सर्वात शक्तिशाली टायफून, जमिनीवर कोसळला, 4,580 लोक ठार झाले आणि सुमारे 1.6 दशलक्ष लोक बेघर झाले.

1960 : फिडेल कॅस्ट्रोने यु. एस. एस. आर. ला पाठिंबा जाहीर केला.

1973 : कॉनकॉर्ड या सुपरसॉनिक विमानाने विक्रमी वेळेत अटलांटिक महासागर नॉन-स्टॉप पार केला.

1984 : युनायटेड किंगडमने हाँगकाँगच्या हस्तांतरणास मान्यता दिली.

1990 : रंगनाथ मिश्रा यांनी भारताचे 21 वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला.

1997 : गरुड इंडोनेशियाचे विमान मेदान शहराजवळ कोसळले आणि 234 लोकांचा मृत्यू झाला.

2001 : व्यवस्थापकीय संपादक – सकाळ वृत्तपत्राचे संचालक प्रताप पवार यांची इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड.

2009 : टायफून केत्साना या चक्रीवादळाच्या तडाख्यात फिलिपाईन्स, चीन, व्हिएतनाम, कंबोडिया, लाओस व थायलंडमध्ये 700 लोक मृत्युमुखी.

*📝

English Grammar Proverb Part 1*

https://www.dnyaneshwarkute.com/2022/10/english-grammar-proverb-part-1.html

*👉अनमोल वाणी*

*कक्षा आठवी हिंदी*

https://www.dnyaneshwarkute.com/2020/08/online-test_56.html?m=1

*👉 पूर्ण विश्राम*

https://www.dnyaneshwarkute.com/2020/08/online-test_23.html?m=1

आजचा दिनविशेष - जन्म :

1820 : ‘पं. ईश्वरचंद्र विद्यासागर’ – यांचा जन्म. (मृत्यू : 29 जुलै 1891)

1849 : ‘इव्हान पेट्रोव्हिच पाव्हलॉव्ह’ – नोबेल पारितोषिक विजेते रशियन शास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 27 फेब्रुवारी 1936)

1858 : ‘मणिलाल नथुभाई त्रिवेदी’ – लेखक यांचा जन्म. (मृत्यू : 10 ऑक्टोबर 1898)

1870 : ‘क्रिस्चियन (दहावा)’ – डेन्मार्कचा राजा यांचा जन्म.

1876 : ‘गुलाम कबीर नैयरंग’ – भारतीय कवी, वकील, आणि राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू : 16 ऑक्टोबर 1852)

1888 : ‘टी. एस. इलिय’ – अमेरिकेत जन्मलेले ब्रिटिश कवी, नाटककार, टीकाकार आणि नोबेल पारितोषिक विजेते यांचा जन्म. (मृत्यू : 4 जानेवारी 1965)

1894 : ‘आचार्य शंकर दत्तात्रेय जावडेकर’ – प्रज्ञावंत भाष्यकार आणि तत्वचिंतक यांचा जन्म. (मृत्यू : 10 डिसेंबर 1955)

1909 : ‘बिल फ्रान्स सीनियर’ – NASCAR (नेशनल एसोसिएशन फॉर स्टॉक कार ऑटो रेसिंग) चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 7 जून 1992)

1918 : ‘एरिक मॉर्ली’ – मिस वर्ल्ड चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 9 नोव्हेंबर 2000)

1923 : ‘देव आनंद’ – भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक यांचा जन्म. (मृत्यू : 3 डिसेंबर 2011)

1927 : ‘रॉबर्ट कड’ – गेटोरेडे चे सह-संशोधक यांचा जन्म. (मृत्यू : 27 नोव्हेंबर 2007)

1931 : ‘विजय मांजरेकर’ – भारतीय क्रिकेट खेळाडू यांचा जन्म. (मृत्यू : 18 ऑक्टोबर 1983)

1932 : ‘मनमोहन सिंग’ – भारताचे माजी पंतप्रधान यांचा जन्म.

1943 : ‘इयान चॅपल’ – ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.

1962 : ‘चंकी पांडे’ – भारतीय अभिनेता यांचा जन्म.

1972 : ‘मार्क हॅस्लाम’ – न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.

1981 : ‘सेरेना विल्यम्स’ – अमेरिकन टेनिस खेळाडू यांचा जन्म.


आजचा दिनविशेष - मृत्यू :

1902 : ‘लेवी स्ट्रॉस’ – लेव्ही स्ट्रॉस कंपनी चे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 26 फेब्रुवारी 1829)

1952 : ‘जॉर्ज सांतायाना’ – स्पॅनिश तत्त्वज्ञानी यांचे निधन.

1956 : ‘लक्ष्मणराव किर्लोस्कर’ – भारतीय, मराठी उद्योगपती यांचे निधन. (जन्म : 20 जून 1869)

1977 : ‘उदय शंकर’ – भारतीय नर्तक यांचे निधन. (जन्म : 8 डिसेंबर 1900)

1988 : ‘शिवरामबुवा दिवेकर’ – रूद्रवीणा वादक यांचे निधन. (जन्म : 1 एप्रिल 1912)

1989 : ‘हेमंतकुमार’ – गायक, संगीतकार आणि निर्माता यांचे निधन. (जन्म : 16 जून 1920)

1996 : ‘विद्याधर गोखले’ – मराठी नाटककार, पत्रकार यांचे निधन. (जन्म : 4 जानेवारी 1924)

2002 : ‘राम फाटक’ – मराठी संगीतकार, गायक यांचे निधन. (जन्म : 21 ऑक्टोबर 1917)

2008 : ‘पॉल न्यूमन’ – अमेरिकन अभिनेता यांचे निधन. (जन्म : 26 जानेवारी 1925)

No comments:

Post a Comment