Importance of the day
14 ऑक्टोबर दिनविशेष
आजचा दिनविशेष - घटना :
1882 : पंजाब विद्यापीठ भारतात (आता पश्चिम पाकिस्तान) सुरू झाले.
1920 : ऑक्सफर्ड विद्यापीठाने महिलांना पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला.
1920 : फिनलंड आणि सोव्हिएत रशिया यांनी काही प्रदेशांची देवाणघेवाण करून टार्टू करारावर स्वाक्षरी केली.
1926 : ए.ए. मिल्ने यांचे मुलांसाठीचे विनी-द-पूह पुस्तक प्रकाशित झाले.
1933 : लीग ऑफ नेशन्स आणि जागतिक निःशस्त्रीकरण परिषदेतून जर्मनीने माघार घेतली.
1947 : चार्ल यॅगर या वैमानिकाने X-1 या विमानातून ध्वनीपेक्षा जास्त(सुपरसॉनिक) वेगाने पहिले यशस्वी उड्डाण केले.
1968 : अपोलो कार्यक्रम : अपोलो-7 च्या क्रूद्वारे अमेरिकन अंतराळवीरांद्वारे कक्षेत प्रथम थेट दूरदर्शन प्रसारित केले गेले.
1981 : उपराष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांची इजिप्तचे अध्यक्ष म्हणून निवड.
1982 : अमेरिकेचे अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी ड्रग्ज विरुद्ध युद्ध सुरू केले.
1998 : प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले.
*5 वी प.अभ्यास 2*
https://www.dnyaneshwarkute.com/2020/11/5-2.html
*5 वी गणित*
https://www.dnyaneshwarkute.com/2020/11/5-study-from-home-with-fun_7.html
*5 वी मराठी*
https://www.dnyaneshwarkute.com/2020/11/5-study-from-home-with-fun.html
*5 वी english*
https://www.dnyaneshwarkute.com/2020/11/class-5-th-diwali-project-english-study.html
आजचा दिनविशेष - जन्म :
1643 : ‘बहादूरशहा जफर (पहिला)’ – मुघल सम्राट यांचा जन्म. (मृत्यू : 27 फेब्रुवारी 1712)
1784 : ‘फर्डिनांड (सातवा)’ – स्पेनचा राजा यांचा जन्म. (मृत्यू : 29 सप्टेंबर 1833)
1882 : ‘इमॉन डी व्हॅलेरा’ – आयर्लंड प्रजासत्ताकाचे पहिले राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 29 ऑगस्ट 1975)
1890 : ‘ड्वाईट आयसेनहॉवर’ – अमेरिकेचे 34 वे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 28 मार्च 1969)
1924 : ‘वीरेन्द्रकुमार भट्टाचार्य’ – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आसामी साहित्यिक यांचा जन्म. (मृत्यू : 6 ऑगस्ट 1997)
1927 : ‘रॉजर मूर’ – जेम्स बाँडच्या भूमिकांसाठी प्रसिद्ध इंग्लिश अभिनेता यांचा जन्म.
1931 : ‘निखिल बॅनर्जी’ – मैहर घराण्याचे सतारवादक यांचा जन्म. (मृत्यू : 27 जानेवारी 1986)
1936 : ‘सुभाष भेंडे’ – लेखक यांचा जन्म. (मृत्यू : 20 डिसेंबर 2010)
1939 : ‘राल्फ लॉरेन’ – राल्फ लॉरेन कॉर्पोरेशनचे संस्थापक यांचा जन्म.
1940 : ‘क्लिफ रिचर्ड’ – भारतीय-गायक-गीतकार आणि अभिनेते यांचा जन्म.
1950 : ‘सेकंड लेफ्टनंट अरुण खेतरपाल’ – परमवीर चक्र, भारतीय सैन्यातील अधिकारी यांचा जन्म.
1958 : ‘उस्ताद शाहिद परवेझ’ – इटावा घराण्याचे सतार वादक यांचा जन्म.
1981 : ‘गौतम गंभीर’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
आजचा दिनविशेष - मृत्यू :
1919 : ‘जॉर्ज विलहेम फॉन सिमेन्स’ – जर्मन उद्योगपती यांचे निधन. (जन्म : 30 जुलै 1855)
1944 : ‘एर्विन रोमेल’ – जर्मन सेनापती यांचे निधन. (जन्म : 15 नोव्हेंबर 1891)
1947 : ‘नरसिंह चिंतामण केळकर’ – साहित्यसम्राट यांचे निधन. (जन्म : 24 ऑगस्ट 1872)
1953 : ‘र. धों. कर्वे’ – संततिनियमन आणि लैंगिक शिक्षणसाठी विचारप्रवर्तन व प्रत्यक्ष कार्य करणारे विचारवंत यांचे निधन. (जन्म : 14 जानेवारी 1882)
1993 : ‘लालचंद हिराचंद दोशी’ – वालचंद उद्योगसमूहाचे अध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 24 ऑक्टोबर 1904)
1994 : ‘सेतू माधवराव पगडी’ – इतिहासकार, विचारवंत, संशोधक यांचे निधन. (जन्म : 27 ऑगस्ट 1910)
1997 : ‘हेरॉल्ड रॉबिन्स’ – अमेरिकन कादंबरीकार यांचे निधन. (जन्म : 21 मे 1916)
1999 : ‘ज्युलिअस न्येरेरे’ – टांझानियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 13 एप्रिल 1922)
2004 : ‘दत्तोपंत ठेंगडी’ – स्वदेशी जागरण मंच, मजदूर संघ व कामगार संघ यांचे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 10 नोव्हेंबर 1920)
2013 : ‘मोहन धारिया’ – केन्द्रीय मंत्री व सामाजिक कार्यकर्ते यांचे निधन. (जन्म : 14 फेब्रुवारी 1925)
2015 : ‘राधाकृष्ण हरिराम तहिलियानी’ – भारतीय नौसेनाधिपती यांचे निधन. (जन्म : 12 मे 1930)
No comments:
Post a Comment