Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

Translate

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image

Saturday 12 October 2024

Importance of the day 12 ऑक्टोबर दिनविशेष

 


Importance of the day 

12 ऑक्टोबर  दिनविशेष

12 ऑक्टोबर दिनविशेष - घटना :

1492 : ख्रिस्तोफर कोलंबस वेस्ट इंडिजमधील बहामास येथे पोहोचला.आपण भारतात पोहोचलो आहोत असा त्याचा समज झाला.

1823 : स्कॉटलंडच्या चार्ल्स मॅकिंटॉशने पहिला रेनकोट विकला.

1847 : वर्नर वॉन सीमेन्स यांनी सीमेन्स व हलस्के (सीमेन्स एजी) कंपनी ची सुरवात केली.

1850 : अमेरिकेतील पहिले महिला वैद्यकीय महाविद्यालय सुरू.

1871 : भारतात ब्रिटिश सरकारने क्रिमिनल ट्राइब्स अॅक्ट या कायद्याद्वारे 161 जाती व जमातींना गुन्हेगारी जमाती ठरविले.

1901 : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रुझवेल्ट यांनी अधिकृतपणे कार्यकारी हवेलीचे नाव व्हाईट हाऊस ठेवले.

1968 : मेक्सिको सिटी, मेक्सिको येथे 19व्या ऑलिम्पिक खेळांना सुरुवात झाली.

1983 : जपानचे पंतप्रधान तनाका काकुई यांना लॉकहीड कॉर्पोरेशनकडून $200,000 लाच घेतल्याबद्दल चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.

1993 : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना.

1998 : 33व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये कोल्हापूरच्या पल्लवी शाहने आपला सामना जिंकून आंतरराष्ट्रीय महिला मास्टरचा किताब पटकावला.

2000 : भारतीय वनस्पती जनुकशास्त्रज्ञ डॉ. सुरिंदर के. वसल आणि मेक्सिकोच्या वनस्पती जनुकशास्त्रज्ञ डॉ. इव्हॅन्जेलिना व्हिलेगास यांना प्रोटिनयुक्त मक्याची जात विकसित केल्याबद्दल सहस्त्रक जागतिक अन्न पुरस्कार जाहीर.

2001 : संयुक्त राष्ट्र आणि संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस कोफी अन्नान यांना नोबेल शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला.

2005 : दुसरे चिनी मानवी अंतराळ उड्डाण, शेन्झोऊ 6, प्रक्षेपित झाले, दोन अंतराळवीरांना पाच दिवस कक्षेत घेऊन गेले.

2012 : युरोपियन युनियनने 2012 चा नोबेल शांतता पुरस्कार जिंकला

2017 : युनायटेड स्टेट्सने युनेस्कोमधून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला. इस्रायल ने हि त्या पाठोपाठ जाहीर केले.


12 ऑक्टोबर दिनविशेष - जन्म :

1860 : ‘एल्मर अॅम्ब्रोस स्पीरी’ – गॅरोकोम्पास चे निर्माते यांचा जन्म. (मृत्यू : 16 जून 1930)

1868 : ‘ऑगस्ट हॉच’ – ऑडी मोटार कंपनी चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 3 फेब्रुवारी 1951)

1911 : ‘विजय मर्चंट’ – क्रिकेटपटू, क्रिकेट समालोचक, उद्योगपती व समाजसेवक यांचा जन्म. (मृत्यू : 27 ऑक्टोबर 1987)

1918 : ‘मुथ्थय्या अन्नामलाई चिदंबरम’ – उद्योगपती व क्रिकेट प्रशासक, BCCI चे अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 19 जानेवारी 2000)

1921 : ‘जयंत श्रीधर टिळक’ – संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे एक नेते यांचा जन्म. (मृत्यू : 23 एप्रिल 2001)

1922 : ‘शांता शेळके’ – कवयित्री आणि गीतलेखिका यांचा जन्म. (मृत्यू : 6 जून 2002)

1935 : ‘शिवराज पाटील’ – भारतीय वकील आणि राजकारणी यांचा जन्म.

1946 : ‘अशोक मांकड’ – क्रिकेटपटू यांचा जन्म. (मृत्यू : 1 ऑगस्ट 2008)

1985 : ‘शक्ती मोहन’ – भारतीय नृत्यांगना, अभिनेत्री यांचा जन्म.


12 ऑक्टोबर दिनविशेष - मृत्यू :

1967 : ‘डॉ. राम मनोहर लोहिया’ – समाजवादी नेते, विख्यात संसदपटू, लोकसभेतील प्रभावी वक्ते व व्यासंगी लेखक यांचे निधन. (जन्म : 23 मार्च 1910)

1996 : ‘रेने लॅकॉस्ते’ – फ्रेन्च लॉन टेनिस खेळाडू आणि पोलो टी शर्टचे जनक यांचे निधन. (जन्म : 2 जुलै 1904)

2011 : ‘डेनिस रिची’ – सी प्रोग्रामिंग लँग्वेज चे निर्माते यांचे निधन. (जन्म : 9 सप्टेंबर 1941)

2012 : ‘सुखदेव सिंग कांग’ – भारतीय न्यायाधीश व राजकारणी यांचे निधन. (जन्म : 15 मे 1931)

No comments:

Post a Comment